एक छोटीसी लव्ह स्टोरी- 10

A Story of Love, Friendship and Love in Friendship...

ती धावतच खाली आली.. निनाद बाईक वर बसून तिची वाट बघत होता..तिला असे प्रफुल्लित चेहराने धावताना बघून त्याला आश्चर्य वाटले....नक्कीच काही तरी महत्वाचे आहे नाही तरी ही अशी पळणार नाही ....

निन्या..एक गुपित सांगायचे आहे...चल बाहेर जाऊ या...

दोघे बिल्डिंग चा नाक्यावर आले. प्रीती ने मग निनाद ला काल मंदार ने प्रपोज केल्याचे सांगितले...मग सगळे साग्रसंगीत काय काय घडले ते सांगितले...तिचे ते सांगताना लुकलुकणारे डोळे, मध्येच हसणे आणि लाजणे..खूपच लोभस दिसत होते ...निनाद मात्र तिच्या कडे टक लावून बघत होता....थोड्यावेळाने प्रितीच्या लक्षात आले, ह्याचे लक्षच नाही आपल्याकडे. 

काय रे निन्या..मी इतक्या महत्वाचे काही तरी सांगतेय आणि तुझा लक्षच नाही आहे..माझ्याकडे...

नाही ग....लक्ष आहे तुझ्याकडे. बास्स आश्चर्य वाटते... एवढ्या लवकर मंदार ने विचारले.मला वाटले होते की निदान गेड्युएशन नंतर विचारले तो...पण मी खुश आहे तुझ्या साठी...नाही तरी तुला ही आवडतो तो नाही का..

हम्म आवडतो..माहिती नाही कसे काय मनातले कळेल तुला ते. पण आय आम सो हॅपी निनाद...जणू जग जिंकल्याचा दिली ग येतंय मला ...बाप रे मला तर अजू काही वाटत नाही आहे ...नक्की मी जे सांगितले ते खरे ना...

नंतर बराच वेळ ते निनादशी आपल्या मनातले सांगत राहिली...बराच वेळाने मग ती तरंगत च घरी आली...आता तिला खूप मोकळे वाटत होते...असाच मंदार चा विचार करत बसली तेव्हा कुठे तिला अनुजा चा विचार मनात डोकावला...

अरे बाप रे...आपल्या लक्षात कसे आले नाही...अनुजा ला काय वाटेल ते..जाम वाईट वाटेल तिला. अनुजा ला कळेले तर ..काय म्हणेल ती, सगळे आपल्याशी बोलणे बंद करतील शेवटी ती जे म्हणत होती आपल्याबद्दल तसेच तर वागलो आपण...काय करावे!! अनुजा ला सगळे सांगावे का...माफी मागावी का ? समजून घेईल का ती मला आणि मंदार ला ?? प्रश्न प्रश्न आणी अजून प्रश्न येत होते तिच्या मनात .. काय करावे काही कळत नव्हते...

मोबाईल वर मंदार चे दोन मेसेज येऊन पडले होते...बराच वेळ झाला होता .मग ती ही मेसेज वर गप्पा मारू लागली..तूर्तास तरी अनुजा मागे पडली तिच्या मनातून...प्रीती मंदार मय होऊ बसली...
बराच वेळ दोघे मोबाईल वर चाट करत बसले..
आत्ता हे रोजचे झाले होते...सकाळ संध्याकाळ मंदार आणि प्रीती एकमेकांना मेसेज करत बसायचे..लपून छपून प्रेम बहरत होते..

मग बारावी चा रिझल्ट लागला...त्या दिवशी सगळ्यांना सांगायचं ठरले. अनुजा ची भीती होतीच पण तशी पण ती आजकाल सगळ्यां पासून लांबच असायची. आता तर सगळ्यांचे मार्ग ही वेगळे होणार होते...कोण कुठे परत भेटणार ते माहीत नव्हते ...त्यामुळे प्रीती थोडी निर्धास्त होती. अर्थात हे सगळे तिला मंदार ने पटवले होते. तसे पण अनुजा आता फार संबंध ठेवणार नाहीच सगळ्यांशी खास करून प्रितिशी हे तर काळ्या दगडावरची रेघ होती. ...मग कशाला टेन्शन घ्या..कोणाला काही वाटू देत..

धाकधूक करत सगळ्यांनी आपला निकाल हाती घेतला. अक्षय, ज्योती, प्रिया, प्रीती, मंदार , निनाद सगळ्यांना ८५% मिळाले, तर बाकीच्यांना ७०८०% मिळाले. सगळेच खुश होते आप आपल्या कामगिरी वर. सगळ्यांनी एकमेकांना भरपूर शुभेच्छा दिल्या. मग छोटी पार्टी करायची ठरली...सगळे जवळच्या हॉटेल मध्ये गेले...मंदार ने हळूच प्रीती ला आपल्या जवळ बसण्याचा इशारा केला...ती मात्र छान पणे लाजली... आणि मोका बघून त्याच्या जवळ जाऊन बसली...

सगळ्यांनी मग आधी समोसा, भज्जी आणि डोसा मागवला.. मनसोक्त हादाडले..आणि मग गप्पा रंगल्या...सगळे आपले पुढचे प्लॅन्स सांगत होते. मग मंदार ने सगळ्यांचे चमचा वाजवून लक्ष वेधले. सगळे एकमेका कडे बघायला लागले...

मला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे..खरे तर कसे सांगावे कळत नाही पण तुम्ही सगळे माझे आणि तिचे जवळचे मित्र आहात...म्हणून तुम्हाला सगळ्यांना पर्सनल गोष्ट सांगत आहोत...असे.म्हणत त्याने प्रीती चा हात हातात घेतला...आणि.म्हणाला मी परीक्षांच्या शेवटच्या दिवशी प्रीती ला प्रपोज केले आहे आणि ती ने ही हो म्हटले आहे....

दोन क्षण सगळे स्तब्ध झाले आणि मग सगळ्यांनी गलका केला....चुपे रुस्तम कुठेले......

प्रीती आणि मंदार ने सगळ्यांना आईस क्रीम पार्टी दिली...थोड्या वेळाने सगळे आपल्या घरी निघाले. जाताना प्रीतीने मंदारला मिठाई चा पुढं घेऊन दिला. ..घरी घेऊन जा...चांगले मार्क मिळालेत तुला ..

हो पण तुझ्या पेक्षा कमीच ना....

चालत रे...परीक्षा आहे...वरती खालती होणारच...येवढे नको मनावर घेऊ.तिने समजूत घातली....त्याचींही कधी नव्हे ते समजूत पटली....

उद्या भेटशील...प्लीज ...आज काही बोलताच आलं नाही....

अरेरे पण ना क्लास चालू आहे ना काही मग काय सांगू घरी ..

सांग ना निनाद सगळे पिक्चर जायचा प्लान आहे जिनाड ला तुला घरून पीक करायला सांग मग काहीच प्रॉब्लेम नाही ...

हम्म सांगते रात्री पण नक्की नाही ...

त्या रात्री सगळं गप्पा मारत बसले त्यामूळ मग प्रीतीला मंदारशी बोलता येत नाही. . त्याने एक दोनदा मेसेज केला पण रिप्लाय नाही म्हणून रागावून झोपला. प्रीती च्य बाबाना वाटत होते कि तिने कॉम्पुटर इंजिनेर वाहावे. . आजकल आयटी मध्य खूप स्कोप आहे पुढे नोकरी करायला पण स्कॉप होता त्यात प्रीतीला पण कॉम्पुटर मध्ये इंटरेस्ट होता. बहुतेक जण इंजिनीरिंग ला जाणार होते. मंदार च्या काय होत मनात पूड का करायचे ते अजून तिला माहित नव्हते. 



 

🎭 Series Post

View all