Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

एक करार ! भाग -10

Read Later
एक करार ! भाग -10

भाग - 10 मागील भागात - भक्ती विश्वा एका पार्टीत आले तिथे त्यांना रिना मेहता त्यांची मैत्रीण भेटली. भक्तीला विश्वासोबत पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला बाजूला घेऊन ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती.. तेवढ्यात भक्तीने तिच्या गालावर तिच्या हातांची चपराक दिली. रागाने लाल झालेली भक्ती खूप बोलत होती. त्याचे ऐकून घेत नव्हती मग त्याने भक्तीची बोलतीच बंद केली होती.   आता पुढे -  "आय लव यू भक्ती." विश्वा तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. "लव यू टू विशी." तिने ही त्याच्याभोवतीची मिठी एकदम घट्ट केली. "तुला माहितीये ही माझी पहिली वहिली किस आहे." विश्वा. "हो का आणि माझी कितवी आहे?" ती डोक्यावर जोर देत एक बोट हनुवटीवर ठेवत विचार करत होती. "अंऽऽऽ, माझी एकशे पंचवीसवी आहे." "क्कायऽऽ." तो आश्चर्य व्यक्त करत होता. "मग मी तर असंच येता जाता लोकांना पप्प्याचं देत असते नं, पागल आहे. माझा पहिला किस अचानक जबरदस्तीने घेतलेला." ती नाक मुरडत म्हणाली. "तू बोलायची थांबत नव्हती मग काय करु? बाय द वे हे भारीये या बुलेट ट्रेनला थांबविण्यासाठी, वॉव सुपर्ब आयडिया आहे ही." तो खट्याळ हसून म्हणाला आणि त्याने भक्तीला डोळा मारला. तसे तिने त्याच्यावर गाल फुगवले आणि डोळे मोठे केले. तसा तो खळखळून हसायला लागला. थोड्याच वेळात ते पार्टीच्या ठिकाणी गेले. त्याच्या मित्राने त्या दोघांना डान्ससाठी फोर्स केला आणि ते दोघेही डान्स करण्यासाठी समोर गेले. विश्वाने एका हाताने तिच्या कमरेला अलगद पकडले आणि तिने एक हात त्याच्या खांद्यावर आणि दुसरा हात त्याच्या हाती दिला. गाणे वाजत होते. देखा हज़ारों दफ़ा आपकोफिर बेक़रारी कैसी हैसंभाले संभलता नहीं ये दिलकुछ आप में बात ऐसी हैलेकर इजाज़त अब आप सेसांसें ये आती जाती हैढूंढें से मिलते नहीं हैं हमबस आप ही आप बाकी हैंपल भर ना दूरी सहें आप सेबेताबियां ये कुछ और हैं दोघे इतके तल्लीन होऊन नाचत होते की, नाचणारे फक्त दोघे होते. बाकीचे कपल्स तर कधीचं बाजूला झाले होते आणि सगळी मंडळी त्यांच्याकडेच बघत होते. इतक्या सराईतपणे दोघे नाचत होते. नाचतांना त्यांचे मुव्ह, लिफ्ट करणे असो की त्याचे तिला दोन्ही हातांच्या पंजावर उचलणे असो,गाण्याचे बोल जणू दोघाच्या मनाची अवस्था सांगत होती. गाण संपल तरी दोघे एकमेकांच्या मिठीत होते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, तेव्हा कुठे दोघे भानावर आले आणि एकमेकांच्या मिठीतून दूर झाले. वेटरने तिला सॉफ्ट ड्रिंक सर्व्ह केले. ती पटकन प्यायली. थोड्या वेळात तिला विचित्र वाटू लागले. प्रत्येकी दोन दोन दिसू लागले. ती टेबलवर डोक धरुन बसली..रिना तिला तिच्याजवळ आली.  "मा..झ्या नव ..ऱ्यापासून दूर राहायचं, छिपकली, सटवी. सारखी माझ्या नवऱ्याच्या मागे असते.एकच तर नवरा आहे माझा. कडू कारल पण मला लय आवडतो. तु ..झी हिं ..मत कशी झाली ग भवाने माझ्या नवऱ्याला किस करते." भक्ती तंद्रित अडखडत बडबड करत होती. मध्येच रिनाच्या अंगावर धावून गेली. रिनाने दोन माणसांना बोलवून तिला उचलायचा इशारा केला. त्यांनी तिला पकडले तसा तिने त्यांच्या हाताला हिसका देऊन दोन्ही हातांनी एक एक ठेवून दिले . "ओयऽऽऽ भामट्यांनोऽऽ, तु…झी हिं ..मत कशी झाली म...ला हात लावायची." असं म्हणून तिने अजून एक सनसनीत लगावली. तिने तिच्या पायातील एक सँडल त्याला मारायला जोरात फेकली. त्यातील एक व्यक्ती खाली वाकला आणि ती सँडल जेवणाच्या टेबलावर जाऊन पडली "ये पकड के रखो इसे, इसके हाथ बहोत चल रहे है. और इसका मूह भी बंद करो और इस दरवाजे से लेकर आओ,जल्दी करो." भक्तीचे हात बांधले. तिने "विशीऽऽ, मोठ्याने हाक मारली आणि पटकन तिचे तोंड रुमालाने बांधून तिला बाहेर काढून गाडीत टाकले. खूप हात पाय हलवत होती. त्या दोन माणसांनी तिला दंडाला उचलून धरली त्यात तिची दूसरे सॅडल खाली पडले. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती. रिनाने एक मारली आणि ती गाडीत खाली पडली. डोळ्यांतून अश्रू येत होते आणि आता डोळेही बंद होत होते. त्याचा चेहरा समोर आला. ओठांवर गोड हसू आले. तिने आर्ततेने अंतकरणातून त्याला साद घातली आणि डोळे मिटले. जेव्हा तिने विश्वाला हाक मारली, तेव्हा एकदमच धडधडायला लागले. त्याची नजर भक्तीला शोधत होती. तिला तो शोधत होता. पण ती दिसली नाही. तो अस्वस्थ होत होता. त्याने घरी फोन करुन विचारले, पण त्यांना कळणार नाही असे त्याने सत्यनला फोन करुन बोलवून घेतले. एकीकडे एक माणूस वेटरला खूप काही बोलत होता. त्याच्या हातात सॅडल होती, ती त्याच्या ताटात पडली आणि त्याचा महागडा सुट खराब झाला होता. विश्वाला एक वार पाहून लगेच दूसरीकडे जायला वळला दोन पाऊल पुढे जाऊन तो वेगाच्या दिशेने तो त्या माणसाजवळ जाऊन ती सँडल हातात घेतली आणि ती सँडल भक्तीचीच होती. "ही सँडल इथे, ती कुठेय?" त्याचा जीव घाबराघुबरा झाला होता. वाईट फिलिंग येत होती. तो आता सैरभर झाला होता. त्याने सगळीकडे शोधले. सत्यन धावतच आला . "सत्या,भक्ती .." "इथेच असेल रे." "नाहीये इथे, तिचा फोनही लागत नाहीये. तिची सँडल सापडली." तितक्यात मागून संजू आली. "जिजू ,मी ऐकलं सर्व, मला आधी सांगा इथे आल्यावर काय घडलं?" विश्वाने आल्यापासून सर्व सांगतो (त्यांचा किस सोडून ) "आणि ही सँडल सापडली. म्हणजे काहीतर झालंय इथे, ती रिना कुठेय?" पोलिसही आले. "आम्हाला, सत्यन आणि संजना मॅमने सर्व सांगितले." इन्स्पेक्टर कदम. "संजू ,मी तेव्हाच पाहिलं नाही तिला." विश्वाने संगितले. नंतर विश्वाने पहिल्यापासून इन्स्पेक्टर कदमांना सर्व सांगितले. "मॅम, भक्तीचा जी पी एस लोकेशन ट्रेस करतोय डोन्ट वरी आणि रिना मेहताचाही." इन्स्पेक्टर कदम. विश्वा संजूकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. संजूला त्याची नजर कळली. "जिजू, तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नंतर देईल." संजूला त्याची नजर कळली होती. तिने त्याला आश्वस्त केले. त्यांनी सीसीटिव्ही फुटेज पाहिले, पण तिथे काही आढळून आले नाही. ते पाठीमागच्या गेटकडे गेले तिथे त्यांना भक्तीची दुसरी सँडल सापडली. पार्किंगमधील फुटेज पाहिले, रिनाची गाडी पाठीमागच्या गेटजवळ आली होती.  "म्हणजे हे रिनानेच केले. मी सोडणार नाही तिला." कंट्रोलरुममधून फोन आला आणि त्यांना लोकशन मिळाले. भराभर गाडीत बसून सर्व त्या दिशेला निघाले. गाडी वेगाने शहराच्या बाहेर जात होती. विश्वाला खूप अस्वस्थ व्हायला लागले होते. त्याची अस्वस्थता त्याच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. सत्यनने त्याच्या हातावर हात ठेवून धीर देत होता.किती अविस्मरणीय होती आजची संध्याकाळ त्याच्यासाठी, त्याने तिला पहिल्यांदा असे त्याच्यासाठी पझेसिव होताना पाहिले होते. रिनाच्या कानाखाली मारली. 'तो फक्त माझा नवरा आहे.' असे म्हटली. त्यानंतर तिची तुफान मेल सुरु झाली ते बंद करण्यासाठी त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवून बंद केले. त्याचा पहिला वहिला किस कसा झाला. त्यांच्या मिठीत होते फक्त प्रेम. तिचा हक्क गाजवणे, त्यांचा नजरेला नजर देऊन हातात हात घेऊन डान्स करणे, हे आठवून त्याच्या ओठांवर गोड हसू उमलले, त्यानंतर काही वेळातच हे घडले होते. 'भक्ती, कुठे आहेस?' "ती ठीक असेल.माझ मन सांगतेय." जसं काही सत्यनने त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर समजून दिले. त्यालाही खूप अस्वस्थ वाटत होते. ती त्याच्या मावशीची मुलगी होती, पण ही गोष्ट विश्वाला माहिती नव्हती. आता यावेळेला तिचे मिळणे महत्त्वाचे होते आणि आता लोकेशन अचानक बंद झाले. विश्वाने रागाने गाडीच्या स्टेअरिंगवर पंच मारला.क्रमश ..©®  धनदिपाटिम अहमदनगर   


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dhandipa

Housewife

"Simplicity is the true beauty".

//