
उजाडतो कधी कधी एक चुकार दिवस...
आला तो हि एक दिवस माझ्या आयुष्यात...
ऐकून माझी कर्मकहाणी, तुमच्या डोळ्याही येईल पाणी..
नवर्याबरोबर झाले कचाकचा भांडण,
कारण फक्त नका पुसू...
नव्हते मनोहर म्हणूनी गमत होते उदास..
काय करावे सुचेना , कशी घालवावी मरगळ या जीवाची ते उमजेना..
आली धावून मग सखी जीवाभावाची,
आणि दिली तिने idea कल्पनेची..
घातला नवीन ड्रेस , केली साधीशी hairstyle, चढवला हलकासा मेकअप, सेंटचा केला शिडकावा...
असा करूनी जामानिमा , स्वारी निघाली shopping ला..
अवतार बघून लेकही म्हणाली solid दिसते आहेस मम्मा...
टाकून रागीट कटाक्ष नवऱ्याकडे शेवटी पडले घराबाहेर...
इत्र, तित्र, सर्वत्र होती दुकाने भरपूर,
जवळ होते नवर्याचे credit card..
त्यामुळे पैशाची नव्हती चिंता..
मन झाले शांत करूनी मनसोक्त खरेदी...
बघत होते एक सुंदर काचेची वस्तू, समोरुन आला एक नवतरुण आणि गेला धक्का मारून..
तुटली ती नाजूक काचेची वस्तू, पण त्याच्या वाक्ताडनाने अक्षरशः झाले ह्रदयाचे शक्ल हजारो..
सोडूनी सारी खरेदी आले घरी माघारी...
पाहूनी मला रडताना ओक्साबोक्सी, नवरा आणि मुलगी ही झाले हक्काबक्का...
विचारू लागले, काय झाले राणी तुला...
आवरून माझा हुंदका , सांगितला सगळा किस्सा..
त्या तरूणाचे *काकू अहो दिसत नाही तर, चष्मा लावायचा सोडून लिपस्टिक काय लावताय ?* हे वाक्य ऐकून दोघेही लागले हसू.. आणि माझ्या रक्तबंबाळ ह्रदयावर मीठ लागले चोळू..
कसेबसे हसू थांबवून म्हणाला नवरा, हेच तर राणी सांगत होतो सकाळी..
मान्य कर वाढत असलेले वय... दिसू लागले डोक्यावर चंदेरी केस चुकार आणि नाही दिसत तुला ,डोळ्याचा नंबर वाढलाय फार..
शांत डोक्याने विचार करता , पटले मनाला थोडेसे.. पण उघड म्हंटले पती हाच परमेश्वर असे म्हणते माझी आई म्हणून मान्य करते तुझी ही शिष्टाई...
तेवढ्यात आली लेक घेऊन हातात रसमलाई , म्हणाली वजनाची चिंता न करता खा हवी तेवढी आई..
एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात रडू असा संपला एक दिवस..
तेव्हापासून करते रोज देवाची प्रार्थना, रस्त्यात कोणीही म्हटले तर चालेल ताई पण काकू अगदीच old fashioned वाटते मला बाई???
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ता.क.सदर लेख हा पूर्ण (थोडासा)पणे काल्पनिक आहे.. लेखिकेचा याच्याशी काहिही संबंध नाही???