एक होता अभिजित - भाग २

It's A Story Of Guy Whose Name Is Abhijit



एक होता अभिजित - भाग २

भाग २ - जेनी


जेनीचं कॉलेज सुटलं म्हणून नेहमीप्रमाणे तिचे डॅडी तिला घेयला आले आणि ती तिच्या डॅडीच्या बाईकवर मागे बसली..पुढे एक दोन किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या बाजूला तीन मुलं एकत्र येऊन एका मुलाला खाली पाडून बेदम मारत होते ..जेनीने लगेच तिच्या डॅडीला बाईक थांबवायला लावली ..तिचा डॅडी बाईक थांबवत नव्हता पण जेनी हट्ट करू लागली त्यामुळे तो आणि जेनी दोघेही पळत जाऊन त्या पोरांना ढकलून बाजूला करत होते ..

जेनी : अरे ये भेकड पोरांनो ,एकत्र येऊन मारतात होय ?
अरे हिम्मत असेल तर एका एकाने येऊन मारायचा होता की ह्याला

आभ्या : ओय तू कोण गं आम्हाला अक्कल शिकवणारी ?

जेनी : मी कोण ? मी कोण सांगतेच की आता तुला ..डॅडी रेडी ना ?

आभ्या : ओय ओय ..हे रेडी म्हणजे काय ?

जेनी : एक दोन तीन ..

" वाचवा, वाचवा.. हे पोरं मला छेडत आहेत वाचवा ,
वाचवा कोणीतरी माझ्या पोरीला, हे गावगुंड मारतील आम्हाला " जेनी आणि तिचे वडील एकत्र ओरडत होते

हे दोघे ओरडून ओरडून सगळे लोकं जमवतील म्हणून आभ्या आणि त्याच्या मित्रांनी लगेच तिथून धूम ठोकली..

जेनी अशीच होती ,एकदम बेधडक आणि बिनधास्त ..कारण तिच्यासोबत तिचा डॅडी होता आणि त्या तीन पोरांमधील एक होता आपल्या कथेतील हिरो अभिजित उर्फ आभ्या..

बाप लहान असताना वारला आणि आई धुणंभांडीचं कामं करते त्यामुळे आभ्याकडे कोणी नीट लक्ष दिलंच नाही .. आभ्यास सुटला ,शाळा सुटली त्यामुळे आभ्या गावगुंड झालेला.. एका नेत्याचा कार्यकर्ता म्हणून कामं करत होता .. सतत कोणाला मारायचं असेल तर किंवा कुठं हफ्ता गोळा करायचा असेल तर आभ्या नेहमी हजर असायचा..

एकदा अचानक जेनी आणि तिची मैत्रीण आमदार सूर्यभान देशमाने यांच्याकडे आली

देशमाने साहेब : या या पोरींनो बसा, कशा आहात ? सगळं ठीक ना ? ये चहा आना रे पोरींसाठी

जेनी : नाही नको तात्यासाहेब .. मला तुमची मदत हवी आहे .

देशमाने साहेब : माझी मदत ?

जेनी : अहो पर्वापासून एक पोरगं लय मागं लागलं आहे आमच्या दोघींच्या ..दररोज जाता येता रस्त्यात आडवा येतो .. मला धमकी पण देतो की माझ्या डॅडीला मारून टाकेल ..आज रात्री मला या पत्त्यावर बोलावलं आहे .. माझे डॅडी सध्या आजारी आहेत म्हणून कळत नव्हतं की कोणाकडे जाऊ ..म्हंटलं तुमचं ऑफिस जवळच आहे आणि तुम्ही नेहमी आपल्या गावातील आया बहिणींच्या संरक्षणासाठी तत्पर असतात म्हणून तुमची मदत हवी आहे

देशमाने साहेब : पोरींनो तुम्ही अजिबात काळजी करू नका ..मी माझ्या एका पंटरला तुमच्या सोबत पाठवतो.. तो पठ्ठ्या चांगलाच बंदोबस्त करेल त्या पोराचा..आभ्या इकडं ये पाहू

आत दुसऱ्या खोलीत असलेला आभ्या बाहेर आला , आभ्या आणि जेनी दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि चकित होऊन दोघही एकत्र ओरडले .. " तू ? "

देशमाने साहेब: अरे वा ओळखता वाटतं तुम्ही एकमेकांना ?

जेनी : हो हो चांगलंच ओळखते मी याला

आभ्या : हो मीपण हिला चांगलंच ओळखतो

जेनी : हा देणार आहे होय तुम्ही आमच्या रक्षणासाठी ? पण मग याच्यापासून आमचं रक्षण कोण करणार ?

आभ्या : ओय म्हणायचं काय तुला ?

देशमाने साहेब : एकमिनीट गप्प बसा तुम्ही दोघांनी .. पोरींनो हा आभ्या माझं सगळं ऐकतो.. माझ्या शब्दाबाहेर नाही तो आणि याच्यापासून तूम्हाला काहीही धोका नाही याची खात्री देतो मी ..


देशमाने साहेबांनी खात्री दिली म्हणून नाईलाजाने त्या दोघीनी आभ्याला त्यांच्या सोबत नेलं.. त्या पोराने पुन्हा रस्ता अडवला होता.. तेव्हढ्यात मागून येऊन आभ्याने त्या पोराला बेदम मारला.."बहिणीसमान पोरींना छेडतो म्हणून लाज नाही का वाटत? " असं मारता मारता आभ्या बोलत होता त्यामुळे जेनी त्याच्याकडे बघतच होती.. तो पोरगा जेनीच्या पाया पडून माफी मागून निघून गेला..

" काय मॅडम माणूस ओळखायला चुकला आहात तुम्ही , परवा त्या पोराला आम्ही यासाठी मारत होतो कारण त्याने साहेबांचे भरपूर पैसे बुडवले ,या पोरांसारखं आम्ही पोरींना छेडत नाही कधी "आभ्या बोलला

" माझं चुकलंच, सॉरी माफ करा मला " जेनी बोलली

" ठिके कोई नही ,आता ते पोरगं पुन्हा तुम्हाला त्रास नाही देणार .. चला येतो मी " आभ्या बोलला

" थांब थांब ..अरे तू आमची एवढी मदत केली त्याबदल्यात आम्ही तूला काहीच नाही देऊ शकलो " जेनी म्हणाली

"काही हरकत नाही ,मी काही मिळवण्यासाठी कामं नाही करत "आभ्या बोलला

"पण माझ्याकडून तुला एक पार्टी " जेनी म्हणाली

"पार्टी ? आणि काय असतं तुमच्या पार्टीत ? "आभ्या ने विचारलं

"काही नाही ,मस्त भेळपुरी खाऊ आणि एक फक्कड चहा "जेनी म्हणाली

"ठिके चालेल "आभ्या ने पार्टीसाठी होकार दिला

आधी आभ्याकडून मदत ,मग एक छोटी पार्टी त्यामुळे दोघे एकमेकांच्या निदान ओळखीचे झालेले.. पण नंतर सतत काहीं ना काही कारणांनी जेनी नेहमीच आभ्याच्या आजूबाजूला घुटमळत असायची ..म्हणजे त्या आमदाराच्या निवासा जवळ जेनी जाणं येणं करायची, आभ्याच्या घरी बाजूने जायची..जिथं आभ्या तिथं जेनी सतत दिसायची ..त्यामुळे न राहवून आभ्याने जेनीला असं वागण्या मागील कारण विचारलं ..जेनी आभ्याच्या प्रेमात होती ..चिंगी नंतर आभ्याने कोणत्याही मुलीचा विचार केला नव्हता आणि आता चक्क जेनी आभ्याच्या प्रेमात होती ,आभ्याला देखील ती आवडायची त्यामुळे ते दोघे आता रोज भेटत असायचे.. कधी गार्डन, कधी आईस्क्रीम खायला, कधी कॉलेजमध्ये..सगळीकडे हे प्रेमी युगुल एकत्र हिंडायचे. रोज रात्री शतपावली करायला जेनी बाहेर जायची आणि आभ्याला भेटायची..एकदा कळत नकळत तिच्या डॅडीला सुद्धा शतपावली करायला जावंसं वाटलं म्हणून जेनीच्या मागोमाग तिचा बाप गेला ..पाहतो तर काय जेनी चक्क एका मंदिरात गेली ,तिथे आमदार साहेबांच्या हजेरीत ह. भ.प महाराजांचे भजन सुरू होतं ..पण जेनी नंतर एका पोराच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून होती

जेनी : अभी तू हे कामं नको करू , या कामात काही भवितव्य नाही ..उद्या आपण लग्न केलं की,चांगलं स्थिरता असलेलं काम बघावं लागणार तूला किंवा मला ..

आभ्या : काय लग्न ? तू लग्न करणार माझ्याशी ?

जेनी : हो मग ..मी टाईमपास करणारी पोरगी नाहीये, मला तू नवरा म्हणून आयुष्यभर हवा आहे .

आभ्या : आतापर्यंत फक्त मीच लग्नाची स्वप्नं बघायचो पण कोणी पोरगी माझ्याशी लग्न करायचं स्वप्नं बघेल हे वाटलं सुद्धा नव्हतं.. लगेच आपल्याजवळ असलेल्या
एम.आय.डी.सी मध्ये मिळेल ते कामं घेतो ,कोणतंही काम करेल हवं तर ओझं वाहून नेईल पण आपल्या लग्नासाठी काहीही करेल..आधी काम मिळवेन आणि मगच तुला भेटेन.

जेनी : हो जर तू चांगला कमवता असेल तर माझे डॅडी देखील विरोध नाही करणार आपल्याला .

हे सगळं जेनीचा डॅडी लांबून पाहत होता ,त्याला खूप राग आलेला जेनीचा ..आपली पोरगी ख्रिश्चन सोडून एका हिंदू पोरासोबत लफडी करतेय हे त्याच्या मनाला पटत नव्हतं..

दोन दिवसांनी पेड्याचा बॉक्स घेऊन आभ्या जेनीच्या घराबाहेर बाईकवर वाट बघत होता..जेनी घराच्या बाहेर आलीच नाही ..न राहवून दोन तासांनी त्याने दरवाजा ठोठवला

जेनीचे डॅडी : कोण हवंय आपल्याला ?

आभ्या : जेनी कुठं आहे अंकल ? मला तिला भेटायचं आहे ,तिला सांगा आभ्याला जॉब लागला

जेनीचे डॅडी : जेनी आता इकडे नाही राहत ,मी परवा माझ्या मित्राच्या मुलासोबत म्हणजे इन्स्पेक्टर रमेश डिसोझा सोबत तिचं लग्न लावून दिलं ..हा घे तिच्या घराचा पत्ता, तिला तू तिकडे जाऊन दे पेढे..

जेनीच्या डॅडीने जोरात दरवाजा बंद केला आणि त्याच क्षणी आभ्या पुन्हा प्रेमात हरला ..डोळ्यातून आपसूकच एक अश्रू ओघळला ,पेढ्याचा बॉक्स आपोआप हातातून खाली पडला..


काय होईल आपल्या आभ्याचं ?
त्याचं भविष्यात लग्न होईल का ?

वाचत रहा ..
एक होता अभिजित..!!

क्रमश..




🎭 Series Post

View all