Feb 25, 2024
पुरुषवादी

एक होता अभिजित - भाग ३

Read Later
एक होता अभिजित - भाग ३


एक होता अभिजित - भाग ३

हा भाग आणि यापुढील भाग हे सत्यघटनावर आधारित आहेत,याची वाचकांनी नोंद घ्यावी.

भाग ३ - गोष्ट लग्नाआधीची


निदान जेनीच्या हट्टापायी तरी आभ्या नोकरीला लागला होता ,गेली पाच वर्षे तो एम.आय. डी. सी मध्ये जॉब करतोय. आता आभ्याचा अभिजित झाला होता.
तो आणि त्याची आई एवढंच त्याचं छोटं जग आहे ,आई रोज त्याचं डोकं खाते लग्न करण्यासाठी पण अभिजितला आता काडीमात्र लग्नात रस नव्हता .जेव्हा होयचं तेव्हा होईल असं मनात धरून तो आलेला दिवस कसा मजेय जाईल यावर लक्ष देयचा.

आधी घर छोटं होतं म्हणून पैसे जमवून जमवून एक दोन वर्षात त्याने एक फ्लॅट घेतलेला, मग एक एक करून फ्लॅट मध्ये वेगवेगळ्या वस्तू आणू लागला.. टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज हवं नको ते सगळं आणत होता. एवढ्या पैशांचं करायचं काय म्हणून तो बिनधास्त गरजेच्या वस्तूंवर खर्च करायचा.. नंतर मोठी गाडी देखील घेतली .
बघता बघता आता अभिजित बत्तीस वर्षांचा झाला होता त्यामुळे त्याच्या लग्नाच्या चिंतेत त्याची आई असायची.. आजकाल मुलींची संख्या खूप कमी आहे मुलांच्या तुलनेत त्यामुळे ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षा खूप असतात.. मुलगा पुण्यातच रहायला हवा ,मुलाच्या नावावर निदान चार पाच एक्कर शेती तरी हवी पण मुलगा शेतकरी नको मग त्या शेतात काय यांची मुलगी खुरपायला जाणार का ? असे एक ना अनेक अपेक्षा मुलींच्या वाढत आहे त्यामुळे अभिजितच्या आईला कळत नव्हतं की काय करावं.

अभिजीतच्या मावशीने सुद्धा वेगवेगळे स्थळं आणली पण पत्रिका जुळल्या नाहीत, मावशीने एक सुचवलं की मुलगी आपल्या जातीची नसली तरी बघुयात ,एखादी गरीब असेल तरी चालेल उलट आपल्यामुळे गरीबाच्या मुलीच्या आयुष्याचं सोनं होईल.
गरिबा घरची मुलगी बघत असताना त्यांची नजर आठवडे बाजारात मिर्ची मसाले विकणाऱ्या एका होतकरू दाम्पत्याचा मुलीवर पडली . सुरुवातीला संकोच वाटत होता की लोकं काय बोलतील पण नंतर विचार केला आणि ठरवलं की,लोकांपेक्षा लेकाचं भवितव्य महत्वाचं म्हणून त्या मुलीच्या वडिलांना विचारणा करण्यात आली, मुलीच्या बदल्यात काही पैसे पण देऊ करू बोलल्यामुळे आणि मुळात एका छान, सुशिक्षित कुटुंबात मुलगी जाईन म्हणून ते लोकं मुलगी देयला तयार झाले ..

मुलीला देखील हे स्थळ पसंद आलेलं ,गरिबा घरची आणि तेही वेगळ्या जातीची मुलगी सून म्हणून करणार त्यामुळे अभिजितच्या आईचे खूप लोकांनी कौतुक केलं, त्यांच्या विचारसरणी नुसार बाकीच्या तरुण मुलांच्या घरी देखील या विषयावर चर्चा सुरू झाली..

अभिजितला सुद्धा त्याची होणारी बायको अवंती खूप आवडली, चलो देर आये दुरुस्त आये.. असा विचार करून अभिजित सुद्धा पुन्हा त्याच्या संसाराची स्वप्नं पाहू लागला.. अभिजीतच्या जीवनात जगण्याची उमेद देणारं पुन्हा एक कारण आलेलं. ठरल्या प्रमाणे लग्न आनंदात पार पडलं..

मुलीला इतकं सुंदर सासर,राजा राणीचा संसार ,मोठं घर आणि शिवाय बदल्यात काही पैसे देखील मिळाले त्यामुळे या मुलीच्या सासरचे ऋण कधीही फिटू शकणार नाही म्हणून मुलीच्या आई वडीलांनी आनंदाश्रूने मुलीची पाठवणी केली


काय होईल पुढे कथेत ??
कथा घेईल एक आगळ वेगळं वळण ..

वाचत रहा ..

एक होता अभिजित..!!

क्रमश..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//