Login

एक दिवसाचं गरोदरपण (भाग २)

बाळ सांभाळत घर सांभाळणे कठीणच


"या या...मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. हे बघा.. तुमच्या लेकीने काय केलं आहे." मयूर दारातूनच बोलत होता पण त्याचे शब्द ऐकून सुधाताई आणि विलास राव थोडे घाबरलेच. काही न बोलता आत जात बघतात तर त्या एकदम अवाक् होतात. लेकीला अस बघून त्यांच्या डोळ्यात पाणीच येत.

" आईबाबा..तूम्ही असे अचानक? सोफ्यावर बसलेली मुग्धा उठत बोलली.

"हो..अचानकच..पण अचानक आलो नसतो तर लेकीचा सुखी संसार बघायला मिळाला नसता. सुनेचे फार लाड चालले आहेत. एवढे पण लाड करू नका नाहीतर डोक्यावर बसेल." लेकीची अलाबला घेत सुधाताई बोलल्या.

"नाही बसणार डोक्यावर आणि बसलीच तर डोक्यावरून तिला दुबई दाखवेन मी! तेवढाच खर्च वाचेल ओ दुबईचा.." महेशराव गंमत करत बोलले.

"आता तुम्ही म्हणताय तर मग ठीक आहे. पण सुनेची एवढी खातिरदारी कशासाठी चालू आहे." खुर्चीत बसत विलास रावांनी म्हणजे मुग्धाच्या वडिलांनी प्रश्न केला.

"अहो बाबा...काही नाही. काल दुपारी मला थोडा ताप आला होता तेंव्हा पासून हे असच चालू आहे. किचनमधून पाण्याचे ग्लास घेऊन येत मुग्धा बोलली.

"काय? ताप..अचानक? बघू बर.. डॉक्टरकडे गेली होतीस का?"सुधाताई काळजीने विचारू लागल्या.

"अग अग आई.. हो हो.. शांत हो जरा.. त्या दिवशी बाहेर आइस्क्रीम खाल्ली होती म्हणून ताप आला होता. बाकी काही नाही आणि ताप अचानकच येतो. मी येतोय अस सांगून काही येत नाही ना?" आईला पाण्याचा ग्लास देत मुग्धा बोलली.

"हो, पण आईची काळजी तुला नाही समजणार बर. "विमलताई टेबलवरची प्लेट उचलत बोलल्या.

"तुम्ही सून सून करा आणि आईबाबा तुम्ही लेक लेक करा. हल्ली मला कोणी विचारतच नाही. म्हणजे मला अस वाटते की मीच लग्न करून नवीन घरात आलोय की काय?" मयूर नाटकी करत बोलला.

"अहो जावई..ती तुम्हाला विचारत नाहीत ना मग आम्ही कशासाठी आहोत. तुम्ही या आमच्या जवळ." जावयाची गळा भेट घेत पाठ थोपटत विलासराव बोलले.
सगळे छान हसून खेळून गप्पा मारत बोलतं होते. मुग्धा फार खुश होती. तिच्या ऑफिसमधल्या सगळ्या कलिग्स त्यांच्या सासवांबद्दल नेहमी वाईट बोलत असत पण मुग्धाच्या घरी उलटी गंगा वाहत होती. त्यामुळे ती फार खुश होती.

लेकीचा हसता खेळता संसार बघून दोघेही अगदी निर्धास्त झाले होऊन सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले.
लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती. दोघानाही आता आईबाबा होण्याचे वेध लागले होते. दोघांनी चांन्स घ्यायचं ठरवल होत.

"मयूर...अरे माझी पिरेड मिस झाली आहे...आणि मी चेक केलं तर हे.. टेस्ट किट पॉजिटीव्ह आल आहे." मुग्धा नजर खाली करत बोलली.

"काय? खरचं? "मयूर तिचे खांदे पकडुन तिच्याकडे बघत विचारत होता.
खाली नजर करतच मुग्धा हातातलं टेस्ट किट वरच्या बाजूला पकडत मयुरला दाखवते.

"ओह..माय गॉड... मुग्धा...सिरीयसली... ओह नो..मुग्धा..मी बाबा होणार..आणि तू..तू आई...मुग्धा मुग्धा...आय लव्ह यू.."तिचे खांदे पकडुन तिच्या सोबत गिरकी घेत मयूर बोलला आणि त्याने तिला स्वतः च्या मिठीत घेतले.
मुग्धा फार खुश झाली. तिने पण मयूरला घट्ट मिठी मारली.

सकाळी ऑफिससाठी दोघे सोबतच निघाले पण जायच्या आधी डॉक्टरांकडे जाऊन ब्लड टेस्ट करून घेतले. रिपोर्ट पॉजिटीव्ह होते. दोघेही घरी जाताना मिठाई घेऊन गेले. घरात सांगितल्यावर सगळा आनंदी आनंद झाला. सगळेच खूप खुश होते. बत्तीस वर्षानंतर घरात लहान बाळ येणार होत.

मुग्धाची प्रेग्नेंसी थोडी नाजूक होती म्हणून तिला डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. छोटी मोठी काम करू शकत होती पण धावपळ किंवा दगदगीची काम करायला डॉक्टरांनी नकार दिला होता.
क्रमशः