एक सोन्याचा पिंजरा भाग 6

महेश उर्फ राजेंद्रकुमार समोर आता नवे आव्हान उभे राहिले.



एक सोन्याचा पिंजरा भाग 6

मागील भागात आपण पाहिले अक्षय,समीर आणि शरद तिघांनी मिळून केलेल्या चौकशीत पवन त्या क्लबमध्ये जात असल्याचे दिसले. त्याबद्दल माहिती मिळवून देईल असा मार्ग शोधण्यात त्यांना यश आले. इकडे पिंटोने मुलाखत घ्यायला बोलावले होते.आता पाहूया पुढे.


पिंटो बोलायला लागला,अक्षय,मी बॉलीवूड स्टोरी करायला सुरुवात केल्यावर लक्षात आले इथे जे वरून दिसते तसे काहीच नाही. ए.जे.स्टुडिओ नवीन टॅलेंट हंट स्पर्धा घेणार होते. त्याबाबत वार्तांकन करण्यासाठी मला सांगण्यात आले. देशभरातून मोठे व्हायचे स्वप्न घेऊन आलेले अनेक तरुण इथे एकत्र झाले होते. मी त्यातील प्रत्येकाला भेटू लागलो.

त्यात मला सगळ्यात वेगळा वाटला तो महेश. डॉक्टर असलेल्या महेशची प्रसिद्धीची भूक प्रचंड होती.

मला सहज वाटून गेले,जर हा नाही जिंकला तर तो काय करेल?

मी पुढे प्रश्न विचारला,"मग काय झाले? महेश जिंकला का?"


त्यावर हसत पिंटो म्हणाला,"ते सगळे तुला महेश उर्फ राजेंद्रकुमार सांगेल."


तर ती स्पर्धा कव्हर करायला गेलो. त्याचवेळी मला तिथे एक तरुण भेटला.

त्याने मला सांगितले,"बातमी दिवसा नाही रात्री असते इथे."

तो निघून गेल्यावर मी विचार केला. अशी काय बातमी असेल रात्री शोधायला हवी.


त्या रात्री मी गुपचूप ए.जे.स्टुडिओमध्ये प्रवेश केला. सगळीकडे सामसूम होती. स्पर्धक उतरले होते तिथे सगळे झोपी गेले होते. अत्यंत सावध राहून मी कानोसा घेत होतो. रात्रीचे बारा वाजून गेले. काहीही घडले नव्हते. बहुतेक त्याने माझी चेष्टा केली. असा विचार करून मी परत जायला निघालो.


इतक्यात स्टुडिओच्या मुख्य गेटमधून तीन चार आलिशान गाड्या आत आल्या. मी हळूच लपून बसलो. गाडीतून भारतीय फॅशन जगतातील अत्यंत प्रसिद्ध मॉडेल आणि काही अभिनेते,राजकीय नेते उतरले.

सगळेजण एका भव्य पार्टी हॉलमध्ये एकत्र झाले. मधोमध अभिनेते आणि मॉडेल नृत्य करू लागले. थोड्याच वेळात मी जे पाहिले त्यावर माझा विश्वास बसेना. समोर चालू असलेला सेक्सचा बाजार पाहून मला धक्का बसला होता.


मी अत्यंत सावध राहून काही फोटो घेतले. गुपचूप बाहेर पडलो अजूनही माझे हृदय धडधड करत होते.

पिंटो थांबला आणि मी त्याला म्हणालो,"मला एके ठिकाणी जायचे आहे.आपण नंतर बोलूया का?"

पिंटोने हसून होकार दिला आणि मी बाहेर पडलो.


शरद आणि मी वेगाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बेमालूम वेषांतर करून आम्ही आत प्रवेश केला. आमच्याकडे पाहून तिथला वेटर हसला.


त्याने चावी दिली आणि म्हणाला,"आज कोण आनेवाला है?"


आम्ही त्याला बाहेर हाकलले. बरोबर रात्री दहा वाजता बेल वाजली. मी जाऊन दार उघडले. टी. व्ही.वर अत्यंत सोज्वळ नायक साकारणारा तो अभिनेता अत्यंत तंग पँट,जवळजवळ सगळे अंग दिसेल असे कपडे,डोळ्यात भडक काजळ,भडक रंगवलेले ओठ. अशा अवतारात उभा होता.


आत येताच त्याने यांत्रिकपणे सगळे कपडे उतरवले आणि म्हणाला,"क्या करना है बोलो?"


मी त्याला म्हणालो,"हे सगळे कशासाठी करतोस? अभिनयातून पैसे मिळतात ना?"


तसा तो मराठीत बोलू लागला,"साहेब पैसा,दारू आणि शरीरसुख यांचे एकदा व्यसन लागले की नैतिकता येते कुठे?"


शरद म्हणाला,"पवन हे सगळे करायचा?"

आता तो गडबडबला,"तुम्ही कोण आहात? मी निघतो."


शरद पुढे झाला,"मी इन्स्पेक्टर शरद फ्रॉम क्राईम ब्रांच."


तो म्हणाला,"सर,माझे करियर उद्वास्त होईल,प्लीज मला सोडा."


शरद म्हणाला,"आम्हाला पवनचे खुनी पकडण्यात मदत केलीस तर नक्की सोडू."


त्यावर तो म्हणाला,"सर मी सगळी मदत करायला तयार आहे. त्या रात्री पार्टीत मीसुद्धा होतो. पवन डायरी लिहीत असे. तुम्ही ती डायरी मिळवा. त्यातून माहिती मिळेल. मी सुद्धा पुरावे गोळा करेल."


शरदने त्याला सोडून दिले. आम्ही घरी पोहोचलो रात्रीचे तीन वाजले होते. मीस्वतःला बेडवर झोकून दिले.



दुसऱ्या दिवशी जवळपास दहा वाजता मला जाग आली. तोवर सुधांशूचे दोन फोन येऊन गेले होते.

मी घाईने त्याला फोन केला,"अक्षय कुठे आहेस तू? आपल्याला निघायचे आहे. मी नेहमीच्या जागी वाट पाहतोय."


मी फोन ठेवला. दोन दिवस शहराबाहेर जात असल्याचे शरदला कळवले आणि निघालो. आम्हाला तिकडे पोहोचायला दुपारचे तीन वाजले होते. राजेंद्रकुमार आमची वाटच पहात होते.

मी कॉफी घेत बोलू लागलो,"तुम्ही ती स्पर्धा जिंकलात का? पुढे काय झाले?"


राजेंद्र पुढे बोलू लागले,"त्या स्पर्धेने अभिनय,मेकअप,आवाज अशा अनेक गोष्टी शिकत होतो. पण मला ए.जे.मधील काही लोक खटकत असत. त्यांचे सारखे अंगाला हात लावणे,स्पर्श करणे मला आवडत नसे. माझी कामगिरी उत्कृष्ट होती. मीच जिंकेल असे सगळ्यांना वाटत असताना विजेता म्हणून मुंबईचा विनय विजयी ठरला.


मला खूप मोठा धक्का बसला. स्पर्धा संपली होती. आता माझ्या हातात ना काम होते ना रहायला जागा. मी रात्री विमनस्क स्थितीत भटकत होतो.


एवढ्यात मॅनेजरच्या खोलीतून आवाज ऐकू आला,"तुला जिंकून दिले. बदल्यात मला काय मिळणार?"


आता मी सावध होऊन आत डोकावलो.
विनयने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले त्याच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला,"तू आता काहीही सांग मी तयार आहे."


हे सगळे ऐकून धक्का बसला. मी जायला मागे वळलो आणि धक्का लागून काहीतरी पडले. मॅनेजर पटकन बाहेर आला.

मला पाहताच तो म्हणाला,"आत ये."


मी खूप चिडलो होतो. आत गेल्यावर पाहिले विनय पूर्ण विवस्त्र उभा होता.

मला हसत तो म्हणाला,"इथे फक्त सौंदर्य असून चालत नाही.ते योग्य ठिकाणी वापरावे लागते."

मॅनेजर मला म्हणाला,"महेश,हे सगळे इथे चालते. तू तयार असला तर मला नक्की संपर्क कर."


मी रागाने त्याच्या कानाखाली मारली आणि बाहेर पडलो.


मी बाहेर तर पडलो परंतु असे हारून परत जायचे नव्हते. त्यासाठी इथेच यशस्वी होऊन दाखवायचे असा निश्चय केला. आता मला सर्वात आधी मुंबईत रहायला जागा शोधावी लागणार होती. मला काय करायचे काहीच कळत नव्हते. मी त्या रात्री ए. जे.स्टुडिओच्या दारात झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मी गर्दीचा एक भाग झालो होतो. मला काय करावे सुचत नव्हते.


इतक्यात सुरींदरने मला आवाज दिला,"ओय महेशबाबु अब क्या करोगे? घर वापस जाओगे?"


मी नकारार्थी मान हलवली.

तो म्हणाला,"फिर चलो.हम सब मिलकर रहते है| हमारे साथ रहो|"


मी एका नव्या प्रवासाला निघालो होतो.


काय होईल राजेंद्रकुमारचे?तो यशस्वी होईल की तडजोड करेल?पिंटो काढलेले फोटो छापेल का?

वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा.

🎭 Series Post

View all