Nov 23, 2020
शिक्षण

एक प्रवास - माझ्या घरापासून दूर आल्यावरच्या आठवणी आणि अनुभव

Read Later
एक प्रवास - माझ्या घरापासून दूर आल्यावरच्या आठवणी आणि अनुभव

   मी रत्नागिरी सारख्या लहानशा शहरातून, जिल्ह्यातून मुंबईत आले. माझ लाॅ पूर्ण झाल्यावर, मला मास्टरी करण्यासाठी  साठी मुंबई युनिवर्सिटी मधे अ‍ॅडमिशन मिळाल. पण होस्टेल न मिळाल्यामुळे मुंबईत राहण्याची सोय नव्हती. पण रत्नागिरीत माझ्या ऑफीस कलीग एक मॅडम होत्या त्यांच परेलच घर हेच माझ् राहण्याच ठिकाण बनल. मी तिथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. माझ्या बरोबर आणखी दोन डॉक्टर्स आणि एक "प्रीती" नावाची खूप जिवलग मैत्रीण, असे आम्ही तिथे राहत असू.


     इथे आल्यावर राहण्याचा प्रश्न मिटला होता पण कॉलेज तर संध्याकाळी असायचं मग दिवसभर काय करायच? तर माझी एक मैत्रिण अ‍ॅड. मृदुला कदम - पाटकर हिने अ‍ॅड. कुणाल सरांच्या ओळखीने मला जॉब मिळवून दिला. मग माझी मुंबई मधे प्रॅक्टीस सुरु झाली. 


      तर त्यावेळी आले तेव्हापासूनच रत्नागिरीचा अभिमान होताच, आहे आणि यापुढेही राहिल. "माझी रत्नागिरी" म्हणून. पण तिथली विचारसरणी आणि मुंबईची विचारसरणी यात मला खूप तफावत जाणवली. एवढ्या मोठ्या शहरात एकट रहायची सवय नव्हती, त्यात ट्रेनच ज्ञान अजिबातच नव्हतं. म्हणजे माझ असं व्हायच, स्टेशनला आल्यावर कुठल्या दिशेची ट्रेन पकडून आपल्या destination ला जायचं आहे, हेच मला कळायच नाही. मग दोन तीन महिन्यानी सरावाने मला हे व्यवस्थीत जमलं. मग अगदी तिन्ही routes ही समजायला लागले. त्यावेळी smart phone नव्हते, म्हणून ट्रेन routes च एक पुस्तक घेतले होते. तरीही माझा पूर्व- पश्चिम चा सुद्धा खुप प्रॉब्लेम व्हायचा, कधी कधी पश्चिमेला जायच असायच आणि मी पूर्वेला उतरलेली असायची मग परत जिने चढून पश्चिमेला याव लागायच.   


     मुंबईत आल्यानंतर मला व्यवस्थीत हिन्दी ही बोलता येत नव्हत. एका जाणकारने मला सल्ला दिला होता की मुंबईत उतरल्यानंतर हिन्दीच बोलायच.???? खुप मजेशीर अनुभव होते त्या वेळचे.???? कारण रत्नागिरीत फक्त मराठीतच बोलल जात आणि बाहेरुन नविन आलेल्याला पण मराठीच बोलाव लागत. त्यामुळे माझी कसरतच होती. 

 
     तर आता माझ्या या प्रवासात मला वेगवेगळे अनुभव आले. मला थोडी भीती होतीच की इथले लोक आपल्याला कसे accept करतील? एवढ्या मोठ्या मुंबई युनिवर्सिटीत आपल्याला सगळं जमेल ना? वैगरे. कारण रत्नागिरीत जर एखादा नविन माणूस आला तर समोरचा रत्नागिरीकर त्याला अगदी पायाच्या नखापासून, डोक्याच्या केसापर्यंत फक्त निरिक्षणच  करणार. त्यानंतर तो समोरच्याच्या डोळ्यात निरखून पहाणार.... नंतर तो ठरवणार की ह्या माणसाशी हसायचं- बोलायच की नाही....! म्हणजे 99% हसणारच नाही ???? आणि 1% चान्स हसण्याचा किंवा नविन ओळख दाखवण्याचा. समोर दिसल्याबरोबर पहील्या फटक्यात हसला तर तो रत्नागिरीकर कसला...! पण एकदा ओळख झाल्यावर मग मात्र जिवाला जीव देणारा. तर या आणि अशाच वातावरणातून मी आलेली. आता मी सुट्टी मधे रत्नागिरीत गेल्यावर सुद्धा हा अनुभव येतोच येतो.
     मुंबईने मला एक छान जिवलग मैत्रीण दिली. ती म्हणजे प्रिती तिवरेकर- किर. तिच्यामुळे माझे अवघडलेपण सुद्धा पळून गेल. खूप छान गट्टी जमली आमची. आम्ही दिवसभर खूप फिरायचो शेजारच्या काकी आमचा डबा करायच्या. मला आठवतं 162 ( डबलडेकर) बस मधून आम्ही वरळीला जायचो, वीकएंड्सला त्या बसमध्ये फारशी गर्दी नसायची. पटापट चढून वरच्या कम्पार्टमेंट मधे पहील्या सिटवर बसायचो आणि काय सांगू...... विमानात बसल्याचा आनंद अनुभावायचो. ( कुणी अजूनही हा अनुभव घेतला नसेल तर घ्या कारण सध्या फक्त दोनच डबलडेकर बसेस चालू आहेत माझ्या माहीतीप्रमाणे.????)

     पावसात तर मुंबईत पाणीच पाणी मग ट्रेन बंद. रत्नागिरीत कधी पावसामुळे पाणी भरुन शाळेला किंवा कॉलेजला सुट्टी मिळालेली आठवत नाही. कारण असं पाणी रत्नागिरीतील गावांमधे भरायच. पण इथे मस्त कुठेही पाणी भरत. मग काय?.... ऑफीसला सुट्टी...! पण पावसात ????????भिजण्याचा अनुभव हा माझ्यासाठी नेहमीच सुखद. मग आम्ही दोघीही छत्री न घेता परेल व्हिलेज ते हिंदमाता चालत जायचो, ढोपरभर पाणी असायच.... परेलच्या ब्रिज खालून अगदी हिंदमाता पर्यंत पावसातून चालायची मज्जा काही औरच होती. (लहानपणी अमला आणि आशू बरोबर पावसात छत्री बंद करुन घरी जाण्याचा अनुभव पाठीशी होताच.) त्यानंतर हिंदमाता मार्केटच्या बाहेर डोसावाला असायचा. खूप गर्दी असायची त्याच्याकडे पण त्या गर्दीतूनही डोसा खायची मजा चाखायचो. पावसातला रविवार हा वरळीच्या बिचवर.
     त्यावेळी आमच्याकडे टीव्ही नव्हता. सगळ्याना प्रश्न पडायचा की तुमचा वेळ कसा जातो? काय सांगू.......  आमच्या गप्पाच इतक्या असायच्या की आम्हाला भानच नसायच. प्रत्येकजण आपापल्या दिवसातल्या गमतीजमती सांगत दिवस संपायचा सुद्धा. माझ्या ऑफीसमध्ये एक "अजित " नावाचा विक्षिप्त क्लार्क होता. त्याच्या गमतीजमतीत सांगितल्यावर सगळयांची हसुन हसुन पुरेवाट व्हायची.

      आता जवळजवळ 15वर्षे होतील इथे येवून पण इथे कुठल्याही नविन ठिकाणी किंवा नविन स्टेशनवर उतरल्यानंतरही एखाद दुसरा हसरा चेहराच दिसतो. आणि ते ओळखीच हसू असत. म्हणजे हे शहर नविन माणसाला लगेच सामावून घेत असावं.

    आता मी मुंबईस्थित झालेली आहे कारण लग्न इथेच जमलं. पण तरी रत्नागिरीची ओढ, तिथली माझी माणसं माझ घर हीच खरी ओळख आहे माझी.

Circle Image

Sapana Nandakumar Kadrekar

Housewife

I m a law graduate.