एक होता कार्व्हर

पुस्तक समिक्षण


मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे “एक होता कार्व्हर.” हे पुस्तक विणा गवाणकर यांनी लिहीले आहे. हे पुस्तक ओरिजिनल शर्ली ग्रेयम आणि जाॅर्ज लिप्स्कम यांचे इंग्रजीतून आहे आणि विणा गवाणकर यांनी त्याचे मराठी व्हर्जन लिहिले आहे.

कार्व्हर म्हणजे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज वाॅशिंग्टन कार्व्हर. त्याचे लहानपण हे खूप हालाखीचे होते. त्यावेळी अमेरिकेत निग्रो लोकांना गुलाम म्हणून ठेवण्याची पद्धत होती. मोझोस कार्व्हर आणि सुझान यांनी मेरी म्हणजे जाॅर्जची आई हिला गुलाम म्हणून घेतले होते. या दोघा जोडप्यांनाही गुलामगिरी आवडत नव्हती. म्हणून त्यांनी मेरीला गुलामाप्रमाणे कधीच वागवले नाही. या मेरीच्या पोटी जाॅर्जचा जन्म 1फेब्रुवारी 1864 मध्ये झाला. पण मेरीचा अचानक मृत्यू झाल्यावर मोझेस आणि सुझान यांनी जॉर्जला सांभाळले. आईपासून दुरावलेल्या जॉर्जला त्यांच्या मालकाने मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. जाॅर्ज हा लहानपणी खूप अशक्त आणि दुबळा होता. याचे पुढे जाऊन काय होईल याची मोझेसला खूप काळजी वाटत असे.

मोझेस यांची शेती होती. ते एक शेतकरी होते. जॉर्ज त्यांच्या शेतामध्ये माळीकाम करू लागला. माळीकाम करताना झालेल्या झाडांसोबतच्या मैत्रीने त्याला पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून सखोल ज्ञान मिळू लागले... तो त्या झाडांशी, फुलांशी बोलत असे. त्यांच्यावर खूप प्रेम करत असे.
त्यानंतर जाॅर्ज “निओशो” गावात निग्रोंच्या शाळेत शिकण्यासाठी गेला. त्यावेळी निरोप देताना कार्व्हर दाम्पत्याचा ऊर भरून आला.
जाॅर्ज शाळा शिकत असताना त्याला ना रहायला घर ना जेवन काहीही मिळाले नाही. कित्येक रात्री त्याने उपाशी घालवल्या आहेत. त्यानंतर त्याला जाॅन मार्टिन यांनी आसरा दिला. मूलबाळ नसलेल्या या दांपत्याने त्याला आपला मुलगाच मानला. जाॅर्ज त्यांच्या पिठाच्या गिरणीत काम करू लागला. मार्टिन कुटुंब कॅलिफोर्नियात रहायला गेले मग जाॅर्ज मारिया या नावाच्या महिलेकडे राहू लागला.

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो “फोर्ट स्काॅट” येथे आला. तेथे तो पेन यांच्याकडे राहू लागला.

जाॅर्जने उच्च शालेय शिक्षण मिनियॅपलिसमध्ये पूर्ण केले. जाॅर्ज आत्तापर्यंत ‘जाॅर्ज कार्व्हर’ म्हणून ओळखला जाई. कारण शाळेत जाॅर्ज हे नाव पुरेसे नव्हतं. पण त्या मिनियॅपलिसमध्ये आणखी एक जाॅर्ज कार्व्हर नावाचा गोरा माणूस होता. त्यामुळे पञ वाटताना पोस्टमन घोटाळे करू लागला. ही अडचण टाळण्यासाठी काळ्या कार्व्हरने आपल्या दोन नावामध्ये w घुसवला. लोकांनी त्याचा ‘वाॅशिंग्टन केला आणि जाॅर्जने पण ते आनंदाने स्वीकारले.

काॅलेजचे शिक्षण घेण्यासाठी जाॅर्ज इंडियनोलात आला. तेथे बड यांच्या हाताखाली त्याने तीन वर्षे शिक्षण घेतले. या तीन वर्षांच्या काळात त्याने तयार केलेल्या तैलचिञांपैकी सत्तावीस तैलचिञ “कार्व्हर आर्ट कलेक्शन” मध्ये मांडलेली आहेत.

निसर्गावरील प्रेम आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवणा-या जॉर्ज कार्व्हर यांनी १८९६ मध्ये शेतकीशास्त्रात एम. एस्सी. ही पदवी घेतली. नंतर त्याने एम्समधील वनस्पतीशास्ञ व कृषीरसायनशास्ञ या शाखांसाठी “आयोवा स्टेट” काॅलेजमध्ये प्रवेश घेतला.
कार्व्हर यांनी जगातील पहिली वाहिली फिरती प्रयोगशाळा स्थापन केली. जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर यांनी मोलवृद्धी (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) हा प्रकार शोधून काढला. पिकाची विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून विविध अन्नपदार्थ बनवले आणि ते विकले, तर त्यातून जास्त नफा मिळतो, हे या मोलवृद्धीचे तत्त्व.
अमेरिकेतील अलाबामा येथील आफ्रिकीवंशीयांच्या वस्तीतील शेतकऱ्यांना त्यांनी शेंगदाण्यापासून दूध, दही, चीज, क्रीम, कँडी, रंग, पॉलिश असे जवळपास ३०० पदार्थ बनविण्याची पद्धत आणि त्यातून पिकांची मोलवृद्धी शिकवली.
विशेष करून शेंगदाणे आणि रताळी यावर प्रक्रिया केल्या आहेत. विज्ञानक्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केल्याबद्दल जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना १९३९ मध्ये रूझवेल्ट मेडल देण्यात आले. १९४० मध्ये त्यांनी काव्‍‌र्हर प्रतिष्ठानची स्थापना केली. अत्यंत साधा वेश, निगर्वी व संकोची स्वभाव, समाजाप्रती पूर्ण समर्पित वृत्ती, यांसारखे अनेक असामान्य गुण अंगी असणारा हा शास्त्रज्ञ ५ जून १९४३ रोजी निधन पावला.
डायमंड ग्रोव्ह येथील जन्मस्थान “लाकडी ओंडक्यांचं खोपट” राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
असे हे पुस्तक जाॅर्ज वाॅशिंग्टन कार्व्हर यांचे आत्मचरित्र प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान एकदा तरी वाचावे.