A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session93ee91e3fdd85eed691b8ef903c5638058e8fd3eed4df6d99d22d0fcddc0ee45d9094f95): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Ek onjal prem part 2
Oct 20, 2020
स्पर्धा

एक ओंजळ प्रेम भाग २

Read Later
एक ओंजळ प्रेम भाग २

सायली आवरून येते.. सगळे जण गरम गरम खिचडी खायला बसतात.. सायली तशीच उभी राहते..
“अगं सायली ये.. बस जेवायला.. दमली असशील ना. “
“नको मी नंतर बसते तुमच्याबरोबर..”
“अगं.. आपण सगळे रात्री एकत्र बसतो जेवायला.. कोणी आधी नाही का नंतर नाही.. ये चल जेऊन घे..”
जेवणं आटपून योगेश आणि राहुल त्यांचा खोलीत निघून जातात.. रुपाली आणि मंगला स्वयंपाक घरात जातात.. सायली सुद्धा पाठोपाठ तिथे जाते..
“ मी मदत करू का?”
“नको वाहिनी.. आम्ही करतो. नंतर काय तुलाच करायचं आहे.. “
मंगला बोलते,” सायली तू खोलीत जा.. आराम कर बरं.. उद्या पूजा आहे ना आपल्याकडे.. राहुल पण तुझी वाट पाहत असेल.. जा हे आम्ही करतो..”
सायली तिथेच जरा घुटमळत होती.. रुपालीच्या लक्षात आलं की दादाने काहीतरी पराक्रम केला आहे.. 
“वाहिनी चल आपण जाऊया.. मी येते तुझ्यासोबत.. अगं तुला अजुन नवीन आहे ना घर होईल सवय.. चल..”
अगदी मैत्रिणी प्रमाणे ती सायलीला घेऊन जाते.. इकडे खोलीत राहुल पुस्तकं काढून बसलेला असतो..
“दादा उचल ही पुस्तकं.. अरे सायली ला घेऊन यायचं ना खोलीत.. आता ही तिची सुद्धा खोली आहे..”
“रूपे, तू जास्त शिकवू नकोस मला.. मी बघून घेईन.. ही माझी खोली होती, आहे आणि राहील.. ती तिचं काय ते बघून घेईल..”
“अरे दादा ती तुझी बायको आहे आता.. तुझ्या सगळ्या गोष्टींवर आता तिचा समान हक्क आहे.. तिची पण झाली ना ही खोली आता..”
“रूपे तुझा बहीण म्हणून समान हक्क आहे हिचा नाही.. “
“तू हे उचलतोस की नाही? का मी उचलू? आईला बोलावू का त्यापेक्षा?? तिच तुला सरळ करेल..”
“नको काही गरज नाही.. मीच जातो बाहेर. घाला गोंधळ तुम्ही..”
“दादा……” राहुल झटकन निघून पण जातो.. सायलीला खूप रडू येतं. तिच्या घरात लाडाची असल्यामुळे असा प्रसंग कधीच आला नव्हता.. 
“वाहिनी तू रडू नकोस ग.. तो असाच आहे.. तू लक्षात ठेव रडत बसलीस तर काही होणार नाही. तो मुलींच्या बाबतीत लाजरा आहे पण वाईट नाही.. थोडं समजून घे त्याला.. मला माहिती आहे त्याने तुला समजून घेतलं पाहिजे पण आता काय करायचं..”
सायली रुपालीच्या बोलण्यामुळे जरा शांत होते.. नणंद आणि सासूचा पाठिंबा तिला भावतो.. ती गुपचूप झोपायला जाते.. थोड्या वेळाने राहुल खोलीत येतो आणि तिला बेड वर झोपलेलं बघतो.. एक सतरंजी घालून तो खाली झोपतो.. 
“अहो खाली नका झोपू.. वर झोपा ना..”
“नको.. झोप तुच. मी बरा आहे इथे..” असं म्हणून मान फिरवून राहुल झोपून जातो.. सायलीचा खूप वेळानंतर डोळा लागतो.. दुसऱ्या दिवशी पूजा, पाहुणे, जेवणं ह्यात वेळ कसा निघून जातो कळतच नाही.. सायलीचे आई बाबा , काका काकू, भाऊ येतात. माहेरची माणसं पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलतं.
“काय ग सायु? नीट झोप लागली ना? काही त्रास तर नाही ना झाला? तुझे डोळे सुजल्यासारखे वाटत आहेत.”
मंगला आणि रुपाली क्षणभर ही काय सांगेल आता याची वाट बघत होत्या..
“आई अगं काही नाही.. काल खूप दमले होते.. तुमच्या आठवणीत रडूच थांबत नव्हत पण रुपाली आणि आईंनी फार छान समजावलं मला.. अगदी तुमच्या सारख्या आहेत. आणि आज ही लवकर उठले ना म्हणून असं जरा वाटतंय वेगळं..”
आपल्या सुनेने सासरची बाजू सांभाळून घेतल्याने  मंगलाला फार कौतुक वाटलं.. थोड्या वेळाने सायलीच्या आईला बाजूला नेऊन मंगलाने त्यांना काल घडलेलं सांगितलं.
“तुम्ही काळजी करू नका.. मी सायलीच्या बाजूने भक्कम उभी आहे.. आमचा राहुल वाईट नाही.. पण हे असं तुम्हाला न सांगणं माझ्या तत्वात बसत नाही.”
“मंगला ताई आमचा ह्या घरावर पूर्ण विश्वास आहे. मुलांना थोडा वेळ दिलाच पाहिजे.. तुम्ही काळजी करू नका दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके बुडतील की काही दिवसांनी आपण त्यांना दिसणार नाही.”
असं म्हंटल्यावर दोघी खळखळून हसतात.. दिवस संपतो आणि सायली पुढे परत प्रश्न उभा राहतो खोलीत कसं जायचं..
तेवढ्यात मंगला पाठून येते..
“सायली जरा येतेस माझ्यासोबत?? ये इकडे.”
सायली आणि मंगला बाहेर मोकळ्या हवेत बागेत जातात.. 
“सायली तुला एक गोष्ट सांगू?? मी लग्न करून आले ना ह्या घरी तेव्हा अशीच होते.. लाजयचे, नुसता गोंधळ.. मग माझ्या सासूबाईंनी मला एकच सांगितलं की तुझं स्थान तुला निर्माण करायचं आहे. अशी राहिलीस ना तर तुझं काही चालणार नाही.”
“मग मी काय करू? मी ह्यांना फार ओळखत नाही..”
“अगं मला कुठे पहिल्यापासून ओळखतेस. पण झाली ना आपली गट्टी? तसच तू रोज राहुल ला बघ.. तो काय करतो, त्याचा आवडी निवडी काय? कुठला रंग त्याला आवडतो, पदार्थ कुठला आवडतो आणि असं बरच काही.. मग तुला तो हळू हळू समजत जाईल..”
“बरं आई..  मी प्रयत्न करेन. पण दोन्ही बाजूंनी झालं पाहिजे ना..” असं खणखणीत आवाजात सायली बोलली..
“वाह.. आवाज आहे म्हणजे आपल्याला.. असाच आवाज काढ जरा.. हळू हळू गोंजरायचं आणि हळूच एक फटका पण मारायचा.. लक्षात ठेव. आम्ही आहोतच ग.. पण तुम्हा नवरा बायको मध्ये जेवढं तुम्ही तुमचे प्रश्न सोडवाल तितकं बरं.. चल आत जाऊ उशीर झाला आहे..”
सायली सासूबाईंचा आत्मविश्वास घेऊन आत मध्ये पाऊल ठेवते.. 
तडक खोलीत जाते.. खोलीत जाऊन बघते तर राहुल खाली झोपलेला असतो.. तिच्याकडे लक्ष न देणाऱ्या राहुलने मात्र तिची बेड वर झोपायची सोय केली असते. त्याचा एवढ्याशा काळजी दाखवण्यामुळे सायली हुरळून जाते. पुढे जाऊन ती राहुलचं पांघरूण नीट करते... तिचं आवरून राहुल कडे बघत बघत झोपून जाते..
….....................................................................
सकाळी उशिराच जग येते बघते तर राहुल खोलीत नसतो. समोर घड्याळात १० वाजले असतात..
“बापरे एवढे वाजले? सायली हे सासर आहे असं नाही चालणार इथे.. आता काय करू? आई काय बोलतील? राहुल तर हसेल की किती वेळ झोपा काढते..” स्वतःशीच बडबडत ती पटापट आवरून घेते आणि बाहेर येते.. राहुल बाहेर त्याचं काम करत असतो. मंगला स्वयंपाक घरात असते. रुपाली आणि योगेश दिसत नसतात.. ती स्वयंपाकघरात जाते.
“आई, माफ करा मला उशीर झाला उठायला.. मला सवयच नाही ना लवकर उठायची पण मे उद्या पासून उठेन नक्की.. सगळं करेन.. मला स्वयंपाक येतो सगळा…”
“ बरं पुरणाच्या पोळ्या करायला घे.”
सायली मंगला कडे आ वासून बघत बसते.. मंगलाला हसू आवरत नाही..
“हा चहा घे आधी.. वेडे मजा केली तुझी.. मला माहिती आहे तुला काय येतं आणि काय नाही.. हो पण आज उशीर झाला ठीक आहे उद्या पासून लवकर उठ.. शिस्त सगळ्यांना सारखी आहे त्यात तडजोड नाही..”
मंगला तिच्या स्वभावाप्रमाणे सायलीला समजावून सांगून एक धडा सुद्धा देते.. सायलीची कळी खुलते.. अच्छा आपल्याला असच करायचं आहे राहुलच्या बाबतीत.. आईंना जमतं पण मला जमेल का?? का नाही जमणार? जमेल..  असं ती स्वतःशीच पुटपुटत असते..
“अगं सायली.. ये इकडे पोळ्या भाजायला.. राहुलचा विचार नंतर कर..” सायली थोडीशी लाजते.. दोघी मिळून स्वयंपाक करून टाकतात..
“आई, रुपाली आणि बाबा कुठे आहेत? दिसले नाहीत?”
“ हे कामाला गेले आहेत जेवायला येतील आणि रुपाली सकाळीच कॉलेज ला गेली आता येईल इतक्यात..”
“अच्छा..”
“जा बाहेर.. राहुल आहे ना.. बघ तो काय करतोय.. त्याला विचार जेवायचं का?”
“हो जाते..” असं म्हणून ती बाहेर येते.. राहुल तेवढ्यात उठून कुठेतरी गेलेला असतो.. त्याला ती घरात सगळीकडे शोधते. कुठेच नाही म्हणून मग बाहेर बघते तर राहुल बागेत काम करत असतो..  चाफ्याचा झाडाला थोडी माती आणि खत घालतो. ते झाल्यावर चक्क झाडाशी गप्पा मारतो..
“मी तुझ्याशी कायम मनातलं बोलतो.. आजही त्याची गरज वाटते आहे.. सायली कशी आहे मला माहीत नाही पण तिला दुखवायचं माझ्या मनात नसतं. मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं पण बाबा आणि आई पुढे माझं काही चाललं नाही.. तूच सांग आता मी काय करू? मला त्या मुलीला त्रास नाही द्यायचा. पण उगाच गोड बोलून तिच्या अपेक्षा का वाढवू?” 
सायली ऐकून थक्क होते. तिला कळतं नक्की काय मुद्दा आहे ते.. ती मनाशी काहीतरी ठरवते आणि आत जाते. राहुलला माहीत नसतं की सायली ने ऐकलं आहे. तो काम झाल्यावर आत निघून जातो..

क्रमशः
© स्वराली सौरभ कर्वे.

 

Circle Image

Swarali Saurabh Karve

Business

लिखाणाचा प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे.