एक दुपार मंतरलेली . २

What happened that afternoon? Written in two parts, if you are interested to know then please keep on reading..!

गावात आल्यावर रमाकाकी हिरुला तिच्या घरी घेऊन गेली , 

हिरु खुप थकलेली वाटत होती , 

हात पाय धुवं हिरुबाई अशीच नको बसू , 

मग हिरुने हातपाय धुतलेत आणी ओसरीत गोधडी टाकून झोपली , 

तिची आई आणि बाबा यायचे होते शेतातून , 

एवढ्या लवकर का परत आल्या म्हणून वेटाळातल्या घरी राहणार्‍या बाया आणी आज्जी तिला विचारायला लागल्या , मग काकीने घडलेला प्रकार सांगीतला , 

पाच वाजता लक्ष्मीबाई घरी आली हिरुचे बाबाही आलेत , घरासमोर गर्दी बघून काय झाले म्हणून विचारपूस केल्यावर घडलेला प्रकार त्यांना कळला ,

तसे ते दोघेही चिंताग्रस्त झाले , 

लक्ष्मीकाकी म्हणाली आता व माय कस , 

मंग काय करु आता ?

बोलता बोलता अंधार झाला , 

हिरुला झोप लागली होती अचानक ती ओरडायला लागली ,

अव आई माह्या गळा दाबत हाये हा , 

हा पाय माया छातीवर बसला , 

आणी ती गळ्याला हात लावून पाय आणी डोके हलवायला लागली , 

तिचा आवाज ही घोगरा आणी दबका यायला लागला , 

तसे तिचे बाबा आई तिच्या जवळ गेले , 

कोनीच त नायी हाय व हिरु , 

तुयाच हात गळ्या जोळ हाय तुया , 

काढं बरं हात , लक्ष्मी म्हणाली ,

बाबा गा पाय न हा माया गळा दाबत हाय,

त्याले पकडाना ,

थे पा थो म्हणते बाहेर चाल ,

म्हणून हिरु ओरडत होती , 

आज्जी लांबूनच ओरडून म्हणाली , 

थे देवा जवळच कुकू आनून लावा तिले , 

कुणीतरी धावतच आतून कुंकू आणून लावले तिला , 

थोड्या वेळाने ति शांत झाली , 

पण धापाच टाकत होती , 

तिला पाणी पाजले काकीने , 

लक्ष्मीबाई तिला पाहून रडायलाच लागली , 

आज्जी म्हणाली हे बाहेरच होय , 

दुपारच्या येळेले अस झाडाखालती नायी जाचं , 

मंग आता वो बाई कसं करु लक्ष्मीबाई रडतच म्हणाली ,

रडत कायले व , तुया रडन्यान कायी होनार हाये का ?

थे वरतीपुर्‍यात { गावातील शेवटचे वस्तीचे ठिकाण } अवधूते भजन असत , 

तिथ ने तिले , 

थो तुकाराम बुवा त्याले समजते सार , 

थो पानी{ मंतरलेले पाणी } देईन तिले , 

मग ठरले , 

आठ वाजता भजन सुरु होणार मग हिरुला तिथे घेऊन जायचे , 

रमा , लक्ष्मी काकी , तिचे बाबा आणी एक दुसरी सरुआज्जी , सगळे आप आपल्या घरी गेलेत जेवण वगैरे करुन मग हिरु ला घेऊन सगळे अवधुते भजन मधे गेलेत , 

भजन नुकतेच सुरु झाले होते , 

एका छोट्या खोली मधे चार पाच जण टाळ , मृदंग वाजवत अवधुताचे भजनं म्हणत होते , 

आणी आधीच त्या खोलीत चारपाच बाया बसलेल्या होत्या , मग कसेबसे हे चार पाच जण दाटीवाटीने बसले , 

सगळ्यांच लक्ष हिरु कडे , 

ही आता घुमेल की मग घुमेल , 

तेवढ्यात जिथे सरुआज्जी दाटीवाटीने बसली होती , 

एका दुसर्‍याबाईला खेटून , 

तिच घूमायला लागली , 

जोरजोरात हू हूहूहूहू करायला लागली , 

तशीच सरुआज्जी घाबरुन अवं माय व किंचाळून बाहेर पळाली , 

तिच्या मागेच लक्ष्मीचे बाबा गेले अवं काकी कायले घाबरतव , चाल नं अंदर , अंधारात कुकड जात , 

मंग सोबतच घराकडे जावू ,

बाप्पा मायात जीवाच पानी पानीच झाल्त ,

जिले खेटून बसली माय मी तिच्याच आंगात आल , 

कायर बापा तिच्या आगातल मले त नायी लागन? 

अव काकी ज्याले जिथ लागाच त्याले लागते , 

तू येवढी घाबरत , त आली कायले , 

बरं चाल येतो ना बाप्पा आता अंधारात मी येकली घरी नायी जात , 

म्हणत दोघेही आत जाऊन बसलेत , 

तिथे दुसर्‍या दोघींच्या अंगात आले होते हुहुहुहुहु आवाज घूमत होता , 

मग थोड्या वेळाने भजन जसे रंगात आले तसेच , 

हिरुबाई ही बसल्या जागेवर घुमू लागली , 

तिच्या मागून कुणीतरी तिचे केस सोडलेत मग ति अजूनच जोरात गोल गोल घुमायला लागली , 

मग भजन थांबवून तू कोण म्हणून विचारले तुकाराम बुवांनी , मी मुंजा होय { बिना लग्नाचे मरण आलेले } ,

माया जागेवर ही आल्ती , 

आता तिले नायी सोडत , 

नेतो माया सोबत मी तिले , 

हिरुबाई पुरुषी आवाजात बोलली , 

असा कसा नेशीन तिले , 

तुले रोज या लागन बलावल्यावर , 

बोल नायीतर तुले इथच राख करतो , 

हाव येत जाईन हिरु ने म्हंटले ,

मग पुन्हा भजन जोरात सुरु झाले आणी थांबले तसे ह्या तिघीही घुमायच्या थांबल्या आणी झटक्याने मागे पडल्या ,

मग ह्या तिघींनाही तुकाराम बुवाने मंतरलेले पाणी प्यायला दिले , 

आणी घरी पाठवले पण दर आठवड्याला बुधवारी यावे लागेल हे ही सांगीतले , सगळे वेटाळात घरी परत आलेत , आज्जीचा अड्डा भरलेला होता , सगळे लहान मोठे बसलेले होते तिथे , 

ह्यांचीच वाट पहात होते , 

आल्यावर तिकडे काय झाले ते सगळे हिरुच्या बाबांनी सांगीतले , 

सरुआज्जी कशी पळाली ते ही हिरुच्या बाबांनी हसून सगळ्यांना सांगीतले , 

मग ही मोठ्ठी आज्जी म्हणाली

"घरात मारे डरकाया फोडते ,

आन बाई घूमाले लागली त

ढुंगणाले पाय लावून पयते "

त्या सरुआज्जी सकट सगळे खळखळून हसायला लागले ,

चला बाप्पा आपआपल्या घरी , 

लक्ष्मी कायजी करु नको ,

होईन पोरगी चांगली , 

जाईन तिच्याही मांगच लंचाड , 

सुंदरा आजी म्हणाली आणी तिचे लक्ष बाब्या कडे गेले ,

कार आँ ! काय म्हणत ? 

जाता जाता पायजे का आजून येक ! 

हाव ना व आज्जी यकडाव मंग जावू घरी , 

हं आयीक मंग , आजी म्हणाली

"भर दुपारी 

कुट ही नको

बसू मुताले

रोज मायी म्हन आयकायची

सवय लावून 

नोको घेवू

मेल्यावरही मंग

येईन रातची

तुले सांगायले "

तसे बाब्याने कान पकडत म्हंटले , 

" अव आज्जी माफ कर बाई मले , 

तू मेल्यावर नको येजो बाप्पा 

नायीतर मले जा लागन घुमायले "

आणी सगळेच थोड्यावेळा पुरते चिंता विसरुन हसायला लागले , मग घरी गेलेत .

असेच काही दिवस अवधुते भजनात रोज जावे लागायचे , दिवाळीच्या आधी एकदा भजनात हिरुबाई ला नेले , थोड्यावेळाने ती घुमायला लागली मग तुकाराम बुवांनी तिला विचारले कोन आहे , 

मी मुंज्या हावो , हिरु म्हणाली ,

मंग किती दिवस रायत पोरी च्या आंगात , 

सोडून दे तिले , 

नायीतर तुले जाळून टाकू , 

तुयी कायी इच्छा आसन त सांग थे पुरी करु ,

येत्या बलीप्रतिपदे ले तुले सोडालागन हिरुबाईले , 

ठाणावर या लागन ,

तुयी इच्छा सांग , तुकाराम बुवा म्हणाले ,

तसे हिरु म्हणाली घोगर्‍या आवाजात , 

मले कोंबड्याची भाजी पायजे आन भाकरी संग हातभट्टीची पायजे , 

सार देतो तुले पन हिरुबाईले सोड , 

मग थोड्यावेळाने भजन संपले आणी हिरु घूमायची थांबली , लवकरच दिवाळी आली , 

मग बलिप्रतिपदेचा दिवस ऊगवला ,

हिरुच्या बाबांनी ,

हातभट्टीचा एक बंपर आणी पव्वा , 

एक कोंबड आणून त्याची भाजी बनवली आणी सहासात भाकरी , 

हिरुला लाल साडी घालून तयार केले , 

एका मोठ्या टोपल्यामधे भाकरी , भाजी , हातभट्टीचा बंपर आणी पव्वा ठेवलेत , 

लक्ष्मीकाकीने टोपले डोक्यावर घेतलेत , 

लांबूनच भजनाचे आवाज यायला लागले , 

वाजत गाजत मिरवणूक घुमणार्‍या बायांसहीत येत होती , 

मग हे सगळे रस्त्यावर ऊभे राहीलेत , 

मिरवणूक जशी जवळ आली तशी हिरु हळूहळू हलायला लागली , 

त्यांच्याजवळ मिरवणूक आल्यावर ही पण घुमणार्‍या बायांमधे सामील झाली , 

आणी चालत चालत घुमणार्‍या बायांसहीत भजन मंडळी बघ्यांसहीत सगळे गोठाणावर {गावातील सगळ्या गुरांना चारायला न्यायच्या आधी , एकाठिकाणी ऊभे करण्याची जागा }आलेत , 

तिथे एका दगडावर हळक कुंकू टाकून पूजा केली तुकाराम बुवांनी , 

मग प्रत्येकाने भुतां न साठी आणलेला नजराणा तिथे ठेवला , एव्हाना भजन फारच जोरावर आले होते , 

शेवटी तुकाराम बुवांनी सगळ्यांच्या अंगातल्या भुतां ना आवाहन केले ,

शरीर सोडण्यासाठी आणी कुंकू सगळीकडे फेकले , 

मंतरलेले पाणी शिंपडले सर्वांवर आणी सगळेच घुमणारे धडाधड खाली पडलेत , 

आणी भजन ही थांबले ,

तेव्हा कुठे आप्तांनी सुटकेचा श्र्वास घेतला , 

आणी आनंदाने घरी परतलेत .

घरी जाता जाता बाब्या आज्जीला म्हणाला , आज्जी एक डाव होऊन जाऊ दे ना , का बे पोट्ट्या तुले कायी कामधंदा नायी त काय मले ही नायी काय ?

नायी व ,,,,हा,,हा,,हा,,, कोन्ते काम असतात व आज्जी तुले ,

माश्या हाकलत त बसत तिथ आंगनात ,

कवा कवा तूही त येतो ना हाकलाले ,

म्हण न वं , तू लयच रंगीली हायेस व आज्जी,,,

हा,,हा,,हा,, दोघेही हसायला लागले ,

आईक मंग ,

हिरुच्या गच्चीवर {मानेवर}

भूताच ठानं

कोंबड आन हातभट्टीची पिऊन

भूत पडल ऊतान

ओ आज्जी येक नंबर वं ,,हा,,,हा,,,हा,,,

संध्याकाळी सगळे लाईट खाली गप्पा गोष्टी करत बसले होते , अंबा काकी ने बाब्या ला म्हंटले , अरे बाब्या जाय बर माह्या घरी , थो घरात जलमर { जर्मन }च्या डब्यात चिवडा हाय थो घेऊन ये बरं फटकन , नायी व काकी मले तुमच्या गोठी आयकाच्या हात , लयच हाय येलपाड्या{ नाटकी }वं , माय बाई हे शेंबड पोट्ट पायन नायी मनते , चिवडा आनला का , कावरल्यासारखा खात बसन मंग , 

मधेच हिरु म्हणाली काकी मी आणतो वं चिवडा , 

याले घुसू दे बायाच्या गोठीत !

हो माय हिरु , शायनी बाई , जा माँ , घेऊन येजो हां , थ्या वरच्या पट्टीवर हाये डबा , घेऊन येजो , 

बरं घरी असन ना कोनी , 

नायी वं , सोन्या पोट्ट्यायसोबत गल्लीत बसला हाय , त्याचा बाप गावात गेला हाय , कडीच लावली हाय , जाय घेऊन ये , हाव , म्हणत हिरु वेगाने काकीच्या घराकडे गेली , 

कडी काढलेली होती , दार लोटून हिरु सरळ घरात घुसली आणि दार आतून लावून घेतले , तसेच तिला मागून येऊन सोन्याने मिठीच मारली , अरे काऊन बा असं करत ! थांब काकीलेच आवाज देतो , तिला आपल्याकडे वळवत सोन्या म्हणाला , अजून तुले जायाच का बा घुमाले ? आँ ! 

मंग बोंबल ! तसे दोघेही हसायला लागले , 

हे पा , माया राग मले लय भारी पडला बा !

मंग कावून येवढा तमाशा केला ? सोन्या म्हणाला ,

अरे त्या , थ्या मीरीले कावून पायल ? 

तुले आंधीच म्हतल होत म्या , 

मले थे मटकी पोट्टी जरायी रास{ आवडत } येत नायी , 

बेज्ज्या राग येते तिचा , 

मले भेटाले आला वावरात आन निंबाखाली ऊभा रावून तिले पायत होता,,,,?

मंग मायी सटकली ,,,! 

आन कसा पयाला बाबू तिथून ,,,,!हा,,हा,,हा,, 

सांगीतल्यावरही थ्या पायलच त्या बांदरीकड{ माकड } ,,, 

म्हणून मंग म्या,,,,,,हा,,हा,,हा,,

दोघे ही एकमेकांच्या डोळ्यात बघून हसायला लागले,,,,,आता वागशीन का असा,,,!

न्हायी बाप्पा ! कानाले खडा , मायवाल्या,,,,,! 

ढोपरापासून पाया पडतो माय माजे,,,,!

फक्त मनोरंजनार्थ,,,,,,

००००००००

🎭 Series Post

View all