एक छोटीसी लव्ह स्टोरी- 38

A story of Love friendship and Love in Friendship.

प्रीती अल्बम मध्ये रमली होती…सगळे जुने जुने फोटो आणि ठळक आठवणी अगदी जूनियर के जी पासून ते इंजिनीरिंग कॉलेज पर्यंत चे फोटो…त्यानंतर पहिला जॉब मिळाला तेव्हाचा फोटो आणि मग लंडनचे फोटो…सगळे मस्त  एक एक लावून नीट लावलेले सोबत छोट्या छोट्या आठवणी लिहिल्या होत्या.. …आणि पुढची पाने कोरी….शेवटी एक चिठ्ठी होती…सोबत आठवणी बनवू या..साथ देशील???

वेडा कुठला…म्हणत तिने परत अल्बम बघायला घेतला…तेवढ्यात दाराचा आवाज झाला..तशी ती सावध झाली…अचानक पणे हातपाय थंड पडले.. …आणि हृदय राजधानी पेक्षा जास्ती जोरात धडधडते आहे हे तिला जाणवले वाटले….

निनाद रूम मध्ये आला होता…येताना एका ट्रे मध्ये दूध आणि बिस्किट्स होती…हे घे…आई ने पाठवले आहे तुझ्यासाठी…जेवली नाहीस ना आज…उगीच अॅसिडीटी होईल…म्हणत त्याने ग्लास पुढे धरला…

त्याला असे बघून ती हसायला लागली.. opतसा तो ओशाळाला..

पकडली गेली ना चोरी???

ह्म्म््म…काय गरज आहे हे सगळे करायची…कुठून आणले हे सगळे…

अरे यार…तू जेवली नाहीस ना आज .. मला वाटले तुला त्रास होईल…म्हणून आणले…प्रियाला सांगून…

धन्य आहे तुझी….

मग काय करू…एक तर तू आज इतकी इमोशनल झाली लग्नात, पाठवणीला पण रडली त्यात सकाळी पासून उपास, प्लस इथे पण सगळं गोंधळ चालू…म्हणून आणले…घे ना प्लीज….

मी चेंज करून येतो ..हे सगळे संपले पाहिजे तोपर्यंत…ओके…

तिने एक बिस्कीट घेतले ..मग जाणवले की आपल्याला खूप भूक लागले आहे… अजून एक दोन बिस्कीट खाऊन तिने दूध पिऊन घेतले आणि खिडकीत उभी राहिली. तेवढ्यात निनाद बाहेर आला….तिला बघून फक्त हसला… वेडी भूक लागलेली पण कळत नाहीं हिला..

त्याने तिला आपल्या जवळ ओढले आणि आपल्या घट्ट मिठीत ओढले…तिचे डोके त्याच्या छातीवर होते आणि त्या च्या ह्रदयची स्पंदने स्पष्टपणे ऐकू येत होती…. प्रिन्सेस…मी तुझ्या साठी काहीतरी आणले आहे…एक मिनीट दाखवतो तुला…असे म्हणत त्याने एक छोटा बॉक्स काढला…आत छोटे स्टार्स लावलेले ट्रेंडी ब्रेसलेट होते….

एक मिनट !!! मी हे बघितले आहे कुठेतरी आधी…कुठून घेतले हे…

लंडन ..तुला आठवते हॅरोडस मॉल मध्ये गेलेलो …तिथे आवडले होते तुला हे डिझाईन…म्हणून घेऊन आलो…

वेडा आहेस का तु!!!!कित्ती महाग होते ते…काय गरज होती…येवढे तर दागिने केलेत लग्नात…

ते जाणार सगळे ६ महिन्यात लॉकर मध्ये ..म्हणून हे रोज घाल.मला आवडेल तू रोज घातलेले.. अर्थात तुला आवडले असेल तर हा…

थॅन्क्स निनाद…मला खूप आवडले गिफ्ट…तिने ते घालत म्हटले…

चल ना झोपू या…जाम दमलो आहे…दोन रात्री ह्या लोकांनी मला झोपून दिले नाही आहे…त्याने खोटे जांभई देत म्हटले…तसे पण उद्या लवकर उठायचे आहे…गुरुजी लवकर येणार आहेत…

हम्म …मी चेंज करते …तू झोप…

एक मिनट..हे पण आणले होते तुझ्यासाठी…आवडले तर घाल कधीतरी…जबरदस्ती नाही हा…

ती आत जाऊन बराच वेळाने चेज करून बाहेर येते….आणि बेड चा एका टोकाला जाऊन बसते…निनाद डोळे मिटून पडलेला असतो..त्याचा जवळ जाऊन आपले ओठ त्याच्या कपाळावर किस करायला नेते पण हलकेच त्याच्या गालावरून हात फिरवून मागे वळते……तस्सा तो गालातल्या गालात हसतो…कबुल कर ना…मी आवडतो ते…फक्त एक इशारा कर….बस त्याशिवाय हे नात पुढे जाणार नाही .. प्रिन्सेस….

बेड चा दुसऱ्या टोकाला ती कुशीवर झोपते..केस मागे मोकळे सोडलेले…तिला झोप लागली आहे हे बघून हळूच तिचे केस आपल्या चेहरावर टाकतो आणि एक हात तिच्या कमरेवर हलकेच तिला म्हणतो….गुड नाईट प्रिन्सेस…..

????????????????????????????????????????????????????????????

दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला जाग येते ते निनाद चा कुशीत…घाबरून ती बाजूला होते…तरी निनाद ची झोप चाळवते…जाऊन तयार होऊन बाहेर येते…मग लक्षात येते ..आरे आज साडी घातली पाहिजे…घरी अजून पाहुणे मंडळी असतील…ड्रेस चालणार नाही…म्हणून बॅग तून एक साडी काढते…परत ब्लोऊस आणि पेटीकोट चेंज करून येते..पण साडी कशी नेसणार आत….बाहेर निनाद झोपलेला…तो नक्की झोपलेला आहे ते बघून ती नाईट लंप चालू करून साडी नेसायला घेते…इथे निनाद एक डोळ्याने तिच्या सगळ्या हालचाली बघत असतो… तिची गोरी गोरी पाठ आणि त्यावर मेहेंदी ने काढलेला टॅटू त्याचे लक्ष वेधून घेत होते…अरे काल कसे आपल्या लक्षात आले नाही…

तिने घाईघाईने साडी नेसली आणि टिकली टेकवली..हातातला बांगड्या दागिने चेक केले आणि हलकी गुलाबी लिपस्टिक फिरवत नाक उडवलं..आणि बाहेर गेली…
ती बाहेर जाताच निनाद ने हुश केले..काही खरं नाही बाबा माझे ..!!!  कसली दिसते यार तु ..कधी तुला जवळ घेऊ असे मला झाला आहे .. लव यू सो मच प्रिन्सेस..सांग कधी कळणार तुला , प्रीत माझ्या मनातली…

????????????????????????????????????????????????????????????????

बाहेर अजून उठाउठ झाली होती..काकी आधीच किचन मध्ये  स्वयंपाक करत होती..तिने जाऊन आधी काकी ना नमस्कार केला..अरे उठलीस तू… पडायचं ना जरा वेळ…

नको जाग आली मला…काकी मी काही मदत करू…काय करू  सांग ना….

आधी हे दूध घे आणि पटकन संपव ..तुला Bournvita हवे असेल तर वरती आहे बघ… आणि मग जरा पूजेचे बघशील…देवपूजा राहून गेलीं आहे बघ..आज ह्या गडबडीत ..नाहीतरी अंघोळ करून आली आहेस ना…कर ना आज…

मी…!!!

हो येते न पूजा करता…??

हा येते …तशी करता पूजा..!!

ती ने पटकन दूध संपवले आणि पूजा करायला घेतली…पूजा करता करता अथर्वशीर्ष चे पठण सुरू केले….तिचा तो आवाज ऐकुन निनाद बाहेर येऊन बसला तिचे ते सोज्वळ रूप, छान टॉवेल बांधलेले अंबाडा, साधी पण सुंदर  साडी नेसलेली प्रीती चे हे रूप तो बघतच बसला..तुझे कुठले रूप खरे प्रिन्सस… वेस्टर्न ड्रेस मधली तु की आज साडी मधली तू…तुझे सगळीच रूप लोभसवाणे ….पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो तुझ्या….

काकी…मी शीरा करू प्रसादाचा…

येतों तुला करता ..?? काकी ने आश्चर्याने विचारले..

हो म्हणजे आई बनवते तो येतो मला…प्रसादाचा शीरा…

बनाव ना मग.. छान तुझ्या कडूंन पाहिले गोड पदार्थ होईल..बनाव..सामान आहे तिथे ..अजून काही हवे असेल तर सांग…

काकी ..म्हणजे जास्ती बनवू प्लीज….ह्यांना आवडतो खूप आईंच्या हाताचा शीरा….

काकी आणि निनाद खो खो हसायला लागले …काय म्हणालीस तू…ह्यांना….!!!! म्हणजे कोण??? प्रीती….

तशी ती लाजली …शेवटीं काकी म्हणाली..निनाद बोल त्याला…उगीच आहो जहो करू नकोस त्याला…डोक्यावर बसेल तुझ्या तो….

thanks काकी..मला पण विचित्र वाटत होते त्याला असे कसे आदराने एक दिवसात बोलवायला सुरू करू….मला कित्ती टेन्शन आलेले….,

त्यावर त्याने वेडा वून दाखवले आणि आत पाळला…

दोघांनी एकत्र बसून पुजांकेली आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले ….दुपार नंतर सगळे पेंगुळेले होते गोड जेवणाने…निनाद ने तिला मेसेज केला ….पणीपुरी खायला येशील संध्याकाळी ???

दुसऱ्या दिवशी, दोघा हनिमूनला निघणार होते… संध्या काळी निनाद तिला बाहेर पाणीपुरी खायला घेऊन गेला …तेव्हा तिने विषय  काढला …. कुठे चाललो आपण… मला तशी बॅग भरायला …सांगना…

आपण केरळला चाललो आहे…चालेल ना…??आणि हो थोडे गरम कपडे पण घे..थंडी आहे आता तिथे …जिथे चाललो आहे ती जागा खूप उंचावर आहे त्यामुळे थंडी असेल…

निनाद तूं रागावला आहेस मह्यावर??? काही चुकले का???

नाही ..काहीच नाही … तुला असे का वाटले पण .

नाही असाच… काल पासून बघते आहे …तू नीट बोलत नाही आहेस माझ्याशी ..म्हणून विचारले..तुला नसेल सांगायचं तर राहून दे…..

दोघा घरी आले..हळू हळू नातेवाईक निघणार होते..फक्त गावाकडचे 3/४ जणा राहणार होतें अजून काही दिवस. … निनाद त्याच्यात रमला .. आणि बाहेरचे सगळे आटोपले आणि रूम मध्ये गेली ..तिला वाटले निनाद वाट बघत असेल….पण तो तर गाढ झोपला होता…त्याच्या अंगावर एक चादर टाकी आणि बराच वेळ त्याच्यकडे बघत बसली …शेवटी उसासा टाकून उठली …. डोळ्यात येणारे अश्रू तिने कसेबसे थोपवले….असा का वागतोय हा? आय झाले अचानक ह्याला???..त्याच्या बाजूला जाऊन पडली…बराच वेळ विचार करत पडली…..

🎭 Series Post

View all