Login

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 35

As tory of Love friendship and Love in Friendship.

दुसऱ्या दिवशी सकाळी, प्रीती नाश्ता घेऊन निनाद चा घरी आली…बघते तर निनाद तयार होऊन बसलेला..

तू इतक्या लवकर उठला पण???….

मग बाहेर जायचे आहे आज मला…!!! म्हणून लवकर तय्यार होऊन बसलो आहे…तूच  उशिरा आली आहे….त्याने तिचे परत केस ओढत म्हटले..तसे तिने डोळे वटारले…

आईला घाबरते ?? त्याने मेसेज केला…

शांत रहा जरा..काय चाललंय सगळ्यांसमोर ..!!!

हेही ही ही…मी नाही घाबरत…मी असाच वागणार…तू बघ काय करायचं ते….????????????????????

????????????????????

तुमचा मोबाईल वर रोमान्स करून झाला असेल तर …निघा आता इथून …आई ने दोघांना म्हटले तसे दोंघांचे चेहरे बघण्या लायक झाले….प्रीती चांगलीच गिरी मोरी झाली आणि बाहेर पळाली…तर निनाद ने आई ला मिठी मारली…काय गा आई !!! काहीही बोलते….

????????????????????????????????????????????????????????????????

आज प्रीती त्याला घेऊन बाहेर जाणार होती..कुठे ते काहीच सांगितले नव्हते…दोघा बाहेर आल्यावर तिने गाडी घेऊन आली ..

तू कधी शिकलीस गाडी चालवायला??? मला वाटले आपण बाईक ने चाललो आहे….

नाही आपण तुझा सूट बघायला जात आहोत…तुझ्या पसंतीचा घेणार आहे ..बाबा नी मला कामाला लावले आहे मला…सो तुला घेऊन चालली आहे !!!.

काय यार..मला वाटले की तू कुठे फिरायला घेऊन जाणार आहेस मला म्हणून सकाळीच तयार होऊन बसलो ना…मला नाही यायचा आहे ….त्याने तोंड वाकडे करत म्हंटले…

नेणार आहे ह तुला..पण मग लवकर सूट पसंत करायचा ओके..???

डन..पण आधी बाहेर जायचं …ओके…

चल…!!!

तिने गाडी काढली आणि गाडी पुण्याच्या दिशेने वळवली…

कुठे चाललो आहे आपण ..??? त्याला काहीं कळेना.

नीट नेते..विश्वास ठेव जरा तरी….फार लांब नाही नेणार आहे ..

तिने गाडी लोणावळा ला एका पंचतारांकित रिसॉर्ट मध्ये नेली…दोघा एका कॉफी शोप मध्ये गेले….

कशी वाटली जागा…

मस्त आहे…पण एवढ्या लांब का आलो आहोत आपण….ते पण कॉफी प्यायला…???

सांगते सांगते…एक तर मला ड्रायव्हिंग यायला लागले हे तुला दाखवायचे होते, दुसरे चांगली जागा तुला घेऊन जायला मला मुंबईत मिळाली नाही, तिसरी मला इथली कॉफी आवडते…आणि चौथी आणि मेन गोष्ट तुझ्या बाबाचा ६० वाढदिवस येतोय आपल्या लग्न आधी तर हे हॉटेल पॅकेज गिफ्ट्ट कसे वाटेल ते बघ आणि सांग म्हणून…

Goodness Princess ..how do you manage all this???

त्याला आश्चर्य चा धक्का बसला…किती सहजरीत्या तिने सगळे प्लॅन केले.आपल्या आई वडिलांची काळजी घेतली आणि आता त्यांची ६० ही प्लॅन करतेय…. गॉड ..तू परफेक्ट आहेस प्रीती…त्याच्या मनात आले…

त्याने तिचा हात पकडुन म्हटले…थँक्यू..इतके सगळे तू नीट सांभाळलं…मी नसताना सुद्धा …मुलगा म्हणून माझा काहीच उपयोग झाला नाही..आई ने सांगितले मला सगळं..आज बाबा आहेत ते फक्त तुझ्या मुळे प्रीती…नाही तर माहीत नाही काय झाले असते…त्या दिवशी नसती तर ??आईला हाक तरी मारू शकले असते का ते…?? आवाज गेला असता का???किती तरी अनउतरीत प्रश्न आहेत… आता ही तू त्यांचा विचार करून प्लॅन करते आहेस ??? मानल बाबा तुला…!!!

आपल्या आई बाबांनी कधी एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये ना चहा पण घेतला नसेल ना …म्हणून त्यांना गिफ्ट …आपण दोघं ही छान कमवतो मग काय हरकत आहे….तुला माहित आहे एकदा काकी बोलता बोलता काय म्हणाली…कसे असले का पंच तरांकित हॉटेल आतून ..एकदा बघावे से वाटते..म्हणून ही आयडिया…..नाहीतरी एवढे पैसे खर्च केले म्हणून वर बोलतील…माझ्या आई बाबा ना पण मी पाठवणार आहे त्यांच्या लग्नाच्या वाढदिसानिमित्त….आणि हो तुझे आभार प्रदर्शन झाले असेल तर रिसॉर्ट बघू येऊ या…तिने विचारले…

चल…

दोघा हातात हात घालून रिसॉर्ट बघून येतात…निनाद ला रिसॉर्ट खूपच आवडते….एखाद्या वीकेंड ला प्रीती तुला पण लग्नानंतर येऊ…चालेल..

तशी ती लाजली… चल आता…

प्रीती …..ऐक ना !!!!! आपण हनिमूनला कुठे जायचे..सांग ना…

तिने मान खाली घातली…मला नको विचारू तूच ठरव काय ते…मी काय सांगू …तिने मेसेज केला…

ठीक आहे…Ur wish….मला वाटले तू सांगशील काहीतरी पण ठीक आहे….मीच ठरवतो काय ते …नंतर म्हणू नकोस मला विचारले नाही म्हणून…

????????????????????????????????????????????????????????????????

तू ड्रायव्हिंग चांगले करते आहेस ..कधी शिकलीस ???

परत आल्यावर…जाणवले आता शिकायला पाहिजे म्हणून. आणि कधी ही उपयोगी येऊ शकते…..तिने हसत म्हटले…

खोटे..!!! खरे सांग ना…भीती वाटली ना त्या दिवशी मला काही झाले असते तर….तू काय केले असते..म्हणून शिकलीस ना…

हम्म…. थोडा हा पण भाग आहे, थोडा लंडन चा प्रभाव आहे …तिथल्या मुली कशा मस्त ड्राईव्ह करतात आणि थोडा काका ना बघून वाटले …आपल्याला हे सगळे आले पाहिजे…त्यांना नेताना  कशी बशी रिक्षा मिळवली मी… मग जाणवले स्वतःचा नाकर्ते पणा म्हणून शिकली….

good very good…तू इंडिपेंडंट असेलच पाहिजे प्रीती…उगीच कोणावर अवलंबून राहू नकोस चांगले पण नाही ते ..उद्या तुला कुठे बाहेर जायची संधी मिळाली ..तरव तुला सगळे जमले पाहिजे …प्रत्येक वेळी मी बरोबर असेनच.. असे नाही ना….

क्षण तिला कुठे तरी एक वाक्य वाचलेले आठवले….मैत्री आणि प्रेम त्याच्यावर करा जो तुम्हाला उडायला शिकवेल सतत प्रोत्साहित करेल… ना की त्याच्यावर जो तुम्हाला प्रेमात बांधून ठेवले…

????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️

दोघा निनादचा  सूट बघायला गेले…एक ट्रायल करत निनाद बाहेर येऊन तिला दाखवत होता..आणि ती नाक उडवत होतो…शेवटी तिनेच एक सूट सिलेक्ट केला आणि त्याला ट्रायल ला पाठवला….बराच वेळ तो बाहेर आला नाही म्हणून तिने नॉक केले…

२ मिनिट आलोच…..

तो बाहेर आला …आणि ती त्याच्या कडे बघतच राहिली…कसला हँडसम दिसत होता…एक तर आधीच उंच त्यात आता गव्हाळ निनाद अजूनच उजळला होता. व्यायाम करून शरीर एकदम फिट केले होते त्यात केस छान सेट केले आणि बारीक फ्रेम चष्मा … भारदस्त दिसत होता… तीच काय दुकानातले सगळे बघायला लागले त्याच्या कडे…

तो तिच्या बाजूला राहिला आणि हळूच कानाजवळ जावून म्हणाला..अा बंद कर…आवडली तुझी चॉइस…

तशी तिने स्वतःच्या डोक्यावर टपली मारून घेतली….निनाद ने सेल्स मनला इशारा केला…. आणि तो एक हेवी बनारसी दुपट्टा घेऊन आला. निनाद ने तो प्रीतीच्या खांद्यावर नीट टाकला आहे तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला…

सो सूट होतंय ना मी तुला????

तिला लाजून पटकन बाजूला झाली…..

सर !!!! ह्याच्यावर टाय बघणार ना सेल्समन ने विचारले…

तुम्ही मॅडमच्या चॉईस चा दाखवा त्यांची पसंत खूपच चांगली आहे….त्याने हळूच तिला डोळा मारत म्हटले…

तसा प्रीती ने मोबाईल काढून त्याला मेसेज केला ..माझी नजर लागेल तुला रे… प्लीज सगळ्यां समोर नको ना असा वागुस …. I feel so embarrassed….

Princess enjoy !!!  हे दिवस परत येणार नाहीत पण तुला नसेल आवडत तर नाही करणार असं पुन्हा…

त्याचा  सूट घेऊन दोघा बाहेर निघतात…आणि तो तिला घेऊन कॉफी शोप मध्ये बसतात….

प्रिन्सेस …तू पब मध्ये येशील..कित्ती दिवसात पार्टी नाही केली…आपण सगळ्यांनी….उद्या जाऊ या…ना…

वेडा आहेस का …लग्न होते आहे आपले आणि काय पब ला ????

का लग्न होते म्हणून काय झाले…काहीच बदलत नाही आपल्यामध्ये…ते मला माहित नाही …तू उद्या येणार आहेस माझ्याबरोबर….तू ऑफिस मध्यला पार्टी ला जाते ना.मग माझ्याबरोबर यायला काही प्रोब्लेम आहे का???

नाही प्रॉब्लेम नाही आहे …पण तेव्हा आपण पुण्याला होतो..प्लस घरचे कोणी नव्हते…मग चालायचं.आता आता घरचे विचारणार नाहीत का एवढ्या रात्री कसे आलात ते आणि मला कोण सोडेल तुझ्याबरोबर एवढ्या रात्रीचं हे मुंबई ते लंडन नाही…

अरे एवढंच ना मी बोलतो बाबांशी तुझ्या.. होणारी बायको आहेस तू माझी… घेऊन जाऊ शकतो तुला मी तुला फिरायला…

पबमध्ये????

हो त्याला काय… घरी सांगून येणारे तुला मी मग बघू कोण काय बोलते

दुसऱ्या दिवशी निनाद ,प्रीती चा घरी गेला…बाबंचाही बोलता बोलता म्हटले प्रीती ला बाहेर घेऊन जाऊ का ..पार्टी आहे ऑफिस मधल्यांची..सगळ्यांना भेटायचे आहे तिला. आणि उशीर होईल रात्री ..मी घर पर्यंत सोडेन तिला..बाबा नी होकार दिला…

निनाद ने छान क्लब शोधून काढला होता…अक्षय  प्रिया ज्योती सुमित सगळ्या ग्रुप बरोबर निनाद तिला घेऊन जाणार होता…IT मध्ये अश्या पार्टी खूपदा होत असत पण प्रीती त्यात जास्ती रमत नसे…एक तर जास्ती कोणाशी मैत्री नव्हती आणि उगीच कोणी मस्ती वैगरे केली तर त्याचे पडसाद नंतर व्हायचे…म्हणून नावापुरती जाऊन यायची….

संध्याकाळी तो प्रीती ला घ्यायला आला आणि बघतच राहिला….मस्त काळा शॉर्ट ड्रेस आणि हाय हीलस वर हलका क्लासी मेकप आणि केस छान सेट केलेले…..त्याच्या मनात आले…इतक्या मुली बघितल्या आज पर्यंत…पार विदेशी पण…पण हिच्यात जी कशिश आहे …ती कोणातच नाही….आपसूक त्याच्या तोंडातून निघाले…

वाऊ…सुपर्ब..ऊ लूक सेक्सी टुडे….!!!

ओह mr. deskmukh ,काय हे…!!! असे तोंडावर सेक्सी वैगरे बोलतय ते पण होणाऱ्या बायको ला…

आई शपथ..आजवर एकही मुलीला अश्या नजरेने बघितले नाही…तुला पण नाही बघितले कधी….पण माहित नाही कसे …आपसूक तोंडात न निघाले…..पण बाय दा वे….होणाऱ्या बायकोलाच सेक्सी म्हटले ना…मग काय प्रोब्लेम आहे…प्रॉब्लेम तेव्हा होईल ना…मी दुसऱ्या कोणाला असे काही बोलेंत तेव्हा….हो ना…

बोलणार आहेस का मग..??? तिने डोळे रोखून विचारले…

चांस च नाही आहे …तुझ्या सारखी दुसरी कोणी भेटलीच नाही ना….म्हणून तुलाच पाठवला देवा ने माझ्याकडे….

????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️

आज सगळा ग्रुप बरेच दिवसांनी एकत्र भेटला होता….मस्त वातावरण, छान लाऊड मुसिक आणि लाइट्स ..सगळ्यांनीच नाचायला सुरुवात केली..आधी प्रीती थोडी बुजली पण अक्षय ने तिला मोकळे केले आणि निनाद बरोबर तिने मस्त एन्जॉय करत डान्स केला..तिच्या एक एक डान्स मोवेस बघून निनाद तिच्या अजून प्रेमात पडत होता….होता होता एकाने तिला धक्का दिला ..तिला थोडे बाजूला घेतल निनाद ने….पण परत कोणी तरी नाचता नाचता धक्का मारायला आले…तसे निनाद ने तिला आत रिंगमध्ये ठेवले आणि सगळ्या बाजूने मित्रानी कव्हर केले….

आत्ता स्लो मुसिक  चालू झाले होते…हळू हळू फक्त कपलच डान्स फॉलोर वर उरली होते…त्याने तिच्या कमरेत हात घालून जवळ खेचले आणि दोघा नाचायला लागले….तशी ती हळूच म्हणाली…. थँक्यु….

प्रिन्सेस तू आहेस ब्युटिफुल पण म्हणून तुझ्या बरोबरच असा गलिच्छ प्रकार बरोबर वाटत नाही आणि तू तर स्पेशल आहेस…तुला असे संकटात टाकेन का कधी ???त्या आधीच काहीतरी करेन ना..असे म्हणत अलगद तिच्या कपाळावर आपले ओठ ठेकवले….

He is my Man…असा विचार तिच्या मनाने येताच तिला खुदकन हसू आले…आणि म्हणाली….

मला सोडून जाऊ नकोस निनाद….!!!!!!

विश्वास ठेव प्रीती…माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझी सोबत हवी आहे…

????????????????????????????????????????????????????????????????