एक करार ! भाग - 12 (अंतिम)

"ओ लेडीऽऽ सिंघमऽऽ. रडू नको. सिंघम रडत नसतो." भक्ती संजूला म्हणाली.

एक करार

भाग - 12 (अंतिम)

मागील भागात -

"ये डोळे फाडून बघू नको माझ्याकडे? मग काय करणार किती घाबरवल तूऽऽ. आमची अवस्था किती वाईट झाली होती. जिजूंची तर सांगूच नको, त्यात काकूंचे फोन भक्तीशी बोलायचं आहे, त्यांना कसंतरी समजावलं." बोलतांना तिच्या डोळ्यांत पाणी आले होते.

आता पुढे -

"ओ लेडीऽऽ सिंघमऽऽ. रडू नको. सिंघम रडत नसतो." भक्ती संजूला म्हणाली.

"भक्तीभाईऽऽ, जिजू ही ओले झाले तरी कपडे चेंज करायला गेले नाहीत. ती शुद्धीवर आल्याशिवाय इथून बाहेर जाणार नाही. हात सोडतच नव्हते तुझा. तुझे कपडे चेंज करायचे होते, तेव्हा कुठे ते रुमच्या बाहेर पडले. जिजू लईच प्रेम करता राव तुझ्यावर." ती भक्तीला डोळात मारत,हळू पण दोघांना आवाज ऐकू जाईल अशी म्हणाली, तशी भक्ती लाजली.

"चला त्यांना आराम करु द्या." सिस्टर म्हणाली. तसे सर्व बाहेर गेले. विश्वाला तिला सोडू वाटत नव्हते,पण जावे लागणार होते. तिलाही औषधांच्या गुंगीमुळे लगेच झोप लागली. ती झोपली असल्यामुळे विश्वाने त्याच्या माणसांना कपडे घेऊन बोलवले होते. त्याने बाथरूममध्ये जाऊन कपडे चेंज केले आणि रावसाहेबांसमोर येऊन उभा राहिला.

"जावईबापू, मला माहितीये तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत. मी इथेच आहे जावाईबापू .आपण घरी गेल्यावर बोलूया." रावसाहेब विश्वाचा चेहर्‍यावरचे प्रश्न पाहत म्हणाले. तो डॉक्टरांना विचारायला त्यांच्या कॅबिनमध्ये गेला.

"डॉक्टर आम्ही भक्तीला घरी नेऊ शकतो का? मी काळजी घेईल तिची,एखादी नर्स ठेवूया."विश्वा डॉक्टरांना म्हणाला.

"ओके, पण आज त्यांना इथेचं थांबावं लागेल. तुम्ही उद्या नेऊ शकता पण पायांची हालचाल, पायांवर जोर द्यायचा नाही." डॉक्टर विश्वाला सांगत होते.

"ओके, चालेल डॉक्टर." विश्वा.

दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तिला चेक करुन गोळ्या लिहून दिल्या. सोबत नर्स पण होती. डॉक्टरांना वेळोवेळी तिच्याकडून अपडेट मिळणार होते. तिला घ्यायला रावसाहेब, संजू ,सत्यन आले होते. विश्वाने तिला अलगद दोन्ही हातांवर उचलून हळूच गाडीत बसवले. दोघे घरी आले. अंजलीने तिला ओवाळून आत घेतले. तिला तिच्या रुममध्ये नेण्यात आले.

"काय मग बायकोऽऽ आपल्या बेडरुममध्ये आलीस."

"हो, मिस करत होते आपली रुम, आई, सर्वांनाचं."

"आणि मला?" त्याने भूवया उंचावून विचारले.

"तुम्हाला कसं मिस करणार, तुम्ही तर माझ्याजवळच होता ना नवरोबा?" तिने हृदयावर हात ठेवत आणि डोळा मारत म्हणाली.

"क्या बातऽऽ आज तू नाही तुम्ही, क्या इरादा है." तो तिच्याच अंदाजात म्हणाला आणि तिच्या चेहर्‍यावर झुकला.

"ये बस हा ..तू .. बंद कर हे." भक्ती अडखळत म्हणाली.

"मी चालू कुठे झालोय." विश्वा खट्याळ हसत म्हणाला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून बाजूला झाला.

"विशीऽऽ." तिने प्रेमाने हाक मारली.

"किती गोडऽऽ वाटतेय माझी रसमलाई, तू हाक मारल्यावर." विश्वा. 

"मी रसमलाई आणि तू कडू कारलं." ती जिभ दाखवत म्हणाली.

" जसा आहे पण तुझा आहो." विश्वा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.भक्ती पुढे काही बोलणारच तर आई आल्या.

"माझं बाळ कसं आहे बर वाटतयं न, या गाढवाने मला येऊच दिले नाही. थोडस लागलं म्हणाला, बघ किती लागलंय तिला?" आईने विश्वाला डोक्यावर टपली मारली.

"अरे काय यार तुम्ही दोघी माझा येता जाता बँड वाजवता, आधी ही होती आणि आता तू ही सुरु झालीस." विश्वा नाटकी रागवत म्हणाला. दोघीही हसायला लागल्या. भक्तीला थोडं खाऊ घालून विश्वाने गोळ्या दिल्या. गोळ्या घेतल्यामुळे ती लगेच झोपली. नर्सला तिच्याजवळ बसवून तो आणि आई खाली आले.

खाली जेवण झाले. रावसाहेबांनी बोलायला सुरवात केली.

"जावईबापू, तुमची आई म्हणजे अंजलीताई आणि भारती (भक्तीची आई ) या दोघीही मैत्रिणी होत्या. या मैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात होत्या. मी आधीपासूनच राजकारणात होतो. जेव्हा भारती आम्हाला सोडून गेली. तेव्हा ताईंनी त्यांच्या जीवनात प्रॉब्लेममध्ये असताना आईच्या मायेने मिठ्ठूला सावरले होते. काही दिवसानंतर भक्ती तिच्या मावशीकडे सत्यनच्या आईकडे गेली आणि मी पूर्णपणे राजकारणात मन लावले. सत्यनच्या आईने तिचा सांभाळ केला. कधी होस्टेलला रहायची कधी तिच्या मावशीकडे,नंतर अंजली ताईंची भेट झाली आणि भक्ती त्यांना पसंत पडली, त्यांनी आरतीकडे विषय काढला." रावसाहेब.

"आता मी सांगते, मला भक्ती लहान असतानाच पसंत होती. मी भारतीलाही सांगितले होते की, भक्तीला माझी सून बनवून घेणार आणि तिचाही होकार होता. या नात्याने आम्ही पुन्हा अधिक जवळ येणार होतो. आम्ही दोघीही स्वप्न पाहत होतो, पण ती अचानक सोडून गेली आणि सगळचं राहिलं. मी माझ्या आयुष्यात गुरफटली की माझं याकडे लक्ष नव्हतं. मी एका कार्यक्रमात भक्तीला पाहिले आणि मी आरतीजवळ विषय काढला पण भक्ती या लग्नाला तयार होईल की नाही हे नव्हते माहित. तू आधीच लग्नाला नाही म्हणत होता, म्हणून मग मी तुला लग्नाला तयार करायची जबाबदारी सत्यनला दिली. मी सत्यनला मुलीचा फोटो दाखवला तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण, ती भक्ती होती त्याची छोटी बहिण. " अंजली.

"आणि मी जेव्हा तुझ्याकडे विषय काढला. तेव्हा तू सरळ सरळ फोटो न पाहता नाही म्हणाला आणि विषय काढू नकोस. खूप समजावलं मी पण तू माझं ऐकायला तयार नव्हता. मग मीच भक्तीजवळ जाऊन लग्नाचा विषय काढला तेव्हा तिने मला सांगितले की, तिचं एका मुलावर प्रेम आहे? हा तर माझ्यासाठी मोठा धक्का होता. आता कसं तयार करायचं? असा प्रश्न पडला. तू नाही म्हणत होता. मावशीने तुला तयार करायला मला सांगितले आणि आता भक्ती तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे?" सत्यन म्हणाला पण हे ऐकून विश्वाचा चेहरा एकदमच पडला.

"मग मी तुम्हा दोघांच्या साईडने झालो आणि मावशीला समजवण्याचा विचार करु लागलो. मी भक्तीला विचारले तेव्हा तिने फोटोज आणून दाखवला. शाळेचा गणवेश दोन वेण्या घालून ती स्टेजवर आली आणि त्याच्या हातून बेस्ट स्टुडंटचा अवार्ड मिळाला. तोही यंग बिजनेस मॅन मि.विश्वराज अभ्यंकर च्या हातून." सत्यन हसत म्हणाला. इकडे विश्वाचा चेहरा प्रफुल्लित झाला.

"तिने मला फोटो दाखवल्यानंतर मी भलताच खुश झालो पण तसे दाखवले नाही. तिला विचारले तर तिने अगदी थोडक्यात तिला जितकी माहिती होत ते सांगितले. चार वर्षांपासून ती तुझ्या प्रेमात होती."

"असे नको म्हणू दादू की तुझ प्रेम नाही आकर्षण आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अस म्हणातात ना,माझं प्रेम आहे त्यांच्यावर चार वर्ष झाली. मला आधीही तसचं वाटायचं पण नाही हळूहळू कळले की प्रेमात पडलेय त्यांच्या. कारण त्या नंतर मी त्याला कधीच पाहिले नाही पण ते नेहमी माझ्या डोळ्यासमोर असायचे. त्याचं व्यक्तीमत्त्व इतकं जबरदरदस्त की माझ्या मनावर कायमची छाप पडली. " भक्तीने मला सरळसरळ सांगून टाकले.

"मी तिचा मन वळवण्याचा प्रयत्न केला. भक्ती तो खूप अरोगंट आहे. रागीट आहे. त्याला चांगले बोलता येत नाही जे सांगेल ते ओरडून सांगेल. मशीन असल्यासारखं काम काम यांच्याशिवाय त्याला काही येत नाही. मी सांगितल्यावर सुद्धा ती तिच्या निर्णयावर ठाम होती. पिल्लू तो लग्नाला तयार होत नाहीये. त्याचा कोणत्याचं नात्यांवर विश्वास नाही. प्रेम वगैरे त्याला काही वाटत नाही. प्रेम वगैरे काही नसतं असा तो म्हणतो." सत्यन.

"पण दादू मी तर त्याच्यावर प्रेम करते नं, त्याने नाही केलं तरी मी करेल आयुष्यभर." भक्ती म्हणाली.

"बरं मग मी या मुलाच्या घरच्यांना नाही सांगू का?" 

"हं नाही सांग." तिचं लक्ष फोटोकडे गेले तशी ती खूप आनंदित झाली.

" दादू, हे तर विश्वराज आहेत."

"हो माझा मित्र आणि अंजली मावशी माहितीये ना तुला त्यांचा मुलगा. भारती मावशी आणि त्यांची इच्छा होती की, तू सून म्हणून त्या घरात जावं." 

"काय सांगतो दादू ." भक्ती सत्यनला मिठी मारत म्हणाली.

"पण एक प्रॉब्लेम आहे तो सध्या लग्नाला तयार नाही." 

"ठीक आहे मी वेट करेल दादू त्यांचा. ती हसत म्हणाली. त्यानंतर ही मी किती फोर्स केला पण तू नाहीच आणि अनपेक्षितपणे मावशीचे कॅन्सरचे निदान झाले आणि तू शेवटची इच्छा म्हणून तू लग्नाचा वर्षाचा करार केलास. मग सगळे आम्ही ठरल्याप्रमाणे झाले. भक्तीला विश्वास होता की, तू बदलशील आणि नाहीच बदलला असता तर आता तुझ्यासोबत राहतेय. आईसोबत राहतेय हेच पुढे जगण्यासाठी भरपूर होतं."

"मग ती सरळ सरळ का नाही आली माझ्यासमोर?" विश्वा.

"कारण तुझा प्रेमावर विश्वास नव्हता. तुझा नात्यांवर विश्वास नव्हता. तिने तर हे पण स्विकारले होते जर तू एका वर्षात करार झाल्यानंतर तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नसेल तर ती काहीच न बोलता तुझ्या आयुष्यातून दूर जाणार होती. आपल्या आवडत्या कामामध्ये करियर करायचं म्हणून तिने तिच्या करियरवर फोकस केलं आणि ती प्रसिद्ध फॅशन डिझायनर झाली. तुला माहितीये तुझे कपडे ही तिनेच डिझाईन केले आहे. हे बघ तिचा लोगो 'बीआर' म्हणजे भक्तीराज." सत्यनने त्याच्या कोटवरचा लोगो दाखवला. विश्वाचा कंठ दाटून आला,डोळे पाणावले होते. 

'इतके प्रेम करते ती माझ्यावर,वेडीच आहे ती.' विश्वा स्वत:शीच म्हणाला.

"मला हे एक वर्षाचा करार मान्य नव्हता. मी नाही म्हणालो, पण अंजलीताईंची मागणी आणि माझ्या लेकीचा हट्ट मोडवला नाही तिचा तिच्या प्रेमावर विश्वास होता आणि माझा माझ्या मिठ्ठूवर." रावसाहेब म्हणाले.

"सॉरी विश्वा." सत्यन म्हणाला.

"सॉरी जिजू मला ही सर्व माहित होते."संजू

"पण मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही." विश्वा संजू म्हणाला.

"आम्ही दोघी बेस्ट फ्रेड, बोलो तो एकदम जिगरी, फक्त करियर वेगवेगळी आमची. मी इन्स्पेक्टर संजना भोसले क्राइम ब्रांच." संजू हसत म्हणाली.

"सॉरी विशू, मला माफ कर बाळा. मी तुला काहीच बोलले नाही." अंजली माफी मागत होती.

"आई, सॉरी नको गं, तू माझं चांगलच व्हावं यासाठी केल न आणि झालं ही, तुझी भक्ती तुझीच सून झाली." तो आईला मिठी मारत म्हणाला. 

"मी रुममध्ये जातो." भक्तीला आता या क्षणी मिठीत घ्यावे असे वाटत होते. अंजलीने सगळ्यांना आरामाला रुममध्ये पाठवले. रावसाहेब, सत्यन , संजू थोडावेळ आराम करायला रुममध्ये गेले. इकडे विश्वा धावतच रुममध्ये आला तेव्हा भक्ती गाढ झोपेत होती. नर्स बाहेर निघून गेली. झोपेतच तिच्या कपाळावर, गालावर तिला किस भेटत होते. नंतर तिला मिठीत घेऊन तो तिच्याजवळच पहुडला.

संध्याकाळी भक्तीला जाग आली, तेव्हा ती विश्वाच्या मिठीत होती. तिच्या चुळबूळीने त्याला जाग आली.

"आय लव्ह यू जान." विश्वा तिला अजून घट्ट पकडून मिठीत घेत म्हणाला.

"आज काय माझ्यावर प्रेमाची उधळण होतेय." भक्ती तिने डोळे उंचावून म्हणाली.

"आता नेहमीच होणार, भक्ती पाच वर्षापासून माझ्यावर प्रेम करतेस? इतकं प्रेम की मला सोडून जायला ही तयार होती." विश्वाने विचारले. 

"विशीऽऽ तुला माहिती पडलं हे?" भक्ती त्याच्याकडे पाहत होती.

"हो ..अजून किती दिवस लपवणार होती?" विश्वा.

"लपवणार नव्हते .. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. तुम्ही रागवलेत का माझ्यावर? मी फसवलं न तुम्हाला?" भक्तीने विश्वाला विचारले .

"नाही ग राणी, मी तुझ्यावर कसं रागवू? का म्हणून रागवू ? खरतर मी तुला थँक्यू म्हटले पाहिजे, तू माझ्या आयुष्यात आली आणि प्रेमाचे, प्रत्येक नात्याचे महत्व कळले. तुझ्यामूळे माझं जीवन सुंगधित झाले आणि इतक्या गोड प्रेम करणाऱ्या बायकोवर का रागवू मी? हिच्यावर तर खूप प्रेम करायचं आहे मला." विश्वा मिश्किल हसत म्हणाला .

"इश्शऽऽ!" भक्तीने लाजून चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवला.

"आई शप्पथ!" तिचं लाजणं पाहून विश्वा म्हणाला. दोघेही एकमेकांची मिठी अनुभवत होते. इथून त्यांचा एक नवीन करार सुरु झाला.

समाप्त.

©® धनदिपा 

टिम अहमदनगर

प्रिय वाचकांनो, तुम्ही माझ्या कथांना भरभरून प्रेम दिलं त्या बद्दल तुमचे मनापासून आभार. असेच प्रेम राहू द्या.

कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा .

धन्यवाद .

🎭 Series Post

View all