Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

एक दुर्गा अशी ही!

Read Later
एक दुर्गा अशी ही!
गोष्ट छोटी डोंगराएवढी१३


एक दुर्गा अशी ही!

स्त्री ही आदिमाया आदिशक्ती, जगदंबा, रणरागिनी इत्यादी अनेक रूपात आपल्याला पाहायला मिळते.
अशाच एका रणरागिनी दुर्गेची ही कथा...

सुनिता च बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण झालं. आणि घरच्यांनी तिचं लग्न साधारण आर्थिक परिस्थिती त असणाऱ्या मुलाशी लावून दिलं.
खरं म्हणजे लग्न हा एक जुगार आहे.
असंच म्हणावं लागेल. कारण समोरच्या व्यक्तीचा कुठलाही परिचय नसताना त्याच्या गुणदोषांची कुठलीही माहिती नसताना मुलीचं लग्न लावून दिल्या जातं. आणि आयुष्यभर तिला त्या संसारात होरपळण्यासाठी सोडून दिल्या जातं. हा एक भारतीय समाजातल्या विवाह संस्थेतील दोष आहे. असं खेदानं म्हणावं लागतं.

सुनिता चा नवरा सर्व प्रकारच्या व्यसनात आकंठ बुडाला आहे, याचा थांग पत्ता तिच्या सासरच्यांनी तिला लागू दिला नाही.
त्याचा दूध विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे सकाळी तो दूध घेऊन तालुक्याला जायचा. तिथून दारू ढोसून घरी आला की तिला त्रास देणं सुरू.. ही बिचारी दोन म्हशींच शेणपाणी करणं, गोठा स्वच्छ करणं इत्यादी घरातली सर्व काम करून हिला जराही सवड मिळत नव्हती.
हे सर्व करीत असताना तिच्या मनाला सतत वाटायचं, मी पुढे शिकली असती तर फार बरं झालं असतं. तिच्या मनात काहीतरी करण्याची सुप्त इच्छा होतीच.
अशातच गावातल्या ग्रामपंचायत मध्ये तालुकास्तरावरून आशा वर्कर च्या जागा भरण्याची नोटीस लागली. हिच्या कानावर बातमी आली. तिने आरोग्य विभागा त अर्ज केला. त्यात तिची निवड झाली.
आणि आशा वर्कर म्हणून ती रुजू झाली.

घरातली सर्व कामं सांभाळून, नवर्याचा जाच सहन करतच ती आपली सेवा आरोग्य विभागाला देत राहिली.

एक दिवसभर दुपारची वेळ! आरोग्य विभागातर्फे गावात भेटी देत असताना एका छोट्या झोपडीत हिला दोन वर्षाच बाळ रडत असताना दिसलं. झोपडी त बाळ एकटं आणि त्याच्यासमोर एक भला मोठा नाग फणाकाढून उभा होता. तिने आजूबाजूला पाहिलं. कुणीच नाही! त्याची आई दूरच्या दगडावर कपडे धुत होती. कपडे धुण्याच्या नादात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज सुद्धा आला नाही. सुनिता ने पाहिलं, क्षणाचाही विचार न करता तिने त्या नागाची शेपटी पकडून दूर त्या नागाला भिरकावले.

तशी ती खूप धाडसी होती. संघर्ष करीत जीवन जगण्याची खमकी ताकद तिच्यात होती.
आरोग्य विभागात सेवा देत असताना तिला अनेक अडचणी आल्यात. परंतु ती त्या अडचणींना धीराने सामोरी गेली.

एकदा तिच्या नवऱ्याचा तिच्या हक्काच्या मेहनतीच्या कमावलेल्या पैशावर डोळा गेला.
त्याने तिला मारहाण केली. तिने उलट प्रतिउत्तर देत त्याला चांगला चोप दिला.

अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन न करणे हे तिला आता मैत्रिणींच्या संभाषणावरून कळत गेले होते....


वळून कोणी पाहिलं नाही म्हणून....
माळावरच्या चाफ्याचे अडलं नाही!
शेवटी पानांनीही साथ सोडली...
पण त्यानं बहर नं सोडलं नाही!!!!

छाया राऊत ( बर्वे)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Chhaya Raut

//