एक प्यार ऐसा भी 4

marathi love story

अनीशने अनुश्रीला प्रोजेक्ट बनवण्यासाठी काही टिप्स दिल्या आणि त्याप्रमाणे अनुश्रीने प्रोजेक्टसाठी माहिती गोळा करायला सुरुवात केली. माहिती बघताना म्हणजेच सर्च करताना जे मुद्दे योग्य वाटतात, ते ती कागदावर टिपून घेऊ लागली. ती दिवसभर त्याच कामात होती. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर डबा घेऊन सावनी सोबत ती कॅन्टीनमध्ये गेली. कॅन्टीनमध्ये गेल्यावर तिला अनीश दिसला नाही. ती सगळी कडे पाहू लागली. पण तो कुठेच दिसला नाही.

"काय ग, कुणाला शोधतेस?" सावनी

"अनीशला, तो जेवायला आला नाही का? कुठे दिसतच नाही ग." अनुश्री

"असेल ग इथेच कुठेतरी? तू जेव." सावनी

"दिसत नाही ग कुठेच? बहुतेक आला नसेल. मी पाहू का?" अनुश्री म्हणाली. इतक्यात समर तिथे आला, त्याला पाहून अनुश्री गप्प बसली.

"हॅलो, मी इथे बसू का?" समर

"हो. बसा ना सर." सावनी असे म्हटल्यावर समर लगेच तिथे बसला. सगळे जेवण करू लागले. पण अनुश्रीचे लक्ष सगळे अनीश कडे होते, म्हणून तिने एकही घास खाल्ला नव्हता. समर आणि सावनी मात्र गप्पा मारत जेवत होते.

"तू का जेवत नाहीस? जेव ना. नाहीतर सुट्टी संपेल." समर

"हो जेवते, पण माझे एक महत्त्वाचे काम आहे, मी आलेच, तुम्ही चालू करा." असे म्हणून अनुश्री डबा घेऊन अनीशकडे गेली. अनीश त्याच्या डेस्कवर काम करत बसला होता.

"आज कामामुळे जेवायचं लक्षात देखील नाही का? काम इतकं महत्त्वाचं आहे का? जेवायचं देखील विसरलास." अनुश्री

"तसे काही नाही. थोडं काम होतं. जेवीन नंतर." अनीश

"मग कधी? मला काही सांगू नकोस. चल बघू जेवायला." अनुश्री

"अग, मी डबा आणला नाही." अनीश

"का? स्वयंपाक झाला नव्हता का?" अनुश्री

"झाला होता. मीच गडबडीत विसरून आलो." अनीश

"अरे, मग कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घे. उपाशी राहू नकोस." अनुश्री

"नाही नको, मला थोडा पित्ताचा त्रास होत आहे. ते जेवण सोसणार नाही, पित्त आणखी वाढेल." अनीश

"मग माझ्या डब्यातील तुला चालेल का? नाही म्हणजे मी सहजच विचारले, तुला चालत असेल तर बघ, नाहीतर राहू दे. म्हणजे एकेक जण असे खात नाहीत ना म्हणून म्हणाले." अनुश्री

"न चालायला काय झालं? धावेल की, पण तुला कमी पडेल ना. मीच सगळं खाऊ लागलो तर तू उपाशी राहशील." अनीश

"नाही पडणार. मी थोडं जास्तच आणलंय. कुठे बसूयात. चल मग इथेच बसून खाऊया." म्हणून अनुश्रीने तिथेच बसून तिचा डबा उघडला.

डबा उघडल्याबरोबर "अरे वा! भेंडी. माय ऑल टाइम फेवरेट. किती छान." असे म्हणून अनीशने ताव मारायला सुरुवात केली.

"हळू खा. नाहीतर ठसका लागेल." अनुश्री

"मॅडम, तुम्ही पण घ्या. डब्बा तुमचाच आहे." असे म्हणून अनीशने डब्बा अनुश्रीच्या समोर ठेवला, मग दोघांनी मिळून डब्यातून जेवण केले.

"अहाहा! भेंडी मस्त झाली होती हं. सांग काकूंना." अनीश

"काकूंना का सांगू?" अनुश्री

"त्यांनी बनवली ना भाजी म्हणून." अनीश

"आईने नाही, मी बनवली आहे." अनुश्री असे म्हणताच अनीश आश्चर्यचकित झाला.

"काय सांगतेस काय? तुझ्याकडे बघून वाटत देखील नाही, की तुला स्वयंपाक बनवता येतो! तू खोटं बोलत आहेस ना." अनीश

"मी खोट बोलत नाही आणि तसे कुठे लिहिलेले असते का? बघून कसे कळणार की स्वयंपाक येतो का नाही ते? काहीही असतं तुझं." अनुश्री

"तसे नाही ग. पण सुंदर मुलींना स्वयंपाक येत नसावा असे माझे वैयक्तिक मत होते, पण ते साफ चुकीचे झाले, म्हणजे तू चुकीचे केलेस." अनीश

"काहीही हं. तुझं तर जगावेगळं असतं बघ." अनुश्री

"अगं खरंच, मला तसंच वाटत होतं. सुंदर मुलींना स्वयंपाक बनवता येत नसेल. पण आता पटलं बरं का?" अनीश

"काय? मी सुंदर आहे ते की मला स्वयंपाक बनवता येतो ते." अनुश्री त्याला चिडवण्यासाठी म्हणाली.

"दोन्हीही." अनीश. अशा गप्पा मारताना जेवणाची सुट्टी संपली आणि सगळे परत कामाला लागले.

जेवण झाल्यावर अनुश्रीने पुन्हा प्रोजेक्टसाठी सुरुवात केली. हा प्रोजेक्ट तिला एकटीला करता यावा यासाठी तिची अनेक धडपड चालू होती. अनीश तिला फक्त आदेश देत होता, बाकी काम अनुश्री तिची तीच करत होती. ती जरी नवीन असली तरी थोडाफार अनुभव तिला होता आणि तिलाही कुणीही मदत केलेली अजिबात आवडत नव्हते, म्हणून ती स्वतः देखील प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिला भरपूर शिकता येणार होते.

तिच्या प्रोजेक्टसाठी ती माहिती गोळा करू लागली. त्यात तिला काही अडचण आलीच तर ती अनीशला विचारू लागली. दिवस सगळा प्रोजेक्ट कसा बनवायचा? या प्लॅनिंग मध्येच गेला.

ऑफिस सुटायची वेळ झाली. अनुश्रीला हवी तशी माहिती मिळाली नाही, पण अजून बरेच दिवस होते प्रोजेक्ट सबमिट करायला, तसेच त्यांना बेस्ट प्रोजेक्ट सबमिट करायचा होता. जेणेकरून तो प्रोजेक्ट सरांच्या पसंतीला उतरेल. त्यामुळे ते दोघेही त्या प्रोजेक्टसाठी घाई करणार नव्हते. शिस्तीत दोघांचे एकमत करूनच प्रोजेक्ट बनवणार होते. ऑफिस सुटल्यावर अनुश्री तिथेच थांबली होती, कारण तिला अनीशचा नंबर हवा होता. प्रोजेक्टसाठी काही काम असेल तर विचारता येईल म्हणून. पण कसे विचारावे? या विचारात ती तिथेच उभी होती. इतक्यात अनीश तिथे आला.

"काय मॅडम, घरी जायचं नाही का? की इथेच वस्ती करायचा विचार आहे." अनीश तिची चेष्टा करत म्हणाला.

"हो, जायच आहे ना. जाईन लगेच." असे म्हणून अनुश्री तिथेच थांबली.

"मग इथे का थांबली आहेस? कुणी येणार आहे का?" अनीश

"नाही. थोडं तुझ्याकडेच काम होतं." अनुश्री

"बोल ना मग." अनीश

"अरे तुझा नंबर हवा होता." अनुश्री

"कशाला?" अनीश

"प्रोजेक्ट साठी काही लागलं तर विचारता येईल म्हणून. तुला द्यायचं असेल तरचं दे. म्हणजे काही अडचण आली तर तुला फोन करता येईल. सगळ्यांकडे आहे. फक्त आपल्याकडेच नाही एकमेकांचा नंबर." अनुश्री

"उगाच त्रास देणार नाहीस ना. मगच देईन नंबर. नाहीतर राहू दे." अनीश हसत म्हणाला.

"बरं राहू दे, देऊ नकोस. पण जास्त नाटकं करू नकोस." अनुश्री

"घे नंबर, उगीच रडू नकोस." असे म्हणून अनीशने तिला नंबर दिला.

अनुश्री घरी येऊन पुन्हा थोडा वेळ प्रोजेक्ट बनवू लागली आणि रात्री झोपताना अनीशने त्याचा नंबर दिलेला तिला आठवले म्हणून तिने "गुड नाईट" असा मेसेज केला. अनीशने तो मेसेज पाहून तिला परत गुड नाईट म्हणून मेसेज केला आणि तो गालातच हसला.

तिचा डीपी पाहून तो परत मनात विचार करू लागला, "किती सुंदर आहे ही, मला मिळेल का? आज पर्यंत किती मुली पाहिल्या? पण ही थोडी वेगळीच आहे, कदाचित म्हणूनच माझी मैत्री तिच्या सोबत झाली असावी, या मैत्रीतून काहीतरी नक्कीच साध्य होईल, म्हणूनच तर ती माझी मैत्रीण झाली आहे, ती फक्त मैत्रीण आहे, पण मला तर ती मैत्रीच्याही पलीकडे वाटत आहे. नियतीच्या मनात काय आहे कोणास ठाऊक? मला वाटतं ही नक्की माझी होईल. पण हिच्या मनात दुसरा कोणी असेल तर. हे काय अनीश तू डायरेक्ट मिळवण्याचा विचार करत आहेस. अजून खूप बाकी आहे. मैत्री तरी व्यवस्थित होऊ दे." अशा विचारात अनीश झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्यांने अनुश्रीला गुड मॉर्निंग असा मेसेज केला आणि तो आवरू लागला.

ऑफिसमध्ये आल्यावर तो अनुश्रीला शोधू लागला. ती अजून आली नव्हती, म्हणून तो त्याच्या डेस्कवर जाऊन बसला. तो त्याचे काम करू लागला. अनीश त्याच्या कामात मग्न असताना घाईघाईने अनुश्री येताना त्याला दिसली.

"काय मॅडम, आज उशीर झाला." अनीश

"हो, थोडसं काम होत म्हणून उशीर झाला." अनुश्री

"आज काही विशेष आहे का?" अनीश

"नाही, पण तू असे का विचारत आहेस?" अनुश्री

"ते तुझं स्टेटस बघून विचारतोय." असे म्हणून अनीश हसू लागला.

"त्यात काय एवढं. सहज ठेवले आहे. ते गाणं माझ्या आवडीचं आहे ना, म्हणून मी ठेवले आहे, त्यात काय एवढं?" अनुश्री

"मला वाटले तुझ्या मनात कोणीतरी आहे, त्याच्यासाठी ठेवली आहेस." अनीश

"का? मी माझ्यासाठी ठेवू शकत नाही का? आणि तसेही कोणीच नाही माझ्या मनात आणि नसेलही." अनुश्री थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"काहीही हं. माझा नाही विश्वास. कोणीतरी नक्कीच असेल. तू मला का सांगशील?" अनीश

"कोणी नसेल तर काय सांगणार? मी कोणाला घाबरत नाही? कोणी भेटला तर नक्की सांगेन. मी प्रोजेक्टचे पॉइंट्स काढले आहेत. आज त्यानुसार मांडणी करते. नंतर तू पाहून घे." अनुश्री

"येस मॅडम, त्यासाठीच तर मी आहे." अनीश

"तू आता नौटंकी करू नकोस हं. नौटंकी करणार असलास तर नाटकात काम करायला जा." अनुश्री

"मी विचार करेन कधी जायच ते." अनीश हसतच म्हणाला.

"झाली का तुझी नौटंकी? चल मी आता प्रोजेक्ट बनवायला घेते. " अनुश्री

अनुश्री दिवसभर प्रोजेक्टचं करत होती. दिवसभरा मध्ये जेवणाची वेळ सोडली तर इतर वेळी ती फक्त फक्त प्रोजेक्ट करत होती. त्या प्रोजेक्टच्या नादात दिवस कसा गेला? हे तिलाच कळलेच नाही, तसेच ऑफिसची वेळ संपली हे सुद्धा तिच्या लक्षात आले नाही. जेव्हा काम संपले तेव्हा तिने घड्याळात पाहिले, "अरे बापरे! खूप उशीर झाला. आता घरी जायला उशीर होणार." असे ती मनातच म्हणून सामान आवरून निघाली. तेव्हा अनीश तिथेच होता.

"तू अजून थांबला आहेस." अनुश्री

"हो थोडं काम आहे." अनीश

"बरं, मी निघते." असे म्हणून ती ऑफिसमधून बाहेर आली. थोडे पुढे आल्यावर जिन्यावरून खाली उतरणार तोच सगळे लाईट्स गेले. सगळीकडे काळाकुट्ट अंधार. तिथे एकही व्यक्ती नव्हती. किड्यांचा आवाज खूप घुमत होता. किरकिर आवाज येत होता. तिला काहीच दिसेना. त्यातच एक वेगळा आवाज ऐकू येऊ लागला. अनुश्री खूप घाबरली. ओरडावे तरी त्या अंधारात तिच्या मदतीला कोण येणार? परत ऑफिसमध्ये जावे तर ती ऑफिसपासून बरेच अंतर पुढे आली होती. तिला काहीच कळेना. इतक्यात एक प्रकाश अर्थातच उजेड तिच्याकडे येत होता. ते पाहून ती आणखीनच घाबरली.

तो प्रकाश काय असेल तिथे? कोण असेल तो? तिला काही करेल का? ती घाबरून ओरडेल का? तिच्या मदतीला कोणी येईल का? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशःअनीशने अनुश्रीला प्रोजेक्ट बनवण्यासाठी काही टिप्स दिल्या आणि त्याप्रमाणे अनुश्रीने प्रोजेक्टसाठी माहिती गोळा करायला सुरुवात केली. माहिती बघताना म्हणजेच सर्च करताना जे मुद्दे योग्य वाटतात, ते ती कागदावर टिपून घेऊ लागली. ती दिवसभर त्याच कामात होती. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर डबा घेऊन सावनी सोबत ती कॅन्टीनमध्ये गेली. कॅन्टीनमध्ये गेल्यावर तिला अनीश दिसला नाही. ती सगळी कडे पाहू लागली. पण तो कुठेच दिसला नाही.

क्रमशः

🎭 Series Post

View all