एक प्रवास : थेटर आठवणींचा

माझ्या काही आठवणी

आमचे आजी आजोबा जत्रेत तंबूत चित्रपट पाहायचे.थेटर तेव्हा तर क्वचित होती. मग सिंगल स्क्रीन आले नंतर आता आपण पाहतो ते मल्टी स्क्रीन आणि आता आोटीटी प्लैटफॉर्म म्हणजेच मोबाईलची स्क्रीन.असा आहे थेटरचा प्रवास

हल्ली ओटीटीवर मजा येत नाही.मग तुम्ही छोट्या स्क्रीनचे फायदे सांगाल.जसं कुठेही कधीही कसंही बघता येत आणि हव ते बघता येतं.

पण खर खर सांगा तुम्हाला गडद अंघार आणि  गारठवून टाकणाऱ्या ऐसीच्या थंडीत बसुन सत्तर एमएमचा कान फाडु आवाज तसेच डोळ्यातून मोहीनी घालणारे चलचित्र हा अनुभव छोट्याश्या स्क्रीनवर येतो का??

आम्ही दोघेही चित्रपट वेडे असल्यामुळें त्याकाळी पॉकेटमनीचे पैसे साठवुन चित्रपट पाहयचो. तेव्हा ऑनलाईन बुकिंग हा प्रकार नव्हताच .मग रांगेत तासनतास उभे राहणे त्यातपण पाठची तिकीटे मिळतीलच ह्याची शाश्वती नाहीच किंवा ब्लॅकने तिकीटे घेणे हाच पर्याय. आता मात्र बुक माय शो वर बुकिंग केल्याशिवाय थेटरमध्ये पाय ठेवत नाही.

पण ब्लॅकने घ्यायला पुरेसे पैसे तर हवे ना.मग काही चित्रपट मॅटीनी कींवा मॉर्निग शोला जाउन बघणे हाच पर्याय. तेव्हा चित्रपट बरेच आठवडे राहायचा म्हणुन हा पर्याय चालायचा. त्यापण लपत छपत जायचो बर का... नाहीतर क्लास बंक करून शोला गेलो म्हणुन जर घरी कळले तर चापट पोळी नि धम्मक लाडु हे जेवणआणि टोमण्यांचे स्टारटर तर फिक्सच. आणि स्वीट डिश म्हणजे पुढच्या महिन्यात पॉकेटमनी बंद

आता मात्र वेळ नाही म्हणुन चांगले चित्रपट पाहायचे राहून जातात मग आोटीटी प्लैटफॉर्मवरच पाहावे लागतात. कारण हल्ली एवढा वेळच नसतो

मी आणि माझा नवरा दोघेही आमच्या दोघांच्या काॅलेज काळातील बघितलेले चित्रपटावर चर्चा करता करता दोघांना अमुक अमुक चित्रपट बघताना आलेल्या अनुभवांचे किस्से  एकमेकांना सांगितले मग सोबत आमच्या  दोघांचा विशी ते चाळीशीचा थेटर प्रवास डोळ्यासमोरून गेला. तेच काही अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.यातले विलेपार्ले आणि औरंगाबाद हे किस्से माझ्या नवऱ्याचे आणि त्यानंरचे सगळे किस्से माझ्या बाबतीत घडले आहेत आणि शेवटचा आम्हा दोघांचा एकत्रच अनुभव आहे.

जुने "बहार "(विले पार्ले) थेटरमध्ये "मै खिलाडी तू अनाडी" हा अक्षय कुमारचा पिक्चर  लागला होता. कॉलेज सुटल्यावर मित्र मित्र दुपारच्या शोला गेलो होतो. "लडकी देखी मुहसे सीटी बजे हाथसे ताली" हे गाण पडद्यावर चालु होते. मी मित्रांबरोबर स्टाॅलमध्ये बसून गाणे इनजाॅय करत होतो. तेव्हाच

येणऱ्या जाणऱ्या रस्त्यामध्ये अचानक स्लॅब पडली. दोन मिनीटे कुणालाच काही समजले नाही. सगळे थेटर धुरामुळे भरून गेले नंतर आम्हाला धोकादायक बिल्डींग मधून बाहेर काढण्यात आले आणि जुन्या बहारला मात्र टाळे लागले. हा अनुभव घेतला तेव्हा सगळीकडे  सिंगल स्क्रीन थेटरच असायचे मुंबईत. मल्टीप्लेक्स तर कल्पनेतही अस्तित्वात नव्हता.

त्या अनुभवानंतर तुम्हाला वाटेल की मी थेटर मध्ये पाय ठेवायची हिम्मत नसेल केली पण तरूण रक्त आणि वळवळणारे कीडे कुठे गप्प बसूं देतात का?? तीन महिन्यात बाँबे" बघायला गेलो होतो. 

तेही पोलीस बंदोबस्तात थेटरमध्ये. मुंबईच्या दंगलीवर आधारीत चित्रपट असल्याकारणामुळे पोलीस होते थेटरमध्ये तेही नेमके आमच्याजवळच उभे मग काय अख्खा चित्रपट पुर्ण मौनातच बघितला.ते क्षण आठवले की आंगात काटा फुलतो.

हा किस्सा आहे औरंगाबादाचा .मी आणि माझा सहकारी आर्टीकलशिपच्या काळात एका कामानिमीत्त औरंगाबादला काही दिवस होतो. 

रविवारी काहीच काम नसल्यामुळें "दिल चाहता है" बघायला गेलो होतो.बालकनीची पहीली रो आमची होती. चित्रपटात ऑपेराचा सीन चालु होता. आचानक लाइट गेली. कदाचित तिकडे लोड शेडींग होत असल्याकारणामुळे लोक दहा मिनीटे शांत बसून होते. मग मात्र कानामागुन सुर्र ....असा आवाज करत काहीतरी आमच्यावरून गेले. नंतर कळले की ती सोडा वाॅटरची काचेची बाटली होती.

मग तर वैतागलेल्या लोकांनी बाटल्यांचा वर्षावच केला. आम्ही दोघे डोके गुडघ्यात खुपसुन युद्धात होणाऱ्या बाँम्बिंगचा प्रत्यक्ष अनुभवच घेत होतो. दोन मिनीटांत पिक्चर पुन्हां सुरू झाला आणि आमचा मात्र जीव वाचला. हे थेटर जरी सिंगल स्क्रीन असलेले तर पंखे असणारे होते. तेव्हा मुंबई सारखी शहरे सोडली तर एसी थेटर क्वचित असायची.

"मोहब्बते" लिबर्टी मरिन लाईन्सला लागलेला.मल्टी स्टार चित्रपटाची हवा होता. आम्ही मैत्रिणींनी चित्रपट बघायचाच म्हणुन चंगच बांधलेला. मग घेतली ब्लॅकने तिकीटे नि बघितला पिक्चर. होते तेवढे सगळे पैसे दिले तिकीटाला मग बसलापण पैसे नसल्यामुळे तीन किलोमीटर  पैदल यात्रा केली होती .

मला हॉरर मुवी बघायला खुप आवडतात म्हणुन "राझ" पिक्चर बघायला "एराॅस" चर्चगेटला गेले हेते.मला हाॅरर बघायला जरी आवडत असल तरीही मी एक नंबर घाबरूट म्हणून ग्रुपमध्ये फेमस होते.

त्यात माझ्या ज्या मैत्रिणीने हा पिक्चर आधी बघितला होता तिच नेमकी माझ्या बाजूला बसलेली.मग काय तिने मजा म्हणुन नेमकं भुताच्याच एन्ट्री सीनला खांद्यावर हात ठेवला.

मी अशी जोरात ओरडले की पुढच्या सीटवरची दोन माणसे चक्क घाबरून खुर्चीवरून खाली पडली.

तेव्हा फस्ट डे फस्ट शो बघायचा अस वेडच होत आंगात. "देवदास"च्या रीलीज झाल्या दिवशीच बघायचा असा प्रणच आम्ही मित्र मैत्रिणींनी केला होता मग आमचा मित्र आदल्या दिवशी सहा वाजता "मेट्रो" थेटर मरीन लाईन्सला जाउन पडद्याजवळची दुसऱ्या रोची तिकीटे काढली कारण पुर्ण थेटरच हाऊसफुल होते.

"शाहरूख खान" जेव्हा "ऐश्वर्या" रायला दुर्बिणीतून बघतो ह्या सीनला वेगवेगळय़ा कोनातुन कॅमेरा फिरतो आणि तेव्हाच आम्हालाही कोणी फिरवत आहे असा अनुभव आम्ही घेतला.जर कधी तुम्हाला २डी पिक्चर ३डी मध्ये बघायचा अनुभव हवा असल्यास नक्की थेटरमध्ये पहिली किंवा दुसरी रोची तिकीटे काढा.पण एक फुकटचा सल्ला डोकेदुखीची गोळी खायला मात्र विसरू नका.

"Charlies Angels"  नायिकाप्रधान अक्शनपॅट हा इंग्रजी चित्रपट मराठा मंदीर बॉम्बे सेंट्रल लागला होता.मला बघायचा होता म्हणून मी आणि माझी मैत्रीण दोघीच पहिल्यांदा इंग्लीश पिक्चर बघायला गेलो होतो. आमच्या रोमध्ये तसेच पुढच्या आणि पाठ्यच्या रो मध्ये फक्त पुरूष बसलेले होते.आम्ही महान मुलींनी नेमकी रोमधली मिडल सीटची तिकटे काढली होती. पडद्यावर जेव्हा किसींग सीन आले तेव्हा मात्र आम्हालाच कसेतरी वाटले मग आम्ही पिक्चर अर्धवट टाकून सरळ घरी निघुन आलो होतो.

आम्ही दोघी आजही हा किस्सा आठवला की स्वता:च्या मुर्खपणावर खुप हसतो.

हा शेवटचा किस्सा मात्र आम्हा नवरा बायकोने  एकत्र घेतलेला अनुभव आहे.

"स्त्री" हा हाॅरर काॅमेडी पिक्चरचा लेट नाइट शो  आम्ही "सनसिटी पार्ले" येथे पाहीला होता. आम्ही सनसिटीवरून नेहमी शाॅटकटने गल्लीतून चालत  घरी जायची सवय. ती गल्ली दिवसाही तशी सुनसान असते तशीच रात्रीसुद्धा तिकडे चिटपाखरू नव्हते. आम्ही रात्रीच्या दीड वाजता चालत घरी जात होतो. आम्ही आणि आमच्या पाठीमागुन एक जोडपे असे चारच जण चालत होते. हाॅरर चित्रपटाचा परीणाम आणि गल्लीची शांतता ह्याने आमची भीतीने गाळण उडालेली...

केव्हा एकदा गल्ली संपते व मेन रोडला पोहचतो असे झाले होते. धीर येण्यासाठी चालताना मध्येच मी त्या जोडप्याला मागून वळून बघायची.अश्याप्रकरे आम्ही गल्लीमध्ये असलेल्या चार रस्त्यावर आलो.मी पुनः पाठी बघितले तर ते जोडप गायब झालेलं. 

हे बघून आम्ही मात्र शंभर मीटरच्या शर्यतीत असल्यासारखे धावत मेन रोडला आलो.

रिक्षा अडवताना मला ते जोडपे दुसऱ्या गल्लीमधून बाहेर पडताना दिसले. त्यानंतर मात्र आम्ही लेट नाईट शोनंतर सरळ रीक्क्षाच करतो.नो चाली चाली प्रकार.सनसिटी मल्टीप्लेक्स थेटर  हे जुने लक्ष्मी थेटर तोडुन केलेले आहे.

जसे आम्ही मोठे होत गेलो तसेच थेटर पण बदलत गेली, मिटत गेली...असा आम्हा दोघा चित्रपट वेड्यांचा कॉलेजपासून आतापर्यंतचा थेटर प्रवास.

🎭 Series Post

View all