Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 37

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 37

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

निनाद ने आपले हळदी चे फोटो शेअर केले …पूर्ण हळदी ने माखलेला होता…आणि तिचे फोटो शेअर कर म्हणून माग लागला..शेवटी प्रिया ने तिचे दोन फोटो शेअर केले…मस्त गोरी गोरी प्रीती त्यात फुलांचे दागिने आणि त्यावर हलका पिवळा ड्रेस आणि  छान हलका पिवळा गालांवर…कसली गोड दिसत होती….

थोडी अजून लाव तिला हळद….मस्त दिसले…त्याने प्रियाला फोन करून सागितले…

गप्प रे…इथे तुमच्यासारखी हळद नाही खेळत ….बावळट..आणि तिचे फेशियल खराब होईल…ना..!!!!

गम््म अरे हो…ठीक आहे…सांग तिला…जास्ती लावू नकोस मग…मी काय एवढं गोरा नाही आहे….ब्लॅक अँड व्हाइट दिसू आपण…????????????????????????????????.

बाबा रे कठीण आहे आता…लग्नात काय होणार आहे माहीत नाही…सगळ्याच पद्धती वेगळ्या आहेत…कोणाचे मन दुखवयला नाही म्हणजे मिळवले….
????????????????????????????????????????????
????????????????????????????????????????????????????????????????

आज प्रितीची मेहंदी कार्यक्रम होता…सगळे जमले होते एक निनाद सोडून…म्हणून त्याला लाईव्ह व्हिडिओ कॉल चालू केला…सोबत संगीत आणि डान्स प्रोग्राम चालू होता..
प्रीती ने शॉर्ट ड्रेस करून छान मेहंदी काढून घेत होती…मध्येच तिचे केस सारखे चेहऱ्यावर येत होते….ते केस , निनादला खुणवत होते…असेच जावे आणि तिचे केस कानामागे खोचावे असा मोह त्याला कित्ती तरी वेळा आवरला….शेवटी प्रितीच्या मावशीचे लक्ष गेले…त्या व्हिडिओ कॉल कडे आणि त्यांनी तो बंद केला….

बास्स आत्ता..दोनच दिवस आहे …मग त्तुझीच आहे ती…बघत बस तिच्या कडे….त्यांनी निनादला दटावले….तसा निनाद खजील झाला…

रात्री प्रितीची आई तिच्या साठी भात घेऊन आली भरवायला…दोंघी हातावर पायावर मेहंदी होती..काही असे दोन घास खावून ती आई चा कुशीत शिरली..का कुणास ठाउक..पण मन भरून आले होते…

अगं वेडा बाई ..तुझ्या घरी जाते आहेस की तू..प्रत्येक मुलीला जावे लागते बाळा..रीतच आहे ती तशी..आणि तू तर तुझ्या सख्या मित्राशी लग्न करते आहेस कित्ती लकी आहेस .झालं गेल विसरून जा आता…निनाद आता तुझा मित्रच नाही नवरा ही आहे…त्याला तसा मान दे…उगीच सगळ्यां समोर निन्या वैगरे बोलायचे नाही…आपल्या नवऱ्याचा मान आपणच ठेवायचा असतो हे लक्षात ठेव…त्याच्या घरच्याना जप.पद्धती थोड्या वेगळ्या आहेत पण तू शिकशील हळूहळू आणि उगीच कोणी ही काही बोलले तर उलट उत्तर द्यायचे नाही… आणि सारखी त्याच्याकडे कंप्लेंट करायला जायचे नाही….आणि हो तुमच्या मधले प्रॉब्लेम फक्त तुमच्यापर्यंतच राहिले पाहिजेत…बाहेर येता कामा नये…कित्ती भांडलात तर भांडण दुसऱ्या दिवसापर्यंत न्यायचे नाही आणि सारखे सारखे माहेरी पण यायचे नाही हा भांडून…मुळीच घेणार नाही मी घरात तुला….

काय गा आई..

मग लहानपणी किती भांडा भांडी चालायची तुमची…करमत तर दोघांना नसायचे पण अबोला सुरू तुमचा आडून आडून…शेवटी तोच यायचा तुझी मनधरणी करायला….

तुला खूप खुश ठेवेल बघ  तो.. जीवापाड प्रेम करतो बघ तो तुझ्यावर.. जप हा सोने त्याला…खूप हळवा आहे तो..पटकन मनातले बोलत नाही तो पहिल्यापासून…त्याला उगीच काहीतरी त्रास देऊ नकोस हा…

आई मला झेपेल ना सगळे??? भीती वाटते आहे…!!!!

चल वेडी कुठली…निनादला काय आज ओळखते..सांभाळून घेईल बघ तुला…फक्त तो मंदार चा विषय मनात सुद्धा आणू नकोस आत्ता…ते आकर्षण होते ते फक्त…वयच असे असते ते आणि निनादला  तर माहीत आहे ना सगळे.. फसवत तर नाहीस ना त्याला…मग कसले टेन्शन…

आई बराच वेळ तिला समजावत राहिली….कधी तरी प्रीतीचा आईच्या कुशीत डोळा लागला….

????????????????????????????????????????????????????????????????

छान नऊवारी साडी आणि त्याचा साज शृंगार केलीली प्रीती जेव्हा मांडवात आली तेव्हा सगळे बघतच राहिले कौतुकाने…अक्षय ने त्याला म्हटले.. तोंड बंद कर बच्चू….तुझीच बायको आहे.

प्रत्येक विधीला निनाद ने तिचा हात घट्ट धरून ठेवला …शेवटी तिने हळूच त्याला सांगितला…हळू पकड ना.. अंगठी रुतत आहे ..लागते आहे मला..,.

कन्यादान चा विधी प्रितीच्या डोळ्यात पाणी आले..आधीच प्रितीचे बाबा फारच इमोशनल झाले होते..काका तुम्ही फक्त प्रीतीचा हात द्या माझ्या हातात…मी वचन देतो तिला खूप सुखी ठेवेन..

प्रीती निनादचे लग्न एकदम धूमधडाक्यात पार पडले. सगळ्यांची लग्नात खूपच मज्जा केली..विधी ही दोन्ही पद्धतीने झाले म्हणून दोन्ही घरचे खुश…

कान पिळी चा विधीला तिने अक्षय आणि आपल्या आते भावाला बोलावले….

अक्या साल्या…पार्टी बदलीस ना…त्याने हसत विचारले….

बायकोचा आग्रह बाबा…कळेल तुला ही आता…!!!! तशी ही खूप शहाणी निघाली हा प्रित्स …मलाच भाऊ बनवून टाकला आणि जबादारी दिली…

शहाणीच आहे माझी बायको मग..वाटले काय तुला..!!!

काय साल्या बोलतो आहेस ..सगळे बघतात ना..हळू बोल जरा…

अरे बायकोच्या भावाला सालाच म्हणतात ना..मी काय शिवी नाही हा दिली त्याला…काय अक्या बरोबर ना….!!!!!

????????????????????????????????????????????????????????????????

निनाद वरात घेऊन घरी आला…पण कार मधून उतरून तो आणि प्रीती बाहेरच  थांबले..सगळ्या मित्र मैत्रिणी नी त्या दोघा साठी प्रवेश द्वारा पर्यंत गुलाब पाकळ्यांचा सडा घातला होता…आणि निनादला तिला उचलून न्यायला आग्रह केला…त्याशिवाय कोणी हटायला तयार नव्हते…
शेवटी मुहूर्त टळेल म्हणून निनाद  ने तिला हळूच विचारले…

मे आय??

तिने लाजून मान खाली घातली..काय बोलणार अश्या वेळी…आणींकही कळायच्या आत निनाद ने तिला अलगद उचलले….‌‌आणि तिला दारात घेऊन उभा राहिला…

खाली उतरव ना मला आता…असे प्रीतीने लाजून म्हटले तेव्हा सगळीकडे हास्याची लहेर उठली…प्रीतीने गृह प्रवेश केला आणि आई ने तिला सगळ्या घरच्या विधी करायला घेतल्या… तेवढ्यात निनाद चा मोबाईल वाजला म्हणून त्यानें मेसेज बघितले आणि त्याचा चेहरा वरचा रंग उडाला… अक्षय ब रोबर होता त्याने मेसेज दाखवला…

कॉंग्रेट्स…शेवटीं तुझ्या मनासारखे केलेस तू..पण ती माझी  आहे हे लक्षात ठेव.मी नेणार तिला माझ्या सोबत लवकरच..मंदार.

साला..नालायक …कुठला… धमकी देतो काय..तू लक्ष देऊ नको निनाद काही नाही करणारं तो ..

मी नाही घाबरत रे त्याला …मला वेगळीच चिंता आहे ह्याने प्रीतीला पण मेसेज केला असेल ना….आज चा दिवस खूप स्पेशल आहे रे.. मला विघ्न नको आहे..आणि कोणालाच माहिती नाही मंदार बदल इथे…तिला असा काही मेसेज आला आहे म्हटले ना…तर तिला पनिक अटॅक येईल…उगीची बदनामी होईल रे तिची…

तूं काळजी नको करू ..मी प्रियाला बोलवतो …बघू काहीतरी करू…

प्रियाला त्याने बोलावले आणि तिला सगळी परिस्थिती सागितले..ती म्हणाली मी बघते काय करायचं ते..अक्षय तू बाहेर जा..आणि मी येई पर्यंत परत वर यायचे नाही..

ती प्रितीकडे गेली आणि म्हणाली…प्रीती मोबाईल दे ना तुझा..माझा डेड झाला आहे..हा अक्षय पण ना कुठे गेला काय माहीत……प्रीतीने मोबाईल काढून दिला..आणि ती call करायच्या बहाण्याने बाहेर आली ….तिचा मोबाईल चेक केला… एक मेसेज होता मंदार चा…unknown number वरुन….त्याने तो न वाचता डीलिट केला आणि नंबर ब्लॉक केला….

????????????????????????????????????????????????????????????????‌

रात्री बराच वेळ सगळे गप्पा मारत बसले..काकी ने तिला रूम मध्ये नेऊन सोडले आणि म्हणाली …बघ आवडते का..त्याने आत सगळेच बदलले आहे…

आत निनाद ची रूम पूर्णपणे बदली होती… अच्छा म्हणून मला येऊ देत नव्हता हा घरी…छान फ्लोरल वॉलपेपर लावला होता एका भिंतीला . बाकी लाईट कलर च्या भिंती..दोन वेगवेगळी कपाट, छोटे ड्रेसिंग टेबल, आणि तिच्या वीणा साठी स्पेशल जागा .बेड जवळ छान दोघांचा लंडनचे फोटो फ्रेम आणि सोबत एक फोटो अल्बम होता…ती तो फोटो बघत बसली..उर मात्र खूप धडधडत होते…..

????????????????????????????????????????????????????????????????

 

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...