एक छोटीसी लव्ह स्टोरी- 7

A Story of Friendship, Love and Love in Friendship.

मंदार पाण्यातून बाहेर येतो आणि प्रीती जवळ जाऊन बसतो...निनाद मात्र दोघा कडे लांबून लक्ष ठेवून असतो. ...बघू तरी येते का त्याच्या बोलवण्यावर ...

चल ना..अशी काय बसली आहेस ऐकटी..??बोर नाही होत आहे.?

नाही..असाच बसली आहे...बोर नाही होत आहे...तुमचे फोटो काढते आहे ना...

हम्म चाल ना..भिजू या..काही नाही होत..लहान थोडी आहेस आजारी पडायला...चाल मोठी झालीस आता..हवे तर रेनकोट घाला आणि चल ..पण चल

त्याने खूप आग्रह केला...पण प्रीतीने ऐकले नाही.. त्याने शेवटचे अस्त्रा काढले...तू नाही ना आलीस तर मी पण नाही जाणार...तुला वाटत असेल मी बोर होऊ नये तर चल...

शेवटी नाही करता करता प्रीती तयार झाली...रेनकोट घालून...तिचा हात पकडुन तिला धबधब्याखाली घेऊन आला...तिला आलेले बघून सगळेच खुश झाले..थोड्या वेळ पाण्यात मस्ती करून ती परत बाहेर निघाली...आणि दगडावर बसली....कित्ती मस्त वाटत होते असे भिजणे....त्या पेक्षा मंदार चे आग्रह करून तिला पाण्यात  नेणे...

थोड्या वेळाने तिने परत परत सगळ्यांचे फोटो काढले. त्यातल्याच मंदार चे फोटो जास्ती काढले..पाण्यात  भिजलेला मंदार अजूनच गोरा दिसत होता. त्याचे कपडे अनगला चिकटलेले..व्यायाम करून कमावलेले शरीर दिसत होते....कसला हीरो दिसतोय....प्रितीच्या मनात आले...उगीच नाही सगळ्या मुली मागे लागतात ह्याच्या...नंतर आपल्याच विचारांनी लाजली...चला त्या मुली मध्ये आपली एक भर...अजून काय...

बरेच वेळाने सगळे एक एक करून बाहेर पडले..जाम भूक लागली होती...मग एका ढाब्यावर मस्त जेवणाचा ताव मारला....आणि काट्यावर टाईमपास करत बसले...उगीच भंकस चालू होती.... संध्याकाळ होत होती...मग सगळे निघाले..

प्रीती परत मंदरच्या बाईक वर बसली..विश्वासाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला..तो मात्र हसला. बरं आहे प्रगती आहे...मनात म्हणाला.
हायवे पर्यंत दोघांच्या बराच्य गप्पा झाल्या. त्याची आवडी  निवडी खूप वेगळ्या होत्या...तो असा आऊट गोइंग टाईप . खेळात रुची असणारा, अभ्यासात पुढे, करिअर करणारा, आयुष्यात खूप मोठे व्हायचे होते त्याला...अगदी करिअर बदल जागरूक असणार हा मंदार तिला मनापासून आवडला...आपल्या मनावर जणू त्याचे गारूड पडले होते....

हायवे जवळ येताच..सगळे थांबले. आता दोघांचे रस्ते वेगळे होणार होते. दोघांची मनाची घालमेल होत होती..पण जावे तर लागणार...प्रीती मग निनाद चा बाईक वर जाऊन बसली...नीट ने रे...त्याने निनादला बजावले. त्यावर तो मात्र कसूनसा हसला ....

निनाद बाईक वरून प्रीतीला घरी सोडणार होता. थोडे पुढया गेल्यावर निनाद ने विचारले

काय मग प्रीती...आज अचानक पाण्यात वगैरे...आम्ही बोलवतो तर येत नाहीस ...!!!

हम्म्म खूप मज्जा आली रे...किती तरी वर्षांनी..मज्जा आली खूप...खूप मस्त वाटते..

एक विचारू...नक्की तुझ्या मनात काही नाही ना..म्हणजे मंदार तसा चांगला मुलगा वाटतो पण खूप लवकर होतेय ना...

निन्या गप्प रे...तसे काही नाही आहे...सकाळी बघितले ना काय झाले ते...म्हणून असे वागत होता इतकाच.. उगीच अपराधी वाटत होते त्याला... बास बाकी काही नाही...काही असेल ना ..तर सगळ्यात पहिले तुला सांगेन ..नक्की...

हम्म...येवढे लक्षात ठेव म्हणजे झाले... प्रीटी...

किती दिवसांनी तू मला प्रीटी म्हटले ना.. आठवत ..लहानपणी खूप चिडवाय चा मला. ...किती वेळा तुला लहानपणी शिकवले असेल ना.. ट नाही त आहे ते.... तिने हसत म्हटले...


हो आणि किती रडायची ना तू..चिडविले की....त्याने हसत म्हटले. निनाद चा लक्षात आले....प्रीतीने विषय बदलला ते. ...

प्रीतीला घरला खाली सोडले....तेवढ्यात प्रीती शिंकली..
अरे बाप रे...झाले काम आत्ता...तिच्या मनात आले...

प्रीती माझ्या घरी चल..तुला एक मस्त ब्रांडी देतो...सगळे आजार बिजार बघ कसे पळून जातात ते...येतेस का...चल !!  त्याने हसत विचारले...

थांब काकूंना विचारते...आणि येते चालेल...आईला पण सांगते..

वेडी झाली काय तू...की डोक्यावर पडलीस आज...जातो मी...जा घरी...त्याने हसत म्हटले.

ती निघाली तसा तिचा हात पकडुन म्हणाला ..काळजी घे 
प्रीटी...

तू पण हा... निन्या...ती ने हसत प्रतिउत्तर दिले आणि पळाली...

तो मात्र तिच्या कडे बघत उभा राहिला...एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला..वेडी आहेस प्रीती तू..

सोमवारी सगळे कॉलेज मध्ये परत भेटले..सगळा ग्रुप पिकनिकमय झाला होता...नुसत्या गप्पा त्या पिकनिक चा...बाकी काही विषयच नव्हता...मंदार मात्र कॉलेज ला आला नव्हता...

बरेच दिवस मग मंदार आणि प्रितीची भेट नव्हती..तोही एनसीसी मध्ये, कधी फुटबॉल सामने मध्ये बिझी होता...अधून मधून हाय बाय होत होते तेवढेच. 

दिवस असेच भराभर पुढे जात होते. आता लवकरच रिझल्ट लागणार होता..सगळेच ट्टेन्शन मध्ये होते आणि सगळ्यांना आश्चर्य वाटले जेव्हां प्रीती कॉलेज मध्ये दुसरी आली होती ...तिला स्वतः वर विश्वास बसत नव्हता...मंदार आणि बाकीच्यांना चांगले मार्क मिळाले होते...मंदार मात्र खूपच चिडला होता...त्याने प्रीती ला साधे विश पण केले नाही... तिला कळेना आपले काय चुकले. संध्याकाळी मंदार चा मेसेज नाही की कॉल नाही मग प्रीतीने ही नाद सोडला..बरेच  दिवस अबोला चालला...शेवटी मंदार ने तिला मेसेज केला..कॅन्टीन मध्ये भेटशील????
खरेतर प्रीती ला त्याचे वागणे कळतच नव्हते काहीही चूक नसताना तो चिडतो अबोला धरतो गृहीत धरतो .त्याचे चुकते आहे पण तरीही बघू काय बोलायचे आहे म्हणून तयार होते. 
उद्या संध्याकाळी..कॉलेज नंतर..भेटायचे ठरते...


संध्याकाळी कॅन्टीन मध्ये तो तिची वाट बघत असतो. ती आल्यावर मात्र गोड स्माई ल देतो..जणू काही झालेच नाही...इकडे तिकडे चे बोलून शेवटी तो सॉरी म्हणतो.मी उगीच चिडलो..सहन नाही करू शकलो ते तू माझ्या पेक्षा जास्त मार्क मिळवले ते ...खरे तर चूक तुझी नाही पण तरी पण तुझ्यावर चिडलो... माझे लक्ष विचलित झाले.. अभ्यासातून मग तुझ्यावर चिडलो..सॉरी...

प्रीतीने मात्र त्याला मोठ्या मनाने माफ केलं. त्याला त्याची चूक कळेली होती मग ठीक आहे..पुढे काय वेळी चांगला अभ्यास कर..कंपेटिशन माझ्याशी आहे लक्षात राहून दे...असे म्हणाली...नक्कीच प्रीती..बघच तू...तुला नाही मागे टाकले ना तर बघ...त्याने हे हसत चॅलेंज दिले....

प्रीती मग सुट के चा  निःश्वास सोडला..असा काय हा..चिडका रडका नुसता, ह्याला जर माझ्या बदल काही वाटत असेल तर त्याने खुश व्हायला पाहिजे का चीडायला पाहिजे...फक्त स्वतःचा विचार करतो हा...

प्रीती ने सगळ्यांना गणपती ला घरी बोलावले. नेहमी प्रमाणे सगळे प्रीती कडे ३दिवशी जेवायला जाणार होते. मंदार ला खास आमंत्रण  होते..तिने मंदार ला १० वेळा बजावले घरी ये म्हणून...प्रीतीला फार वाटत होते त्याने आपल्या घरी यावे...आपण कुठे राहतो, आई बाबा ना भेटावे..पण मंदार  गणपती ला आलाच नाही...ना काही कारण दिले ना सॉरी म्हणाला..मग प्रीती पण दुखावली...इतका काय अखडू..नेहमी स्वतःचा विचार बाकी काही नाही....स्वार्थी  कुठला..माझ्या मनाचा काहीसुद्धा विचार करत नाही. मला किती वाईट वाटले त्याचे काही नाही...

कॉलेज परत सुरू झाले..प्रीती तर मंदार वर चिडलीच होती आला नाही म्हणून...पण मंदार ने आपल्या क्युट स्माई ल  ने तिचा राग लगेच पळवला....प्रीती ने त्याला मग नेहमी प्रमाणे माफ केले...परत दोघे आपले एकत्र...

होता होता प्रीती चा वाढदिवस आला. सगळ्यांना वाटले आता मंदार प्रपोज करेल प्रीतीला ...पण तसे काहीच झाले नाही..त्याने एक छान से टेडी दिले तिला गिफ्ट म्हणून...निनाद ने मग त्याला विचारले..काय रे फक्त खेळ करायचा आहे प्रितीबरोबर की खरंच सीरियस आहेस तिच्या बाबतीत...

त्यावर त्याने निनाद ला आश्र्वस्त केले ..करणार प्रपोज तिला पण इतक्यात नाही..एक तर अजून बारावी येणार आहे अभ्यास करावा लागणार आहे ..मग कुठला तरी प्रोफेशन मिळतोय ते बघूनच..उगीच प्रेमात पडून आयुष्यात वाट नाही लागू द्याची आहे...हे इकुन निनाद मात्र चाटच पडला...हा असा काही विचार करतोय ....प्रीती ला कल्पना आहे का त्याची??उगीच हर्ट नाही झाली म्हणजे मिळाली. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाला होती..त्याचे दोष जणू काही दिसतच नव्हते तिला.....

🎭 Series Post

View all