एक करार ! भाग - 8

"काय गं बाई मी काय बिघडवलय गं तुझं." संजय हात पकडत म्हणाला. "का रे काय झालं? असं का बोलतोय? मी काही ?

एक करार !

भाग -8 

  

मागील भागात -  

विश्वाने स्वीट हवयं म्हणून तिला जवळ ओढून तिच्या गालावर ओठ टेकवून ऑफिसला निघून गेला तरी भक्ती ही मूर्तीसारखी उभी होती

आता पुढे - 

दुसऱ्या दिवशी भक्तीने आईला विचारले,"आई आपण बाप्पाला आणूया का?" 

"तुझी इच्छा आहे ना मग आणूयात की." अंजली भक्तीला म्हणाली.

"ओके मी तयारीला लागते." भक्ती .

भक्ती गणपती आराससाठी तयारी लागली. तिने छान डेकोरेशन केले. बाप्पाची मूर्ती तिने दिव्यांग मुलांकडून करवून घेतली. त्या मुलांचे स्टॉल लावून त्यांना मदत केली. विश्वा ऑफिसमध्ये बिझी झाला आणि संजूच्या विषयाचा विसर पडला.

बाप्पाला आणायची वेळ झाली. विश्वा सत्यन बाप्पाला घेऊन आले. दारात भक्ती केशरी रंगाची नऊवारी साडी, गळ्यात ठुशी, बोरमाळ आणि मंगळसुत्र घातलेली, चेहर्‍यावर हलकासा मेकअप,ओठांवर लिपस्टीक, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ ओय होय साक्षात लावण्यवती समोर उभी होती. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने बाप्पाचे छान स्वागत केले आणि त्यांना त्यांच्या जागी विराजमान केले. तिचे फ्रेंड अमायरा, सोनल, कावेरी, रोशन,संजय ही आले होते. तिने सगळ्यांशी ओळख करुन दिली. संजयने भक्तीला मिठी मारली. छान अशी कॉम्पिलीमेंट दिली. संजयला संजू समजून विश्वाने शेकहँण्ड जरा जास्त जोरात घेतला. संजयचा पंजा विश्वाने चांगला दाबून धरला होता. विश्वा गेला तसा संजयने सुटकेचा श्वास सोडला..

"काय गं बाई मी काय बिघडवलय गं तुझं." संजय हात पकडत म्हणाला.

"का रे काय झालं? असं का बोलतोय? मी काही नाही केलं." भक्ती न समजून म्हणाली.

"हे बघ तुझ्या नवर्‍याने माझा हात मोडला ना. इतक्या टाईट कोण शेकहँन्ड करतं का?." संजय हात दाखवत म्हणाला.

"सॉरी संज्या माझ्यामुळे तुला त्रास झाला. त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल." सगळे जेवण करुन निघून गेले. भक्ती रात्री रुममध्ये आली, तेव्हा विश्वा बेडवर लॅपटॉप घेऊन काम करत होता. ती आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली.

"काय?" तो तिच्याकडे पाहत म्हणाला.

"तू संजयचा हात इतका जोरात का दाबला की त्याला पंधरा दिवसांसाठी हाताला बँडेज बांधावा लागलाय."

"तुझा संजू फार चिपकत होता ना तुला. कोणाजवळ जायला आता तो शंभरवेळा तरी विचार करणार?" तो गालात हसत म्हणाला.

"तर तू जेलस झालास. तो संजू नव्हता, संजू तर आलाच नाही. संज्या फक्त माझा मित्र आहे." भक्ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली.

" मी कशाला जेलस होवू. तो संजू नव्हता म्हणजे?"

"हो का म्हणून त्याचा हात मोडून ठेवलास. जळकुकडा माकड कुठला."

"मग इतका चिपकून का बरं बोलत होतास?"

"मूर्ख माणसा कारण त्याचं आणि त्याची गर्लफ्रेंड प्रियाचं भांडण झाल होतं तेच तो सांगत होता. त्याआधी एकदा माझ्याशी बोलला असता पण नाही." ती थोडी रागवत म्हणाली.

" सॉरी मला नव्हतं माहीत की तो काय बोलत होता आणि तो संजू नाहीये."

"नाहीये तो संजू पण तुला इतकी काय पडलीय संजूची?"

"कारण त्याच नाव जरी काढलं तरी मला त्याचा राग येतो." तो पटकन बोलून गेला.

"तुला राग येतो पण का?" भक्तीने विश्वाला बारीक डोळे करुन विचारले.

"तू माझ्यापेक्षा त्याच्याशी जास्त बोलते." तिच्या मनाला हे ऐकून थोडे बरं वाटले.

"पण तुला काही फरक पडायला नको. आहेच तरी मी कोण तुझी, एका वर्षापर्यंत तुझी बायको म्हणून या घरात आहे. करार संपला की नात ही संपलं." हे म्हणतांना आपसूकच तिचे डोळे पाणावले होते. तिचे पाणावलेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. ती जायला वळली आणि त्याने तिचा हात पकडला. ती मागे फिरली नाही.

"हात सोड माझा." भक्ती म्हणाली, पण तिने त्याच्याकडे पाहिले नाही.

"नाही सोडणार तुझा हात, बायको आहेस तू माझी. हे नात एक वर्षासाठी मर्यादित नाहिये. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी प्रेम करतो तुझ्यावर!" तो तिला पाठीमागून मिठीत घेत म्हणाला. तसे तिने अंग चोरुन घेतले. तिच्या अंगावर शहारे आले. गाल गुलाबी झाले. पुन्हा ती फुलपाखरे पोटात येऊन गुदगुदी करायला लागली.

"काय म्हणालास?" ती अविश्वासाने म्हणाली.

"तू जे ऐकलं तेच म्हणालोय मी. सात जन्मांची सोबत आपली, अशी कशी तुटेल?" त्याने कपाटाच्या ड्रॉवरमधून ते पेपर्स काढले आणि फाडायला लागला तसा तिने त्याचा हात धरला.

"थांब घाई कशाला करतोय. तू नीट विचार कर, पुन्हा जर तुला माझ्याबद्दल नवीन काहीतरी माहिती पडले आणि तुला वाटलं की मी फसवलं आहे, मग तर तुझा विश्वास तुटेल आणि नातंही." भक्ती त्याला थांबवत म्हणाली.

"नाही माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि तुला काहीच नाही वाटत का माझ्याबद्दल?" त्याने ते पेपर्स ताडकन फाडले आणि तिला जवळ ओढले. लक्ष्मी काकूनी आवाज दिला तशी ती बाजूला झाली आणि धावतच अंजलीजवळ गेली.

"आईऽऽ." ती अंजलीच्या गळ्यात पडून रडू लागली.

"काय झालंय माझ्या बाळाला." अंजली आईने काळजीने विचारले.

"आई, त्याने माझ्यावरचे प्रेम कबूल केले." ती आनंदाने आईला म्हणाली.

" ही तर गुड न्यूज आहे ना बाळा, मग अशी रडतेस कशाला?" आई तिचे डोळे पुसत म्हणाल्या.

"पण त्याला जर सत्य माहिती पडले, तर तो म्हणेल मी फसवलंय त्याला, तेव्हा त्याला माझ्यासोबत राहू वाटणार नाही." भक्ती उदास होत म्हणाली.

"असं काहीही होणार नाही. तो प्रेम करतोय तर समजून घेईल तुला. नको काळजी करुस आणि मीही समजवेल त्याला." आई भक्तीला समजवत म्हणाली.

"खरचंऽऽ आई." भक्ती.

"हो." अंजली.

तिने आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि डोळे बंद केले. तसा मगाशी झालेला प्रसंग आठवला चेहर्‍यावर लगेच गोड स्माईल आणि झोपेतसुद्धा ब्लश करायला लागली. विश्वाला मात्र झोप लागत नव्हती. कितीतरी वेळा आईच्या रुममध्ये डोकावले होते.भक्ती गाढ झोपली होती. आईच्या रुमबाहेर तो येरझाऱ्या घालत होता.

"विशूऽऽ."आईने हळूवारपणे साद घातली. तो आत आला.

"काय आई तू झोपली नाहीस?"

"जा हिला घेऊन जा, नाहीतर रात्रभर फेऱ्या मारत बसायचा." आई त्याला चिडवत म्हणाली.

"काय आई तू पण ना, मला झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर वॉक करतोय. झोपू दे तिला इथेच." गालात हसून केसांवरून हात फिरवला.

"नको घेऊन जा तिला." मग विश्वाने दोन्ही हातांवर उचलून घेतले आणि त्याच्या रुममध्ये जाण्यासाठी निघाला तोच आई त्याला म्हणाली, "दुखवू नकोस तिला, काही चुकलं तर आधी ऐकून घे तिचे आणि समजून सांग. तिच्यावर अविश्वास दाखवू नकोस." त्याने शांतपणे ऐकले.

"हो आई, कळतयं मला तुला काय म्हणायचं आहे ते. आयुष्यभर तिची साथ सोडणार नाही." त्याने हसत सांगितले आणि त्याच्या रुममध्ये आला. तिला हळूच बेडवर झोपवून अंगावर ब्लॅकेट ओढले. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिला न्याहाळत होता. खूप काही तिच्यासोबत बोलायचं होतं, पण सध्या तरी तो तिला शांत न्याहाळत होता. जागेपणी तिला असं न्याहाळणे म्हणजे काय ती एका ठिकाणी असते कुठे? त्या दोघांना असा कितीसा वेळ मिळत होता. त्यात तो जीवघेणा अबोला, आता कुठे ती बोलायला लागली होती. तिला न्याहाळताना त्याला कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा ती त्याच्या मिठीत होती. तिचा चेहरा त्याच्या मानेजवळ होता.त्याला तर असं वाटत होतं की, असेच तिला मिठीत घेऊन राहावं,पण आता उठणे गरजेचे होते. तिच्या कपाळावर ओठ ठेवून तो आवरायला गेला. ती उठली तेव्हा नुकताच तो बाथरुम मधून टॉवेलवर बाहेर आला. पहिल्यांदा असा शर्टलेस तो तिच्यासमोर आला आणि ती पहिल्यांदाच त्याला शर्टलेस पाहत होती. ती नकळतच त्याला न्याहाळत होती. जिम करुन बनवलेलं ते पिळदार शरीर,सिक्स पॅक, बायसेप्स एकदम किल्लर दिसत होता. नजर झुकवून ती स्वतःशीच लाजली आणि तिचं लाजणं तो आरशात पाहत होता. सकाळी उमललेल्या टवटवीत फुलाप्रमाणे तिचा तेजस्वी चेहरा, त्यावर लाजेने लाल झालेले तिचे गुलाबी गाल.

"किती पाहणार आहेस जान मी तुझाच आहे." विश्वा म्हणाला आणि तिने एकवेळ आजूबाजूला नजर फिरवली.

"अय्यो,कुणाला म्हणतोस तू?" ती भुवया उंचावून म्हणाली

"तुलाच!" विश्वा लगेच उत्तरला.

"मला?" ती अजूनही अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती . 

"मी नव्हते पाहत तुला." ती खाल मान घालून म्हणाली.

"हो का?" तो तिच्याजवळ येत म्हणाला. आधीच नुकताच शॉवर घेऊन आल्याने त्याचा सुंगधित वास तिच्या मस्तकात शिरत होता. त्याच्या जवळ आल्याने तिचा उर धपापू लागला. त्याने तिला कमरेतून जवळ ओढले. तशी थंडगार लाट तिच्या शरीरात पसरली. हृदयाची धडधड वाढली होती. हे त्यालाही जाणवत होते. तो तिच्याकडे पाहत होता तर ती खाली मान करुन नजर झुकवून होती.

" वर बघ ना, आता जवळून कितीही पहा मला." तो मिश्किल हसून म्हणाला. तिने 'नाही' मध्ये मान डोलावली. तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजला आणि त्याने तो उचलण्यासाठी एक हात काढला तर ती लगेच दुसरा हात सोडून बाथरुममध्ये धावत गेली. दार लावून ती जोरजोरात श्वास घेत होती. मध्येच लाजत होती हसत होती, आरशात पाहून तिने चेहरा हाताच्या ओंजळीत लपवला. थोड्यात वेळात ती आवरुन बाहेर आली. बाहेर आल्यावर ती इकडे तिकडे शोधत होती पण तिच्या नजरेला काही पडले नाही. कारण विश्वा लगेच ऑफिसला निघून गेला होता.

क्रमश ..

©® धनदिपा

टिम अहमदनगर 

🎭 Series Post

View all