Jan 26, 2022
प्रेम

एक प्यार ऐसा भी 3

Read Later
एक प्यार ऐसा भी 3

अनीशच्या नावाची चिठ्ठी आली आणि सरांनी त्याचे नाव घेतले. तोच अनीशला धस् झाले. परीक्षेच्या निकालाच्या वेळीसुद्धा इतकी भीती वाटली नसेल तितकी भीती त्याला आज वाटत होती. कारण त्याच्या ग्रुपमध्ये कोण येईल? याची भीती त्याला वाटत होती. प्रोजेक्ट बद्दल त्याच्या मनात भीती नव्हतीच, ते तर तो एकटाही करू शकला असता, पण मेंबर कोण असेल? याबद्दल भीती वाटत होती. त्याने त्या व्यक्तीचे नाव ऐकण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित केले होते.

अनीशचे नाव घेतल्यावर अनुश्रीलाही थोडी काळजी वाटली, कारण तिच्यासाठीच तर तो हा प्रोजेक्ट करायला तयार झाला होता. ती देखील देवाला प्रार्थना करू लागली की, त्याला जी व्यक्ती हवी आहे तिच व्यक्ती त्याच्या ग्रुपमध्ये येऊ दे. त्यात लगेच सरांनी अनुश्री देशमुख हे नाव घेतले. अनीशला विश्वासच बसेना. सरांनी खरंच तिचं नाव घेतलं का? असे त्याला वाटत होते की हा भास आहे, म्हणून त्याने परत सरांना विचारले. तेव्हा सरांनी पुन्हा एकदा अनुश्रीचे नाव घेतले आणि दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. दोघांनाही खूप आनंद झाला. अनुश्रीला समाधान वाटले, तिच्यासाठी तो इतका ग्रुपने प्रोजेक्ट बनवायला तयार झाला होता म्हणून तिच्या मनाला धाकधूक लागली होती. पण आता दोघेही निश्चिंत झाले. सरांनी सर्व ग्रुप बनवून सर्वांना एक एक विषय दिले होते. तसेच तो प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण करायचा तो कालावधीतील दिला होता.

"सर्वजण कामाला सुरुवात करा. प्रोजेक्ट वेळेत बनायला हवा. उशीर झाला तर प्रोजेक्ट कॅन्सल केला जाईल. ऑल द बेस्ट." असे म्हणून सर निघून गेले.

सर निघून गेल्यावर सर्वजण तिथेच थोडा वेळ चर्चा करत बसले होते. पण अनीश मात्र चर्चा न करता लगेच निघून गेला. तो गेल्यावर त्याच्या पाठोपाठ अनुश्री सुध्दा गेली. अनीश त्याच्या डेस्कवर जाऊन काम करू लागला. ते पाहून अनुश्रीला थोडा राग आला.

"असं काय आहे हा? माझ्याशी प्रोजेक्ट बद्दल थोडसं बोलावं, पण याला काहीच चर्चा करायची नाही, देवा काय म्हणून मी याला तयार केले? याच्यापेक्षाही इतर कोणी असते ग्रुपमध्ये तर चालले असते. आता प्रोजेक्ट कसा होणार? मलाच गरज आहे. चला जाऊया साहेबांशी बोलायला." असे मनात म्हणून अनुश्री अनीश सोबत बोलायला गेली.

"हॅलो सर, प्रोजेक्टचा विषय आपण बघून येऊया काय? म्हणजे आपल्याला बनवायला सुरूवात करता येईल. माहिती गोळा करता येईल. मी नवीन आहे, मला काहीच कल्पना नाही." अनुश्री

"तू बघून ये जा. मला थोडं काम आहे." अनीश

"पण सर तुम्ही बघितलं तर बरं होईल. सध्या तरी हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. ते काम तुम्ही नंतरही करू शकता. सगळे आत चर्चा करत आहेत आणि आपणच बाहेर आहोत. तुम्हाला या प्रोजेक्टची गरज नसली तरी मला आहे." अनुश्री

"का नाटकं चालवली आहेस? सर सर करत. सरळ अनीश म्हण ना. ग्रुप ठरल्यावर लगेच सर झालो का मी? काय माझी खेचायची ठरवली आहेस? उगीच मला राग आणू नकोस." अनीश

"नाही सर, तुम्ही सिनियर आहात. तुम्हाला कामाचा अनुभव आहे. मग तुम्हाला सरच म्हणायला हवं ना. तुमच्या हाताखाली मला प्रोजेक्ट करायचा आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे आणि प्रोजेक्ट वेळेत बनवायचा आहे. मग आदर नको का करायला? त्याशिवाय प्रोजेक्ट कसा वेळेत पूर्ण होईल?" अनुश्री आणखीनच नाटकी करून बोलू लागली.

"गप्प बस हं, आत्ताच सांगतो तुला नाहीतर बघ." अनीश रागाने म्हणाला

"नाहीतर काय करणार आहात सर? तुम्हाला इतकं रिस्पेक्ट देत आहे तर माझं काही चुकलं का?" अनुश्री हसतच म्हणाली

"मी काय करू शकतो?" असे म्हणत अनीशने तिच्या दंडाला धरले आणि "परत सर म्हणशील का? म्हटलीस तर याच्यापेक्षाही वाईट हाल होतील." असे अनीश हसत म्हणाला.

अनीशने हात थोडा जोरात पकडल्यामुळे अनुश्रीला तो दुखत होता म्हणून ती लगेच "सॉरी सॉरी परत नाही बोलणार" म्हणाली, म्हणून अनीशने लगेच हात सोडला. त्याने हात सोडल्यावर अनुश्री "सर..." म्हणून लगेच पळाली आणि तिच्या पाठोपाठ अनीशही रागाने पळाला. तिला पकडू लागला, पण ती अधूनमधून पळत होती, त्यामुळे ती त्याला सापडत नव्हती. त्यात सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये होते, त्यामुळे खुर्च्या अधे मधे पसरल्या होत्या. त्या पार करत करत अनुश्री पळत होती आणि तिला पकडण्यासाठी अनीश तिच्या मागे मागे जात होता. जाता जाता अनुश्री हळूच खुर्ची मधे करून जात होती जेणेकरून अनीशला वाटेत अडचण येईल.

आता अनुश्रीच्या समोर भिंत आली म्हणून ती थांबली. आता कुठे पळायचे? तिला समजेना. ती इकडे तिकडे पाहू लागली, तोपर्यंत पाठीमागून लगेच अनीश येत होता. तोच त्याचा पाय खुर्चीत अडकला आणि तो एकदम अनुश्रीच्या जवळ आला. तो इतका जवळ आला की, त्यांचे एकमेकांचे श्वास श्वासात मिसळू लागले, ते एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले, तशी त्यांच्या हृदयाची स्पंदने वाढू लागली. दोघांनाही काय करावे? ते समजेना, दोघेही एकमेकांना फक्त पाहत होते. दोघांचीही ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांना काहीच समजेना. ते एकमेकांत गुंतले होते. अनीशने त्याच्या हाताने अनुश्रीच्या चेहर्यावर आलेले केस बाजूला सरकवले. त्या क्षणी अनुश्रीच्या अंगावर शहारे आले, तिने तिचे डोळे बंद केले. इतक्यात खट्ट असा आवाज झाला, म्हणून दोघेही भानावर आले. सगळे जण काॅन्फरन्स रूममधून बाहेर येत होते. ते पाहून अनीश लगेच त्याच्या डेस्कवर जाऊन बसला आणि अनुश्री तिथेच काहीतरी काम करत आहे असे दाखवत होती. इतक्यात सावनी तेथे आली.

"अनु, तू काय करतेस? तुझी डेस्क तर तिथे आहे ना. तू इथे काय करतेस? आणि आत चर्चा करायची सोडून बाहेर का आलीस? प्रोजेक्ट बनवणार आहेस ना." सावनी

"हो हो. किती प्रश्न विचारशील? अगं मला पेजेस हवे होते ना, ते घेऊन जाण्यासाठी आले होते. प्रोजेक्ट तर बनवणारच आहे." अनुश्री थोडी दबकतच म्हणाली.

"पेजेस इथे कुठे आहेत? त्या बाजूला आहेत. तू तिकडे जायचं सोडून इकडे का आली आहेस? दुसरं काही हवं आहे का?" सावनी

"हे बघ मी पण ना, प्रोजेक्टच्या विचारात काही लक्षात येत नाही आणि आत्ताच तर जाॅईन झाले ना, म्हणून एकदम लक्षात आले नाही ग. मी शोधतच होते इतक्यात तू आलीस." अनुश्री डोक्याला हात लावतच म्हणाली.

"अच्छा, पण अनीश इथेच होता ना. त्याला विचारायचं होतं. तो सांगितला असता की. तसंही तुम्ही खूप छान बोलता." सावनी

"अगं हो, पण जाऊ दे ना. आता तू सांगितलेस ना, घेते मी." असे म्हणून अनुश्री तिकडे गेली.

त्यानंतर ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली आणि डोक्यावर हात बडवत "कोणी सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला? काय गरज होती त्याची टिंगल उडवायची? तसंही फक्त दोन दिवसांची ओळख आमची आणि हक्क दाखवायला निघाले मी. मी पण ना अशी कशी वेंधळी? एखाद्याला आपलं मानलं की लगेच हक्क दाखवते. झाली की नाही गडबड. भोगा आता अनु मॅडम." अनुश्री असे मनातच बडबडत होती.

ती पूर्ण दिवस अनीश सोबत बोलली नाही. बोलणार तर कसे? काय वाटेल त्याला? म्हणून ती गप्पच बसली. इकडे अनीशची अवस्था सुध्दा काही वेगळी नव्हती. तो सुद्धा अनुश्री सोबत बोलला नाही. काय म्हणून बोलायचे? हा प्रश्न होताच. म्हणून दोघेही थोडे अवघडलेच होते.

ऑफिस सुटल्यावर अनुश्री आणि सावनी बोलत थांबल्या.
"अनु, प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केली का ग तुम्ही?" सावनी

"नाही ग, अजून विषय सुद्धा पाहिले नाही. इथून आमची सुरूवात." अनुश्री

"काय सांगतेस? आम्ही माहिती गोळा करायला सुरुवात देखील केली. प्रोजेक्ट लवकर व्हायला हवा ना. मग आत्तापासूनच सुरूवात करायला हवं. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही तर रिजेक्ट करणार आहेत ना." सावनी

"हो ग. तू कोणाच्या ग्रुप मध्ये आहेस?" अनुश्री

"मी समरच्या ग्रुपमध्ये आहे. खूप चांगला आहे तो. खूप छान समजावून सांगतो. प्रोजेक्ट कसा बनवायचा? माहिती कोठून घ्यायची? ती आपल्या भाषेत कशी लिहायची? वगैरे सगळी माहिती व्यवस्थित सांगतो." सावनी समरचे खूप कौतुक करत होती.

"माझं कुठलं नशीब इतकं चांगलं? आमचा लीडर तर काहीच बघत नाही. त्यात मी माती खाल्ली, म्हणजे अजूनच कठीण आहे माझं." अनुश्री मनातच म्हणाली.

"आता आम्ही माहिती गोळा करून प्रोजेक्टला सुरुवात करणार. घरी जाऊन थोडं काम होईल. फोन वरून देखील थोडी माहिती घेता येईल. म्हणजे प्रोजेक्ट लवकर होईल ना." सावनी

"फोनवरून, म्हणजे तू नंबर पण घेतलास की काय?" अनुश्री

"हो त्यांनीच तर दिला, गरज लागणारच ना आता या प्रोजेक्टसाठी." सावनी

"माझ्याकडे तर अनीशचा नंबरही नाही." अनुश्री. दोघीही थोडा वेळ गप्पा मारून घरी गेल्या.

घरात अनुश्रीचे मन कशातच लागेना. तिला फक्त प्रोजेक्टचीच काळजी लागली होती. अनुश्री रात्रभर प्रोजेक्ट कसा होणार? या विचारातच होती. इकडे अनीशची अवस्था थोडी वेगळी होती. त्याला रात्रभर अनुश्रीचा चेहरा दिसत होता. दुसरे काहीच दिसत नव्हते. तिचा पकडलेला हात, नजरेला भिडलेली नजर आणि ती हृदयाची धडधडणारी कंपने आणि तिचे बाजूला सरकवलेले केस यामुळे तो रात्रभर झोपलाच नाही. त्याला जाणवू लागले होते की, तो तिच्या प्रेमात पडत आहे. आता ती त्याला आवडू लागली होती. दिवसभराच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटलं होतं.

"मी पण ना कसा लहान मुलासारखा तिच्या मागे मागे गेलो? काय वाटलं असेल तिला? पण जे घडलं ते खूप छान घडलं, आज मला खूप छान वाटत आहे." असे तो मनातच म्हणाला. दोघेही वेगवेगळ्या विचारात रात्रभर जागेच राहिले.

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना अनुश्रीने मनातच ठरवले होते की, "त्याला आज प्रोजेक्टबद्दल काय करायचं? ते स्पष्ट विचारायचं, नाही तर माझी मी एकटी प्रोजेक्ट बनवेन. त्याला गरज नसेल तर मला आहे. मी समर्थ आहे माझा प्रोजेक्ट बनवायला." पण जेव्हा अनुश्री ऑफिसमध्ये गेली तेव्हा त्याला बघून तिची बोलतीच बंद झाली. ती गुपचूप जाऊन तिच्या डेस्कवर बसली.

"मी पण त्याच्या पाठीमागे बडबडते आणि त्याच्या समोर बोलायची हिंमत आहे का? चला मॅडम, विषय तरी बघून येऊ." असे मनात म्हणतच अनुश्री विषय बघण्यासाठी जाणार इतक्यात तिकडून अनीश येताना तिला दिसला, म्हणून त्याला बघून ती परत खुर्चीत बसली.

"काय मॅडम, प्रोजेक्ट करायचा विचार आहे की नाही. प्रोजेक्ट लवकर बनवून द्यायचा आहे ना. की रिजेक्ट करायचा आहे." अनीश

"हो. तेच विषय बघायला जात होते, आलेच बघून" म्हणून अनुश्री जात होती,

"मी बघून आलोय, तुम्ही बसा आणि माहिती गोळा करायला सुरुवात करा." अनीश

"सॉरी" अनुश्री

"आता सॉरी का?" अनीश

"ते प्रोजेक्टसाठी." अनुश्री थोडी दबकतच म्हणाली.

"अजून खूप वेळा बोलावं लागेल, तोपर्यंत तुझ्या कडेच ठेवून घे." अनीश

"हं" अनुश्री मनात परत म्हणाली "किती अटीट्युड दाखवतोय हा. जणू काही हाच बाॅस आहे असा"

या प्रोजेक्टमधून अनीश आणि अनुश्रीचे सूर जुळतील का? की यामध्ये कोणी येईल? त्यांचे प्रेम फुलेल का? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः

ही कथा ईरा प्रो ब्लॉग मध्ये येणार असून आजच ईरा चे सबस्क्रिप्शन घ्या..

ईरा सबस्क्रिप्शन कसे घ्यावे?

1. तुमच्याकडे android फोन असेल तर प्ले स्टोर वर जाऊन ira blogging app इन्स्टॉल करा.
2. App मध्ये लॉगिन ऑप्शन येईल, तिथे डायरेक्ट google लॉगिन करा.
3. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ईरा चे सर्व ब्लॉग दिसतील. वरील पट्टीवर वेगवेगळ्या कॅटेगरी दिसतील, latest, trending इत्यादी. त्यात pro blog कॅटेगरी मध्ये जाऊन कुठल्याही एका ब्लॉग वर क्लिक करा, तुम्हाला सबस्क्रिप्शन चा मेसेज येईल. तिथून तुम्ही ऑनलाइन पेमेंट ने 15 रुपये भरू शकता.
4. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर app बंद करून पुन्हा सुरू करावे, तुम्हाला pro blog वाचता येतील. सबस्क्रिप्शन घेऊनही वाचता न आल्यास 8087201815 या नंबर वर आपला मेल आयडी पाठवावा.

iOs user साठी
1. तुम्ही irablogging.com या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता, त्यानंतर तुम्हाला एक otp येईल (मेल मधील spam फोल्डर मध्ये चेक करा)
2. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा, कुठल्याही एका pro blog वर जा आणि तिथून ऑनलाइन पेमेंट ने 15 रुपये भरा.
3. सबस्क्रिप्शन घेऊनही वाचता न आल्यास 8087201815 या नंबर वर आपला मेल आयडी पाठवावा.

15/- रुपये महिना हे केवळ एका लेखकासाठी नसून pro blog मधील सर्व लेखकांच्या सर्व भागांसाठी आहेत. The boss, स्वीकार, माझिया प्रियाला प्रीत कळेना सारखे ब्लॉग pro blog मध्ये येतात. सबस्क्रिप्शन नंतर या कथांचे तुम्ही रोज एकेक भाग वाचू शकता.अनीशच्या नावाची चिठ्ठी आली आणि सरांनी त्याचे नाव घेतले. तोच अनीशला धस् झाले. परीक्षेच्या निकालाच्या वेळीसुद्धा इतकी भीती वाटली नसेल तितकी भीती त्याला आज वाटत होती. कारण त्याच्या ग्रुपमध्ये कोण येईल? याची भीती त्याला वाटत होती. प्रोजेक्ट बद्दल त्याच्या मनात भीती नव्हतीच, ते तर तो एकटाही करू शकला असता, पण मेंबर कोण असेल? याबद्दल भीती वाटत होती. त्याने त्या व्यक्तीचे नाव ऐकण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित केले होते.

15/- रुपये महिना हे केवळ एका लेखकासाठी नसून pro blog मधील सर्व लेखकांच्या सर्व भागांसाठी आहेत. The boss, स्वीकार, माझिया प्रियाला प्रीत कळेना सारखे ब्लॉग pro blog मध्ये येतात. सबस्क्रिप्शन नंतर या कथांचे तुम्ही रोज एकेक भाग वाचू शकता.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..