एक करार ! भाग -5

"माझा नवरा तो एकदम गोरीला सारखाच दिसतो?" असं बोलून ती खी खी करत हसायला लागली.

भाग -5

 मागील भागात -

"विश्वा, आत्ताच तर तुमचं लग्न झालं आहे, हेच दिवस असतात रे सोबत फिरण्याचे, एकमेकांना ओळखण्याचे,समजण्याचे." अंजली त्याला समजावत म्हणाली.आता पुढे....."आई, तुझं म्हणणे बरोबर आहे, पण मला असं अचानक इतक्या दिवसांसाठी सर्व सोडून जाता येणार नाही. माझी मिटिंग आहे. ती मी कॅन्सल करु शकत नाही." विश्वराज अंजलीला म्हणाला.

"ती मिटिंग सत्यन अटेंड करेल." अंजली.

"मला थांबावच लागेल." विश्वराज.

"बरं मग असं कर तुम्ही दोन दिवस तरी जवळपास फिरुन या." अंजली म्हणाली.

"आई, माझ्याजवळ यापेक्षा मस्त आयडिया आहे." भक्ती मध्येच म्हणाली.

"कोणती?" सत्यनने विचारले.

"आपण सर्वच काही दिवस फिरायला जाऊया, कशी वाटली आयडिया?" भक्ती एक्साईटेड होऊन म्हणाली.

"एकदम बेक्काऽऽर आहे." सत्यन म्हणला.

"सत्यन दादा." ती गाल फुगवून म्हणाली.

"अरे मग काय, दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळावा म्हणून पाठवतोय न आम्ही मग मध्येच आम्हाला कशाला आणतेस?"

"हे बघा जायचं तर सर्वांनी, पटलं तर सांगा नाहीतर आम्हीही कुठे जाणार नाही." बोलून ती रुममध्ये जायला निघाली.

"भक्तीऽऽ."अंजलीने आवाज दिला.

"बाळा माझं ऐक ना?"

"आई प्लिज हो म्हण ना." भक्ती अंजलीच्या पायाजवळ बसून लाडीगोडी लावत म्हणाली.

"ठीक आहे आपण जाऊया मग तर खुश." अंजली तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली.

"हो खूप म्हणजे खूप खूप खुश. चला आपण तयारी करुया." विश्वराज भुवया उंचावून त्या दोघींकडे पाहत होता.

"सत्या, हे काय आहे रे मी कितीवेळचा सांगतोय तर ऐकत नव्हती आणि आता या मांजरीच कसं ऐकलं आईने? असं वाटत की ती माझी आई नाही हिचीच आहे." विश्वराज सत्यनला म्हणाला. 

"तू जळतोय का तिच्यावर?" सत्यन विश्वाला म्हणाला.

"चक्ऽऽ मी नाही जळत त्या चिपकलीवर, कशी आईला जाऊन चिपकलीय."सत्यनला विश्वराजच्या बोलण्यावर हसूच आले.

"हसतोय काय? जाम वैताग आणलाय या मुलीने?" विश्वराज सत्यनला हसताना पाहून म्हणाला.

"मला ना यांच्याकडे पाहून डाऊट येतो, दोन तीन दिवसांच्या ओळखीत ह्या इतक्या जवळ कश्या आल्यात?" विश्वराज अंजली,भक्तीकडे बारीक नजरेने पाहत म्हणाला."चला तयारी लागा." सत्यन विषय बदलवत विश्वराजला म्हणाला.

"आधी त्या चिपकलीला विचार कुठे जायचं आहे? तशी तिकिटे काढावी लागतील." विश्वराज भक्तीकडे पाहत म्हणाला.

"तिने जर ऐकलं ना की तू तिला चिपकली आणि मांजर म्हणालाय तर तुझं काही खरं नाही." सत्यन.

"तू घाबरवतोय का मला?" विश्वराज.

"मी फक्त सांगतोय तुला, तिने ऐकलं असेल तर महागात पडेल." सत्यन.

"कुठे जातोय आपण?" सत्यनने हसत भक्तीला विचारले.

"फार्महाऊसवर." भक्ती म्हणाली. अंजलीकडून तिने फार्महाऊसबद्दल ऐकलं होतं. तिला तिथे जायची इच्छा झाली. अंजली तिच्याकडे कौतुकाने पाहत होती.कोणते कपडे घ्यायचे इथपासून तर यायच्या वेळेपर्यंत हे करु आणि ते करु असं तिचे प्लॅनिंग चालू होते.

"आई शॉपिंग राहिली ना आपली?" भक्ती अंजलीला म्हणाली.

"जा तू करुन येऽ, विशू भक्तीला घेऊन जा शॉपिंगला तिला काय घ्यायचं ते घेऊन ये." अंजली विश्वराजला म्हणाली.

"चलऽऽ." नाईलाजाने तो \"हो\" म्हणाला. ती लगेच त्याच्यासोबत निघाली. दोघे एका मॉलला आले. तिथून ती कपड्यांच्या सेक्शन मध्ये गेली आणि तिला हवे तसे कपडे घेऊन परत आली. घरी आल्यावर आईच्या रुममध्ये गेली तर आई आराम करत होती म्हणून आवाज न करता ती तिच्या बेडरुममध्ये आराम करायला गेली. विश्वा तिला सोडून ऑफिसला निघून गेला. अंजली उठल्यावर भक्तीने तिला काय काय शॉपिंग केली. ते सर्व अंजलीपुढे ठेवले.

"भक्ती काय हे तू सर्व आमच्यासाठीच आणले, तुझ्यासाठी काहीच नाही?" अंजली आणलेल्या कपड्याकडे पाहत म्हणाली.

"आई, माझ्याकडे भरपूर ड्रेस आहेत. हे तुझ्यासाठी, रमाकाकू साठी आणलेत. आपण तिकडे गेल्यावर हे घालायचे आहेत." भक्तीने हा निर्णय सांगूनच टाकला आणि उद्याच्या तयारीला लागली. सर्वात आधी आईच्या बॅगमध्ये औषधे भरली. आईला लागणाऱ्या वस्तू काळजीपूर्वक भरल्या, नवीन ड्रेस बॅगेत पॅक केले. रात्रीचे जेवण झाले तसे अंजलीने तिला जबरदस्ती तिच्या बेडरुममध्ये पाठवले. ती पाय आपटतच त्यांच्या रुममध्ये आली, तेव्हा विश्वराज बेडवर आडवा तिडवा झोपलेला होता.(मुद्दामहून तिला त्रास देण्यासाठी त्याची नाटकं दुसर काय?) त्याचं जोरात जोरात घोरणे चालू होतं.

"ये उठंऽऽ उठंऽऽ, मला झोपायच इथे? इतका मोठा बेड आहे तरीही कसा पसरलाय अजगरासारखा." भक्ती वैतागत म्हणाली.

"काय कटकट लावाली आहे गं तू, रात्रीच्या वेळीस लोक झोपतात आणि तू काय बडबड करतेय झोपू दे मला." विश्वराज बोलून पुन्हा झोपत म्हणाला.

"ये थांब." तिने त्याचा हात पकडून त्याला ओढले, तो ओढला तर गेला नाही, तिचं आपसुकचं त्याच्या अंगावर ओढल्या गेली.नकळत तिच्या नाजुक मुलायम ओठांचा स्पर्श त्याच्या कॉलरबोन वर झाला आणि त्याच्या शरीरावर शहारे आले. त्याच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली.कधी कोणत्याच मुलीला पाहून त्याला असे वाटले नव्हते. तो आपसुकचं भक्तीकडे खेचला जात होता. ती नजर झुकवून पटकन उठण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्याकडून उठल्या जात नव्हते.

"कशाला ओढलं मी या चोमड्याला, मीच ओढल्या गेले, त्याच्या अंगावर आणि थंडगार स्पर्श झाला माझ्या ओठांना, किती ऑकवर्ड वाटतय तो काय विचार करेल माझ्याबद्दल." मनातच ती त्याला आणि स्वतःलाच शिव्या देत होती. मग विश्वानेच तिला उठवले.  

"या संधीचा अडवांटेज घेतलास तू माझा." तो तिच्याकडे पाहत म्हणाला.

"मी तुझा अडवांटेज हड्ऽऽ,इतके वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर." ती त्याला धुडकावत म्हणाली.

"मग हे काय होतं, तू माझ्या इथे किस केलस ते? जर तुला किस घ्यायचा होता तर कुठं घेतात आणि कसं करतात,मी तुला सांगतो?" अस म्हणत तो तिच्याजवळ आला तशी ती मागे सरकली.

"ये चल हडऽ हडऽ. " करत ती मागे मागे जात होती.

"दूर राहा माझ्यापासून, असं जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि थोबाड पाहिलं का आरशात?" ती त्याच्यासमोर एक बोट नाचवत म्हणाली.

"का काय झालं? या सुंदर चेहऱ्याच्या मागे कित्येक मुली आजही फिदा होतात. रिया तर आजही माझ्या मागे लागलेली आहे. तुझा नवरा इतका हॅण्डसम आहेस, त्याची तुला कदरच नाहिये." विश्वराज बिचारा चेहरा करत म्हणाला.

"चेहरा सुंदर असून काय? त्या चेहर्‍यावर हसू ही पाहिजे असतं नेहमीच त्याच्यावर राग आणि जिभेवर कडू कारलं, हसून खेळून कधी बोलता येत नाही मग काय कामाचा असा चेहरा." ती म्हणाली आणि तो विचारात पडला. खरंच तर होत तिचे तो असा कधी राहिलाच नाही. जेव्हा पासून कळायला लागले तेव्हापासून तर तो हसनच विसरलेला, सतत काम काम आणि चेहर्‍यावर राग.

"आणि कोण आहे ती? हा रिया बिया ती ही तुझ्यासारखीच असणार एक नंबर खडूऽऽस." भक्ती नाक मुरडून म्हणाली. 

"मी खडूऽऽस काय?" विश्वराज.

"हो मग, नेहमी त्या सडलेल्या कारल्यासारखा चेहरा केलेला असतो." ते इमॅजिन करुनच तिने चेहरा वेडावाकडा केला. तिचे एक्सप्रेशन पाहून त्याला खूप हसायला आले आणि तो जोरात हसायला लागला.

"त्या \"झू\" मध्ये जर ठेवले ना तुला, तर तुला पाहिल्यावर कोणताच प्राणी पाहायची गरज पडणार नाही." विश्वराज तिची खेचत म्हणाला.

"नाही हो असं कसं एक प्राणी पाहतील न ते?" ती सिरियस चेहरा करत म्हणाली."कोणता?" विश्वराज.

"माझा नवरा तो एकदम गोरीला सारखाच दिसतो?" असं बोलून ती खी खी करत हसायला लागली.

"मी गोरीलाऽ तर तू गोरीलीऽऽ." त्याला तिला चिडवायला फार मजा येत होती, त्याने हसत पुन्हा चिडवले तर ती तणतण करत बेडवर एका बाजूने जाऊन अंगावर पांघरुन घेऊन झोपली."हिच्या नादाला लागणे म्हणजे आ बैल सॉरी सॉरी आ म्हैस मुझे मार असं आहे." तो पुटपुटला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊन झोपला.

  सकाळी नाश्ता करुन लवकरच ते फार्महाऊस साठी निघाले. गाडीतही तिची चटरपटर चालूच होती.

"हिची गाडी बंद पडत नाही का?" विश्वाने प्रश्नार्थक नजरेने सत्यनला विचारले. त्याने हसून मान डोलावून नाही म्हटले. 

फार्महाऊसवर काय काय होणार पाहूया पुढच्या भागात.

क्रमश ..©® धनदिपाटिम अहमदनगर
🎭 Series Post

View all