एक करार ! भाग -1

"अबे ये भैताडा डोळे फुटलेत का तुझे? दिसत नाही का तुला, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?"

एक करार ! भाग 1( प्रेमकथा )'आता कुठे राहायचं? घर ही गेलं,नोकरीही गेली. कॉलेजची फी भरायची आहे.' याच विचारात ती रस्ता पार करत होती .

"अबे ये भैताडा डोळे फुटलेत का तुझे? दिसत नाही का तुला, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?" ती मोठ्याने त्या गाडीवाल्याला ओरडत होती. तशी ती गाडी मागे येऊ लागली आणि क्षणांतच गाडी येऊन तिच्याजवळ थांबली.त्यातून एक व्यक्ती सुटाबुटात बाहेर पडला. डोळ्यांवर गॉगल, हातात महागडं घड्याळ घातलेल, बिअर्ड लुक, केस सेट केलेले, त्याची पर्सनॅलिटी एकदम भारी होती. तो डोळ्यावरचा गॉगल काढत म्हणाला,

"काय म्हणालीस तू, माझ्या बापाचा रस्ता आहे का? तर हो हा रस्ता माझ्याचं बापाचा आहे. पुढे बोल. पहिले तर तुला रस्त्यावर कसे चालायचे हे शिकवले पाहिजे." आधीच तो टेंशनमध्ये होता आणि ही अशी बोलल्यामुळे त्याला तिचा राग आला.

"ये डोळे तुझे फुटलेत, माझे नाही. अंधार पडल्यावर कोणी गॉगल लावतं का?  तुला इतकी मोठी मुलगी दिसली नाही, त्यात माझा काय दोष? किती जवळून गाडी नेलीस, अपघात झाला असता मग काय केलं असतं? गरिबांच्या जीवाची काही किंमतच नसते तुम्हा मोठ्या लोकांना." दोघांचे भांडण चालू होते. शब्दाला शब्द वाढत होता. कोणीच माघार घेत नव्हते. गाडीतून आणखी एक व्यक्ती बाहेर आला.

"सॉरी मॅम,एक्सट्रीमली सॉरी." तो दिलगीरी व्यक्त करत म्हणाला.

"तू कशाला माफी मागतोय तिची ?" पहिला व्यक्ती उत्तरला.

"तिला समोर पाहून चालता येत नाही तर आपण काय करायचं ?"       "अरे जाऊदे चल आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे."

"मी पण खूप खूप सॉरी." ती त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली. तिनेही पटकन त्या दुसऱ्या व्यक्तीची माफी मागितली.

"सॉरी त्याला काय म्हणतेस? मला म्हण."

"तू मला सॉरी म्हटलं का?नाही ना मग मी कशाला म्हणू?" ती ही मोठ्या तोऱ्यात म्हणाली. असं आजपर्यंत त्याला कोणी म्हटलं नव्हतं. आता तर त्याच्या नाकाच्या पुड्या रागाने फुगल्या होत्या.

"तुम्ही खूप जेंटलमेन आहात. मुलीसोबत कसं बोलाव हे तुमच्या मित्राला पण सांगा." ती पहिल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे पाहून त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली. त्याचा अधिकच राग उफाळून येत होता. त्यानेही एक खुन्नस नजर टाकली. 

"विश्वा, चल लवकर मावशी वाट पाहत आहे रे." तसा तो भानावर आला. तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकून तो ही गाडीत बसला. 'जा उडत, मला काय?' या अविर्भात तिने ही नाक तोंड वेडंवाकडं करुन त्याला प्रतिउत्तर दिले.थोड्याच वेळात तो एक भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये धावतच गेला. एका तासाआधीच तो भारतात पोहचला आणि तिथूनच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाला होता, तोच मध्ये तिचे आणि त्याचे भांडण झाले. आत गेल्यावर बेडवर एक पन्नास वर्षीय महिला तिच्या हाताला ड्रिप लावलेली, तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला तिच्या जवळच एक काळा कोट परिधान केलेला एक माणूस हातात काहीतरी फाईल घेऊन बसलेला होता. तो जवळ आला, तसा तो काळा कोट घातलेला माणूस उठला.

"आई." त्याने हलका आवाज दिला. आई नुकतीच झोपली होती. जावळे वकिलांनी त्याच्या पुढ्यात पेपर ठेवले.

"ही काय वेळ आहे का जावळे अंकल?"

"ताईसाहेबांचा हुकूमच आहे तो." त्याने ते पेपर वाचले. कपाळावर आठ्या आणि टेंशन आले.

"काय वेडेपणा घेऊन बसलीय ही?" तो थोडा वैतागला होता ते पेपर वाचून. त्याच्या मित्राने म्हणजेच सत्यनने त्याच्या हातातील पेपर्स घेतले आणि वाचू लागला.

"व्हॉट?" सत्यन .

"बघ ना कसली डिमांड करतेय. आत्ता या वेळेला हिला काय सुचतंय सांग ना. बघ कसा हट्ट धरुन ठेवलाय हिने. सगळं माझ्यापासून लपवलं, इतकी आजारी असतांना सुद्धा ती मला काही बोलली नाही."तितक्यात डॉक्टर आले.

"डॉक्टर आई कशी आहे?" विश्वराजने डॉक्टरांना विचारले.

"मि. विश्वराज तुम्ही माझ्या केबिनमध्ये या." तसा तो ताडताड डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. 

केबिनमध्ये जाऊन विश्वराज घाईघाईने म्हणाला,"डॉक्टर माझी आई बरी होईल ना? ती पहिल्यासारखी नॉर्मल कधी होईल? डॉक्टर मी आईला असं बेडवर पडलेलं बघू शकत नाहीये."

विश्वराजने एकामागून एक प्रश्नांची सरबत्तीचं चालू केली होती. आपल्या आईबद्दल वाटणारी काळजी त्याच्या डोळयात स्पष्टपणे दिसून येत होती.

"सॉरी मिस्टर विश्वराज, मी काहीच करु शकत नाही. त्यांचे आयुष्य फार कमी उरले आहे. कदाचित वर्ष,महिने,फार फार तर काही दिवस,त्यांना खूप खूश ठेवा,त्यांच्या इच्छा पूर्ण करा." डॉक्टर. 

विश्वराजला मनातून खूप भरुन आले होते. सत्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मनातच सर्व भावना रोखून ठेवल्या. त्याला आईसमोर कमजोर दिसायचे नव्हते. तो आईजवळ गेला. तिच्या कपाळावर हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने आईला जाग आली. तिने त्याच्याकडे पाहिले आणि बाजूला तोंड केले.

"आई." आई तरीही काहीच म्हणाली नाही आणि त्याच्याकडे पाहिले देखील नाही.

"सत्यन, मला घरी घेऊन चल आणि माझी खोटी काळजी करण्याची काहीच गरज नाही." एक कटाक्ष विश्वराजकडे टाकत म्हणाली.

"आई लहान मुलांसारखा हट्ट का करतेय?" विश्वराज.

"सत्यन मी सांगितलं नं, माझं ऐकायचं नसेल तर माझ्याशी बोलायचं सुद्धा नाही." आई म्हणाली. त्याने एक सुस्कारा सोडला आणि बाहेर आला. दोन तीन दिवसांनी आईला डिस्चार्ज देऊन घरी नेण्यात आले.

हा विश्वराज नेमका कोण आहे? आणि त्याची आई काय हट्ट करतेय? त्या पेपर्समध्ये असं काय लिहिलं होतं? हे जाणून घेऊया पुढील भागात…क्रमश ..©® धनदिपा टिम - अहमदनगर 


🎭 Series Post

View all