Login

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 40

A story of Love friendship, love and love in friendship.

निनाद आणि प्रीती हनिमूनहून परतले आणि निनाद दोन दिवसांनी पुण्याला जायला निघाला...

जाऊ नकोस ना....तिने त्याच्या कुशीत शिरत म्हटले.

मला पण तुला सोडून जावेसे नाही वाटत प्रिन्सेस ...पण पापी पेट का सवाल हे.....तुला तरी आवडेल का मला असे ऐतोबा बनलेले सांग बघू..त्याने तिची समजूत काढत म्हटले.

हम्म्म हू..मुळीच नाही...उलट तुला खूप खूप मोठे ..म्हणजे ना ...सीईओ झालेले बघायचे आहे मला !!!!

डायरेक्ट सीईओ...!!!!! कठीण आहे...मग आताच जावे लागेल मग मला पुण्याला ....

शाहणा आहेस भारी...!!!!

एक काम करतो...माहेरी सोडू तुला.मी नाही तर आईकडे जाऊन रहा...पण शुक्रवारी ये...मी लवकर येईन...

मला घ्यायला येशील तर जाईन आणि आधी काकी ला विचार..मला माहेरी पाठवतो आहेस ते....

आईला!!! हे काय नवीन....आईला काय विचारायचे...इथेच तर आहे माहेर....त्यात काय विचारायचे..

वेडा आहेस का...लग्न झाले आहे आपलं..असाच माहेरी नाही जाता येणार..ते ही पहिल्यांदा.... रीत असते ती...वेड्या..उगीच माझे संस्कार निघतील हा...तुला काय...!!

सॉरी मला माहीत नव्हते....मी आईला विचारतो..पण मला विसरणार नाहीस ना ...नाहीतर माहेरी जाशील आणि कोण निन्या....असे म्हणत तिला जवळ घेतो, बांगड्यांचा किणकिण नी रूमची शांतता भंगली.....



सोमवारी निनाद पुण्याला ऑफिसला जॉईन होतो आणि प्रीती माहेरी दोन तीन दिवसांसाठी जाते...तिथे ही तिला करमत नाही...सारखे मोबाईल आणि ती...शेवटी आई वैतागते तेव्हा कुठे दोघांचा रोमान्स थांबतो... कधी एकदा शुक्रवार येतो अाहे असे तिला झाले होते... इकडे निनाद चे काही वेगळे हाल नव्हते...कामात मुळीच लक्ष लागत नव्हते...

शेवटीं एकदाचा शुक्रवार येतो...आज निनाद घरी येणार होता...कधी एकदा संध्याकाळ होते असे तिला झाले होते....घड्याळ आज खूपच हळूहळू चालते आहे ..असे सारखे वाटत होते...

तो येताच मात्र तिचा चेहरा खुलला...थोड्या गप्पा मारत दोघा जेवले आणि निघाले...

अगा ऑफिसची बॅग तर घेऊन जा...सोमवार पासून ऑफिस आहे ..लक्षात आहे ना...!!!

अरे हो...विसरलेच....सुट्टी संपली ते !!!!

बाईक घेऊन दोघा घरी निघाले पण सरळ घरी ना जाता... आइस्क्रीम खायला गेले..

सो ऑफिस जॉईन करणार तर..!!! आठवते आहे ना ऑफिसचा रास्ता की विसरलीस.....

खरे सांगू, खरा नाही आठवत ,मी काय काम करत होती ना..हे ही आठवत नाही आहे ...कसे होणार आहे माझे ...मलाच कळत नाही...कसे झेपणार सगळे..आधी कधी घरी काही काम केले नाही .कसली जबाबदारी घेतली नाही आणि आता अचानक घर, ऑफिस, सासर माहेर, नवरा...बाप रे...जमेल ना मला....

आता मात्र तिला खूप टेन्शन येऊ लागले होते...

आरे भित्री कुठली..फोकस ..प्रीती...टीम सांभाळते ना ऑफिस मध्ये तसेच ... थोडेफार तसेच आहे हे पण...वेग वेगळ्या डिपार्टमेंट ना एकत्र घेऊन चालायचं आहे एवढेच...त्यात कसले आले टेन्शन...दोन्ही घरचं तर मुळीच टेन्शन घेऊ नको....सासू आणि आई दोघींची लाडकी आहेस तू..मग काय...राहता राहिला नवरा...तो तर बेस्टी आहे आणि असतो कुठे इथे तुला त्रास द्यायला...तू ना फक्त कामवर फोकस कर प्रिन्सेस...जास्ती विचार नको करू......सब ठीक होगा....मी आहे ना...



प्रीतीने सोमवार पासून ऑफिस जॉईन केले..पाहिले काही दिवस खूपच कठीण गेले ...

सकाळचे लवकर उठणे, डब्बा बाकीची तयारी मग ऑफिस परत रात्रीची जेवणं आवराआवर आणि रात्री निनादशी गप्पा...पण दोन तीन महिन्यात तिने निनाडच्या मदतीने सगळे सावरले...छान आठवड्याचा मेनू सेट केला, त्याची पूर्वतयारी, रात्री चा मेनू ह्या सगळ्यांची सांगांड व्यवस्थित घातली...सकाळचं काकी बरोबरीने डब्बा , नाश्ता बघायला लागल्या तर रात्रीची सगळी जबाबदारी प्रीतीने घेतली.. ह्या सगळ्यामध्ये सनिवर रविवार मात्र फक्त निनाद साठी राखून ठेवलेलं... आठड्याची काम सोमवार ते शक्रवर मध्ये आटपून घायायची आणि वीकेंड ला फुलं ओन धमाल चालायची कधी पिकनिक तर शॉपिंग कधी मुवी तर कधी मित्रमैत्रणींना जमवून कल्ला चालायचा....

अशातच एक दिवस काका फॅमिली ग्रुप मध्ये मेसेज टाकतात....उद्या दुपारी सगळ्यांनी एकत्र यायचे आहे....तेव्हा काही प्लॅन बनवू नये...चर्चा करायची आहे ...

काय झाले असेल..??काही चुकले का माझे की काही खटकले असेल त्यांना माझे वागणे काही कळेना प्रीतीला ...तिने निनाद ला ही विचारले पण त्याला ही काही कल्पना नव्हती....शनिवारची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता....

प्रीती सकाळपासून टेन्शन मध्ये माहिती नाही काय झाले आहे..कशाला सगळ्यांना बोलावले आहे...तसे तर जेवायला सगळे एकत्र बसतात मग वेगळे बोलवायचे काय गरज होती ..हा प्रश्न तिला सतावत होता..नक्कीच काहीतरी बिनसले आहे किवा आपला शनिवार रविवार कार्यक्रम आवडत नसणार  असे तिला वाटले. पण निनाद ऐकेल तर शप्पथ...जणू त्याला आठवड्याचे उट्टे काढायचे असायचे...त्यात नवीन लग्न झालेलं...मग काय ...शेवटी बोलणी खावी  लागणार आता....

बसा...जेवण आणि आवराआवर होताच काकांनी फर्मान काढले तसे प्रीती घाबरली...पण निनाद ने तिला हलकेच थोपटले हातावर...काळजी नको करू...काही होणार नाही...



आजकाल तुम्हाला मुंबईचे जागे चे भाव काय चालले आहेत ते माहीत आहे...हळू हळू हे लोण आता इथे नवीमुंबई ही येणार आहे..त्याआधी तुम्ही पावले उचलावीत असे मला वाटते...आपल्या शेजारीच फ्लॅट विकायला काढत आहेत... आपण सखे शेजारी म्हणून त्याने एजंट ला गाठायचा आधी आपल्याला विचारले आहे..मला हा फ्लॅट तुम्ही दोघांनी विकत घ्यावा ......

काका...माझे काही चुकले आहे का?? तुम्ही असे आम्हाला वेगळे व्हायला का सांगत आहेत??? काकी सांग ना ..काय झाले आहे??

अगं वेडा बाई...असे काही नाही झाले नाही आहे...उलट तू तर आमची लाडकी लेक आहेस...घरात एक तरी मुलगी का असावी म्हणतात ना..ते तू आल्यापासून कळले हो आम्हाला...तुम्हाला तो फ्लॅट investment म्हणून घ्या म्हणत आहेत....तसे पण दोघांना टॅक्स रिटर्न साठी बरे पडेल....थोडी सविंग होतील..आणि जबाबदारी ही कळेल....तुम्हाला घराबाहेर नाही हा काढत...वेडी कुठली....

हे ऐकुन निनाद ने ही निःश्वास सोडला...पुढच्या चर्चा केल्या आणि उद्या पर्यंत सांगतो...विचार करून असे म्हटले...

त्या रात्री, निनाद ने आपले सगळे पेपर्स काढले...प्रीतीला हे सगळे कधीच दाखवले नव्हते..हीच वेळ आहे....प्रीती बस इकडे...

हे पेपर्स नीट बघ, काही इन्वस्तेमेंटस आहेत, काही आजोबांनी आणि बाबांनी माझ्या नावावर घेतले प्रॉपर्टी चेपेपर्स आहेत काही पॉलिसी अँड एफडी आहेत....हे एवढे असताना ..नवीन फ्लॅट घ्यावा का....

तुला मला हे सगळे का दाखवतो आहेस पण.....मला काहीच कळत नाही आहे...

म्हणून तुला म्हणतो ...जरा सगळ्यात लक्ष घाल...तू नोमिनी आहेस ह्या सगळ्याची....राहता राहिला प्रश्न बाबा नी सागितलेल्या फ्लॅट बदल तुझे मत काय ते सांग...बाकीचे नंतर बोलू....

मला पटले काकांचे बोलणे... investmentम्हणून ठीक आहे...तसे पण आजकाल आपण खूप खरंच करतोय..काहीच लगाम नाही आपल्याला म्हणून लोन काढू आपण आणि घेऊ....

तू आपण म्हंटले???

हो का....काही चुकले का ??

नाही...काही नाही.....थँक्यू असच.असे म्हणत त्याने सगळे पेपर्स आवरायला घेतलं...



दोघांनी आपण लोन काढून फ्लॅट घेत असल्याचे  सांगितले...पुढच्या सगळ्या गोष्टी मग वेगाने झाल्या आणि दोघांनी ने शेजारचा फ्लॅट घेतला.....गृह प्रवेशाच्या वेळी निनाद ने दाराच्या पाटीवर मिस्टर आणि मिर्सेस देशमुख स्वीट होम ची पाटी लावली हे बघून सगळ्यांनी दोघांना खूप चिडविले... लव बर्डस...म्हणून.

️️️️️️️️️️️️️️️️

🎭 Series Post

View all