एक प्यार ऐसा भी 7

Marathi love story

आज अनीश आणि अनुश्री प्रोजेक्टच्या प्रेझेन्टेशन साठी जाणार होते. अनुश्री नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेवर येऊन पोहोचली, पण अनीश अजून आला नव्हता. ऑफिसच्या खाली येऊन अनुश्रीला साधारण अर्धा तास झाला, तरीही अनीश आला नाही. अनुश्री फोन करू लागली पण अनीश काही केल्या फोनही उचलेना. आता मात्र अनुश्रीला भीती वाटू लागली, "हा नक्की ठरलेल्या वेळेवर येईल ना. प्रेझेन्टेशनला उशीर झाला तर, हे माझे पहिलेच प्रेझेंटेशन आहे आणि मला खूप भीती वाटत आहे. थोडा वेळ आधी जाऊन तिथे तयारी केली तर बरं होईल, पण त्याला याचं काहीच नाही कामाच काही गांभीर्यच नाही, राजे अगदी निवांत येत आहेत." असा विचार तिच्या मनामध्ये चालू होता आणि ती इकडून तिकडे फिरत होती. इतक्यात एक फोर व्हीलर येऊन तिथे थांबली. तिने निरखून पाहिले तर त्यामध्ये अनीश होता.

"राजे अवतरले एकदाचे." असे मनात म्हणून ती गाडीत जाऊन बसू लागली. अनुश्री पाठीमागच्या शीटवर बसत होती ते पाहून "मॅडम, मी तुमचा ड्रायव्हर नाही, पुढे बसा." असे अनीश म्हणाला. तेव्हा "बरं" म्हणून अनुश्री पुढे बसली.

"इतका का उशीर? तिथे पोहोचायला उशीर झाला तर, मला आधी जाऊन तयारी करावी लागेल ना. सगळे जण येऊन बसले असतील तर, काय काय करायचे मला तर काहीच समजेना? एक तर तू उशीर केला आहेस, त्यात मला खूप भीती वाटत आहे." अनुश्रीची गाडी मध्ये बसल्या बसल्या बडबड सुरू झाली.

"शु शुऽऽ थोडी शांत बस ना, बसल्या बसल्या आपली कचर कचर सुरू झाली का? काही उशीर होत नाही आणि आपण अगदी वेळेत तिथे पोहोचलेलो असेन. तू काय बोलायचे ते ठरवून ठेवले आहेस ना, मग झालं तर आणि भीती वाटण्याचे काही कारण नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, मग इतकी का घाबरतेस? होईल हळूहळू सवय तुला. तुझी पहिलीच वेळ आहे तुला थोडीशी भीती वाटत असेल सहाजिकच आहे. पण टेन्शन घेऊ नकोस." अनीश म्हणाला

अनीशच्या या बोलण्याने अनुश्रीला थोडासा धीर आला आणि ती थोडी रीलॅक्स झाली. फोर व्हिलर असल्याने ते दोघेही अगदी वेळेत किंबहुना लवकरच त्या ठिकाणी पोहोचले.

अनुश्री प्रेझेंटेशनची तयारी करु लागली, इतक्यात सगळे मेंबर जमले. अनुश्रीने प्रेझेंटेशनला सुरुवात केली, ती एक एक पॉईंट समजावून सांगत होती, अनीशने देखील अधून मधून तिला मदत केली, तिथले सगळे मेंबर अनीशला ओळखत होते, कारण अनीशने या आधी सुद्धा दोन-तीन प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन त्यांना दिले होते, म्हणून त्या लोकांनी अनीश पेक्षा अनुश्रीकडे जास्त फोकस केले होते. अनुश्री बाहेरून व्यवस्थित प्रेझेंटेशन देत असली तरी मनातून ती खूप घाबरली होती, कारण इतक्या लोकांसमोर प्रेझेंटेशन देण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. तरीही ती थोडे धाडस करत प्रेझेंटेशन द्यायला लागली.

सगळे प्रेझेंटेशन सांगून झाल्यावर अनुश्रीला थोडेसे हायसे वाटले, ती तिच्या जागी जाऊन बसली, नंतर मग सगळे मेंबर्स एक एक करुन तिला प्रश्न विचारू लागले. त्या सगळ्या प्रश्नाने ती एकदम गोंधळून गेली आणि कशाचे उत्तर कुणाला द्यावे? हेच तिला समजेना. ती तशीच स्तब्ध उभी राहिली आणि ते मेंबर्स एका पाठोपाठ अनेक प्रश्नांचा भडीमार करु लागले. तिची ती अवस्था पाहून अनीशला समजले की, अनुश्री घाबरून गेली आहे, म्हणून तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तेवढ्यात एक व्यक्ती म्हणाला, "मिस्टर अनीश, तुम्हाला नाही विचारलं आम्ही अनुश्री मॅडमना प्रश्न विचारलेला आहे, त्यांनाच सांगू देत त्या आमच्या प्रश्नांची उत्तर देऊ दे."

अनीश म्हणाला, "हो हो त्याच तर उत्तर देणार आहेत आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. इतकं छान प्रेझेंटेशन त्यांनी दिलंय म्हटल्यानंतर त्यांना उत्तरे द्यायचं काय अवघड आहे?" असे म्हणत असतानाच त्याने हळुवार तिचा हात आपल्या हातात घेतला आणि मी तुझ्यासोबत आहे, अशी भावना तिला पोहोचवली. अनीशने हातात हात घेतल्याबरोबर अनुश्री मनातून थोडी शांत झाली आणि तिने एकेक जण प्रश्न विचारा, मी प्रत्येकाचे उत्तर देईन असे म्हणाली. तेव्हा एक एक जण प्रश्न विचारू लागले आणि ती उत्तरे देऊ लागली. हे सगळे झाल्यावर उत्तर देत असताना तिच्या मनामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला आणि ती एकदम बिनधास्तपणे बोलू लागली. ते पाहून त्या लोकांना समजून आले की, हा प्रोजेक्ट तिनेच बनवला आहे आणि त्यांना अनुश्रीने दिलेली उत्तरे देखील खूप आवडली, म्हणून त्यांनी हा डील फायनल केला.

डील फायनल झाली म्हणून दोघेही खूप खूश झाले. अनुश्रीला तर आनंद गगनात मावेनासा झाला. सगळे गेल्यानंतर अनुश्री तर आनंदाने उड्या मारू लागली, तिचा पहिलाच प्रोजेक्ट यशस्वी झाला म्हणून तिला खूपच आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तिने अनीशला मीठी मारली. थोड्या वेळाने शरमेने ती बाजूला झाली आणि आपण आनंदाच्या भरात हे काय केले असे मनात म्हणून डोक्यावर हात मारून घेतली.

पण अनीशला ती मीठी सुखावणारी होती. जेव्हा जेव्हा अनुश्री त्याच्या जवळ येई, तेव्हा तेव्हा त्याच्या मनामध्ये एक प्रकारचे समाधान वाटे. याआधी त्याला असे कधीच झाले नव्हते पण अनुश्री जेव्हा जवळ येई तेव्हा त्याला खूप आनंद होई.

थोड्या वेळाने तिथून सगळे आवरून ते दोघेही घरी यायला निघाले. घरी येत असतानाच मध्येच त्यांची गाडी बंद पडली म्हणून अनीश खाली उतरून काय झाले ते पाहू लागला, तर त्याला काही समजेना, म्हणून त्याने मेकॅनिकलला फोन लावला. थोड्या वेळातच मेकॅनिकल तेथे आला, त्याने हे सर्व पाहिले आणि तो म्हणाला, "गाडी गॅरेजला घेऊन जावी लागेल इथे दुरुस्त होणार नाही." तेव्हा अनीशला खूप राग आला, "अशी कशी मधेच गाडी बंद पडली काय माहित? प्रत्येक वेळी मी चेक करून येतो, तरी ड्रायव्हरला सांगितलं होतं मी गॅरेजला नेऊन आणायला आणि आता कशी काय बंद पडली?" म्हणून तो राग करू लागला. अनुश्रीने त्याच्या जवळ जाऊन "असू दे ना. आपण जाऊ एखादी कॅब किंवा वडाप करून." अनुश्री म्हणाली.

"काय कॅब किंवा वडाप.. मी कधीच गेलो नाही वडापने." अनीश

"मग कॅबने जाऊ." अनुश्री

"आता एवढ्यात कॅब मिळेल का?" अनीश

"मग काय करणार आहेस तू?" अनुश्री

"बघू पहिला गाडी गॅरेजला घेऊन जायला सांगतो." असे म्हणून अनीशने त्या मेकॅनिकलला गाडी गॅरेजला घेऊन जायला सांगतो आणि ते दोघे तिथेच थांबतात.

अनीशने कॅबला फोन लावला, पण तो काही फोन उचलेना म्हणून तो आणखीनच चिडला. अनुश्री त्याला म्हणाली, "थोडे पुढे जाऊ आणि मग बघू." असे म्हणून दोघेही चालत जाऊ लागले. पुढे गेल्यावर अनुश्रीला पाणीपुरीचा गाडा दिसला.

"अनीश चल, आपण पाणीपुरी खाऊया. मला खूप आवडते." अनुश्री म्हणाली

"अशा ठिकाणचे पाणीपुरी खातेस. पाणी कसलं असतं. स्वच्छता नसते इथे. नको चल आपण एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ." अनीश

"अरे, चल तरी एकदा खाऊन तर बघ. मला पाणीपुरी खाण्यामध्ये कोणी हरवू शकत नाही. मी खूप पाणीपुरी खाते, चल आपण रेस लावू." अनुश्री

"नको मला नाही आवडत. तुझी तू खा." अनिश

"अरे चल तर पहिला." म्हणून अनुश्रीने अनीशला ओढून नेले. तिथे गेल्यावर अनुश्री दोन प्लेट पाणीपुरी म्हणून सांगते, अनीश नको नको म्हणत असतानाही त्याला पाणीपुरी खायला लावते आणि ती सुद्धा मनसोक्त पाणीपुरी खाते. पाणीपुरी खाऊन झाल्यावर अनीश बिसलरीची बाॅटल घेतो.

"कसला रे तू? एखाद्या श्रीमंत बापाचा मुलगा असल्यासारखा वागतोस. इतकं काय होतं? आमच्याकडे असं सगळं चालतं. आम्ही नेहमी गाड्यावरचे आवडीने खातो. आम्हाला काहीच होत नाही. तुझं म्हणजे हाय-फाय लेवलच, जणु काही तू अंबानीचा मुलगा असल्यासारखंच वागतोस." अनुश्री हसत हसत म्हणाली

"तसे काही नाही, बस स्वच्छता हवी ना. मला असलं अस्वच्छ आवडत नाही म्हणून." अनीश

"चला आता कॅब वगैरे काही येणार नाही, आपल्याला वडापनेच जावं लागेल, नाहीतर बसने जाऊ, पण बस वेळेत येत नाही, त्यामुळे एवढा वेळ वाट बघण्यापेक्षा आपण वडापनेच जाऊ, ही माझी ऑर्डर आहे." अनुश्री

"जशी तुझी इच्छा, आता मी काय बोलणार, पण वडाप मध्ये खूप गर्दी असते आणि मला गर्दी अजिबात आवडत नाही. पण आता काही इलाज नाही मॅडम." असे म्हणून तिच्या पाठोपाठ जाऊ लागला.

थोडे पुढे गेल्यानंतर तिथे एक वडाप दिसली अनुश्रीने कुठे जाणार? म्हणून विचारलं अनीशला त्या वडाप मध्ये बसण्यास सांगितले. अनीश काही केल्या बसत नव्हता, म्हणून अनुश्री स्वतः जाऊन आत मध्ये बसली. मग नाईलाजाने त्याला ही तिच्या पाठोपाठ जाऊन बसावे लागले.

वडाप मध्ये गर्दी असल्याने अनीशला अनुश्री जवळ एकदम चिकटून बसावे लागले. अनुश्री थोडी अवघडली. "वडापच्या नादात इतक जवळ बसायला लागेल हे आपल्या डोक्यात कसे आले नाही?" असे ती मनातच म्हणाली.

वडापमध्ये एकदम चिकटून बसलेले असल्यामुळे दोघेही इतके चांगले मित्र असूनही अनोळखी सारखे बसले होते. अनुश्री तर अवघडून बसली होती. नंतर ते दोघे आपापल्या घरी गेले. अनीश खूप खूश होता. प्रोजेक्टच्या निमित्ताने का होईना ते दोघे आज पहिल्यांदाच एकांतात गेले होते. तो आता अनुश्रीला प्रपोज करण्याची स्वप्ने पाहू लागला होता. अनुश्रीला तो त्याची भावी जीवनसाथी म्हणून तिच्याकडे पाहू लागला होता. एक दिवस ती नक्कीच माझी होईल असे तो झोपेत स्वप्न पाहू लागला होता. रोज रोज अनुश्री बद्दल विचार करता करता त्याच्या मनामध्ये तिने कधी घर केले हे त्याचे त्यालाच समजले नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सावनी अनुश्रीकडे धावतच आली आणि ती अनुश्रीला म्हणाली, "अगं अनु, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. ग्रेट यार तू आत्ताच तर जॉईन झाली आहेस आणि तुझी इतकी मोठी प्रगती झाली, मला खूप आनंद झाला आहे. खूप छान अनु."

"काय आहे गुड न्यूज सांग ना? सावनी" अनुश्री उत्सुकतेने विचारू लागली.

"सर अनाउन्स करतीलच. तुला समजलं ग आता." असे म्हणून सावनी तिथून निघून गेली, पण अनुश्री मात्र कोणती गुड न्यूज आहे याचा विचारच करत बसली.

काय असेल गुड न्यूज? अनुश्रीला काही मिळणार आहे का? हे आपण पुढच्या भागात पाहू.
क्रमशःआज अनीश आणि अनुश्री प्रोजेक्टच्या प्रेझेन्टेशन साठी जाणार होते. अनुश्री नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेवर येऊन पोहोचली, पण अनीश अजून आला नव्हता. ऑफिसच्या खाली येऊन अनुश्रीला साधारण अर्धा तास झाला, तरीही अनीश आला नाही. अनुश्री फोन करू लागली पण अनीश काही केल्या फोनही उचलेना. आता मात्र अनुश्रीला भीती वाटू लागली, "हा नक्की ठरलेल्या वेळेवर येईल ना. प्रेझेन्टेशनला उशीर झाला तर, हे माझे पहिलेच प्रेझेंटेशन आहे आणि मला खूप भीती वाटत आहे. थोडा वेळ आधी जाऊन तिथे तयारी केली तर बरं होईल, पण त्याला याचं काहीच नाही कामाच काही गांभीर्यच नाही, राजे अगदी निवांत येत आहेत." असा विचार तिच्या मनामध्ये चालू होता आणि ती इकडून तिकडे फिरत होती. इतक्यात एक फोर व्हीलर येऊन तिथे थांबली. तिने निरखून पाहिले तर त्यामध्ये अनीश होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all