Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 32

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 32

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

#31 एक छोटी सी लव स्टोरी

 

भर थंडीत, निनाद ने तिला जवळ ओढले…तसे प्रीती लगेच म्हणाली…नको ना प्लीज..मी तयार नाही अजून. …

तसा निनाद ने पटकन आपला हात काढून घेतला…खूप वाईट वाटले त्याला तरी सयंत आवाजात म्हणाला…सॉरी. पण मी काहीच करत नव्हतो यार…पुन्हा असे नाही असे होणार…!!!

ती बाजुला सरकून बसली. .. रागावला आहेस?? सॉरी ना.

इट्स ओके प्रीती…मला समजले नाही…तू जा आत जाऊन झोप…आणि हो दार लॉक कर.. ..जा.

आपण असे बोलून निनाद ला खूप हार्ट केले आहे ह्याची जाणीव तिला झाली. शीट आपण असे बोलायला नको होते पण वेळ निघून गेली होती…काहीही न बोलता ती रूम मध्ये निघून गेली.दार ढकलून घेतले.

बराच वेळा ने तो उठला ..डोळे मिटायला लागले होते.. जेट लग सुरू झाला होता..त्याने हलकेच दार ढकलून बघतीले…ती गाढ झोपली होती. थंडीमुळे पोटात पाय घेऊन  झोपली होती..त्याने एक ब्लँकेट टाकले तिच्यावर आणि बाहेर पडला…तिला जवळ घेण्याची अनावर इच्छा होऊन ही तो बाहेर पडला आणि सोफ्यावर आंग झोकून दिले.

बराच उशीर खडबडून जाग आली…आधी त्याला आठवेना आपण असे बाहेर का झोपलो…मग आठवले…प्रीती आहे आत..दार उघडे होते म्हणून बघितले तर रूम रिकामी…कुठे गेली ही…!!! सामान तर इथेच आहे.. बाहेर तापमान ५डिग्री पेक्षा ही कमी झालेले….कुठे गेली ही !!!…रागावली की काय!!!फोन पण इथेच ठेवून गेलीं आहे…..विचार करत करत येरझारा घालायला लागला….. शोधू तर शोधू कुठे हिला आता…..क्षणाक्षणाला त्याला आता  टेन्शन यायला लागले…

थोड्यावेळाने तिने चावीने दार उघडले…चांगलीच गारठलेली होती..नाक गाल लाल लाल झाले होते..केशांमध्ये बारीक बारीक हीमकण होते…

कुठे गेली होतीस?? सांगून जायची पद्धत आहे की नाही तुला?? फोन नेता येत नाही तुला??कुठे शोधायचे तुला?? इतकं कधी पासून रागवायला लागली तू?? ….तो रागाने तिला बोलत होता आणि ती शांतपणे मान खाली घालून ऐकत होती. …शेवटी त्याच्या लक्षात आले…ती काहीच बोलत नाही आहे आणि डोळ्यात अश्रू दाटले आहेत जे ती मुष्कलीनी थांबवते आहे…तो मग गप्प बसला….

झाले की अजून काही बोलायचे आहे…!!!तिने शांतपणे विचारले… सवयीने माहीत होते की खूप चिडला आहे…आणि अश्यावेळी बोलण्यात काही अर्थ नसतो…

कुठे गेली होतीस..त्याने शांत होत विचारले…

दूध आणायला…सोबत काही खायला घेऊन आली आहे..आणि डोक शांत झाले असेल तर एक कांदा कापून दे…भूक लागली आहे ..पुलाव करते आहे…खाणार आहेस का??

शीट….आता मात्र तो चांगलाच खजील झाला..काहीही चूक नसताना इतके बोललो आपण हिला…आणि ही ने काहीच react नाही केले…उलट शांत पणे सगळे सांभाळले…

सॉरी ना प्रिन्सेस …रिअली सॉरी..मला काळजी वाटली म्हणून ..सॉरी १००० टाइम्स सॉरी …असे म्हणत कान पकडून  उठाबशा काढायला सुरुवात केली..

नौटंकी बंद कर…काही सॉरी बिरी नाही आहेस.. मुदाम केले ना हे सगळे तू….

नाही तसे काही नाही आहे …यार माझीच चूक झाली ना…सांगतोय ना तुला …माझीच चूक आहे …असे म्हणत परत उठवशा काढायला सुरुवात केली…

ठीक चल माफ केले…पुन्हा असे करायचे नाही.. ऐकून घेणार नाही मी आता…. आणि तसे पण मी तुला दुखावले.. तू मला…. राईट !!!  तो हिसाब बरा बर…चहा घे…चिल्ल अाेल इज वेल…

चहा चा पेल्यातले वादळ…आज तिने शांतपणे शामावले होते…थँक्यू पुन्हा असे नाही होणार…माहीत नाही मी का चिडलो एवढं ते…

साधी सरळ गोष्ट आहे …

तू समजुन का घेत नाही …

कसं , तुला काही समजत नाही..

मला तुझ्या शिवाय राहवत नाही….

हक्क गाजवतो आहेस नीन्या….सांभाळ स्वतःला…

आयुष्भर साथ देणारी…
माझी सावली आहेस तू

माझ्या डोळ्यात राहणार स्वप्नं….
होणार आहेस तू

देवाकडे हात जोडून मागितलेले
मागणे आहेस तू…

जर तुझ्यासोबत आयुष्य ..
जगायचे ठरवले आहे ….

तर किती ही अडचणी आल्या तरी…
तुझी साथ सोडणार नाही…

पण त्यासाठी हवी तुझी साथ, प्रेम आणि विश्वास

????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️

दोघा जेवून परत झोपायला गेले…तिला काही केल्या झोप येत नव्हती..म्हणून मोबाईल घेऊन बसली…बराच जणाचे मेसेजेस आले होते…त्यांना रिप्लाय देत होती. …एका अनोन नंबर वरून मेसेज होता….

काँग्रतुलेशन्स .. स्टे हॅपी अल्वेज…

कोणाचा नंबर आहे हा …लक्षात  येईना….तिने आठवायचा प्रयत्न केला…शेवटी फेसबुक उघडले…फारसे चेक नाही करायची पण येवढे नोटीफिकेशन बघून ती ने चेक केले…त्यांच्याच ग्रुप मधल्या कोणी तरी अक्षय प्रियाचे लग्न चे फोटो पोस्ट केले होते…सोबत निनाद प्रीतीचा फोटो…आणि कमेंट नेक्स्ट कपल इं लाईन…त्याला बरेच से लाईक होते….सांगितले पाहिजे सगळ्यांना प्लीज असे फोटो टाकू नका म्हणून..काय लोक आहेत एक एके…
तेवढ्यात निनाद चा मेसेज आला….

झोप आता…मोबाईल बाजूला ठेव. ..

खडूस  आहे हा…!!!!!!…असे म्हणत तिने मोबाईल बाजूला टाकला आणि डोळे बंद केले…

????????????????????????????????????????????????????????????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...