Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

एक मैत्री अशीही...

Read Later
एक मैत्री अशीही...

       मैत्रीच्या गाथा बघायला गेलो तर इतिहासात खूप मैत्रीच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. राम-हनुमान पण मित्रचा होते नाही का? भक्त आणि देवाचं नातं असलेले मित्र, त्यानंतर कृष्ण-सुदामा मैत्रीप्रेम सर्वांनाच माहिती आहे.

        पण आता तुम्ही म्हणाल या झाल्या जुन्या युगाच्या गोष्टीं. मग ऐका, एक प्रसिद्ध मैत्री अजून होती बाराव्या दशकात. दोन मित्र नेहमीच सोबत राहिले आणि सोबतच गेले. ते होते सम्राट पृथ्वीराज चौहान आणि राजकवी चन्द्रवरदाई.


"चार बांस, चौबीस गज,

अंगुल अष्ट प्रमाण

ता उपर सुलतान है

मत चुके चौहान"

हा दोहा आपण ऐकला असेल. हा दोहा होता आपल्या आंधळ्या मित्राला सुलतान म्हणजे मोहम्मद घोरी कुठे बसलाय याची पुर्ण माहिती देणारा.

पृथ्वीराज चौहान आपल्या राज्याची उत्तरोत्तर प्रगती करत होते त्याच वेळी मोहम्मद घोरी सारखा सुलतान त्याच्या राज्यात असलेल्या अराजकतेमुळे आणि आर्थिक तंगीमुळे अस्वस्थ होता. त्याला खुणावात होतं अजमेरचं सर्वगुणसंपन्न राज्य. या राज्यावर आक्रमण करुन धन लुटायचं दिवास्वप्न तो बघत होता. त्याने बरेचदा अजमेरवर आक्रमण केले पण पृथ्वीराज चौहान नेहमीच त्याला पराभवाची धूळ चाटत गेले.

          यातच आपल्याकडील एक राजा जयचंद, घोरीला जाऊन मिळाला. याच्या मुलीने पृथ्वीराज चौहान सोबत लग्न केलं होतं पण जावई म्हणून जयचंदला चौहान कधीच स्वीकार्य नव्हते. हा द्वेष, ही कुचंबणा त्यांना घोरीची मदत करायला घेवून गेली. पण या बदल्याच्या भावनेत आपण आपल्याच मुलीला विधवा करतोय, आपल्याच लोकांचे प्राण संकटात टाकतोय, आपलाच प्रांत दुश्मनाच्या हातात देतोय याचा जराही विचार जयचंदने केला नाही. यावेळी आक्रमण तर झालं पण त्या आक्रमणात सैन्याच्या पुढे गाईचा मोठा ताफा ठेवण्यात आला. हिंदू लोक गाय मारूपण शकतं नाही आणि मरतांना बघू पण शकत नाही. या कपटात पृथ्वीराज चौहान हरले.


             कैदेत त्यांच्यासोबत होते त्यांचे मित्र कवी चांद. सुलतानाने त्यांचे खूप हाल केले, त्यांची भेदक नजर सुलतानाला सहन होत नव्हती म्हणून त्यांचे डोळे फोडले, त्यांना धर्म बदलायला सांगितले. त्यावेळी कवी चन्द्रवरदाई यांनी सांगितले की माझा राजा डोळे नसतानाही अचूक बाण चालवू शकतो. शब्दबाण चालवणारा राजा म्हणून पृथ्वीराज चौहान यांची ख्याती सुलतानच्या कानावर होतीच. आपल्या राजाचे हेच करतब बघायला म्हणून सुलतानाने सभा भरवली. कवीला ईशाऱ्यात लक्ष्याचे वर्णन करायची परवानगी होती. सुलतान एका उंच आसनावर बसून होता.


कवीने सुलतान किती अंतरावर आहे याचे वर्णन सांगितले.

चार बांस चौबीस गज अंगुल अष्ट प्रमाण ता उपर सुलतान है मत चुके चौहान"।


त्यावरून पृथ्वीराज चौहान यांनी नेम लावला आणि बाण सरळ सुलतानच्या छातीत घुसला. सुलतान धरतीर्थी पडला. सैनिक दोघांना पून्हा कैद करण्याच्या वा मारण्याच्या आधीच या दोन मित्रांनी एकमेकांच्या पोटात सुरे घालून मिठी मारली.

         कुणा यवनाच्या हाताने मरण्यापेक्षा स्वतःच्या मित्राच्या हाताने मरणं स्वीकारणारे हे दोन मित्र. एक सम्राट होता आणि एक साधा कवी पण कुठलीच सीमा नसणारी त्यांची अतूट मैत्री इतिहासात अमर झाली.

         आयुष्यभर कवी चांद पृथ्वीराज चौहानांची सावली बनून राहिले आणि मरतानाही त्यांना मिठी मारूनच मेले. कशी असेल त्यांची मैत्री? साक्षात मरण देखील त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवले, किती त्रास झाला असेल त्यांना आपल्याच मित्राच्या पोटात सुरा भोकताना. ज्या मित्रासोबत जगलो,त्याच्या सगळ्या यातनेत, सुख दुःखात सोबत राहिलो त्या मित्रालाच मारायला परिस्थितीने त्यांना विवश केलं.

           किती कठीण निर्णय होता तो पण त्या क्षणीही शत्रूला मारूनच मरायचं हे ठरवलेले वेडे मित्र होते ते. स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता शत्रूला धडा शिकवणारी ही जोडी आज बदनाम होत असली तरी इतिहास साक्षी आहे त्यांच्या मित्रप्रेमाचा त्यांच्या शूरमरणाचा आणि त्यांनी एकमेकांना मरताखेपी मारलेल्या घट्ट मिठीचा.

      खरंच अशी मैत्री होणे नाही, आजच्या घडीला तर मीपणाच्या पलीकडे मैत्री मिळनेही दुरापास्त झालेय.

      आजच्या मैत्रीदिनाच्या या पावन पर्वावर या दोन मित्रांना वंदन करणारी ही छोटीशी लेखरूपी श्रद्धांजली...


समाप्त.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//