एक छोटीसी लव्ह स्टोरी- 41

A story of Love Friendship and Love iN Friendship

निनाद आणि प्रितीचे घर झाल्यावर आता दोन्ही घरचे बाळासाठी आड वळणाने सुचवू लागले…पण दोघंही आपल्या इतक्यात काही विचार नाही ह्यावर ठाम होते..आधी निनाद ने मुंबईला नोकरी मिळवावी मग बघू असे कारण देऊन दोघा ही गोष्ट टाळत असत…

प्रितीच्या ऑफिस मध्ये नवीन प्रोजेक्ट साठी रेक्रूटमेंत येणार असते.. तिच्या मनात निनादचे नाव येते….सांगावं का त्याला
…आवडेल का त्याला की मी सुचवते आहे ते…की उगीच पुरुषार्थ नाही ना जागा होणार…काही झाले तरी आधी पुरुष मग नवरा मग मित्र आहे…काय बरं करावे….विचार विचार करता करता शेवटी सांगूनच टाकावे आणि मोकळे व्हावे असे ती ठरवते…..

शुक्रवारी निनाद घरी येतो , त्याचा मूड बघून ती विषय काढते, कामाचे स्वरूप, प्रोजेक्ट्स क्लाएंट ह्या बदल सगळी माहिती देते आणि म्हणाते तुझी हरकत नसेल तर मी तुला रेक्कामेंड करू का??? प्रयत्न करायला काय हरकत आहे??मिळालं तर चांगलेच आहे नाही का..? मला ही तू मुंबई ला शिफ्ट झालेला आवडेल निनाद….कंटाळा येतो तू नसतो ते…

अरे.. हे काहीतरी नवीनच….कर ना रेकमेंड…मला काहीच प्रॉब्लेम नाही…

खरंच प्रॉब्लेम नाही…नक्की ना…

हो ग प्रिन्सेस ..काहीच प्रॉब्लेम नाही…मला काहीच वाटणार नाही…..उलट मला आवडेल…

काही दिवसातच निनाद ला इंटरव्ह्यू चा कॉल आला आणि प्रितीचे रेकमेंडशेन ने त्याला असिस्टंट manager ची पोस्ट मिळाली…आणि निनाद मुंबई ला आला…

एकाच office असले तरी दोघांचे काम आणि कामचे स्वरूप खूप वेगळे होते. …एकाच ऑफिस मध्ये पण वेगळ्या वेगळ्या फ्लोअरवर  बसणार होते. अर्थाअर्थी नावाला एकाच कंपनीत काम करत होते….

प्रीती आणि निनाद चा प्रेमाला नवीन आयाम मिळाला…सकाळी निनाद लवकर उठून थोडीफार प्रीतीला मदत करायचा..त्यामुळे प्रीतीला थोडावेळ तिला ही वेळ मिळत होता व्यायामासाठी, नंतर डब्बा वगैरे बनवून, दोघा एकत्र ऑफिसला पळायचे.  सकाळी निनाद आणि प्रीती एकत्र जायचे आणि संध्याकाळी प्रीती लवकर निघायची….निनाद थोडा उशीर यायचा.. एकूण रूटीन छान सेट झाले होते…..

????????????????????????????????????????????????????????????????

अशातच  एक दिवस, निनाद ला आईचा फोन येतो. लवकरात लवकर घरी ये..प्रीतीला बरे नाही ..आईचा फोन हे बघून त्याला धस्स झाले…काल परवा पासून प्रितीच कामात लक्ष नव्हत..काहीतरी बिनसले असेल ..किवा ऑफिस मध्ये काही टेन्शन असेल म्हणून त्याने ही फारसे लक्ष नाहीं नव्हते दिले…काल रात्री ही ती बराच वेळ जागी होती बहुतेक… आपल्या लक्षात नाही आले…काय झाले असेल अचानक हिला??त्याला काहीं कळेना ……

कसंबसं कार पळवत तो घरी येत..तर बाहेर आई संचित पणे बसलेली..काय झाले त्याने नजरेने विचारले …

बरे झाले तू आलास ते…काय झालं ते कळलेच नाही रे…डोके दुखत आहे म्हणून घरी लवकर आली…मगाशी श्वास घ्यायला त्रास होतो आहे…असे म्हणत होती..डॉक्टर कडे चल म्हंटले तर ऐकत नाहीं आहे…आता दरवाजा पण उघडत नाही आहे…मला टेन्शन आला रे..काय झाले रे तिला…बघ ना लवकर….

मीे बघतो आई , तूं काळजी नको करू …मी बघतो ….

तो आधी मेडिकल स्टोअर मधून गोळी आणतो आणि बराचवेळ दरवाजा वाजवत राहतो…शेवटीं दरवाजा धक्का मारून तोडतो …प्रीती मलूल होऊन पडलेली असत.. तिला पानिक आटॅक आलेला आहे हे त्याला कळते…. कसे बसे तिला सावरून बसतो आणि तिला गोळी देतो .बराच वेळ तिच्या उशाशी बसून राहतो तिला थोपटत…. थोड्यावेळाने तिला झोप लागते….तसा तो बाहेर येतो… अतीव थकव्याने सोफ्यावर पडतो …

बरी आहे ती आता …तू काळजी नको करू तिची..खूप स्ट्रेस झाला ना की तिला असा त्रास होतो ….नकळतच त्रास करून घेते स्वतःला…होईल बरी…उद्या पर्यंत …शांत झोपू दे तिला आता ….

ऑफिस मध्ये काही झाले का? झेपत नसेल तर सोड नोकरी म्हणावे…जीवापेक्षा का नोकरी मोठी आहे का??? आई काळजी ने बोलली …

@@@@@@@@@@@@@@@@@@

दोन दिवस विश्रांती करून प्रीती ऑफिस ला जॉईन झाली..ह्या दोन दिवसात निनाद ने तिची खूप काळजी घेतली पण असे अचानक तिला कसला स्ट्रेस आला ह्याबद्दल एक चक्कर शब्द काढला नाही…. जणू अबोला धरला होता तिच्याशी….

त्यांनतर दोन तीन दिवसांनी तिला संध्याकाळी कॉफी प्यायला येशील का म्हणून मेसेज केला….दोघा संध्याकाळी उशिरा ऑफिस मधून निघाले….कॉफी शॉप मध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या तरी मूळ विषया ला कोणीच बोलेना……

शेवटीं त्यानेच विषय काढला….काय झालेलं प्रिन्सेस…कित्ती घाबरले सगळे…काही टेन्शन आहे का ऑफिस मध्ये? सांग ना…प्रीती….मित्र म्हणून विचारतो आहे…नवरा म्हणून नाही….सांग ना..

आधी तिने खूप आढेवेढे घेतले.पण निनाद ऐकणार नाही हे कळताच..तिने आपले मन मोकळे केले….

निनाद…मी पुन्हा असे नाही होणार ह्याची काळजी घेतलीं आहे…त्यादिवशी अचानक फेसबुक वर त्याचा वाढदिवसाचे नोटिफिकेशन आले आणि मन सैरभैर झाले….मी चुकले….मला ही कळतं रे…पण माझ्या मनाला मी नाही आवरू शकले…म्हणूनच त्याचे सगळ्या जुन्या आठवणी त्याच्य वाढदिवसाच्या दिवशी होळी करून टाकल्या …मोकळे व्हायला….त्याचा त्रास झाला बहुतेक…. सॉरी.. माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास झाला ना…..

काय !!!! चक्क आठवणी जाळून टाकल्यास तू…प्रीती…!

हो निनाद …आता परत असे कधीच होणार नाही…तो माझ्या मनात एक सल म्हणून राहील कदाचित….मी प्रयत्न करेन त्याला पूर्ण पणे विसरायचे….कठीण आहे माझ्यासाठी ….पण करेन नक्की….

गुड….मी तुला कधी ही त्याला विसर म्हंटले नाही प्रीती…तुझे पाहिले प्रेम आहे ते…पण कित्ती त्रास करू घ्यायचा स्वतःला ते तुझं तू ठरव..प्रिन्सेस…तू स्वतःची तब्येत खराब करून घेते आहेस .. बाकी सगळेे फक्त चिंता करू शकता तुझ्या साठी…इतर सगळे तुलाच सहन करावे लागते ना….आणि तो खराच ह्या सगळ्या लायकीचा आहे का …ह्याचा विचार कर..

एक विचारू निनाद..आपले लग्न नसते तर..मला विसरू शकला असता कधी???….

कदाचित नाही .कधीच नाही …पण त्याचा परिणाम मी माझ्या आज आणि उद्या वर नक्कीच पडू दिला नसता…हे नक्की….