Dec 05, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 42

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 42

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

प्रीती आणि निनादचा छान संसार चालू होता. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले लव बर्डस दिसत असले तरी अजून प्रीती ने निनादला आय लव यू कधीच म्हटले नव्हते..आणि निनाद प्रीती कधी ते तीन शब्द बोलते ह्या साठी खूप आटापिटा करायचा…तिच्या कृतीतून कधी कधी वाटायचे हिला मी नुसते आवडतच नाही तरी ही प्रेम करायला लागली आहे तर कधी वाटायचे की तिने तडजोड म्हणून आपल्याशी लग्न केलं आहे…

????????????????????????????????????????????????????????????????

अशातच त्यांची पहिली एनिवर्सरी येणार म्हणून प्रीती ने खास निनादसाठी गोवा चा प्लॅन बनवला होता. त्याआधी घरी एक छोटी पूजा आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे गोव्याला जाणार होते.
रात्री पूजा वैगरे आटपून प्रीती रूम मध्ये आली तेव्हा निनाद रूम मध्ये येरझारा घालत होता…नक्कीच मूड खराब होता….

काय रे..काय झाले…मूड खराब का आहे तुझा..??

काही नाही, सगळ्यांना घेऊन गोवा ला जायचा प्लॅन का केलास???? काय गरज होती…!!! तू पण ना….

वाह !! शहाणा आहेस एकदम…इतका स्वार्थी कधी पासून झालास रे…!! रोज सगळे घराचं सांभाळतात ना…आपल्याला बघावे लागते का??मग त्यांनापण थोडा ब्रेक नको..? एवढ्या वर्षात कुठे बाहेर गेले नाहीत दोन्ही घरचे म्हणून त्यांना पण चेंज द्यावासा वाटला….
आणि तसे पण त्यांचा आणि आपले बुकिंग वेगवेगळ्या रूम मध्ये आहे….तेव्हा तुझी प्रायव्हसी जाणार नाही आहे…मिस्टर देशमुख.!!.सो चिल्ल….सगळा मूड घालवला असे बोलून तू निन्या….

परीक्षा घेत होतो तुझी….. प्रिन्सेस…सॉरी ना…!!

खोटे बोलू नकोस तुला काय आज नाही ओळखत….!!!

कान पकडून निनाद बराच वेळ तिची मनधरणी करत होता…त्याने आणलेले एक छोटे हिऱ्याच मंगळसूत्र घातले तेव्हा ती रागावली आहे हे विसरून, हरखलीच …..

हे काय आहे?? इट्स सो ब्युटिफुल….एक मिनिट थांब हा…मी आलेच…

निनाद ने पहिल्या रात्री दिलेले गिफ्ट घालून ती बाहेर आली…हलक्या गुलाबी रंगाचा स्ट्रएप वाला शॉर्ट नाईट गाऊन आणि त्यावर हिरा चे चमचमते मंगळसूत्र आणि लांब मोकळे सोडलेले केस….निनाद तिच्या मादकतेकडे बघतच राहिला…

एक मिनट….असे म्हणत ती वळली आणि केस पुढे घेतले…

गोऱ्या गोऱ्या पाठीवर एक छानसा रंगीत टेटूने NP स्टाईल मध्ये लिहिले होते.

प्रीती हे काय आहे..!!वेड लागलं आहे का तुला ??? कित्ती त्रास होतो त्याने…कोणी सांगितले तुला हे सगळे उद्योग करायला…असे म्हणत त्याने जवळ घेतले…..

हे सगळे करायची काय गरज होती…. प्रिन्सेस…तुला कळते आहे का तू काय केले आहेस ते… आयुष्यभरासाठी कमिटमेंट आहे ती..

माहिती आहे….!! म्हणून तर केले आहे…!!
निनाद ..I think I am falling for you….तिने हळूच त्याच्या कानात म्हटले.

वेडी आहेस तू..खरंच…मी काय बोलू आता… आय लव यू अँड अल्वेज विल आणि थँक्यू इतक्या मस्त गिफ्ट साठी….

अरे खरे गिफ्ट इकडे आहे….असे म्हणत तिने एक सोन्याची चेन त्याच्या गळ्यात घातली.तिचे ते प्रेम बघून तो गहिवरला. हळू हळू प्रीती आपल्याला प्रेमात पडते आहे ह्याची कबुली, तिचा गुलाबी गाऊन आणि वर आयुष्यभराची कमिटमेंट, रात्र प्रेमात नाहून  नाही निघाली तर नवल.

????????????????????????????????????????????????????????????????

असेच एक वर्ष निघून जाते आणि एक दिवस प्रीतीने त्याला संध्याकाळी कॉफी प्याला बोलावले…. बाईसाहेबना नक्कीच काहीतरी महत्वाचे बोलायचे असणार….तसेपण आजकाल तिला वेळच देता येत नाहीं…बाहेर घेऊन जाऊ आज जेवायला …त्या प्रमाणे तो घरी फोन करून बाहेर जेवून येणारं आहे हे कळवतो….

संध्याकाळी तो दोघांच्या आवडत्या कॉफी शोप मध्ये वाट बघत बसलेला …तर प्रीती थोडी उशिरा येते…

तिला येताना बघून त्याच्या मनात येते…कित्ती छान दिसायला लागली आहे ही आजकाल..थोडे वजन वाढलेले वाटते आहे..पण छान दिसते हिला ..पूर्वी पेक्षा जास्त कॉन्फिडेट आणि स्टायलिश दिसायला लागली आहे …कोणी लग्न झालेली आहे असे म्हणणार नाही हिला….आपसूक त्याने आपली नजर वळवली…कोफिशोप मधले बरेचसे लोक तिच्याकडे बघत होती….she's my girl…त्याने मनात म्हटले…

त्याने हाय करून आपण इथे असल्याचा हात केला तसे गोड स्माईल देत ती त्याच्या जवळ येऊन बसली….

सॉरी … लेट झाले…

तुझी वाट बघणे
जसे प्रत्येक क्षणात जीवन जगणे
प्रत्येक क्षणात तू जवळ असल्याचा भास
भेटल्यावर काय बोलू अशा उत्सुकतेची आस….

क्या बात है…आज रोमँटिक मूड मध्ये आहेस ….किती दिवसांनी शायरी म्हटली आहेस….. निन्या…

काही नाही असेच सुचले…बरेच दिवसांनी तुझी अशी वाट बघतो आहे ना…गेले ना ते दिन…

हा …ते तर आहेच…नाहीतरी  आजकाल ना तू  टिपिकल नवरा झालास हा निन्या….एकपण मेसेज नाही की कॉल नसतो तुझा दिवसभरात आणि मी काय बोलते ह्या कडे लक्ष पण नसते हा तुझे…..२ वर्षात हे बदल झालेत तुझ्यात…

सॉरी ना…माहिती आहे ना तुला किती काम आहे ते…

प्लीज ..तुझे ऑफिसचे गाणे नाही ऐकायचे हा मला आणि मला इग्नोर करतोस ना…. म्हणून तू मला उद्या तू शॉपिंगला नेणार आहेस…

अरे यार…कित्ती वेळा शॉपिंग करते तू ..आता तर मागच्या महिन्यात मी सिंगापूरला गेलेलो तेव्हा टॉप्स आणले ना …आत्ता परत!!!

आधी विचारायचे तरी काय हवे आहे म्हणून…लागला लगेच बोलायला…तिने रागावून म्हटले…

सांग …सांगितल्याशिवाय राहणार आहेस तू….बोलून टाक आत्ता..लिस्टच बनवतो एक ….त्याने मोबाईल काढत म्हटले…

मला ना मेटरनिटी गाऊनस घ्यायचे आहेत…

ओके.. नंतर दोन क्षणांनी तो विचारतो . कशाला??कोणासाठी?? आजकाल ह्याची फॅशन आहे काय?

बावळट आणि इडियट आहेस तू!!!…तिने लाजत म्हंटले…

म्हणजे..!!! दोंन क्षणांनी त्याची ट्यूब पेटते…ओह..खरंच!! नक्की ना…कधी?? कसे????

९९% नक्की….मला काल शंका आली म्हणून आज चेक केले… पोसिटिव आली आहे…कधी ते तुझ्या सिंगापूर ट्रीप चा आधी बहुतेक आणि कसे ते मी नाही सांगू शकत तुला…तिने लाजत म्हटले.

याहू…वी आर प्रेग्नेंट…!!!!तो जोरात ओरडला….तसा सगळ्या कॅफे ने त्यांना शुभेच्छा दिल्या….त्याचा वेडेपणा बघून ती मनोमन हसली.

एक मिनिट तुझ्या साठी हॉट चॉकलेट आणि सँडविच मागवतो…तुझी आयरिश कॉफी कॅन्सल नाव यु मस्ट इट राईट…घरी जाऊ जेवायला…सांगतो घरी जेवायला येतो आहे ते..बाहेर जायचा प्लान होता पण आता कॅन्सल…

त्याचा तो उत्साह आणि आनंद बघून ही खूप खुश झाली मनावरचं एक दडपण निघून गेले …थोडे खाऊन दोघा घरी निघाले…आज तो गाडी खूपच हळू हळू चालवत होता…एक दोनदा हटकले ही तिने…

सेफ ड्रायव्हिंग करतोय…शांत बसून रहा…

उद्यापासून सकाळी लवकर उठायचे नाही,पाहिले तुझे हाय हिल्स बंद, नो डायटिंग , फ्रूट रोज खायचे, बाहेरचे सगळे बंद आणि  हो उद्या पाहिले डॉक्टरकडे आपॉइंत्मेंट  …मी अक्याला विचारतो कोणी चांगला गायनेक ते..
ओके प्रिन्सेस…

निनाद…!!!

झेपेल तुला, काळजी नको करू , तुझी तयारी आहे ना ? फक्त ते सांग की… मनात काही वेगळे आहे…सॉरी आनंदाच्या भरात आपले बोलणे अधुरे राहिले…

नाही काही नाही…मला तुझ्या रिअँक्शनची चिंता होती..पण आता नाही आहे….झाली की आता २वर्ष आपल्या लग्नाला,सगळे ठीक आहे मग काय हरकत आहे….आणि आताच माझे ही प्रोम्शन झाले आहे…सो राईट टाईम आहे..असे मला वाटते..

एवढा विचार कधी केलास???

केला कधीतरी…..नाहीतरी तूच म्हणतो ना..सारखी विचार करत असते….

पण हा विचार आवडला…नाहीतर नेहमी निगेटिव्ह विचार करत बसते आणि गोलगोल प्रश्नांना मध्ये अडकलेली असते… बदलता आहात मॅडम..माझ्या संगतीचा परिणाम नाही ना…पण चांगला चेंज आहे हा… प्रीटी…

किती दिवसांनी प्रीटी म्हटले ना तू…..

दुसऱ्या दिवशी दोघा डॉक्टरकडे गेले आणि कन्फर्म केले. मग प्रितीच्या आई बाबा ना बोलावून घेतले आणि घरी सागितले. दोन्ही घरी आनंदाने उधाण आले…

????????????????????????????????????????????????????????????????

तीन महिन्याच्या सोनोग्राफी मध्ये कळले की जुळे आहेत आणि प्रेग्नेंसी थोडी कठीण होणार आहे ह्या मुळे प्रितीच्या जीवाला धोका असू शकतो. तसे निनाद ने आपले काळजी व्यक्त केली. त्याला प्रीतीचा जीव धोक्यात घालावा असे कधीच मान्य नव्हते….

आपण नंतर चान्स घेऊ पण प्रीतीला त्रास नको…. ह्या मतावर तो ठाम होता…

प्रीतीने मात्र आता माघार नाही…तुला नको असतील तर मला माहेरी सोड…मी बघेन माझ्या मुलांचे कसे आणि काय करायचे ते..मी सक्षम आहे त्यांची काळजी घ्यायला.. ह्यावर ठाम राहिली….

दोघा मध्ये अबोला सुरू झाला..दोन्ही घरच्या ना नक्की कोणाची बाजू घ्यावी कळत नव्हते.निनाद आणि प्रीती दोघा ही आपला हट्ट सोडायला तयार नव्हते.. आणि एक दिवस प्रीतीला ऑफिसमध्ये त्रास सुरू झाला …तसे सगळ्यांनी निनादला बोलावून घेतले.. त्याने हॉस्पिटल मध्ये तिला भरती केले…बीपी हाय झाले होते..म्हणजे परत पेनिक अटॅक येण्याची शक्यता…काय करावे सुचेना…शेवटी त्याने अक्षय ला फोन केला..सगळी परिस्थिती सागितली….

अक्या काय करू रे काहीच कळत नाही ……ही एक हट्ट करत बसली आहे…ऐकतच नाही आहे…स्वतःला त्रास करून घेते आहे रे …बघवत नाही आहे…म्हणत रडायला लागला…

वेड्या मग तू माघार घे….तसे पण आता फक्त तुझी लाडकी प्रिन्सेस नाही ….एक नाही दोन मुलांची आई होणार आहे…अशी कशी आपल्या मुलांना अबॉर्त करेल…वेडा आहेस का?? जरा तिच्या बाजूने विचार कर ना…..

निनाद तुझ्या वागण्याचा त्रास होतो आहे तिला….तू सोड ना तुझा हट्ट…जा समजावं तिला.बरी होईल बघ.थोडी जास्ती काळजी घ्यावी लागेल …. ट्वीनस असल्यावर त्रास होतो पण ह्याचा अर्थ असा नाहीं ना..की ट्विंस ने  जन्म द्यायचा नाही….

तू काळजी घे तिची, मग बघ कशी दोन दोन गोंडस मुले होतात तुला ते आणि मी येणार आहे डिलिव्हरीला माझ्या मैत्रिणीला घेऊन ,काळजी नको करू…जा आता वेळ नको घालवू…जा लवकर निनाद…. गमावू नको तिला..खूप मुष्कलीने मिळवली आहेस तिला ….हे लक्षात ठेव….

निनाद ने मुष्कलीने स्वतःला सावरले..आणि आत गेला.प्रीती डोळे मिटून पडली होती…तिच्या शेजारी बसत तिचा हात हातात घेतला आणि हलकेच थोपटत राहिला….डोळ्यातले अश्रू नकळत डोळ्यातून ओघळले…दोन तीन थेंब तिच्या हातावर पडले तशी तिने चमकुन निनाद कडे पाहिले…

निनाद !!!प्लीज रडू नकोस ना…काही नाही झाले आहे मला..!!! तू काळजी नको ना करू  प्लीज….

मग ऐक ना..का त्रास करून घेते आहेस स्वतला ??

प्रिन्सेस नाही राहू शकत तुझ्याशिवाय…..आय लव यू यार….तू बस ठीक हो..तू म्हणशील तसे..तुझा डिसिजन सर आखों पर….पण तुला काही झालं ना…तर माहीत नाही मी काय करेन ते…. सॉरी ना…माफ कर…

इकडे ये…जवळ ये…बेबीज ना सॉरी म्हण आधी.. तर माफ करेन तुला..आणि मला जवळ घे मी पण मिस केलं ना तुला…

प्रीतीला नीट बरे करून मग घरी आणले…आणि सक्तीची विश्रांती सुरू झाली. ..निनाद ने स्वतः पुढाकार घेऊन मग प्रितीच्या आईबाबा ना शेजारच्या घरी आणले त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले.आईबाबा ना खूप समजावले…प्रीती साठी गल घातली आणि त्यांना मानाने घरी घेऊन आला…शेजारच्या फ्लॅट मध्ये त्यांना सेट केले….म्हणजे त्यांनीही त्रास नको.प्रितीवर लक्ष ठेवणे सोप्पे होईल तरी ही स्वतंत्र…..

निनाद चा ह्या निर्णयावर प्रीती खूप सुखावली….

????????????????????????????????????????????????????????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...