एक मैत्री अशीही भाग १

TRue friendship

नताशा गोड मुलगी ..कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होती..तिला छान कॉलेजचं आयुष्य जगावं,असं वाटत होते... कॉलेजची दोन वर्षे तिने फक्त मान मोडून अभ्यास करण्यात घालवले ..मोजक्याच मैत्रिणी होत्या तिला.... एक खास मैत्रीण होती तिची तीच नाव होतं आशा.... आशा सुद्धा नताशाला सर्वच मनातलं सांगायची.... दोघी एकत्र कॉलेजला जायच्या ...नताशा आणि आशा दोघी एकेमेकींसोबत असायच्या....
जिथे नताशा तिथे आशा......

नताशाला मित्रांचे मैत्रिणीचे घोळके पाहिले की,वाईट वाटायचं आपल्यालाही हवा असा मोठा ग्रुप एन्जॉय करायला...फिरायला... मौज करायला...आशा मात्र नताशालाच सर्वस्व मानायची.... नताशा होतीच सुस्वभावी पण नताशाच्या डोक्यात खुळ बसले...मोठा ग्रुप असेल तर एन्जॉय करू शकतो....

थोड्या दिवसाने तिची ओळख स्नेहा नावाच्या मुलीशी झाली....स्नेहा स्वार्थी होती ..तिला फक्त मैत्रि म्हणजे टेंपररी हवी होती,सतत मैत्रिणी बदलणं हा तीचा छंद.... तिला नताशा नावाचं सावज सापडलं होतं... नताशाने निर्मळ मनाने स्नेहाशी खरी मैत्री केली मात्र स्नेहाने तिला कधी खरी मैत्रिण मानलं नाही ...ती आपली नातशाचा वापर करून घेऊ लागली....कॅन्टीनमध्ये बिल नताशा भरायची, कुठे बाहेर गेले की त्याचाही खर्च नताशाचा ,थेटरला सुद्धा गेले की, स्नेहा लगेच लांब पळायची तिकीट काढायच कामं नताशानेच करायचं... 

हे सर्व आशाला कळत होतं की ,स्नेहा फक्त नताशाचा वापर करते आहे....पण नताशा मात्र मोठ्या ग्रुपमध्ये मज्जा करायला भेटत आहे म्हणून ,वेळ छान जात आहे म्हणून खूप खुश होती...जेव्हा आशा तिला सांगत असे तेव्हा ती हसण्यावारी नेही,ती बोलत "अगं मैत्री मध्ये चालत हे"....

नताशा आता वाहवत जाऊ लागली.कधी न्हवे ती तास सुद्धा बंक करू लागली.. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले तिचे ..पण कॉलेजमध्ये एन्जॉय करायचं हे मनी ठरवलं होतं तिने... पण ती खूप मोठी गोष्ट गमवत चालली होती ती म्हणजे तीच डिसीपलीन ......

आधीची नताशा हरवत चालली होती,आशा तिला सतत समजावत होती पण नताशाला अशाचाच राग येऊ लागला,ती तिलाच उलट सुलट बोलायची....तिला वाटायला लागलं आशा जळायला लागली तिच्यावर, पण असे न्हवते नताशा चुकीच्या मार्गावर जात आहे तिला कळत होते..... म्हणून सांगत होती, लांब राहा स्नेहा आणि तिच्या ग्रुपपासून ...पण एक दिवस नताशाला खूप राग आला ,ती अशाशी खूप भांडली... नको ते बोलली....

नताशाचे असे वागणे आशाला दुखावून गेले...काही केल्या ती समजत न्हवती...शेवटी आशा आता एकटी राहू लागली..नताशा नेहमी स्नेहा आणि त्या ग्रुपबरोबर राहू लागली..

काय होते पुढे ,नताशाला कळेल तिची चूक??आशा सारखी मैत्रीण गमावली तिने ....पाहू पुढच्या भागात..

अश्विनी पाखरे ओगले ..
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहित शेअर करा.

🎭 Series Post

View all