Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीशी लव्ह स्टोरी -२0

Read Later
एक छोटीशी लव्ह स्टोरी -२0

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

#19 एक छोटी सी लव स्टोरी

 

????????????प्रीती आणि मंदार चे नाते एक नाजूक वळणावर आहे..त्यातच प्रीतीला ऑफिस कडून परदेशी जाणण्याची संधी मिळत आहे…घरी आई बाबा ना मात्र प्रितीच्या लग्नाची काळजी लागली आहे…तर इथे प्रीती मंदारशी  ह्या विषयावर
निश्चित करते..पण तो टाळाटाळ करतो आणि फोन ठेवतो.  …आता पुढे…????????????????????????

प्रीती ऑफिसची तयारी करायला लागते…तेवढ्यात फोन वाजतो…परत मंदारचा कॉल असेल म्हणून धावत फोन घ्यायला जाते तर साहिल चा कॉल असतो…तिच्याच घरावरून जाणार ऑफिसला म्हणून पीकप करू का विचारायला फोन होता…खरे तर प्रीतीला एकांतात जे काही मंदारशी बोलणे झाले त्या बदल विचार करायचा होता …
पण साहिल सर स्वतः विचारतात मग नाही कसे म्हणायचं म्हणून पटकन आवरते आणि बस स्टॉपवर येऊन उभी राहते….

आज प्रीती ने छान लाँग स्किर्त आणि स्लीवलेस टॉप वर स्कार्फ घेतला होता लांब केस छान पिन उप करून मोकळे सोडले होते..लांबूनच साहिल ने तिला बघितले आणि बघतच राहिला..कित्ती सुंदर दिसत होती.गाडी अजूनच हळूहळू चालवत तिच्यापाशी येऊन राहिली….आज तिला नजरेत साठवून घेत होती…

गुड मॉर्निंग सर आणि थँक्यू  तुम्ही मला लिफ्ट देता म्हणून…प्रीतीने आपला स्कार्फ काढत म्हटले…

गुड मॉर्निंग …प्रीती …ऊ लूक ब्युटिफुल टुडे…हम्म्म काही स्पेशल..?? बर्थ डे ???

तुम्हाला कसे कळलं सर?? माझा वाढदिवस आहे ते…!!!

उगीच का तुला लिफ्ट देतोय ..त्याने मनात म्हटले…

आरे नाही असेच गेस केले…..हॅपी बर्थडे टू यू… मग आज काय स्पेशल..???

काही खास नाही सर..रात्री मैत्रिणी बरोबर डिनर चा प्लॅन आहे…बोलताना तिच्या लक्षात आले …अरे मंदार ने आपल्याला विश पण नाही केले…वाढदिवस असून..विसरला  का.???? काहीही !!!! आज आपण त्याला बोलूनच दिले नाही काही आणि तसे पण अमेरिका एक दिवस मागे आहे इंडियापेक्षा…उद्या नक्कीच  विश करेल मला….तिने समजूत घातली स्वतच्या मनाची…

साहिल ने मग इकडतिकडच्या गप्पा मारत ..प्रीतीला तिच्या निर्णय विषयी विचारले…मग काय ठरले तुझे.???
एक दोन दिवसात तुला तुझा निर्णय सांगावा लागेल…वेळ काढून चालणार नाही…घरी बोललीस का??? काय म्हणाले घरचे??तयार आहेत का तुला पाठवायला??

तसे तर तयार आहेत. … पण आई बाबा ना चिंता लागली आहे लग्नाची…बाबा रिटायर होता आहेत पुढच्या वर्षी म्हणून लग्न साठी मागे लागलेत…कसे बसे समजावले आहे .६ महिने मला वेळ दिला आहे माझ्या करिअर साठी …सो आय एम रेडी सर…

गुड …मग लग्नासाठी कोणी बघितला आहेस की ..कांदे पोहे करणार आहेस ??? त्याने तिच्या कडे रोखून बघत विचारले….

ती काही बोलणार एवढ्यात तिचा फोन वाजला…घेऊ की नको असा विचार करत असताना …साहिल ने गाण्याच्या आवाज कमी केला…फोन घरून होता…आईबाबा नी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या… मग आईशी  थोडा वेळ बोलली…आई ने मंदार ने काही फोन केला का विचारले???

नाही आई…त्याच्याकडे आता रात्र असेल…उद्या करेल उद्या आहे त्याची ७ तारीख आणि मी तुझ्याशी नंतर बोलते…सर आहेत बरोबर ….म्हणत तिने फोन ठेवला….

साहिल ने मग परत विषय काढायचा प्रयत्न केला…तेवढ्यात परत तिचा फोन वाजला….स्क्रीन वर एक प्रीती आणि एक मुलाचा फोटो आला आणि नाव होते निनाद …त्याचा फोन बघून तिचा चेहरा खुलला ..हे साहीलच्या नजरेतून सुटले नाही…पण तिने फोन कट केला….

सॉरी…!!!!!!

अरे घ्यायचा ना…सगळे विश करायला फोन करत असतील….. बोलायचेस ना…..!!!

नको सर…हा फोन ठेवणार नाही लवकर…नंतर करेन त्याला ..!!!

हम्म ओके…त्याने तिच्याकडे नजरेच्या कोपऱ्यातून बघत म्हटले …बाईसाहेब कुठे तरी इंगेजेड आहेत नक्की …नाहीतर आई कशाला विचारेल  त्या मुलाचा फोन आला का..?? म्हणजे घरी माहिती आहे ह्या मुला बदल…आणि लगेच त्याचा फोन आला…तर नंतर बोलते म्हणून म्हणाली. म्हणजे नक्कीच हीचे प्रेम आहे कोणावर तरी…म्हणून आईबाबा लग्नासाठी मागे लागलेत …आता मात्र साहिल ची चीड चीड वाढली….उगीच गाडी  फास्ट दामटत ..त्याने ऑफिस जवळ पार्क केली… शीट आपल्या लक्षात यायला पाहिजे होते…कित्ती प्लॅन्स केले होते आज …आणि आजच कळायला पाहिजे होते हे…नशीब आपण काही बोललो नाही..नाहीतर काय समजली असती ही..

विचार करत करत तो आपल्या केबिन मध्ये पोचला… बॅग मधून खास तिच्या साठी आणलेले रिंग बॉक्स , ग्रीटिंग कार्ड आणि गुलाब काढून लॉकर मध्ये लॉक केले….जाऊन दे प्रेम नशिबातच नाही आपल्या!!!…आज पार्टी होती तिच्या वाढदिवसाची  त्याने खास प्लॅन केलेली…आज प्रपोज करणार होता तो आणि सकाळीच सगळा मूड ऑफ झाला…

संध्याकाळी सगळे प्रितीच्या बर्थ डे पार्टी ला जमले….पण साहिल मात्र ऑफिस मधून लवकर निघून गेला…पार्टी त्यांचं ठेवली होती हे फक्त मोजक्या लोकांना  माहिती होते …प्रीतीला तिच्या एका कलिग कडून कळले…सरांनी पार्टी स्पॉन्सर केली म्हणून…असे काय झाले ..सर अचानक का निघून गेले ?? काही अर्जंट काम असेल म्हणून गेले असतील ..असे मनात विचार करत प्रीती थोड्यावेळ पार्टी एन्जॉय केली आणि घरी निघून आली….

घरी येऊन बघते तर काय..!!! एक मोठा गुलाबाचा बुके आणि खूपशी चॉकलेट्स आणि सोबत हॅपी बर्थ डे चे कार्ड…क्षणभर वाटले ..मंदार ने किती छान भेट पाठवली आहे …एकदम हरखायला झाले आणि लाजत लाजत ती कार्ड उघडले….

हॅपी बर्थ डे बेस्ट फ्रेंड …निनाद…!!!!..

आत निनाद चे नाव बघून..जरा हिरमुसली..म्हणजे निनाद चा  लक्षात आहे पण ह्याच्या नाही…थोडे वाईट वाटले..

अगं केव्हाचा आला आहे तो बुके आणि चॉकलेट्स…पण आजच नेमका उशीर झाला तुला..म्हणून मीच घेतला…..निनाद ने पाठवला आहे तुझ्या साठी…लकी गर्ल आहेस यार तू तर…!!! प्रिया नेहमी प्रमाणे चिवचिवली….

थँकयू निन्या…लक्षात ठेवल्याबद्दल….ती ने मनात ल्या मनात  त्याला धन्यवाद दिले….चल तयार होऊ आणि बाहेर जाऊ.. मग निनाद ला व्हिडिओ कॉल करू चालेले…?? प्रीती ने प्रिया ला विचारले…

दोघी तयार होऊन खाली आल्या तर अक्षय वाटच बघत होता…एका छान हॉटेल मध्ये तिघे जेवायला आले होते..अक्षय ने तिच्या साठी केक आणला होता…व्हिडिओ कॉल वर निनाद आणि समोर प्रिया आणि अक्षयच्या सोबतीनी प्रीती ने केक कट केला… छान डिनर करून सगळे रमत गमत घरी आले.????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????.

प्रीती ला मात्र रात्री झोप येत नव्हती…वाटत होते त्याचा फोन नक्की येईल मला विश करायला…म्हणून जागीच होती…रात्रीचे १२ वाजत आले…तर मोबाईल वर टाईमपास करत बसलेली….हळू हळू काटा ..१२ चा पुढे सरकत जातो तरी मंदार चा फोन येत नाही…शेवटी १२३० ला वैतागून झोपायचा प्रयत्न करते…पण झोपच येत नाही…उलट सुलट विचार करत  रडायला येते…असा काय हा??माझा वाढदिवस पण विसरला….खरंच विसरला की मुदाम टाळतोय काही कळत नव्हते…..रात्री बराच उशीर पर्यंत रडत  विचार करत कधीतरी तिचा डोळा लागला..????????????????.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तयार होत होती तेव्हा मंदार चा फोन आला…तिने उत्सुकतेने फोन उचलला…पण त्याने विश केले नाही..इकडचं तिकडचं बोलून झाले …शेवटी  तिने आठवण करून दिली…

मंदार माझा काल वाढदिवस होता…विसरलास ना??? तिने शांतपणे विचारले….दोन सेकंद मंदार शांत झाला.

सॉरी प्रीत …मी खरंच विसरलो.माझ्या डोक्यात न ..माहीत महिंकसे निघून गेले…सॉरी ना…पुन्हा कधीच नाही विसरणार.. आय एम सॉरी डिअर… रिअली सॉरी !!!! आणि तिला वाढदिव साच्या शुभेच्छा दिल्या…वर इंडियाला आलों ना की तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करू ह्याचे वचन…त्या नंतर तो बराच वेळ तिला मनवत राहिला…शेवटी कशीबशी तिची समजूत निघाली….????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

त्यानंतर प्रीतीला एक महिन्याने लंडन ला जायचे आमंत्रण मिळाले. ऑफिस कडून सगळी तयारी आणि फॉर्मलिटी करण्यात २आठवडे गेले .निनाद तिला रोज फोन करून , मेसेज करून काय काय आणायचे ते सांगत होता… ह्या सगळ्या मध्ये रोज साहिल तिला नित्यनेमाने लिफ्ट देत होता तिच्याशी दोस्ती वाढवत होता.  तिला लंडन मध्ये काय काय लागेल , तिथली व्यवस्था सगळी समजावून देत होता…शेवटी तिच्या वर प्रेम होते असे कसे एकटे सोडणार परदेशात….होता होता प्रीतीचा जायचा दिवस आला……

मुंबई एअरपोर्ट वरून प्रीती निघाली..थोडी घाबरलेली होती. एवढे मोठे ते मुंबई एअरपोर्ट त्याचा कारभार, जाणारी येणारी  लोक आणि अनोळखी देशाकडे प्रयाण.सगळीच नवलाई बघत होती… जमेल ना आपल्याला??सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवता येईल ना?? आपले हसू तर नाही ना होणार ??कुठे काही चुकणार तर नाही ना…आत्ता तर साहिल सर पण नाहीत काही चुकले तर विचारायला ….!!!. थोडी भीती आणि भरपूर  उत्सुकता होती….तिच्या मनात…वाटत होते कोणाजवळ तरी बोलावे….लाळवा का मंदार ला फोन …त्याच्या आज फक्त मेसेज आला होता हॅपी एम जर्नी म्हणून बस. बाकी काही नाही…… ????????????????

security चेक करून ती बराच वेळ इकडे तिकडे बघत बसली…मग शेवटी ना राहून तिने मंदारला फोन लावला..बराच वेळ फोन वाजला पण उचलला नाही…काय रे बोल ना माझ्याशी…मला इथे कित्ती एकटे वाटते आहे आणि तू  आहे की …!!! मनाशी विचार करत बसली होती…मग मोबाईल वर  वर टाईमपास करत बसली……मनात मात्र मंदार आणि त्याच्या आजकालच्या वागण्याचे विचार सुरू होते…काहीतरी चुकतंय, हातातून निसटून चाललंय हे सारखे वाटत होते…

आपले काही चुकले तर नाही ना?? थोडी जास्तीच अपेक्षा करतो का आपण आजकाल? आई बाबा हि त्यांच्या जागेवर बरोबर आहेत …सगळ्या मैत्रिणीच्या घरी लग्नाच्या गोष्टी सुरू आहेत त्यात आपले एक घर…बाबा ही रिटायर होत आहेत त्या आधी जबादारीपासून मुक्त व्हायचे आहे आणि मंदार त्याचे काहीतरी दुसरेच अजून थांब पण म्हणत नाही आणि विषय काढला की चिडतो…काय असेल त्याच्या मनात??? नुसते प्रेम करायचे होते पण कमिटमेंट नको होती असे काही तरी तर नसेल ना??? आपल्यात असे कधी लग्न आणि त्याच्या पुढच्या गोष्टी ह्यावर कधी काही बोलणे ही झाले नाही की स्वप्नं रंगवली नाहीत… बराच वेळ विचार करत बसली होती…शेवटी विचार करून करून करून मेंदू क्षिणून गेला होता म्हणून चहा घ्यायला गेली..

गरम गरम चहा हातात घेऊन आपल्याच विचारात ती चालली  होती की तिचा धक्का एका मुलीला लागला…आणि चहा थोडा प्रितीच्या आणि तिच्या वर सांडला….

आय एम सो सोर…..म्हणत त्या दोघी एकमेकांकडे बघतच राहिल्या….

अनु !!!!!!  तू इथे ..!!!! कशी आहेस !!!! कित्ती वर्षांनी भेटते आहेस!!!!

प्रीती !!!खरंच तू आहेस..ओह गोड तू इथे कशी!!!!!

दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली …अगा जरा हळू…मे प्रेग्नंट आहे प्रीती…अनुने हळूच प्रितीच्या कानात म्हटले….

काय!!!! हे सगळे कधी!!!!तू …  ओह मला काही सुचतच नाही आहे…अनु ..कित्ती वर्षांनी भेटते आहेस…चाल ना..बसू या कुठेतरी….

अगा हो थांब ..तुझी ओळख करून देते…मग प्रितीचे लक्ष बाजूला शांतपणे उभ्या असलेल्या मुलाकडे गेली. …

हा माझा नवरा. आशिष आणि ही माझी बालपणी ची मैत्रिणी   प्रीती…

दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले.. मग आशिष च म्हणाला..

looks like ..तुम्ही दोघी बऱ्याच वर्षांनी भेटीत आहात…चला छान कॉफी घ्या त्तुम्ही दोघी मी येतोच जरा त्या दुकानात जाऊन…..

दोघी मग बराच वेळ कॉफे शोप मध्ये जाऊन बसल्या…अनुजाचे लग्न होऊन १वर्ष झाले होते आणि ती प्रेग्नंट होती…आपल्या नवऱ्याबरोबर अमेरिकेला चालली होती   ..प्रीती ने तिचा हात अलगद पकडला आई म्हणाली..अनु..सॉरी ना..माफ कर..कॉलेज मध्ये जे काही झाले मंदार वरून…खरंच सॉरी तुला दुखवायचे नव्हत मला..पण कशी कोण जाणे मीच गुंतले त्याच्यात…मला लाज वाटली नंतर तुला हे सगळे सांगायची लाज वाटली…मी खूप दुखावले तुला…..

सोडून दे गा सगळे..मी केव्हांच माग टाकले त्या गोष्टीला…कधीच विसरून गेले आहे त्याला. अल्लड वय होते ते .प्रेमात पडण्याचे वय ते..नाही म्हणाला तो…मग काय बाजूला झाली.

पण तू होतीस कुठे इतकी वर्ष ??

बारावी नंतर बंगलोरला गेले …बाबांची बदली झाली.मग तिथूनच ग्रॅज्युएशन केले आणि तिथेच आशिषशी ओळख झाली…तो प्रेमात पडला माझ्या आणि लग्नाची मागणी घातली..घरचे थोडे नाराज झाले पण शेवटी तयार झाले…..
लग्न करून अमेरिकेला गेली आशिष बरोबर..त्याला वर्ष झाले आणि थोड्या दिवसातच इथे आले होते…परत चाललो आहोत…. तू इथे कशी???

मी ऑफिस चा कामासाठी चालली आहे..लंडनला……दोघी मग बराच वेळ गप्पा मारत बसल्या…एकमेकींच्या फोन नंबर घेतले आणि काँटॅक्टण्ये राहायचे ठरवले ..तिचा फोन नंबर आपल्या ग्रोईपध्ये टाकू का नंतर म्हणून विचारून घेतले…ओल्ड टाइम्स सेक..

दोघींना कित्ती बोलू आणि कित्ती नाही असे झाले होते..पण शेवटी फ्लाईट ची घोषणा झाली म्हणून निघावे  लागले…कित्ती तरी वेळ अनुजा दिसेनाशी होई पर्यंत तिला बाय करत होती…. मनावरचे मणा मणा चे ओझे उत्तरल्यासारखे वाटले…!!!!!

चला ट्रीप ची सुरुवात तर चांगली झाली …जुनी मैत्रीण भेटली..तिने खरंच माफ केले असेल का??विसरली असेल का मंदार ला?? पहिले प्रेम विसरणे शक्य असते?? आशिष बरोबर खुप खुश दिसत होती हे खरे….कोणाची नजर नको लागायला  …..

काय होईल पुढे??...You can also read my blogs at PKs Diary on Wordpress . Dont forget to like and comment the stories. 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...