Login

एक पत्र देवाघरी गेलेल्या बाबांचं

Love never ends, memories make alive

सुहास लवकर घरी ये बाबांना त्रास होत आहे ,मला भीती वाटते आहे..आशा ताईंनी मुलाला फोन  करून  बोलावले...सुहास आला पाहतो तर काय ! घराभोवती गर्दी झाली होती.. त्याचा पाय पुढे जाता जाईन ..आईच्या रडण्याचा आवाज येता..त्याला पाहताच सर्व बाजूला झाले.त्याचा बाबा अटेक येऊन देवाघरी गेला होता ..सुहासला धक्का होता.. असे कसं होऊ शकते??.. बाबाला आवडते म्हणून भेळ आणायला गेला होता.....काय एका  क्षणात असे झाले.. सर्वच संपलं होतं.. आईचा तो भकास चेहरा पाहवत न्हवता,कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी आई आज स्वतःच कुंकू पुसत होती,भिंतीला आपटून बांगड्या फोडल्या..सतत चक्कर येऊन कोसळत होती, जोरजोरात किंचाळत होती, सुहास उठव की तुझ्या बाबाला ,असं कसं सोडून गेले आपल्याला ,उठवं सुहास उठवं बाबांना... तो ही बाबाच्या पायापाशी बसून रडु लागला...त्याच्यासाठी त्याचे वडील म्हणजे जीव की प्राण होते... सोडला होता त्यांनी आज प्राण अचानक ,वाटलं सुद्धा न्हवतं असे काही होईल ,झाले होते हे ..

कार्य उरकले..बाबाशिवाय जगायला शिकायलाच हवे होते... त्याशिवाय पर्याय न्हवता..बाबाचा फोटो पहिला की त्याला असे वाटायचे की अजून घरातच आहे बाबा..भास व्हायचा त्याला....सुट्टी होती त्याला आज..त्याला बाबांची आठवण येत होती... बाबांच्या अनेक आठवणी चाळत बसला होता, जुने फोटो त्याला फार आवडायचे आणि त्याच्या बाबांनाही, तेच चाळत बसला होता....तोच त्याच्या हाती हरवलेलं  पत्र आले, जुने फार जुने जेव्हा तो शाळेत जायचा.... तेव्हा बाबा बाहेर गेला होता .खास त्यांच्यासाठी ते पत्र लिहिले होते.. खूप वर्षाने सापडले  होते,फोटोच्या आतल्या बाजूला लपून बसले होते. मोत्यासम अक्षर होते बाबांचे....त्याला राहवलं नाही ते पत्र वाचायला घेतले....पत्रात लिहिले होते..

प्रिय सुहास,

कसा आहेस बाळा??मला तुझी खूप आठवण येते ..मला माहित आहे तुलाही माझी खूप आठवण येते.पण आता मला लगेच यायला जमणार नाही हा,पण तू अजिबात काळजी करू नको इथे मी व्यवस्थित आहे..आईने पत्रात लिहिले होते ,तू माझ्या आठवणीत सतत  रडत  राहतोस..असं नको करू ,तुला माहीत आहे ना मला तू रडलेला अजिबात आवडत नाही..आणि असा तू रडत राहिला तर आईची काळजी कोण घेणार???मी इथे आहे ...आता तुलाच आईची काळजी घ्यायची आहे..प्रॉमिस कर मी येईपर्यंत तू आईची काळजी घेशील..आणि आईला अजिबात त्रास द्यायचा नाही..वेळेवर जेवत जा, अभ्यास करत जा.. आईलाही मदत करत जा तिची तब्येत बरी  नाही..तुझ्यासाठी छान भेट घेतली आहे  आल्यावर देईल.लवकर येण्याचा प्रयत्न करेल ,आल्यावर मस्त मज्जा करूयात ... बाळा काळजी घे तुझी आणि आईची..

तुझा,
बाबा.

पत्र वाचताच डोळे पाणावले...बाबांनी प्रेमाने आनलेली भेट आजही जपून ठेवली होती त्याने .. ती भेट म्हणजे पुस्तक "अग्निपंख"..सुहास ला वाचनाची फार आवड होती म्हणून त्यासाठी ते पुस्तक आणले होते... आज ते पुस्तक त्याने उराशी कवटाळले,तसे त्याला भास झाला बाबाच्या स्पर्शाचा... ते पुस्तक त्याला बाबांनी अनेक वेळा वाचून दाखवले होते, अर्थ समजावला होता..त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानाला  बाबांच्या हाताचा स्पर्श झाला होता....पुस्तकाच्या रुपात बाबा अजूनही जिवंत होता....त्या  पत्रामुळे आज त्याचा देवाघरी गेलेला बाबा जणू पुन्हा भेटला होता...

आपल्यावर प्रेम करणारी माणसे आपल्याला सोडून जरी गेली तरीसुद्धा त्यांच्या अनेक आठवणी त्यांना सदैव जिवंत ठेवतात...एक नाळ जोडलेली असते आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांशी ती शेवटच्या श्वासापर्यन्त नेहमीच मनाशी जोडली जाते. ती नाळ यमराजसुद्धा विलग नाही करू शकत. प्रेमाची नाळ जी आपल्या माणसासोबत जोडली जाते अनेक आठवणींच्या स्वरूपात❤️

अश्विनी पाखरे ओगले.
❤️मनातलं मनापासून❤️
लेख आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट करा, मला फॉलो करा..