एक दिवसाचं गरोदरपण (भाग ४)

बाळ सांभाळत घर सांभाळणं कठीणच


त्याच्याशी आता तुझ काय देणंघेणं? आता तू घरीच आहेस ना..!" मयूर तुसडेपणाने बोलला आणि बाईकला किक देऊन निघून गेला.

मयूर... मुग्धा त्याच्याकडे अवाक् होऊन बघत राहिली.

"जाऊदे त्याला. तू चल आत. कामाचं टेन्शन असेल त्याला" विमलताई तिला समजावत बोलल्या.

मुग्धा तिच्याच विचारात आत आली. मयूर अस का बोलला असेल त्याचाच विचार करत होती.

"मुग्धा..कॉफी घेणार की चहा? महेश राव विचारत होते.

"मुग्धा..कॉफी सांग..हे कॉफी खूप मस्त बनवतात." विमलताई बोलल्या. तशी मुग्धा हसून उत्तरली.

"बाबा..कॉफी चालेल."

काहीच वेळात जायफळ घालून केलेल्या कॉफीचा घमघमाट अख्या घरात सुटला होता.
मुग्धा फ्रेश होऊन आली आणि तिघांनी मिळून कॉफी घेतली.

"मुग्धा...तू जॉब सोडलेली गोष्ट मयुरला आवडली नाही का? मुग्धाचा खोटा हसरा चेहरा बघून विमलताईनी विचारलं.

"नाही. "डोळ्यातलं पाणी पुसत मुग्धा उत्तरली.

"हम्म..मी बोलतो त्याच्याशी. तू नको काळजी करू." महेश राव

प्रेझेंटेशन बरोबर झालं नसल्याने मयुरची चिडचिड सुरू होती. ऑफिसमधे बॉसने बडबड केली होती त्यामुळे तो डिस्टर्ब होता.

"मयूर..कशी झाली मीटिंग? अफकोर्स तू प्रेझेंटेशन दिलं म्हणजे छानच झाली असणार म्हणा!" पाण्याचा ग्लास घेऊन येत मुग्धा बोलली.

"तुला काय करायचं आहे माझ्या मिटिंगच? आणि हो माझी मीटिंग काही चांगली झाली नाही. खुश..झाल समाधान!" मयूर टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलत बोलला. मयुरच वागणं बघुन मुग्धा च्या डोळ्यात पाणीच आल.

"तू काळजी नको करू..मी बोलतो त्याच्याशी!"महेश राव डोळे पुसत असणाऱ्या मुग्धाला समजावत बोलले.

मयुरला आईबाबांनी मिळून मुग्धाची स्थिती समजावून सांगितली. काही दिवसांनी मयूर पुन्हा पूर्वी सारख छान वागू लागला. सगळे खुश होते. पण मयूर या सगळ्यात मुग्धाला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरू लागला होता. जसं की ती घरातच असते म्हणून त्याची सगळी कामं तिने वेळच्यावेळीच पूर्ण केली पाहिजेत, त्याने काही सांगितल की ते लगेच पूर्ण झाल पाहिजे वैगरे वैगरे.
सारखं आपल येता जाता \"तुला घरात काय काम असत?\" काम थोडी पटापट कर..अस काहीतरी सुरूच होत.
मूग्धाला सात महिने पूर्ण होऊन आठवा लागला होता. आराम आणि बेडरेस्ट दोन्ही चांगल्या झाल्याने आता मुग्धा आणि बाळ अगदी छान होत. बाळाचं वजन देखील अडीच किलो जास्त होत आणि मुग्धाची शुगर लेवल हाय असल्याने कदाचित तिची सी सेक्शन ने डिलिव्हरी करावी लागणार होती.
अशातच मयूर तिला सारखं बोलत असायचा.. एवढी कशी थकतेस आई तर असतेच मदतीला मग एवढा कसला त्रास होतो.

एकदिवस हे सगळ महेश राव ऐकतात.

"मयूर.. आपण उद्या मुग्धाच्या घरी जातोय बर.. कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग असेल तर आजच कॅन्सल कर." महेश राव

"अचानक? कॅन्सल करण्यासारखं काहीच प्लॅन नाही. जाऊया आपण. मुग्धा.. आईला सांग मला वांग्याचं भरीत खायचं आहे. ते ही त्यांच्या हातचं." मयूर

"बर..सांगते." मुग्धा

"अंहह...मुग्धा..आईला अजिबात फोन करायचा नाही... म्हणजे आपण जाणार आहोत ते त्यांना मी सांगितली आहे पण उद्या तिकडे जाऊन सगळी काम आम्ही पुरुष मंडळी करणार आहोत आणि महिला मंडळ आराम करणार आहेत. आता नो मोअर प्रश्न...!" महेश रावांनी फर्मान सोडलं त्यापुढे कुणाची बोलायची बिशाद.

जायचा दिवस उजाडला.

"मयूर...मयूर..." दार ठोकत महेश राव आवाज देतात.

"काय झालं बाबा? "मयूर

"आवरलं का तुझ? "

"नाही, आता आवरतो भर भर.."

"बर.. सगळ आवरायच्या आधी हे लाऊन घे." महेशराव आत जात बोलले.

"ओ बाबा...काय करताय हे? अहो बाबा.. हे लावून आवरू कस मी? आणि बाहेर कस पडणार घरातून" मयूर

"ते मला नाही माहित! आणि आपण लवकरच बाहेर पडणार आहोत त्यामुळे तुला इतर कोणी बघण्याचा संबंधच येत नाही. आता हे न काढता तुला आवरायचं आहे. तुझ पण आणि आमच्या सगळ्याच पण..."महेश राव हसत बोलले.

"अहो पण बाबा..." मयूर

"मुग्धा..तू आता निघेपर्यंत फक्त ऑर्डर द्यायची आहेस बेटा आणि आज दिवसभर आम्ही सगळेच तुला ऑर्डर देणार आणि तू तेवढं सगळी कामं करणार... मदतीला आहोतच आम्ही." विमलताई एक जळजळीत कटाक्ष टाकत बोलल्या.

क्रमशः
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all