Dec 05, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 43- The End

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 43- The End

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मंदारचा आवाज ऐकुन प्रितीच्या हातून फोन गळून पडला
आणि कट झाला…तिला प्रीत असे म्हणणारी एकाच व्यक्ती होती जगात..आणि तो होता

मंदार…तिचे पाहिले प्रेम.

इतक्या वर्षांनी ते नाव, ती आजही विसरली नव्हती…त्याचा आवाजने कधी काळी मनाच्या तारा झांकरल्या होत्या .त्याच आवाजाने आज  मन तळापासून ढवळून निघाले…एक अनामिक हुरहुर मनात दाटून आली.

का आला हा परत??का फोन केला ह्याने एवढ्या वर्षाने?? का???काय हवे आहे आता ह्याला?? का सुखाने जगून देत नाही आहे मला???

ह्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते..उगीच प्रचंड राग मनात दाटून आला आणि त्याचे पर्यवसान चिडचिड करण्यात झाले…

ऑफिस मध्ये एक दोंघावर चिडचिड करून झाली…एरवी सगळे काही शांत ,समजूतदार पणे घेणारी प्रीती आज भलतीच चीड चीड करत होती..शेवटी डोके दुखते आहे म्हणून ऑफिस मधून लवकर निघाली…

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

किती मनाला आवरायचं प्रयत्न केला तरी मंदारचा विचार डोक्यात राहून राहून येत होता…..

भारतात आला आहे का?? काय झाले असेल?नंबर तर मुंबईचा वाटत होता…माझा नंबर कुठून मिळवला असेल ह्याने ??? इतक्या वर्षात मी जिवंत का मेली ह्याचा साधा विचार सुद्धा आला नाही ह्याच्या मनात आणि एकदम मला विसरली नाहीस ना ??? असे का? मला लग्न करायचे नाही असे म्हणून सरळ सरळ नकार दिला, आपले ब्रेकअप झालं, कोण तरी चांगला मुलगा बघ आणि लग्न कर असे हाच म्हणाला होता ना.. सगळीकडून मला ब्लॉक केले मला . मग आता कशाला भेटायचे आहे ह्याला…!!!!

तिला घरी लवकर आलेले बघून मुल खूप खुश होतात…त्याच्याशी खेळताना वेळ कसा निघून गेला कळतंच नाही…मंदारचा फोन आणि विचार ह्यांना आपोआपच लगाम  बसतो…

त्यांनतर दोन दिवसांनी ती ऑफिस मध्ये असताना परत निनावी फोन पण वेगळ्या नंबर वरून…परत मंदार चा कॉल…फक्त एकदा माझ्याशी बोल आणि भेट म्हणून तिला विनंती केली…पण तिने स्पष्ट नकार दिला..खरे तर तिला खूप काही सूनवायचे मनात होते पण आजूबाजूला ऑफिस मध्ये खूप लोक होती त्यामुळे फार बोलता आले नाही…
पण त्याने ही आपला हेका सोडला नाही….

मग सत्र सुरू झाले त्याने वेगवेळया नंबर फोन करायचे कधी मला भेट कधी माझ्याशी बोल तर कधी मी तुझ्या ऑफिसला येतो अशी गळ घालायची …प्रीती ने त्याला खूपदा टाळायचा प्रयत्न केला…पण ऐकेल तो मंदार कसला…कसे ही करून त्याला प्रीतीला भेटायचे होते…..

आणि एक दिवस अचानक ऑफिस मध्ये एक गुलाबाचा बुके आणि तिची आवडते चॉकलेट्स बॉक्स आले..आत ना नाव ना गाव..पण तिला कळेले हा असा ऐकणार नाही…त्याला फोन करायचा विचार करत होती की त्याचाच फोन आला…

आधी त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि मग त्याला सरळ ऐकवले…

मिस्टर सावंत, प्लीज हे उद्योग करू नका..नाहीतर मला तुम्ही स्टॉक करता आहात म्हणून पोलिस कंप्लेंट करावी लागेल आणि त्याचे परिणाम वाईट होतील…

प्रीती प्लीज मला फक्त एकदा भेटायचं आहे तुला….फक्त एकदा…अर्धा तास. तेवढा पण नाही देऊ शकत तू मला…??  एवढं का मी परका झालो??

हो मंदार परकाच आहेस तू…मला तुला भेटायची मुळीच इच्छा नाही…प्लीज डोन्ट कॉल मी एवर… वी आर ओव्हर लाँग टाईम अगो….. असे म्हणत तिने फोन ठेवला…

बराच वेळ कॅन्टीन मध्ये जाऊन शांत बसून राहिली..जुने दिवस मनात आले…असाच मी ही फोन करायची त्याला…माझ्याशी बोल, रागावू नकोस ना.. म्हणून भीक मागायची त्याची आणि तो मात्र मस्ती दाखवायचा…. कालचक्र दुसरे काय !!!….

मंदार मात्र रोज तिला फोन करून भेटायची गळ घालत होता, ,इमोशनल ब्लॅकमेल चालू होते…शेवटी एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू या असा विचार  प्रीतीने केला ….निनादला सांगावे का असे तिच्या बरयाचदा मनात आले…पण ओठावर आले शब्द कधी बाहेर पडलेच नाहीत… सारखी अपराधी पणाची भावना मनात येत होती…

एक मित्र म्हणून त्याने नक्कीच सावरले असते पण एवढ्या वर्षांनंतर ही ती भेटायला तयार आहे हे नक्कीच नवरा म्हणून त्याला आवडले नसते..आधी आपल्यात मनाची तयारी करू मंदारला भेटायची…काय बोलायचे आणि इतक्या वर्षांनी परत का आला आहे ह्याची नाही म्हटले तरी उत्सुकता होतीच…..

????????????????????????????????????????????????????????????????

कुठे आणि कधी भेटायचे ते मंदार एक दोन दिवसात तिला कळवणार होता…ते दोन तीन दिवस तिने खूप टेन्शन मध्ये घालवले…आपण करतोय ते कुठेतरी चूक आहे हे तिला ही माहीत होते पण पुढचं पुढं बघता येईल…हा विचार करून ती गप्प बसत होती…ते दोन दिवस तिने खूप टेन्शन मध्ये काढले..जरा कुठे फोनची रिंग वाजली की तिला छातीत
धसस व्हायचे…..

मंदारचा मेसेज आला..शनिवारी दुपारी भेटू या..आणि पत्ता पाठवला…एक तर वीकेंड म्हणजे घरी निनाद असणार..त्याला काय कारण द्यायचे ?कुठे चालली काय सांगावे? काही तरी मनाशी ठरवून तिने मंदारला भेटायला येते म्हणून सांगितले…

????????????????????????????????????????????????????????????????

शनिवार सकाळपासून प्रीतीची घालमेल अजूनच वाढली. कामात मुळीच लक्ष नव्हते…मी मैत्रिणी बरोबर मॉलला जाणार आहे हे सकाळीच निनाद आणि काकीचा कानावर घातले…तसे निनाद ने म्हटले…

आपण मुवीला गेलो असतो ना!! काय तू अशी??

तसे प्रीती ने कसूनसे हसत म्हटले…

एरवी तुलाच कंटाळा येतो ना  माझ्याबरोबर मॉल मध्ये.. ..म्हणून मैत्रिणी बरोबर प्लॅन केला…. प्लीज तू बघ ना आज मुलांकडे, घेऊन जा बागेत त्यांना किवा मॅच बघ…मी येतेच ना २ तासात…तसे निनादने तोंड वाकडे केले…

????????????????????????????????????????????????????????????????

प्रीती तयार होऊन बाहेर निघाली. उर मात्र राजधानी एक्सप्रेस स्पीड ने धडधडत होते. नियोजित कॅफे मध्ये ती पोचली तेव्हा मंदार वाटच बघत होता..त्याला बघताच दोन क्षण ती हरवून गेली..

अगदी तसाच दिसत होता जस्सा कॉलेज मध्ये असताना दिसायचा….उलट आता अजूनच हँडसम दिसतोय, केस थोडे विरळ झालेत पण तरीही मूळच्या सौदर्य काही कमी झाले नव्हते. एखाद्या हीरो चा रोल मध्ये सहज शोभला असता …ह्याच सौंदर्याने ती वेडी झालेली…नाही का..मनात विचार येताच तिने स्वतःला सावरले…नाही हे चूक आहे…स्वतःला समजावले…

तो ही तिला न्याहाळत होता…कित्ती बदलली ही…छान दिसतेय आता. .. एल्लिगंट आणि ब्युटिफुल..तिला बघताच तो उठून उभा राहिला आणि हातात फुलांचा बुके होता…तो पुढे केला…

ह्याची गरज नव्हती मंदार…

इतक्या वर्षांनी भेटते आहेस.. कळतं नव्हत काय आणावे ते..म्हणून आणले…तू बस ना …!!!

मी तुझी आवडती कॉफी मागवतो…असे म्हणत त्याने तिच्या आवडीची कॉफी ऑर्डर द्यायला वेटर ला बोलावले,तो ऑर्डर घेऊन निघणार इतक्यात तिने थांबवले आणि स्वतःच्या कॉफीची ऑर्डर कॅन्सल करायला लावली नंतर म्हणली मला एक आयरिश कॉफी पाहिजे….

वेटर गेल्यावर  मंदार ने  विचारले

अरे वा आयरिश कॉफी वगैरे एकदम… आवड बदलली वाटतं..!!

हो तसे समज हवे तर…तू मागवलेली कॉफी मला कधीच आवडली नव्हती मंदार….फक्त तू मागवायचा म्हणून मी प्यायची …अर्थात ही गोष्ट तुला कधीच कळलीच नाही….

सॉरी !!! इतक्या वर्षांनी भेटते ते काय कॉफीवर चर्चा करायला? कशी आहेस तू काय करते सध्या माझी आठवण येते की नाही तुला की विसरलीस मला लग्न झाल्यावर….

इथे यायच्या आधी माझी माहिती सगळी काढली असशीलच हो ना त्या पेक्षा तूच मुद्द्यावर यांनी सरळ सांग कशाला बोलवलेस मला इथे ते…

तुझी माफी मागायची होती प्रीत….मला माहित आहे मी जे काही वागलो ते  खूप चुकीचे होते .ह्याची जाणीव आहे मला…पण प्लीज मला समजून घे ना…तू मुलगी आहेस आहेस, तुझ्या घरी तुझ्या लग्नाचे बघत होते…तू माझ्या मागे लागलीस बाबांशी बोल म्हणून..काय म्हणून बोलू..माझ्याकडे ना नोकरी ना घर….काय बोलणार होतो तुझ्या बाबांशी..सांग बघू ….

तुला वाटत असेल ना..मी तुला फसवले तसे नाही  प्रीत…एक तर लग्न ह्या संस्थेवर वर जास्ती विश्वास नाही..

त्यात २४ वर्षी लग्न वैगरे म्हणजे जरा जास्तीच होत…..अगा मज्जा मस्ती करायचे दिवस..इतक्यात काय बंधनात अडकायचे असे मला वाटायचे……तू थांबता येणे शक्य नव्हते तो माझा दोष नाही ना ??? म्हणून तुला म्हटले शक्य नसेल तर थांबू नकोस माझ्यासाठी..चांगला मुलगा बघ आणि लग्न कर……माझे चुकले प्रीत…मी असे करायला नको होते…पण तू पण कमाल केलीस …तू तर निनादशीच लग्न केले…साला !! नीच !! तो आधी पासून तुझ्या प्रेमात पडलेला…तुला बरोबर जाळ्यात ओढले त्याने…

एक मिनिट मंदार…माझ्या नवऱ्याविषयी बोलतो आहेस तू…नीट बोलायला जमत नसेल ना तर बोलू नकोस…!!!

प्रीत….. मी तुझ्याकडे वेळ मागितलेला काहीतरी बनायाला.आज मी एक यशस्वी बिजनेसमन आहे प्रीत
..हवे तर नेट वर चेक कर… वेगवेगळ्या देशात सॉफ्टवेअर  पुरवतो..मोठा पसारा आहे…असे म्हणत त्याने आयपड
पुढे केला…थोडेफार  बघितल्या सारखे करून प्रीती ने तो परत केला…

प्रीत आयुष्यात जे काही हवे होते ..ते सगळे मिळाले प्रीत..पण तुला सोडून….प्रीत माझ्याबरोबर चल ना…हे सगळे सोड..काय मिळते आहे तुला ….नोकरी करून..माझ्याबरोबर जग फिरता येईल तुला…राणी बनून राहशील तू…सोड त्या निनाद ला…. चल ना माझ्याबरोबर ….मी  न्यायला आलो आहे तुला….

डोके फिरले आहे तुझे मंदार..राणी बनून काय करू??.सोन्याच्या महलात कैद होऊ..जस्सा तू साराला कैद केले….तिच्या वर ही प्रेम केलेस ना…मग का सोडून गेली तुला…?? खरे सांगशील आता तरी…

तुला सारा बदल कसे माहीत..प्रीत !!!! आत्ता आश्चर्यचकित व्हायची वेळ मंदार ची होती….

तू समजतो ना…तितकी मूर्ख नाही आहे मी मंदार…

तू त्रास द्यायला सुरुवात केली ना… तेव्हाच तुझी माहिती काढायला सुरुवात केली …खूप सोप्पे होते ते माझ्यासाठी…..खूप छान वागलास रे…अपेक्षा नव्हती अशी तुझ्याकडून….इकडे सकाळी माझ्याशी गुजगोष्टी चालायच्या तुझ्या आणि तिकडे तू आणि सारा लिवेईन मध्ये राहत होतात….you were two timing Mandar…मला फसवत होतास तू….मी तुझ्याशी एकनिष्ठ राहिले होते आणि तशीच अपेक्षा तुझ्याकडून ही होती मला….

सॉरी प्रीत..तू समजते तसे काही नाही आहे…मी अडकलो सारा मध्ये …एक तर परदेश जवळ कोणी नाही, एकटेपणा त्यात भरपूर स्वांत्र्य..मला ती अावडायला लागली…तुझ्यासारखी दिसायला…जणू तुझेच अमेरिकन व्हर्जन…. गुंतत गेलो तिच्यात…तुला फसवायचे नव्हते मला…पण ना तुला सोडू शकत होतो ना तिला…हातात काही नव्हते…अश्या वेळी साराने साथ दिली…तिच्याच वडिलांचा बिजनेस सांभाळावा … अट फक्त एक ठेवली तिच्या वडिलांनी .. साराशी लग्न करावे लागेल….तुला हे सगळे कसे सांगणार…समोर बिजनेस , माझी इतक्या वर्षांची स्वप्नं, पैसा सगळे होते….म्हणून तुला सागितले ….लग्न कर……

साराशी लग्न झालं आणि माझ्या स्वप्नानी उचल खाल्ली… बिजनेस खूप वाढवला..नावारूपाला आणला.पार्टनर बनलो..पण त्या दरम्यान साराशी मात्र  खटके उडायला लागले..तिला बंधन नको होती…आणि शेवटी आम्ही वेगळे झालो. तिच्या अर्धा बिजनेस मी विकत घेतला आणि पूर्ण मालक बनलो..बस हीच आहे कहाणी…

एवढ्या वर्ष मी स्वतःला गिल्टी समजत राहिले मंदार ..की तू असा क वागलास म्हणून…पण आत्ता कळते आहे मी किती मोठी चूक करत होती ते…त्या निनाद वर मी कित्ती मोठा अन्याय केला आहे ते…जीव तोडून प्रेम करतो रे माझ्यावर……तुझ्या सारखं स्वार्थी, बांधून ठेवणारे, घुसमट बनणारे, वाटले ते आरोप करणारे प्रेम नव्हे तर ते प्रेम जे फुलवेल, विश्वास ठेवेल..आधार देईल…असे म्हणत ती रडायला लागली….

थोड्यावेळाने शांत झाली आणि म्हणाली…खर तर मीच तुला धन्यवाद दिले पाहिजेत…नाही का??

तुझ्यामुळेच मला कळले..की मी कित्ती मोठी चूक करत होती ते ….तुझ्या आणि निनाद मधला फरक काय आहे ते..!!!

थँक्यू तू ब्रेकअप केलेस ते…मी , माझे आई बाबा..सगळे बाचवलो तुझ्या पासून ….आई बाबा सारखेच प्रेम करणारे सासू सासरे मिळाले..सुंदर घर मिळाले….माझी सगळी स्वप्नं पूर्ण करणारा जीवनसाथी मिळाला..कित्ती लकी आहे मी माझा बेस्टी… माझा नवरा आहे…जो माझी स्पंदन सुद्धल समजतो, माझी ताकत बनतो….

कधी जमले तर असे पण करून बघ कोणावर तरी….स्वार्थी प्रेम करू नकोस.. त्या सारा वर केलेस ते…आज तू एकटा पडला आहेस…..म्हणून तुला मी परत हवी आहे….हे प्रेम नक्कीच नाही…मंदार…आय लव निनाद…मह्या आयुष्यात आता तुला जागा नाही…आज ही नाही आणि पुढे ही कधी नसेल… गूड बाय….

????????????????????????????????????????????????????????????????

प्रीती रडतच बाहेर आली आणि गाडीत जाऊन बसली…मनावरचे मणा मणा चे ओझें उतरल्यासारखे वाटत होते….गाडी पळवतच ती घरी आली. मुलं खाली खेळत होती…तशी ती धावतच वरती घरी गेली. निनाद घरी एकटाच होता..तशी त्याच्या कुशीत शिरली आणि रडायला लागली…

तिला असे रडताना बघून  निनादने तिला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवले…जरा तिला मोकळे होऊन दिले आणि म्हणाला…शांत हो प्रिन्सेस…नाही येणार आता तो परत कधी आपल्या आयुष्यात…!!शांत हो…प्रिन्सेस..

तशी ती लांब झाली….तुला माहित होते मी कुठे गेली आहे ते? तिने आश्चर्याने विचारले…खरे तर मनात नाही नाही ते विचार आले…

बस…पाणी पी आधी…तुला नाही ना सांगावे से वाटले…ह्याचे वाईट वाटले …पण गेले महिनाभर बघतोय तुला कसल्या तरी टेन्शन मध्ये आहेस..विचारले तर सांगत नाहीस .रात्रीची नीट झोपत नाहीस कामात लक्ष नाही तुझे….म्हणून ऑफिस मध्ये विचारले काही झाले का ? तिथे ही काही नाही म्हणून शेवटी तुझा फोन चेक केला…तेव्हा कळले मंदार बदल….मी आलेलो कॅफे मध्ये…तुझ्या वर विश्वास नाही म्हणून नाही हा…फक्त तुझी काळजी होती म्हणून….माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि विश्वास ही आहे..पण त्याच्यावर नाही ना…म्हणूनच.पण तुझा झाशीच्या राणीचा अवतार बघितला आणि निघालो…तू मस्त हंडेल करशील ह्याची खात्री होती…

सॉरी ना..निनाद…खरंच सॉरी…जमले तर माफ कर मला… मला माझ्या पद्धतीने सोडवायचा होता हा गुंता…

सोडवलास ना….की अजून काही मनात आहे ?? त्याने हसत  विचारले.

हम्म..सोडवला..माझ्या पद्धतीने..आता खूप मोकळे वाटत आहे…एकदम हलक हलके….मनावरचे मणा मणाचे ओझे उतरल्यावर कसे वाटते तसे….आज मला liberated ह्या शब्दाचा अर्थ कळतो आहे….

हाहाहा…वेडीच आहेस तू..खरंच…

असून दे ..वेडी तर वेडी…आता सांभाळ मला आयुष्यभर…

अच्छा!!!!..मी नाही हा सांभाळणार अश्या वेड्या बायकोला…कधी झाशीची राणी बनेल ह्याचा भरोसा नाही …नको रे बाबा…

गप्प हा आता… मार खाशील निन्या…!!! असे म्हणत ती बाजुला व्हायला गेली तसे निनाद तिला अजून घट्ट पकडून ठेवले.

प्रिन्सेस…!!! आपण कुठे तरी बाहेर जाऊ या… जस्ट टू ऑफ अस???

का…?? असे मध्येच??

गॉड…मला ना तुला कुठे तरी एकटीला बाहेर घेऊन जावेसे वाटत आहे.. जस्ट लाईक हनिमून म्हणून..आज किती तरी दिवसांनी तू मला फक्त माझी म्हणून वाटत आहे….

निनाद…

????????????????????????????????????????????????????????????????

तुझ्या कुंकावशी माझे नाते…
जन्मो जन्मीचे असावे…
तुझ्या नावाचे मंगळसूत्र…
हसत मी घालावे…
कितीही संकट आले जरी…
तुझा हात कायम माझ्या हातात असावा…
मृत्यू जरी आला तरी…
तो तुझ्या मिठीत असावा…..

 

 

The End.. 

 

 

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/ 

 

Dont forget to like and comment please. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...