Dec 08, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 36

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 36

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

निनाद ने पुण्याला आपले ऑफिस जॉईन केले..लग्नाला आता १ महिनाच राहिला होता…लग्नानंतर काही महिने निनाद पुणा मुंबई करणार होता…प्रीती मुंबईला राहणार होती…

एक वीकेंड ला निनाद मुंबई ला यायचा…तर एक वीकेंड ला प्रीती पुण्याला जायची…असाच एका वीकेंडला प्रीती पुण्याला आली होती आणि प्रिया कडे राहणार होती…

दोघा फिरून आले आणि येताना आईसक्रीम घेऊन आले… प्रिया ऑफिस करून स्वापांक करत होती.प्रीती तिला मदत करत होती…अक्षय आज उशिरा येणार होता क्लिनिक मधून..प्रिया ने सांगितले प्रीती तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे….आज निनाद ला पण सांग इथेच झोप म्हणून …काहीच गरज नाही रूम वर जाण्याची…अक्षय आणि तो बाहेर झोपेल…आपण दोघी आत्त..म्हणजे बोलता येईल ….

जेवल्यावर सगळे टाईमपास  करत बसले…प्रिया तिला आत घेऊन गेली काहीतरी दाखवायचे आहे..जाताना  तिच्यात आणि अक्षय मध्ये नेत्र पालवी झाली होती…तिने बेडरूम चे दार बंद केले…हे बघ तुला होतंय का ते..

ई ई…काय आहे हे..मी  नाही असले काही घालत तुला माहिती आहे ना…!!!!!

अरे हनिमून ला जाणार आहेस ना…मग घाल ना प्रीती..कशी गा तू अशी…काय देवदर्शनाला जाणार आहेत दोघे.!!!! माडचाप कुठली…

तिचा चेहरा बघून शेवटी प्रियाने विचारले…
तुझी तयारी आहे ना प्रित्स ???म्हणजे तुला माहिती आहे ना लग्न नंतर काय होणार असते  ते..

प्रिया!!! तुला तर सगळेच माहिती आहे ना….मला खूप टेन्शन आले आहे…निनाद ला कसे सांगू…..

त्याला माहिती आहे …उलट  मला वाटते, त्याला तुझीच काळजी आहे तू तयार नाही आहेस ना म्हणून…कमाल आहे !!! तुमच्यात लंडन ला असताना पण काही झाले नाही…मानले बाबा तुला आणि तुझ्या निन्या ला…कित्ती काळजी करतो तुझी….

निन्या नाही हा म्हणायचे त्याला…!!!!

प्रित्स …जास्ती ताणू नकोस ग… दुखवशील त्याला.चांगला मुलगा आहे तो..किती मनापासून प्रेम करतो तुझ्यावर ..तुला कल्पना पण नाही आहे….

माहिती आहे मला…म्हणून काळजी वाटते…पण मी माझ्या मनाची तयारी केली आहे प्रिया..मी नाही दुखावणार त्याला…त्याच्या बायको कडून ज्या अपेक्षा आहेत ना…त्या सगळ्या मनापासून पूर्ण करेन मी….बघच तू…

गुड वेरी गुड…

अजून एक.. हे घे..पिल्स आहेत…कशा घेतात ते लिहिले आहे आता..वाच..

प्रीतीने लाजून त्या पिल्स घेतल्या…

बाय दा वे ..बाहेर अक्षय निनाद ला कौन्सेलिंग करतो आहे…तुला हवे तर अक्षय ची मैत्रीण डॉक्टर आहे तिच्या कडे जाऊ…

कोणाची आयडिया आहे ही..हे नक्कीच तुझे डोके नहीं हो ना…

अक्षय ची…तो डॉक्टर आहे प्रित्स..त्यामुळे हे सगळे..तू काही निनादला बोलणार नाही आणि त्याला बोलून देणार नाहीस…म्हणून हा खटाटोप….

डॉक्टर मित्राचा उपयोग नको का करायला???आणि तसे पण आम्हाला इतक्यात आत्या किवा मावशी बनायचे नाही आहे….सो प्लीज युज कर त्या.

लग्नानंतर सगळेच बदलत प्रीती..तुझ्याकडून अपेक्षा असणारच ना..एक तर तुम्हीच ही एकुलते एक आहात मग काय होऊन जाऊन दे लवकर….तरी बरं आपले लव मरिएज आहे आणि नवरे समजूतदार आहेत…सो चील…नाहीतर आज ही मुलीवर लादली जाते प्रेग्नेंसी….खोटे वाटत असेल तर विचार अक्षय ला…सोड ते बाहेर जाऊ या…

तू जा…मी पडते इथे…दमली आता.जा बघ काय करतात दोघे …

प्रिया बाहेर येऊन बसली…तसे निनाद ने विचारले.. ठीक आहे ना ती???

तशी ठीक आहे…तू नको टेन्शन घेऊ…
.????????????????????????????????????????????????????????????????

मला माहित आहे प्रिया.तिला मी आवडतो ते.तू बघायला पाहिजे ती माझ्याकडे बघते तेव्हा….वेडपट आहे थोडी आपण प्रेमात पडतो आहे हे पण तिला कळत नाही अजून……बघच तू आता कशी स्वतःहून कबुल करते ही नाही ते…

????????????????????????????????????????????????????????????????

लग्नाला आता १५ दिवसच राहिले होते..शेवटचा आठवडा निनाद तिला फिरायला घेऊन जातो…ती सांगते पुढच्या शनिवार रविवार जमणार नाही भेटायला…काम आहेत…डायरेक्ट लग्नाला भेटू आता..

काही स्पेशल प्लॅन्स आहेत काय तुझे??? भेट ना थोड्यावेळ साठी…असे काय करते….

नाही जमणार….मला खूप काम आहेत  आणि मला पार्लर वैगरे सगळे करायचे ….परत ऑफिस मधून जमत नाही..काम पण खूप आहे….

काहीपण ..तुला काय पार्लरची गरज आहे…अशीच छान दिसते तू…पण ठीक आहे सगळ्याच मुली करतात काहीतरी लग्न साठी..तू पण हौस करून घे….पण प्लीज केसांना काही करायचे नाही … प्रॉमिस…

तशी ती फक्त हसली….वेडा आहेस तू.. निन्या..

????????????????????????????????????????????????????????????????

दोन्ही घरी लग्न विधी सुरू झाल्या…निनाद ची उष्टी हळद ..प्रितीकडे आली ..निनाद कडे जोरदार हळदीचा कार्यक्रम सुरू होता….वेळात वेळ काढून याने तिला मेसेज केला…

रंग चढा है  हल्दी का…
इतंज़ार है तुमसे मिलने का।।।
अंग पिला हो गया है।।।
बस इतंज़ार है तुम्हारे साथ
लाल लाल होने का।।।।

????????????????????????????????????????????????????????????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...