एक प्यार ऐसा भी 9

Marathi love story

अनुश्री कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होऊ लागली, कोणता ड्रेस घालायचा? हे निवडण्यातच खूप वेळ निघून गेला. शेवटी कशीबशी तिने बेबी पिंक कलरची वनपीस घालण्यासाठी घेतली. त्याच्या मॅचींगची कलर बांगडी आणि एका हातात घड्याळ असं घालायचे तिने ठरवले.

आता इतक सगळं घालून ऑफिसला आपल्या गाडीवरून जायचं कसं? हा मोठा प्रश्न तिला पडला. मग तिने लगेच सावनीला फोन केला, "साऊ ऑफिसला कशी जाणार आहेस? मला तर माझ्या गाडीने जायला जमेल की नाही शंका वाटत आहे ग, म्हणून विचारत आहे."

"अगं अनु, आपण टॅक्सी करून जाऊ ना, नाहीतर रिक्षाने जाऊ म्हणजे बरं होईल ग, मला पण तोच प्रश्न पडला होता. मी तुला फोन करणारच होते. तू तयार होऊन ये, मी सुद्धा येऊन खाली थांबते. मग दोघी मिळून जाऊ." सावनी.

"हो चालेल, मी येते ग." असे म्हणून अनुश्रीने फोन ठेवला.

अनु एक एक करत तिचे आवरु लागली, तिने वन पीस घातला, नंतर केस विंचरून मोकळे सोडले, हलकासा मेकअप केला, हलकीशीच लिपस्टिक लावली, बाकी तिला नटायला जास्त आवडत नव्हतेच आणि तशीही बिना मेकपचीही ती खूप सुंदर दिसत होती. तिने तिचे पूर्ण आवरले आणि ती ऑफिसला जायला निघाली. अनुश्री रिक्षा पकडून सावनीच्या घरी जाऊन मग दोघी मिळून ऑफिसला जाणार होत्या.

सावनी आणि अनुश्री दोघी मिळून रिक्षाने ऑफिसला गेल्या. ऑफिस समोर रिक्षा थांबली आणि दोघीही आतमध्ये गेल्या. तिथे अजून बरेच जण यायचे बाकी होते. थोडे जण आले होते, अनीश देखील अजून आला नव्हता. त्या दोघी जवळच असलेल्या खुर्चीत बसल्या. थोड्या वेळाने हळूहळू एकेक करत सगळे जण येऊ लागले. सगळे जण आले तरी अनीश काही आला नाही. अनुश्रीचे डोळे फक्त आणि फक्त अनीशची वाट पाहत होते.

"काय ग? कोणाची वाट पाहत आहेस?" सावनी

"कोणाची नाही ग? सगळे आलेत का पाहत होते? म्हणजे कार्यक्रम चालू होईल ना म्हणून." अनुश्री

"अच्छा, मला वाटलं की कुणाला तरी शोधत आहेस. कार्यक्रम काय ठरलेल्या वेळी सुरू होईल. तू बिंदास्त बस. पण तुझं माझ्या बोलण्याकडे देखील लक्ष नाही ग अनु, तू खूप उदास दिसत आहेस. कोणी येणार आहे का?" सावनी

"नाही ग, ते आई बाबांना यायला जमलं नाही ना म्हणून असेल. तू बोल ना, मी ऐकतेय." अनुश्री

असे म्हणून अनुश्री आणि सावनी दोघीही बोलू लागल्या. थोड्या वेळातच सगळेजण तिथे जमले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनुश्री अनीशला शोधू लागली, पण अनीश तिला कुठेच दिसला नाही.

\"अनीश आला आहे की नाही, कुठे दिसत तर नाही? त्याला फोन करू का? पण आता कार्यक्रम सुरू झाला आहे आणि शेजारी सावनी देखील बसली आहे, तिला समजेल ना.. जाऊ दे त्यापेक्षा एक मेसेज टाकू अनीशला.\" असे मनात म्हणत तिने अनीशला मेसेज केला. "तू अजून आला नाहीस का? कुठे आहेस? मला दिसत नाहीस." असा मेसेज केला. थोड्या वेळाने रिप्लाय आला, "येतच आहे मी हॉलमध्ये, साॅरी थोडा उशीर झाला मला." ते पाहून अनुश्रीने डोक्यावर टपली मारली. \"त्याचं नेहमीचेच आहे प्रत्येक गोष्टीत हा उशीर करतो, कधीच वेळेत येत नाही?\" असे ती मनातल्या मनात म्हणाली.

स्टेजवर सरांचे बोलणे झाल्यावर एक एक जणांचे नाव अनाउन्स करू लागले, अनीशची हॉलमध्ये एंट्री झाली आणि त्याच्या कानावर अनुश्री देशमुख हे नाव पडले, तो येऊन त्याच्या जागेवर बसला आणि समोर पाहतो तो काय? अनुश्री अॅवाॅर्ड घेण्यासाठी स्टेजवर गेली होती, तिला पाहून तर अनीशची विकेटच उडाली, किती सुंदर दिसत आहे ही! वाव! असं म्हणून तो फक्त तिच्याकडे बघू लागला.

अनुश्रीला अॅवाॅर्ड मिळाल्याबद्दल दोन शब्द बोलण्याची विनंती केल्यावरून ती बोलू लागली, "हा माझा पहिलाच प्रोजेक्ट होता, खरंतर मी कंपनीमध्ये आता आत्ताच जॉईन झाली आहे, तरीसुद्धा कंपनीने माझ्यावर विश्वास ठेवून मला या प्रोजेक्टमध्ये सामिल करुन घेतले, त्याबद्दल सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मला वेळोवेळी गाईड केल्याबद्दल ग्रुपचे कॅप्टन अनीश सर यांचे देखील खूप खूप आभार, धन्यवाद." असे म्हणून अनुश्री खाली येऊन तिच्या जागेवर बसली.

सगळ्यांना एक एक करत अॅवाॅर्ड देण्यात आले. अनीशला देखील बेस्ट कॅप्टन म्हणून अवॉर्ड मिळाला. सगळेच खूप खूश होते. आता कार्यक्रम झाल्यानंतर ऑफिस तर्फे जेवण होते, अर्थातच पार्टी होती, कार्यक्रम संपल्यावर अनीश अनुश्रीला भेटण्यासाठी म्हणून गेला. तर इकडे अनुश्री देखील अनीशला शोधत होती, आता तो तिच्या समोर आला आहे तर तिला काय बोलायचे? ते सुचेना. अनीश तर फक्त तिच्याकडेच बघत होता.

"छान दिसत आहेस." अनीश

"थँक्यू." असे म्हणत अनुश्री थोडीशी लाजली, इतक्यात तेथे समर आला आणि तो तिचे कौतुक करू लागला. ते पाहून अनीशला कसेसेच वाटू लागले. "हा आता का मधे टपकला." असे तो मनातच म्हणाला. अनुश्री देखील नेहमीप्रमाणे त्याच्या सोबत बोलत होती, ते पाहून अनीशला आणखीनच राग आला आणि तो रागाने तिथून निघून गेला. थोडा वेळ समरशी बोलून झाल्यावर ती अनीशला शोधू लागली, पण तो तिला कोठेच दिसला नाही, नंतर अनुश्रीला अनीश एका कोपऱ्यात खुर्चीत बसलेला दिसला. ती त्याच्या जवळ गेली आणि "काय झाले? तू इथे का येऊन बसलास?" असे म्हणाली

"तू जा ना, त्या समरशी बोल जा, माझ्याशी बोलायला कशाला आली आहेस?" अनीश थोडा रागातच म्हणाला

"का? त्याच्याशी बोललेलं तुला आवडलं नाही का?" अनुश्री

"खूप आवडलं, म्हणून तर म्हणालो ना. त्याच्याशी बोलायला जा म्हणून." अनीश

"अरे, इतकं का चिडतोस? शांत हो बघू. काय झालं सांग मला." अनुश्री

"काही नाही, तू त्याच्याशी बोल जा." असे म्हणत अनीशने तिचा हात झटकला ते पाहून अनुश्रीला देखील राग आला, तरी ती थोडी शांत बसली.

"मी त्याच्याशी बोललेलं तुला आवडतं नाही का? स्पष्ट सांगायचं रे, मला कसं कळणार?" अनुश्री शांतपणे म्हणाली.

"आता समजलं ना, मग बोलत जाऊ नकोस." अनीश

"पण का?" अनुश्री

"तो तुझ्याशी जास्त फ्लर्ट करतो, जे मला अजिबात आवडत नाही." अनीश

"का? तसेही मी तुझ्यासोबत आणि ऑफिसमधील सगळ्यांशीच बोलते, मग समरशी का बोलायचं नाही? तो फक्त मलाच नाही सगळ्यांशीच फ्लर्ट करतो, त्याचा तो स्वभाव आहे, पण मीच त्याच्याशी बोललेलं तुला का आवडत नाही?" अनुश्री

"कारण तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. तुझ्यासोबत कोणी असं वागलं तर ते मला आवडत नाही." असे म्हणून अनीश शांत झाला.

\"हुश्श! म्हणजे याच्या मनात तसे काही नाही, हा फक्त एक मैत्रीण म्हणून माझ्याशी बोलतो, ही सावनी काहीही बरळते.\" असे अनुश्री मनातच म्हणाली. तर अनीश तिला प्रपोज कधी करायचं याचा विचार करत होता. इतक्यात सावनी आली.
"काय चाललंय दोघांच गुलुगुलु?" सावनी

"सावी, गप्प बस. काहीही बरळू नकोस." अनुश्री तिला शांत करत होती.

"काही नाही, तुमच्या मैत्रीणी कडून पार्टी मागतोय. स्टेजवर तर माझे नाव घेतले तिने, पण त्या बदल्यात पार्टी देत नाहीत ना मॅडम." अनीश थोडीशी खेचतच म्हणाला.

"दे ग पार्टी, इतकं पहिल्या नंबरचा अॅवाॅर्ड मिळाला आणि त्या बदल्यात पार्टी नको का द्यायला?" सावनी पण अनीशच्या बाजूने बोलू लागली.

"हो हो, देईन की, मी कुठे नाही म्हणतेय?" अनुश्री

"ये बात. मग मी पण आहे बरं का? येऊ ना की कबाब मै हड्डी होईल." सावनी हसतच म्हणाली.

"आता गप्प बसतीस का?" अनुश्री थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"ओह् साॅरी साॅरी." सावनी

\"खरंतर मी आणि अनुश्रीच जायचं आहे. देवा काहीतरी कर पण आम्हा दोघांना एकत्र जायची संधी दे. मग मी अनुला प्रपोज करेन." अनीश मनातच म्हणाला.

"अग सावू चल ना जाऊया आपण, खूप उशीर झालाय ग. खूप रात्र होत आली आहे, लवकर गेलेले बरे आपल्याला." अनुश्री

"हो ग, माझ्या तर लक्षातच आले नाही खूप उशीर झाला ते, चल जाऊ आपण." असे म्हणून दोघी जायला निघाल्या, इतक्यात अनीश म्हणाला, "मी सोडू का तुम्हाला?"

"हो हो, सोडायला आलास तर बरं होईल, खूप उशीर झालाय." असे सावनी म्हणताच अनुश्रीने तिचा हात पकडला आणि "नको आमचं आम्ही जाऊ." असे ती म्हणाली

"जाऊ काय जाऊ, इतक्या रात्री रिक्षा वेळेत मिळायला हव्यात ना, आधीच खूप उशीर झाला आहे, मला सोडून तू पुढे एकटी कशी जाशील?" सावनी

"जाईन माझी मी, चल जाऊ आपण." अनुश्री असे म्हणत सावनीचा हात धरून तिला नेऊ लागली, इतक्यात सावनी "काही नको, अनीश सोडेल आपल्याला, चल रे अनीश." म्हणाली.

सावनी असे म्हणताच अनीश लगेच तयार झाला, एक दोन मिनिटात येतो तुम्ही थांबा असे म्हणून तो कुठेतरी जाऊन लगेच आला आणि मग त्याने त्याची गाडी काढली, सावनी आणि अनुश्री गाडीत पाठीमागे बसल्या.

"हॅलो मॅडम, मी काही तुमच्या दोघींचा ड्रायव्हर नाहीये, कोणीतरी पुढे येऊन बसा." असे अनीश म्हणाला.

"अरे हो की, माझ्या लक्षातच आले नाही. अनु तू जा बघू पुढे, कारण मला लगेच उतरायचं आहे नंतर तू पुढे जाणार आहेस, चल जाऊन बस पुढे." सावनी

"काय वैताग आहे नुसता? तरी मी नको म्हणत होते याच्या सोबत यायला, तूच घेऊन आलीस आणि आता इथे बस आणि तिथे बस." असे म्हणत रागारागाने अनुश्री गाडीतून खाली उतरली आणि पुढच्या सीटवर जाऊन बसली. मग अनीशने गाडी सुरू केली आणि एफएम सुरू केला, तर त्याच्यावर एक सुंदर रोमँटिक गाणं लागलं होतं..

ओल्या सांजवेळी...
ओल्या सांजवेळी ऊन सावलीस बिलगावी,
तशी तू जवळी ये जरा..
कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी,
तशी तू हलके बोल ना..
आभाळ खाली झुके पावलांखाली धुके,
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना?

हे गाणं अनुश्रीच्या खूप आवडीचं होतं. ती ते गाणे ऐकत डोळे बंद करून पाठीमागे टेकून गाण्याचा आस्वाद घेत बसली. अनीशचेही हे गाणे आवडीचे असल्यामुळे तोही एन्जॉय करत गाडी चालवत होता. इतक्यात समोरून एक मुलगा आडवा आला आणि अनीशने एकदम ब्रेक दाबला.

आता काय होईल? त्यांचा अॅक्सिडेंन्ट तर होणार नाही ना? की कोणाला लागेल? काय घडेल हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशःअनुश्री कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होऊ लागली, कोणता ड्रेस घालायचा? हे निवडण्यातच खूप वेळ निघून गेला. शेवटी कशीबशी तिने बेबी पिंक कलरची वनपीस घालण्यासाठी घेतली. त्याच्या मॅचींगची कलर बांगडी आणि एका हातात घड्याळ असं घालायचे तिने ठरवले.

क्रमशः

🎭 Series Post

View all