एक पत्र प्रिय बहीनिस

Sisters are necessary in the life...the besties relation between sisters...

एक पत्र प्रिय  बहिणीस

अवनी आणि तन्वी दोघी चुलत बहिणी,दोघींच्या वयात बराच फरक होता,पण तरी देखील दोघींचे एकमेकींशी नेहमीच पटायचे,...अगदी जीवाला जीव लावणाऱ्या दोघी,खरंच सख्ख्या बहिणी देखील इतक्या चांगल्या वागत नाही जेवढ्या की अवनी अन् तन्वी एकमेकीं सोबत वागत होत्या...

दोघी वेगवेगळ्या गावी राहत असे,म्हणून सोबत न राहण्याचे दुःख दोघींना नेहमीच राहत असे,...पण काही कार्यक्रम किवां त्यांना वाटेल तेव्हा त्या एकमेकींना आवर्जून भेटत असत...दोघींचा देखील एकमेकांवर खूप जीव होता,...आणि योगायोगाने अवणीला तन्वी ज्या गावी राहायची तिथेच नोकरी लागली अन् अवनी तन्वी कडेच राहायला आली,म्हणजेच तिच्या काका काकू कडे आली...

आता तन्वी देखील जाम खुश झाली होती,आणि सोबतच अवनी देखील,तन्वी ही अवनी पेक्षा वयाने लहान होती,म्हणून ती ताई असे ताई तसे करून अवनी ला च सर्व काही सांगत होती आणि तिला आता तिच्या आईची ही गरज वाटत नव्हती,कारण तिच्या सोबतीला आता तिची अवनी ताई होती.,..

तन्वी च्या आईला मात्र या गोष्टीचा खूप राग यायचा तिला वाटत होते आपली तन्वी या अवनी मुळे आपल्या पासून खूप दूर जाईल,...म्हणून तन्वी च्या आईने अगोदर अवनी चे लग्न करावे असे अवनी च्या आईबाबा ला सांगितले,परंतु अवनी च्या इच्छे विरुद् काहीही करायचे नाही असे अवणीच्या आई बाबा चे ठाम मत होते...

आणि अशातच एके दिवशी एक स्थळ आले व त्यांना मुलगी म्हणजेच अवनी पसंत पडली,त्यामुळे तन्वी च्या आई ने अवनीच्या आईबाबा ना समजाऊन सांगून अवनी चे त्या मुलासोबत लग्न पक्के केले....

अवनी ला मात्र तन्वी पासून लांब जाण्याचे खूप दुःख होत होते,पण काय करणार तिचा नाईलाज होता...अशातच अवनी चे लग्न पार पडले,अवनी चे सासर थोडे जुन्या विचाराचे होते त्यामुळे त्यांनी अवनीला बजावून सांगितले की या नंतर सर्व काही सासरच माहेर विसरायचे आता....आणि कदाचित म्हणूनच अवनी पासून तन्वी खूप लांब चालली होती....

लग्नानंतर आपल्या लाडक्या बहिणी सोबत भेट न होऊ शकल्या मुळे,तिने प्रिय बहिनिस पत्र लिहिले...पत्र खालील प्रमाणे,,

प्रिय तन्वी,,

मी तुझी ताई अवनी,मला क्षमा कर की मी लग्नानंतर कदाचित तुला विसरली असेल पण तू माझ्या मनात कायम राहशील,खर तर पत्र लिहिण्याचे कारण असे की मी तुला कायमच मिस करते,काय माहित तुला माझी आठवण येते की नाही...

मला माहित आहे की वेडाबई माझ्या वर रागावली आहे,पण थोड समजून घे अन् प्लीज राग नको ग करू...तुला आठवते का ग आपण लहान असताना किती छान खेळायचो,..अन् खूपदा आपले भांडण देखील व्हायचे,...पण त्या भांडणात जो गोडवा होता तो आता कशातच नाही ग तन्वी...

तू अशी माझ्यावर रागु नकोस ना,प्लीज बोलणं माझ्यासोबत,तुझी ताई नेहमीच वाट पहिल...तू तुझ्या ताईला पूर्णतः विसरली का ग,,,किती अनमोल क्षण सोबत घालविले आपण..का ग तू तुझ्या ताईला अशी विसरलीस,,माझं काही चुकलं असेल तर तसेही मला सांग...पण असा अबोला माझ्यासोबत नको ग करू.....

आपण केवळ बहिणीच नाही तर बेस्ट फ्रेंड सुध्धा होतो,तू सगळेच कसे बरे विसरली....तुला आठवतात का ते क्षण ज्या क्षणी तुला माझी गरज वाटायची आणि मी लगेच हजर व्हायची...आपण सख्या बहिणी पेक्षा ही खूप चांगलं राहतं होतो,पण आता तू मला कायमची विसरली...

माझं लग्न झाल्यापासून आपल नातं जरा जास्त लांब गेलं,पण माझ्या मनात तू कायम घर करून राहशील....मी तुला कधीच विसरू शकणार नाही,,जरी तू मला विसरली तरी सुद्धा....तुझी ही अवनी ताई कायम तुझ्या सोबत राहील....

पण तुझा हा अबोला मला खूप रडवितो,मला तुझी नेहमीच आठवण येते ग तन्वी......प्लीज माझ्यासोबत बोल ना ग माझी लाडकी चिऊताई....

या पत्रात तुझे कशाने मन दुखले असेल तर मला क्षमा कर..,..


                               तुझीच लाडकी अवनिताई

Ashwini Galwe Pund...