Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

एक गुरुदक्षिणा अशीही...

Read Later
एक गुरुदक्षिणा अशीही...

एक गुरुदक्षिणा अशीही…….
         माधवी दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासातही हुशार, मेहनती आणि प्रामाणिकही, तिचा स्वभाव अगदी लाघवी आणि अडल्यानडल्या ला मदत करणारा परंतु घरची परिस्थिती बेतास बात असल्याकारणाने, खूप इच्छा असूनही तिला इंजिनीयर होता आलं नाही. म्हणूनच मग ती ना बी.एस्सी. नंतर बी.एड. केलं आणि घराजवळच्या एका प्रायव्हेट इंग्रजी शाळेत शिक्षिकेची पार्ट टाईम नोकरी केली , आणि गरीब परंतु हुशार मुलांच्या घरी शिकवण्याही घेऊ लागली .


          माधवी चा हा प्रामाणिक आणि मेहनती स्वभाव तिच्या शाळेतील तिच्या सर्व सहकाऱ्यांना फार आवडायचा. त्यातीलच संजना मॅडमने , माधवी साठी माधव स्थळ आणलं. माधव कंप्यूटर इंजिनियर होता, कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. त्याला पगारही चांगला होता. माधवला मात्र करिअर पेक्षा घर सांभाळणारी आणि त्याच्या आई-वडिलांकडे लक्ष देणारी मुलगी सहचर म्हणून हवी होती. कदाचित म्हणूनच, माधवने पहिल्या भेटीतच माधवीला लग्न करता होकार दिला.


             मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने, पण परंपरेतील सर्व विधीनुसार माधव आणि माधवीचे लग्न पार पडले. माधवी सासरी आली. माधवी चे सासू-सासरेही तिला फार जीव लावायचे. माधवी चे आयुष्य अगदी सुखात सुरू होते अगदी दृष्ट लागण्यासारखा तिचा संसार होता. फक्त उणिव होती ती एकाच गोष्टीची, लग्नाला पाच वर्ष होऊनही माधुवी च्या संसारात अजूनही लहान बाळाचा पाळणा हल्ला नव्हता.


              आता माधवीला ही मातृत्वाची ओढ लागली होती. माधवीचे सासू-सासरे हि घरात लहान बाळाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. पण त्यांनी कधी स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून माधवीला तसं जाणवू दिलं नाही. माधव त्याच्या नोकरीत व्यस्त होता. स्वतःच्या करीयरची नवनवीन क्षितिजे पार करीत होता. आता मोठ्या हुद्द्यावर माधव ची नेमणूक झाली होती. पण तरीही माधवला माधवीच्या मनाची अस्वस्थता समजत होती.


          माधवीचे मन रमावे म्हणून माधव सहजच एकदा माधवीला बोलून गेला की, तिने मावशी बाई च्या मुलाची ट्यूशन घ्यावी..


 माधव - " माधवी तू मावशी बाईंच्या अरुण ला गणित आणि विज्ञान हे विषय शिकवशील का? काल त्या आईला म्हणत होत्या की, अरुणला हे विषय अभ्यासात फार कठीण वाटतात. "


 माधवी - " हो नक्कीच शिकवेन मी त्याला गणित आणि विज्ञान विषय. "


                माधवीने अरुण गणित आणि विज्ञान सह , इंग्रजी आणि इतिहास भूगोल हे विषय ही समजून सांगण्यास सुरुवात केली. आणि गणित आणि विज्ञान विषयात काठावर पास होणारा अरुण आठवीत वर्गात तिसरा आला. त्यानंतर अचानक लोक डाऊन लागलं , पण तरीही माधवी अरुणला शिकवत होती. स्वतःचा मोबाईल आणि मोबाईल डेटा सुद्धा अरुणला ऑनलाईन क्लासेस साठी देत होती.


              मुळातच हुशार असणारा अरुण माधुवी च्या अभ्यासातील मदतीने , दहाव्या वर्गात 75 % गुणांनी पास झाला. पण त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च त्याच्या मामाने उचलल्याने, तो त्याच्या मामाच्या गावी निघून गेला. मध्ये पाच - सात वर्ष तशीच निघून गेली मावशीबाई अधेमधे माधवीला भेटायला येत, अरुण ची अभ्यासातली प्रगती माधवीच्या कानावर घालत , अरुण आता डॉक्टर होणार आहेत असं त्या माधवीला सांगत.


       मावशी बाई आता म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांना आता पूर्वीसारखी कामे होत नव्हती म्हणून त्या मुलाकडे राहायला निघून गेल्या होत्या. आणि अचानक माधवीला मातृत्वाचे डोहाळे लागले. तब्बल बारा वर्षानंतर माधवीच्या संसारवेलीवर आता एक फुल उमलणार होते.


          सासू-सासरे , माधव , माधवीची खूप काळजी घेत होते. माधव, माधवीला डॉक्टर कडे नियमित तपासणी ला घेऊन जात होता. तिला काय हवं नको ते अगदी जातीने लक्ष देऊन, तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता. एवढी काळजी घेऊनही ऐन सातव्या महिन्यात माधवीला प्रसववेदना सुरू झाल्या आणि एका गोड कळीने माधवीला मातृत्वाचं सुख दिलं, परंतु प्रसूतीदरम्यान तिला खूपच रक्तस्राव झाला. माधवीचा रक्तगट ओ निगेटिव्ह होता, आणि नेमका तोच रक्तगट हॉस्पिटल मध्ये उपलब्ध नव्हता. माधवीच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला.


         माधव , त्याचे आई - वडील, माधवी चे आई - वडील, सगळेच जण चिंतेत पडले. त्याच वेळी दवाखान्यातील इंटर्नशिप करत असलेल्या एक तरुण डॉक्टरने माधवीला रक्त दिले आणि तिचे प्राण वाचवले.


            माधव, त्याचे आई-वडील सासू-सासरे सगळेजण त्या तरुण डॉक्टर चे आभार मानत होते. तेव्हा तो डॉक्टर म्हणाला


डॉक्टर - " ज्या माऊली ने मला शिकवले, ज्ञाना सारखं सर्वोत्तम दान मला दिले, तिला माझी ही गुरुदक्षिणा समजा. "

          

            " कालपासून तुम्हा लोकांची हॉस्पिटल मधली गडबड मी बघत होतो पण, कामाच्या व्यस्ततेमुळे मी माधवी ताईंना येऊन भेटू शकलो नाही. मी अरुण, काही वर्षांपूर्वी माझी आई तुमच्याकडे घरकाम करत होती, तेव्हा माधवी ताईनीं मला शिकवलं , लॉक डाऊन च्या काळात त्यांचा मोबाईल ऑनलाईन क्लासेस साठी दिला. त्या उपकारांची कधीच परतफेड होऊ शकत नाही. पण त्यांच्या प्रती माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता आहे, म्हणूनच मी त्यांना माझे रक्त दिले."


              "माधवी ताईंना माझ्याकडून हीच माझी गुरुदक्षिणा. " समाप्त.


 जय हिंद 


*********************************************


. वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत…..

.           


.       


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//