एक छोटीसी लव्ह स्टोरी- 5

A Story about love Friendship and love in friendsship,..

त्या दिवसानंतर मंदार खूप बदलला. गप्प गप्प राहायचं. उगीच जास्ती कोणाच्या अध्यात मध्यात पडायचा नाही. ग्रुप मध्ये पण मोjक्या लोकांशी बोलायचा. त्यात प्रीती शी जास्ती  बोलायचं प्रयत्न करायचा. पण अनुजा मुले प्रीती पण मंदार ला टाळत असायची. भेटली की थोडे फार बोलून निघून जायची.  मंदार मग अजूनच उदास व्हायचा. काय होतंय आणि काय घडतय काही कळत नव्हते...अभ्यासातून लक्ष उडाले होते. अनुजा मात्र ग्रुपणपासून तुटत चालली होती. तिचा खास करून राग प्रीती वर होता. तिच्या मुळेच मंदार ने आपल्याला भाव दिला नाही असे सारखे वाटत होते तिला...सगळ्यांनी तिला खूप समजावलं पण ती कोणाचे ऐकत नव्हती. प्रितिशी तर बोलणे सोडून दिले होते आता ग्रुप मध्ये पण क्वचित यायची. प्रीतीने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला पण तिने आपला हेका सोडला नाही. एका पॉइंट नंतर प्रीती ने पण समजावणे सोडून दिले...
आता पहिली युनिट टेस्ट सुरू होणार होती. सगळेच अभ्यासाला लागले होते. प्रीती तर लायब्ररी मध्ये तळ ठोकून बसली होती.मग मंदार पण लायब्ररी मध्ये जाऊन बसायला लागला. पण लक्ष सगळे प्रीती कडे..

तिला ही जाणवायचे, मंदार आपल्या कडे बघतो ते..कशी कधी नजर भेट व्हायची...प्रीती लाजून खाली बघायची.मग मंदार ही गालात ल्या गालात हसायच..प्रेमाचा अंकुर हळू हळू रुजत होता..एक दिवस प्रिया ने लायब्ररी मध्ये प्रीती आणि मंदार चा नजरे चा खेळ  बघितला. तिला मोठे आश्चर्य वाटले...हे कधी घडले...आणि कोणाच्या लक्षात कसे आले नाही...
तिने प्रीती ला गाठले आणि विचारले पण प्रीतीने आपल्या भावना सांगितल्या. मला तो फक्त मित्र म्हणून आवडतो. बस बाकी काहीं नाही.

पण प्रिया हसली आणि तिने आपला अनुभव सांगितला..ही तर सुरवात आहे. आज ना उद्या तो तुला नक्की प्रपोज करणार प्रीती.मग तुझे उत्तर काय असेल ते विचार कर. तुला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. एकीकडे अनुजा आहे ..तिने आधीच तुझ्या आणि मंदार बदल वाट्टेल ते सांगून ठेवलंय तू हो म्हणालीस तर अनुजा जे काही बोलली ते खरे होते. जर नाही म्हणालीस तर दोस्ती राहील की नाही माहिती नाही पण  प्रेम गमावून बसशील. नीट विचार कर प्रीती....मंदार चांगला मुलगा आहे.मला वाटते ती  त्याचा नक्की विचार करावा.....मी आणि अक्षय आम्हाला दोघांना हि तू आणि मंदर्ची जोडी आवडते...मंदार ला खरंच अनुजा सूट नाही होत...आणि ह्या मामल्यामध्ये जोर जबरदस्ती पण तर नाही ना चालत....

प्रीती मात्र हे बोलणे ऐकून अजूनच कन्फ्युज झाली ..काय चाललंय हे...आज प्रिया ला कळेल उद्या अजून कोणाला तरी कळेल. अनुजा चे काय?? ती काय म्हणेल आपल्याला. घरी काय म्हणतील? मित्रमंडळी काय म्हणतील..सगळ्यांच्या नजरेत पडू आपण. मैत्रिणीशी असे वागलो आपण...आणि मंदार आवडतो का आपल्याला. ह्या वयात आकर्षण हे असतेच म्हणून लगेच हो म्हणायचं??? काय करू कोणाला विचारू?काय चूक आहे काय बरोबर?

🎭 Series Post

View all