एक छोटीसी लव्ह स्टोरी-3

A Story of Friendship, Love and Love in friendship..

हाय..आज इथे?? कसला अभ्यास करतेय प्रीती तू??
मंदार ने अनुजा ला इग्नोर करत विचारले...

काही नाही सहज... जीवशास्त्र पुस्तक मिळाले ते बघते आहे...तू इथे काय करतोयस..?? प्रीती ने विचारले...

काही नाही असाच आलो..मी निनाद ला शोधत होतो..दिसला नाही कुठे..म्हणून इथे बघायला आलो...

निनाद आणि लायब्ररी मध्ये....ह्या जन्मात तरी शक्य नाही ते....अनुजा हेटाळणी करत म्हणाली....

दोघांनी एकदम अनुजा कडे चमकुन बघी तले तशी ती वरमली.... मंदार ला तिचा भोचक पणा आणि असे हेटाळणी करणे आवडले नव्हते..ते त्याच्या चेहऱ्यावर  स्पष्ट दिसले.पण तो काही बोलला नाही...

अनुजा चे ते लक्षात आले..पण आत्ता करणार काय...थोड्यावेळ इकडे तिकडे गप्पा मारून ती तिथून निघून गेली. तिला जाताना बघून मंदार ने हायसे वाटले....

का असे वागतोस तिच्याशी तू?? प्रीती ने आज विचारायचे ठरवले...

मला नाही आवडत ...माहिती नाही..ती समोर आली ना ...खूप चिडचिड होते माझी...बरे झाली गेले ती..उगीच भांडण झाले असते...

असे नको ना वागत जाऊस...मस्करी करत होती ती...
आणि थोडा नीट बोल ना त्याच्याशी..तुला  माहिती आहे ..तिला तू खूप आवडतोस ते...की तुला काही कल्पनाच नाही...प्रीती ने विचारले

माहिती नाही पण मला जाणवले..उगीच गळ्यात पडायला बघते माझ्या..म्हणूनच नाही आवडत....उगीच काय !!!!

तुला माहिती आहे म्हणजे....आम्हाला वाटले की तुला काहीच माहिती नाही...अरे देवा...हे अजूनच सोप्प आहे मग.

काय विचार आहे मग...कर ना प्रपोज तिला....मस्त आहे अनु...तुमची जोडी पण छान दिसेल...नाही का मंदार...

वेडी झाली का तू  प्रीती..मी तुला सेंसिबल समजत होतो आणि तू हे काय बोलतेय...मला नाही आवडत ती...बस संपला विषय....पुन्हा कधी काढू नकोस माझ्यासमोर ....मला नाही पडायचे ह्यात.आणि अनुजा बदल बोलशील तर ती माझ्या टाइपची नाही आहे..त्यामुळे नकोच...उगीच तू  आणि निनाद मला भरीस पडू नका...आणि काही विचारू नका. मंदार वैतागून म्हणाला...काय त्रास आहे...उगीच काय ह्या मुली गळयात पडतात आपल्या. एक प्रीती जरा बरी वाटली मैत्री करायला तर ती अनुजा सुचवते...सगळे वेडे झालेत एकसाथ. चिडून त्याने आपली मुठ जोरात टेबल वर आपटली. खूप जोरात आवाज झाला आणि सगळे त्यांच्या कडे बघायला लागले.....

मंदार प्लीज शांत हो ना..सॉरी.आपण बाहेर जाऊ या ..येतोस..प्लीज..चाल ना..प्रीती ने त्याला समजावत म्हटले....

हम्म चाल पण अनुजा चा विषय काढायचा नाही...ठीक असेल तर येतो...

बरे बाबा नाही काढत..चाल इथून नाहीतर आयकार्ड घेतील आपली...

ती दोघे लायब्ररी बाहेर आले ..प्रीतीने त्याला च हा साठी विचारले मंदार ही तयार झाला पण कॅन्टीन मध्ये नाही तर कॉलेज चा बाहेर टपरीवर चहा छान मिळतो म्हणून तिला बाहेर घेऊन आला...त्या दोघांना कॉलेज चा बाहेर जाताना अनुजा ने बघितले....आणि प्रचंड रागावली आणि दुखावली....तिला मंदार पेक्षा राग प्रीतीचा आला...हिला माहिती आहे आपल्याला तो आवडतो तरी त्याच्या बरोबर गप्पा मारत, फिरते , आत्ता काय कॉलेज चा बाहेर दोस्ती चालू आहे....प्रचंड राग आला तिला...आणि समोर निनाद दिसला...

अनुजा ला असे पाहूनच निनाद ला कळाले ..काही तरी बिनसलंय...त्याने तिला आधी कॅन्टीन मध्ये नेले आंड मग बोलायला सर्वात केली...अनुजा ने सगळे झाले ते सांगितले.वर आपण प्रीती वर पण चिडलो असल्याचे सांगितले..ती मुदाम असे करते असे अनुजा ला वाटत होते. ह्या वर निनाद ने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. पण आज अनुजा काही समजायच्या मूड मध्ये नव्हती...

🎭 Series Post

View all