एक दिवसाचं गरोदरपण (भाग ५ अंतिम)

बाळ सांभाळत घर सांभाळणे कठीणच


"मुग्धा..तू आता निघेपर्यंत फक्त ऑर्डर द्यायची आहेस बेटा आणि आज दिवसभर आम्ही सगळेच तुला ऑर्डर देणार आणि तू तेवढं सगळी कामं करणार... मदतीला आहोतच आम्ही." विमलताई एक जळजळीत कटाक्ष टाकत बोलल्या.

"अग आई...हे खूप जड लागतय..आणि पोटालाच का बांधल आहेस? मी वाकणार कस?" मयूर

"तसच..जस मुग्धा वाकते आणि जड च म्हणशील तर...आज पूर्ण दिवस तुला हे पोटाला बांधूनच तुझी आणि इतरांची सगळी कामं करायची आहेत. चला..आता निघा नाहीतर उजाडेल आणि लोक म्हणतील मुग्धा सोबत मयूर पण गरोदर राहिला की काय?" महेश राव बोलले.

अडीच किलो तांदळाची एक गोलाकार उशी बनवून महेश रावांनी ती मयूर च्या पोटाला बांधली होती. दिवसभर बाळाला सांभाळत काम करत राहणं किती कठीण असत याची त्याला जाणीव व्हावी म्हणून केलेला हा सगळा खटाटोप.

मयूर आणि मुग्धा दोघे मागच्या सीटवर बसले आणि विमलताई महेश रावांसोबत पुढे.. कारण मयूर एक दिवसासाठी गरोदर असल्याने आज ते गाडी चालवत होते. सगळे दोन तासात मुग्धाच्या घरी पोचतात. मयूर ला अस अवघडलेल्या अवस्थेत बघून सुधा ताईंना हसू आवरेना पण जावयावर कस हसावं म्हणून त्यांनी कस तरी स्वतः ला आवरलं पण मयूर मात्र ओशाळला होता.

"या या.. " विलास राव त्यांच्या पाहुण्यांच स्वागत करत बोलले. विहिण बाईंनी पण एकमेकींची गळा भेट घेतली.

"काय हो ताई..खूप तांदूळ बांधलेत का जावयांच्या पोटाला!"

"नाही हो...अडीच किलोच असतील जेमतेम आणि असूद्या हो..जरा त्याला पण कळुद्या." विमलताई बोलल्या.

"मयूर..आपण आज इकडे का आलो आहोत माहीत आहे तुला? थांब मी सांगतो. हे बघ...आजूबाजूला खूप पाला पाचोळा झाला आहे. त्यात सुकून पडलेली पान..छोट्या मोठ्या काठ्या...हा सगळा कचरा वेगवेगळा करायचा आहे तुला." महेश राव

"मला? आणि ही तांदुळाची उशी..त्याच काय करू? "मयूर

"त्या उशी सोबतच काम करायचं आहे तुला." सुधाताई हसतच जावयाला सांगू लागल्या.

चहा नाश्ता झाला आणि मुग्धा सोडून सगळेच कामाला लागले. पोटावर बांधलेल्या तांदळाच्या उशिमुळे मयूरला धड वाकताही येईना आणि काही उचलता ही येईना. दोन अडीच तास कसे तरी त्याने काढले पण नंतर त्याला त्या उशीच वजन वाटू लागलं तसं त्याने त्रासून लगेच ती उशी काढून टाकली.

"काय यार हे..कस काम करणार यात.. मुग्धा..आय एम रिअली सॉरी यार..मी खरच चुकलो. तुला या दिवसात सांभाळायचं सोडून मी हे कर ते कर म्हणून सारखं एक ना दुसर काम सांगत होतो. अडीच किलो वजन घेऊन कोणीही सहज मॅनेज करू शकत असच वाटत होत मला पण दोन मिनिटांसाठी वजन उचलण आणि पोटात बाळाला सांभाळत नऊ महिने काम करण किती कठीण असत हे मला समजल आहे. बाबा.. थँक्यू सो मच! मला जी गोष्ट सांगून समजत नव्हती ती अश्याप्रकारे समजावून सांगितलीत की आयुष्यभर विसरणार नाही. आई बाबा..तुम्हाला पण सॉरी.. तुम्हाला वाटत असेल ना कसा जावई आहे आमचा.. बायको गरोदर असताना सुद्धा तिला त्रास देतो. तिने तर सगळीकडून नाती निभावली पण मलाच कदाचित जमत नव्हती. तिने जॉब सोडला मग तुम्हाला दर महिन्याला पाठवण्याचे पैसे मला द्यावे लागले या सगळ्याचा त्रास होत होता म्हणून कदाचित हे सगळ घडत होत माझ्याकडुन पण बाबा.. इथून पुढे अस कधीच होणार नाही. इथून पुढे मी माझ्या बायकोला..बाळाला आणि माझ्या दोन्ही आईबाबांना खूप छान सांभाळेन. वचन देतो मी.." मयूर

"हेच तर हवं होत आम्हाला. तू नवरा म्हणून तिला समजून घ्यावं आणि तिची तिच्या आईबाबांप्रती असलेली कर्तव्य पण तू मनापासून पार पाडावी. आम्हाला तुम्ही दोघे आणि तुम्हाला आम्ही चौघे इतकंच कुटुंब आपल." महेश राव लाडक्या लेकाला आणि सुनेला मिठीत घेत बोलले.

समाप्त...
@श्रावणी लोखंडे

🎭 Series Post

View all