अमित एक Civil Engineer... घरची परिस्तिथी साधारण.... त्यामुळे त्याच्या बाबांच्या मित्रानी त्याला शहरात नोकरीसाठी नेले.... घरात आनंद झाला सगळ्यांना..
दिवाळी आली होती महिन्यावर... अमित ने तयारी करायला सुरुवात केली.... आई बाबा बहीण सगळ्यांना काहीतरी घेऊन जायचे ठरवले त्यांनी....
आईला साडी, बाबांना कपडे, बहिणीला भाऊबीज म्हणून घड्याळ.... सर्व घेऊन आला....
आज साइट वरून आला की, तो घरी जाणार होता आठ दिवस आधीच... कारण आल्यापासून त्याने सुटटी घेतली नव्हती गावी गेला नव्हता... आज 3महिन्यानी तो गांवाला जाणार होता...
नियतीच्या मनात काही वेगळे होते.... साईट वर काम सुरू असताना स्लॅब पडला आणि एक जागीच गेला.... पोलीस कंप्लेंट झाली.... अमितला अटक झाली... त्या बाबांच्या मित्राने स्वतः चे नाव खराब होऊ नये म्हणून अमितला यात अडकवले.... मी तूला बाहेर काढेन... असे तें काका म्हणाले... आणि अमितला जेल मध्ये जावे लागले.... पुढचा दीड महिना तो जेल मध्ये होता....
टीव्ही वर बातमी आली एवढे ते प्रकरण मोठे झाले... गावाला आई रडत होती... बाबाना काय करू तें कळत नव्हते... कोणाला दिवाळी साजरी करायची इच्छा नव्हती.... हा हा म्हणता त्याची सुटका झाली...तो गावी आला.... परत कधीच गेला नाही....
गावात सगळीकडे चर्चा.... त्यात लग्नाचे वय.... आईला खूप काळजी.. कस होईल...??
आई बाबा दोघांनी खूप समजावलं...काही झाले तरी आयुष्य जायचं आहे आपण नव्याने सुरुवात करायला हवे....
त्यात त्याचा मामा येतो त्याला समजावून सांगतो....आणि त्याला पार्टनरशीप मध्ये घेईन सांगतो...आणि त्याच्या शहरात घेऊन जातो....
खूप छान सुरू असते, खूप कामे मिळतात...खूप चांगले नाव होते त्याचे....
म्हणतात ना काळ हेच औषध असते...तसेच होते....छान सुरू असते, फ्लॅट, गाडी सगळे घेतो....पण लग्न जमत नसते....शेवटी ज्याच मन चांगले त्याचे सर्व चांगले होते म्हणतात तसे होते....
ओळखी मध्ये लग्न जमते....काखेत कळसा असा प्रकार होतो...
लग्न अगदी छान होते....मस्त चालु असते सर्व....गोड बातमी येते...पण सगळं चांगले होऊन दॄष्ट लागतें तसेच झाले....
मामा आहे म्हणून अमितने काही कायदेशीर पेपर करून घेतले नव्हते.... आणि मोठे काम अमित ने आणले... तें पूर्ण व्हायला आले आणि अमित ला मिळालेले पैसे अपेक्षेपेक्षा कमी असतात... म्हणून तो विचारायला जातो तर भांडण होतात.... अमित च्या लक्षात येते की हा 35-40 लाख रूपयांना फसवत आहे....
शेवटी अमित रागाने गावी येतो.... बायको बाळ झाल्यामुळे माहेरी असते.... बाबांना सांगतो सर्व...पण बाबा म्हणतात नात्यात वाईटपणा नको म्हणून नंतर बघू... काय करायचे ?? पैसे कसे घ्यायचे....??
आता मात्र अमित खचून जातो....बायकोला कसे सांगू?? असा प्रश्न पडतो त्याला.... माझ्याच आयुष्यात असे का??? तें ही दोन वेळा....
गावात माहिती पडते... लोकं अफवा उठवत असतात... फसवलं... लग्न व्हायला हवं म्हणून शहरात गेला... खूप बोलतात...
तो बायकोला भेटायला जातो... सर्व सांगतो... गावी रहायच म्हणतो.... आहे हा धंदा वाढवू असे ठरवलं म्हणतो....
तीच्या घरी पण नातेवाइक उलट सुलट सांगतात...लग्न मोडा सांगतात.... पण ती ठाम असते... ती म्हणते माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर....माझा आतला आवाज मला सांगतोय सर्व नीट होईल...
आणि तो उमेदीने उभा राहतो.... लोकं त्याच्या बायकोला हसुन बोलतात.. एवढे शिक्षण वाया जातंय... शहरात असतीस तर जॉब केला असतास... खूप भांडण लावायला बघायचे... पण ती खंबीर होती....
आज त्यांचा धंदा खूप वाढला... बंगला, गाडी, सगळं आहे... आज ती खेड्यात जाऊन ज्या मुलाना शिक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी ती काम करते... आज त्याचं चौकौनी हसरं कुटुंब आहे.... खरच नवीन सुरवात करून तो यशस्वी झाला....
अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका.....
लाइक आणि कंमेंट करत रहा.....
सूचनांचे स्वागत....
✍✍ अनुजा धारिया शेठ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा