Dec 08, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 39

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 39

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

रात्री बराच वेळ प्रीती आपल्याच विचारात होती…काय झाले असेल अचानक…असा काय वागतो आहे हा माझ्याशी….नेहमी एवढे मोकळ्या मनाने वागणारा निनाद असा का वागतो आहे….तिला काही कळेना…शेवटी ना राहून ती मोबाईल काढते…ह्या एक दोन दिवसात मोबाईल चेक करायला वेळच मिळाला नव्हता..शांतपणे सगळे मेसेज वाचून काढते..बराच जणांनी लग्नाचे फोटो आणि शुभेच्छा  मेसेज पाठवलेले असतात…..शेवटी ती निनाद चा चाटबॉक्स  उघडते…..

त्याचे आणि तिच्या गप्पा वाचत असते…तो लंडन असताना किती मेसेज करायचा..सगळे जुने जुने मेसेज वाचत हलके हलके स्मित तिच्या ओठावर येते. किती प्रेम करतो हा माझ्यावर….कोणीही ह्याचे मेसेज बघून प्रेमात पडेल …आणि तिचे एका मेसेज कडे लक्ष जाते….

हमे तुम पे प्यार हे…..
बेहद और बेशुमार है…
बस तेरी ….हा का इंतेजार है…

ओह…आत्ता तिच्या लक्षात आले..आपणच तर म्हटले होते…तयार नाही म्हणून त्यानंतर निनाद ने कधी ही आपल्याला जवळ घेतले नाही ….एकदा फक्त त्याने किस केले तेवढेच….आता ही तो वाट बघतो आहे …माझ्या होकाराची…इतके कसे मूर्ख आपण…. एवढे पण लक्षात नाही आले…निनाद !!!सॉरी मला खूप उशिरा कळलं रे….एकदा समजून घे ना…मी कशी सांगू तुला..मला आवडायला लागला आहेस तू…तुझे बरोबर असणे आश्वासक वाटते मला…

आता ह्याला कसे सांगावे ह्याचा विचार करत करत ती झोपून जाते….दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच जाग येते…निनाद आधीच उठून बाहेर गेलेला…

वेडपट उठवायचे नाही का…असे कसे सगळ्यांसमोर उशिरा उठून जाऊ…..काही कळत नाही ह्याला…

पटापट आवरत ती हळूच बाहेर डोकावते…अजून कोणाचे आवाज येत नसतात…कुठे गेले सगळे?? किचन मध्ये ही कोणी नाही…बाहेर अजून झोपाझोप आहे…म्हणजे एवढे काही उशिरा उठलो नाही आपण….ती चहा करायला घेते …तेवढ्यात निनाद घरात शिरतो….जॉगिंग करायला गेलेला वाटत होता…

अरे उठलीस तू….गुड मॉर्निंग..आळशी कुठली…

बोलू नकोस…जा..मला उठवता येत नाही का तुला….काय म्हणतील सगळे…

अरे …झोपलेत सगळे मस्त!!! लग्नात सगळेच दमलेत…आणींतू पण गाढ झोपली होतीस म्हणून नाही उठवले….

तिने बोलता बोलता त्याला चहा दिला आणि स्वतः ही घेतला…हे काय सकाळचे दूध कुठे आहे तुझे…?? काही चांगली सवय बदलल्याची गरज नाही…चाल उठ दूध घे आधी…नंतर चालू दे तुझे दिवस भर कट्टिंग चाय…..

त्याच्या ह्या अदा वर खरे तर तिला खूप आवडली….माझी सवय जपतो आहे….पण बोलणार कसे…

११पर्यंत निघू या….दुपारचे फ्लाईट आहे कोचीला…नंतर ५ तास ड्राईव्ह आहे…रात्री पोचू आपण…

तिने हसून मान डोलावली…

फ्लाईट मध्ये त्याने तिला विंडो सीट मध्ये बसवले आणि बाजूला बसत तिचा हात आपल्या हातात गुफुन घेतला….तुला एकदम आपल्या पहिल्या लंडन मुंबई ट्रीप ची आठवण आली…आणि दोघा ही हसले. थोडीफार गप्पा मारत दोघांनी एक मूव्ही बघितला…त्यांना कोचीला 
हॉटेलचा पीक अप होता..गाडी सरळ त्यांना रिसॉर्ट वर नेणार होती. …

थोडे से खाऊन दोघा मुन्नार ला निघाले… वाट मोठी सुंदर आणि वळणदार होती…सगळीकडे छोटी छोटी गावं आणि हिरवळ बघून डोळे निववत होते….दोघा शांतपणे बाहेर बघत होते…प्रीती ने निनाद ला हाक मारली…निनाद मला कसे तरी होत आहे….हा बरोबर नाही चालवत आहे गाडी….मला गरगरत आहे….आणि खरंच तिला खूप गरगरत होते…त्याने जवळ सरकून तिचे डोके आपल्या खांद्यावर वर घेतले….थोडा वळणदार आहे ना रस्ता …म्हणून तुला त्रास होत असेल ….त्याने गाडी हळू चालवायला सांगितले..तिचा हातावर आपल्या हाताने थोपटत राहिला…शेवटी प्रीती ने त्याला गाडी थांबायला सांगितले…तिला आता  उमसे येत होते…आणि हळू हळू गरगरत होते… दर थोड्या वेळाने ती गाडी थांबत होती..आणि सारखी चक्कर येत होती….

शेवटी निनाद ने घरी फोन केला आणि प्रीती बदल सागितले….आई ने तिला कदाचित गाडी लागत असेल एखद्या मेडिकल स्टोअर मधून गोळी घे आणि पाणी दे सारखे….दोन गोळ्या घेऊन ती निनादचा मांडीत झोपून गेली …तेव्हा निनादने सुटकेचा निःश्वास सोडला….

दोन्ही घरी फोन करून सांगितले की ते नीट पोचले आणि प्रीती आता ठीक आहे…त्याने रिसॉर्ट चा डॉक्टरला बोलावले.तिला एक गोळी अजून दिली आणि सकाळपर्यंत सगळे ठीक होईल फक्त रेस्ट करू द्या  असे सांगितले.

शेवटी न जेवता तो ही झोपायला आला…एकदा तिला ताप वैगरे तर नाही ना बघितले आणि बराच वेळ तिच्याकडे बघत बसला….ग्लानीत होती ती…पण निनाद आपल्या जवळ आहे हे तिला कळलं तसे म्हणाली…सॉरी निनाद….माहीत नाही काय होते आहे ते….

इट्स ओके  प्रिन्सेस काही नाही होत आहे तुला…मोशन सिकनेस झाला आहे….उद्या पर्यंत ठीक होशील तू…शांत पडून रहा आता.. तो बराच वेळ तिला थोपटत राहिला….मनातल्या मनात तिला अनेक वेळा सॉरी म्हणून झाले…करायला गेलो एक आणि झाले भलतेच…

????????????????????????????????????????????????????????????????

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग तेव्हा प्रीती बाजुला नव्हती…कुठे गेली असेल सकाळी….असे म्हणत त्याने बाथरूंच दार   हळूच ढकलून बघितले…इथे पण नाही..

बाहेर हिरवळीवर ती योग करत होती… अच्छा इथे आहे तर… शांतपणे तिला योग करताना पाहून त्याच्या मनात एक कल्पना आली..जाऊन त्याने कॅमेरा आणला आणि तिच्या नकळत तिचे भरपूर फोटो काढले…

थोड्यावेळाने ती प्राणायाम करत होती… शांत ध्यान लावलेला चेहरा आणि त्यावर अतीव शांती असे त्याने तिचे फोटो काढले आणि गपचूप तिच्या समोर येऊन उभा राहीला…

तिचा ध्यान संपताच त्याने विचारले बरी आहेस ना आता??

हो मस्तच…..चल चहा घेऊ या…

हे सगळे कधीपासून प्रीती??आधी कधी बघतीले नाही तुला योग वैगरे करताना…

झाली २/२.५ वर्ष…मनःशांती मिळते ह्यातून मला..आत्ता सवय झाली आहे…कदाचित म्हणूनच सेन राहिली.

त्याने चमकुन पाहिले आणि हसला..ती मात्र दूर कुठे तरी हरवली होती….

आपण तयार होऊन बाहेर जाऊ या…?? छान जागा आहे ही…

मी गाडी ने नाही हा येणार आणि त्या ड्रायव्हरला ला सुट्टी दे ..मी नाही येणार तो असेल तर…

माहिती आहे मला!!!!

तु येणार नाहीस ते…रात्रीच प्लॅन चेंज केला आहे…आपण सेल्फ ड्राईव्ह करतोय चालेल??? मीे चालवतो किवा कंटाळा आला तर तू चालावं ठीक आहे???

थॅन्क्स निन्या…तू एकदम स्वीट आहेस…????????????????????

तसा तो ही गोड हसला….कित्ती दिवसांनी त्याला स्वीट म्हटले हिने…

दोघा तयार होऊन जवळ चहाचा मळ्याला भेट देतात.. दुर दूर पर्यंत पसरलेले चहा चे मळे, फॅक्टरी आणि थंड वातावरण गरम गरम चाय की प्याली..अजून काय पाहिजे.भरपूर फोटो सेशन करून थोडा टाईमपास करून  शेवटी रिसॉर्टवर परत येतात.

आता वातावरणही धुंद झाले होते… हलकी हलकी धुकं पसरायला सुरुवात होत होती.त्याच्या कॉटेज आणि हॉटेल मध्ये छान धुक पसरली होती. सगळीकडे निरव शांतता आणि बाहेर मस्त धुकांची चादर…असे वाटत होते आसमंत खाली उतरला आहे…

प्रीती गाणं म्हण ना…कित्ती छान वातावरण आहे …….

ती बरेच आढेवेढे घेते.मग तयार होते.तसा निनाद मोबाईल वर रेकॉर्ड करायला घेतो….

अपनेही रंग रंग दे….
सावरा मोरा जियरा
चितवन को देख थानी चुनरी
मैं पिया बावरी ….

अखीयन को दे धूप सुनहरी
मैं भई सावरी….
रंग दे… सावरा

तोरे रंग जो ढल-ढल जाऊ
मुझमें काही मैं नज़र ना आऊ

ऐसो समर्पण कर दू तन-मन
तुमरी छबी हो मोरा दर्पण…..

असे म्हणत ती निनादच्या मिठीत समावते आणि पुढे म्हणते…..

सुनले अरजिया
सुन रंगरसिया मोरे मन बसिया
रंग दे… सावरा…..
.
तसा तो तिला आपल्या मिठीत बंद करून घेतो अगदी घट्ट…हळूच तिच्या हनुवटी ला पकडून तिचा चेहरा वर करतो आणि म्हणतो नक्की ना???की अजुंन वेळ पाहिजे…तशी ती लाजून मान खाली घालते..

आरे वा ….लाजता पण येते वाटते तुला !!!!

निनाद पुढाकार घेऊन तिच्या नाजुक ओठावर आपले ओठ गुंतवले.
तिने त्याला अलगद आपल्या मिठीत बध करते….थोड्यावेळाने त्याने ओठ विलग केले आणि तिचे केस चेहऱ्यावरून मागे खोचले…..सबंध रूममधे एक गोड शांतता पसरली…..लाजेने ती त्याच्याकडे पहातही नव्हती. एकमेकांच्या श्वासात गुंताणारे श्वास दोघांनाही बेफाम करू लागले…तसे निनाद ने तिला उचलून बेड वर ठेवले…तिच्या नखांनी त्याच्या शरीरावर अनेक प्रेमाच्या खुणा आणि त्याचा ओठांनी केलेले तिच्या शरीरावर वार ह्यात ती रात्र आणि सबंध आसमंत भरून गेला….मनाने आणि शरीराने निनाद आणि प्रीती त्या दिवशी खऱ्या अर्थाने एक झाले…

????????????????????????????????????????????????????????????????

दुसऱ्या दिवशी सकाळी ….

उठ आता…प्रिन्सेस …कित्ती वेळ झोपणार आहेस…

काय रे…झोपू दे ना….रात्रभर जागवले आहेस…मी नाही उठणार …तू त्रास नको देऊस हा…

अच्छा मी त्रास देतो तुला आता…शहाणी थांब अशी झोप उडवतो ना….बघच तू…

असे म्हणत तो मोबाईल ओन करतो….प्रीती चे गाण्याचे रेकॉर्डिंग प्ले करतो…..माऊ काल ना मोबाईल चालूच राहिला यार….

काय्य!!!! असे म्हणत ती ताडकन उठते….आणि त्याच्या मग पाळायला सुरू करते…मोबाईल दे आधी इकडे…!!!!

बराच वेळ दोघा पळापळ करता..पण निनाद काहीं तिच्या हातात येत नाही….शेवटी दमून खाली बसते….टाईम प्लीज….

हेह्येहीही…लहान आहेस का आत्ता….टाईम प्लीज करायला…चीटर…घे चेक कर…

ती घाईघाईने व्हिडिओ चेक करते…फक्त गाणे रेकॉर्ड झाले होते..तरी संशयाने त्याच्या कडे बघते…

आपले अनमोल क्षण आहेत ते…वेडपट..असे थोडी बंदिस्त होतील कुठल्या कॅमेरा मध्ये….एवढं तर विश्वास ठेव…एवढे म्हणत त्याने तिला जवळ घेतले…खूप वाट बघायला लावली आहेस हा..ह्याची भरपाई बाकी आहे प्रिन्सेस !!!!

चल हट …मुळीच नाही….लाडात येऊ नकोस…

तुझ्या कडे नाही तर कोणाकडे लाडात येऊ सांग ना..मग कशाला जळते बसते दुसऱ्या कोणाचे नाव घेतले की.. प्रिन्सेस…

because i like you stupid…एवढं पण कळतं नाही का तुला…

प्रिन्सेस….!!!!!!  थँक्यू थँक्यू सो मच….सध्यातरी एवढे पुरे….मी वाट बघेन तुझ्या ई लव यू ची..i guess this a good start….????????????????????????????????????????????

त्या नंतरचा आठवडा , प्रीती आणि निनाद एकमेकांच् सहवासात पूर्णपणे विरघळले… एकमेकांना शिवाय आता एक क्षण ही दोघांना राहवत नव्हते…तिला तर करमतं नव्हते निनाद शिवाय.तो ही तिला आनंदी ठेवायचा पुरेपूर प्रयत्न करायचा….. तीही त्याला साथ द्यायची निनादला…आपण निनाद आणि त्याच्या प्रेमाला ओळखण्यात खूप उशीर केला आहे ह्याची तिला जाणीव होती….गेलेला वेळ तर ती परत आणू शकत नव्हती पण हाती असलेला वेळ तिला मुळीच गमवायचा नव्हता…..????????????????????????????????????????

दोघा हनिमून आटपून घरी येतात…तिचा उत्फुल्लेला चेहरा आणि गळ्यावर हलका गुलाबी चट्टा बघून आई समाधानाने हसली……चला मुलगी संसाराला लागली…..

????????????????????????????????????????????????????????????????

प्रीतीने म्हटलेले, आज हे गाणे .श्री राहुल देशपांडे ह्याने गायलेले हंपी ह्या मराठी चित्रपट मधले आहे… अतिशय उत्कृष्ट गायलेले ही बंदिश तुम्हाला गाना किवा जियो सावन वर नक्की मिळेल….नक्की ऐका….आवडेल तुम्हाला…

आजचा हा बघ कसा वाटला ते नक्की सांगा…प्रीती विसरू शकेल आपल्या पहिल्या प्रेमाला…? म्हणू शकेल कधी निनाद ला आय लव यू?? मंदार चे काय??निनाद आणि प्रितीच्या संसारात परत विघ्न बनेल??की विसरून जाईल तिला??? आयुष्यात परत कधी भेट होईल निनाद प्रीती आणि मंदार ची…????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...