Dec 08, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 34

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 34

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

 

 

प्रीती बराच उशीर घरी पोचली…छान झोप काढून घेतली दोन दिवस आणि आई कडून लाड करून घेतले….पुण्याला जॉईन व्हायच्या आधी एकदा निनाद चा घरी जाऊन आली..त्यांच्या साठी ही ती गिफ्ट घेऊन आली होती….काकी ने तिचे खूप कौतुक केले आणि लग्नाची तयारी कशी आणि काय काय करायची ते सगळे प्लॅनिंग केले…

दोन दिवसांनी ती पुण्याला ऑफिसला जॉईन झाली. साहिल सरांचा शेवटचा आठवडा होता… महिना अखेर ते अमेरिकेला जाणार होते..प्रीती शक्यतो त्यांच्याशी जास्ती बोलायची नाही त्या दिवसापासून फक्त काम आणि हेंड ओवर चे काम चालायचे…दोघात एक अवघडलेपण आला होता…अशातच साहिल ने तिला डिनर साठी विचारले…आधी तिने खूप आढेवढे घेतले पण शेवटी तयार झाली, नाही तरी परत कुठे भेटणार होते दोघा ह्या आयुष्यात…

अवडघडले पण दूर करत साहिल तिच्याशी मन मोकळ्या गप्पा मारत होता आणि बोलता बोलता त्याने सांगितले की तिचे प्रमोशन करण्यात येत आहे ..एक दोन दिवसात तिला लेटर मिळेल…तसेच मुंबई ला बदली करून ही…

मुंबईच्या ऑफिस मध्ये ती आता टीम लीडर म्हणून जॉईन करणार होती….हे ऐकुन तिला खूप आनंद झाला….साहिल ला तिने अनेक धन्यवाद दिले पण ह्या प्रोम्शन चे श्रेय साहिल ने प्रितीलाच दिले वर पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा ही …एका चांगल्या नोटवर दोघे आपल्यापल्या दिशेला वळले…

प्रीतीने निनाद आपण साहिल बरोबर डिनरला गेलो होतो हे सांगितले. तिला वाटत होते की निनाद ला ते आवडणार नाही पण निनाद ने त्यावर एखाद्या मित्र बरोबर बाहेर जेवून यावे तशी प्रतिक्रिया दिली ….मग तिने पुढे चे आपल्या प्रमोशन चे सांगणे टाळले…आधी काहीतरी हातात येऊ दे मग सगळ्यांना सांगू असे तिने मनोमन ठरवले….

दोन दिवसांनी  तिला hr,ने बोलावून प्रोम्शन चे लेटर दिले ..तेव्हा ती आनंदाने उडीच मारली…पाहिले प्रोम्शन !!!!! ..

आनंदाने तिने आधी घरी फोन लावला आणि मग निनादला..त्याला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला…शेवटी ती deserving होती ह्या प्रोम्शन साठी ..कित्ती मेहनत घेतली होती ..आठ दिवसांनी ती मुंबई ऑफिस ला जॉईन करणार होती.

❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

दोन अडीच वर्षाच्या पुण्याचे वास्तव्य सोडून ती आज आपल्या घरी राहायला जाणार होती…म्हणून खूप आनंदात होती. घरचे ही खूप  खुश होते…निनादला ला मात्र चिंता लागून राहिली ..आपण लंडन हून परत आल्यावर पुण्याला जॉईन व्हावे लागेल… लग्नानंतर प्रीती आणि तो पुण्याला सेट्टले व्हावे असे त्याच्या मनात होते आणि मध्येच प्रितीची बदली झाली मुंबईला…म्हणजे दोघा पैकी एकाने जॉब शोधणे आले..!!! हा विचार तिच्या डोक्यात अजून आलेला दिसत नव्हता…

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

इकडे निनाद खुपच एकटा पडला होता..उत्साही लंडन आता प्रीती शिवाय एकदम भकास वाटायचे..सतत हलका हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण ह्या मुळे अजूनच उदासी असायची….प्रीती असताना लंडन किती फिरू आणि कित्ती नको असे व्हायचे त्याला…तिला नवनवीन जागा दाखवणे आणि तिला आवडेल अश्या जागा शोधणे हा छंद झाला होता जणू….खूप मिस करायचा तिला…मग अशा वेळी तिचे लॅपटॉप वर फोटो बघत बसायचा….कधी एकदा मुंबई परत जातो असे सतत वाटायचे….प्रीती त्याची रोज एकदा दोनदा तरी व्हिडिओ चाट करायची, मेसेज तर सतत चालू…तरी खूपदा मिस करायचा तिला..वाटायचे आता पळून जावे इथून..

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

प्रीती ने आपले पुण्याचे सगळे घर आणि ऑफिस मधले काम  आवरून घेतले..शृक्रवरी तिने पुणे सोडले आणि मुंबई ला दाखल झाली. ..सोमवार पासून  नवीन ऑफिस जॉईन करणार होती.आत्ता शनिवार रविवार शॉपिंग मध्ये जात होते.सगळी कडून देणे घेणे, लग्नाचे शॉपिंग साड्या दागिने ह्यांचे शॉपिंग सुरू होते.अजून निनाद चे शॉपिंग बाकी होते…

????????????????????????????????????????????????????????????????

अशातच एक शनिवारी प्रीती , निनादकडे आली..थोडा वेळ गप्पा मारून ती निघाली…निघताना काका दिसले नाहीत म्हणून तिने विचारले काका कुठे आहेत …घरी नाहीत का???

खाली असतील गेरेज मध्ये….ते आणि त्यांची गाडी बसले असतील खुडबुड करत…नेहमी प्रमाणे…काकी ने वैतागून म्हंटले….काका आणि त्यांची गाडी हे एक अजब प्रकरण होते…जुनी गाडी ला विकायची सोडून ते सारखी रेपिर करत अब्सायचे..तो त्यांचा आवडता छंद होता…

काका ना व भेटुन जाते…म्हणत प्रीती खाली उभ्या उभ्या भेटायला म्हणून गेली…तर काका गाडी खाली काही तरी काम करत होते..चांगलेच घामाघूम झाले होते…आणि डाव्या खांद्याजवळ जरा दुखत आहे असे म्हणाले…थोड्यावेळ असेच तिथे बोलत उभी राहिली तर काका चा चेहरा पिलवटलेले वाटला..तिला वेगळीच शंका आली म्हणून कसाबसा हात देऊन त्यांना बाहेर काढले…आणि रिक्षात बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आली….आणि त्यांना इमेर्जन्सी मध्ये दाखल केले….डॉक्टर ने सांगितले की हार्ट अटॅक आहे….मग तिने घरी सांगितले आणि निनाडच्या आई ला घरी सांगायला सांगितले..तो पर्यंत भराभर फोन करून  आपल्या मित्रापैकी  सुमितला बोलावून घेतले…हॉस्पिटल मध्ये मदत लागेल म्हणून….

सगळे धावत पळत हॉस्पिटल ला आले…हे काय अवचित झाले आणि कसे कोणालाच कळेना.. काकू तर हवालदिल झाल्या होत्या…त्यांना सगळ्यांनी खूप धीर दिला..प्रीती एक कर्त्या बाई सारखी सगळे निर्णय घेतले होते आणि व्यवस्था केली होती….पण अशा वेळी निनाद ने असणे खूप गरजेचे होते…काकी ने निनाद ला फोन लावला….

थोड्या वेळात त्याला परिस्थिती सांगितली आणि काय करावे हे विचारले….ऑपरेशन करायचे हे ठरले आणि निनाद यायला निघाला…प्रीतीने फोन हातात घेतला आणि निनाद ला समजावले..तो घाईघाईत येऊन काही फायदा होणार नव्हता…

ऑपरेशन करावे लागणार आहे हे तर नक्की पण लगेच नाही..आता त्यांना स्टेबल करणे गरजेचे आहे…नंतर मुंबईच्या हॉस्पिटलला वैगरे दाखवता येईल…आताच लगेच येऊ नकोस …मी आहे…सगळे ठीक होईल…एवढं विश्वास ठेव……

निनादला ही ते पटले…भावनिक होऊन चालणार नव्हते. त्यांचे सगळे रिपोर्ट्स वैगरे दाखवून , डॉक्टर्सशी गाठभेट प्रीतीने एक हाती सांभाळले.हॉस्पिटलच्या फेऱ्या, टेस्ट , नातेवाईकांची विचारपूस सगळे जातीने बघता होती. एकदा निनादच्या मावशीला तिने बोलताना ऐकले…

पत्रिका नीट बघितली ना हीची…लग्न चा आधीच सासऱ्यराला असे झाले …सांभाळ बाई…प्रीती ने बोलणे ऐकून खूप वाईट वाटले पण काहीच झाले नाही असे भासवत  ती दोघी साठी चहा घेऊन आली.

प्रीती होती म्हणून आज आपले कुंकू वाचले तरी..हा विचार काकीच्या मनात आला..नाहीतर काय अनर्थ झाला असता..!!!

काका बरे होऊन घरी परत आले. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला…त्यांच्या तब्येतीची आता खूप काळजी घेणे  आवश्यक होते…प्रीती जाऊन येऊन असायची निनाद चा घरी. निनाद सुद्धा आश्वस्त, प्रीती आहे सगळे बघायला आणि काही होऊन देणार नाही..

????????????????????????????????????????????????????????????????

होता होता निनाद यायची वेळ अाली….त्या मुळे स्वारी भलतीच खुश होती…कधी एकदा मुंबई येतेय असे त्याला झाले होते…त्याला माहित होते प्रीती नक्की येणार घ्यायला त्याला. सरप्राइज म्हणून…!!!कित्ती हळू हळू चालतंय हे विमान असे त्याला वाटत होते….मन कधीच घरी पोचलेले होते…

रात्री  प्रितीचे बाबा त्याला रिसिव्ह करायला आले होते…शेवटी तो होणारा जावई होता..तो मात्र प्रीती ला शोधत होता…शेवटी प्रितीचे बाबा म्हणाले…ती नाही आली…तू गाडीत समान ठेव मी येतो जरा वॉश रूम ला जाऊन…निनाद ने आपली नाराजी लपवली आणि गाडीत  सामान ठेवायला गेला.. तर ड्रायव्हरच्या जागी प्रीती होती….

प्रिन्सेस!!!

हाहाहाहाहा..कसे वाटले सरप्राइज…!!!!

मला खरंच वाटले तू आली नाहीस.!!!.त्याने तिला जवळ ओढत म्हटले…दुष्ट कुठली…

निनाद!!!.आपण  मुंबईत आहोत आणि बाबा आहेत बरोबर…तिने हलकेच बाजूला होत म्हंटले…

तेवढयात बाबा परत आले…निनाद ला घरी सोडून ते आपल्या घरी गेले…गेल्या गेल्या प्रीती ने निनाद ला मेसेज केला…उद्या तयार रहा..बाहेर जातोय आपण. झोप आता!!!!

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...