Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 31

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 31

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

बराच वेळाने दोघे भानावर येतात…चला..घरी वाट बघत आहेत आपली सगळे…फोन वर फोन येतील नाहीतर…

चल..मी तर तयारच आहे….तूच टाईमपास करतोयस….

अच्छा मी टाईमपास करतोय का!! शहाणी कुठली म्हणत तिची केसाची क्लिप काढली…

तू पण ना…..!!काय रे ..!!!

असाच राहू दे ना….छान दिसतात ते..

तिने लाजून मान खाली घातली आणि म्हणाली चल आता….

दोघा घरी आले..सगळे वाटच बघत होते..तिचे मोकळे केस पाहून प्रितीच्या आई ने तोंड वाकडे केले…ते निनाद चा नजरेत ने सुटले नाही…हळूच तिची क्लिप परत केली…सॉरी लक्षात नाही आले….

आई ने दोघं ना एकत्र बसवून औक्षण केले आणि प्रीतीची ओटी भरली. तिला एक छानशी गळ्यातले दिले आणि म्हणाली… लवकर  घरी ये आत्ता…. केव्हांची वाट बघत आहे घर आणि तुझा बेस्टी पण…आणि मायेने हात फिरवला तिच्या डोक्यावरून….सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तरळले….

तुम्ही दोघं इथे आहात तोपर्यंत आपण तुमचा घरच्याघरी साखरपुडा करून घेऊ लग्नाचं तो परत आल्यावर बघू असे निनादचे बाबा म्हणाले…काय चालेल ना तुम्हाला दोघांना.. दोघांनीही होकार भरला. लग्न आणि साखरपुड्यासाठी ची तयारी च्या गप्पा सुरू झाल्या.

निनाद प्रीतीला घेऊन हळूच  तिथूनच निघाला. जाताना सांगून गेला उशीर होईल घरी यायला जेवायला वाट बघू नका……
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

आपण चाललो कुठे आहोत…निनाद…ते तर सांग..

अक्च्युअली माहिती नाही…बस तुला घेऊन बाहेर जावेसे वाटले..

पाणीपुरी खाऊ या ना…..प्लीज ना..!!!!

प्रीतीचा विक पॉइंट म्हणजे पाणीपुरी..खुप खुश असेल तेव्हा तिला पाणीपुरी खायची हुक्की यायची….आणि निनाद ला तो प्रकार बिल्कुल आवडत नव्हता…तरी प्रिती त्याला नेहमी पाणीपुरी खायला घेऊन जायची…

अरे यार!!!! आहेच का तुझे अजून…मला वाटले लंडन ला जाऊन बदलली असशील…

कधीच नाही…मी आहे ती अशी आहे …बघ अजून वेळ गेली नाही….विचार कर..

आज बोललीस प्रिन्सेस ..पुन्हा नाही बोलायचे..चल… मागून मागून काय मागितले तर पाणीपुरी ..????????????????????????

????????????????????????????????????????????????????????????????

दोन दिवसांनी अक्षय प्रिया चे लग्न होते..निनाद आणि प्रीती, प्रियाकडे गेले.. थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारून, तिथे सोडून तो अक्षय कडे गेला…बराच दोघे गप्पा मारत बसले…आपले आणि प्रितीचे लग्न ठरले आणि लवकरच साखरपुडा करणार आहोत हे सांगितले…अक्षय ने आनंदाने त्याला मिठी मारली..

रात्री तिला डीनरसाठी म्हणून एका धाब्यावर घेऊन गेला…

अक्षय प्रियाच्या लग्नात दोघांनी मस्त एन्जॉय केले…ह्या नंतर  कदाचित आपला नंबर असेल ..अक्षय चा जागी मी तर प्रियाच्या जागी प्रीती असेल असा विचार मनात येताच निनाद खूपच खुश झाला…लग्न लागताना..निनाद, प्रितीकडे  अनिमिष नेत्रांनी बघत होता….

दोन दिवसांनंतर घरच्या घरी दोघांचा साखरपुडा झाला…सगळ्या मित्रमंडळी नी घरी कल्ला केला…आणि  त्यांना घेऊन बाहेर गेले…आज डिनर पार्टी निनाद आणि प्रीती कडून वसूल केली……

होता होता १० दिवसा ची सुट्टी संपली आणि निनाद प्रीती परत निघाले…आता ४ महिन्याने प्रीती एकटीच परत येणार होती आणि त्यानंतर ३महिन्याने निनाद….तो पर्यंत दोंघी घरचे लग्नाचा आणि तयारी सगळे करून ठेवणार होते.

????????????????????????????????????????????????????????????????

प्रीती सारखे वाटत होते की सगळे आपल्याकडे बघत आहे आहे तिला खूप अन कम्फर्टेबल वाटत होते शेवटी तिने निनाद ला म्हटले मला ना कसंतरीच वाटतें आहे, लोक आपल्याकडे बघत आहे अशी??..तो फक्त हसला..

सांग ना…असे काय झाले??? ..ती बराच वेळ हट्ट केल्यावर तो म्हणाला…

काही नाही..तुझ्या हातावर एवढी मेहेंदी आहे, त्यात तू आज कुर्ता घातला आहेस आणि प्लस छान दिसते माझ्या बरोबर…लोकांना आपण नवविवाहित जोडपे वाटत आहे ..हे हनीमून ला निघाले आहे…बस म्हणून बघत आहेत…

काहाही निन्या…सॉरी निनाद….तिने लाजत म्हटले..

हाहाहा निन्या चालेल..प्रीटी..त्याने ही चिडवत म्हटले..

????????????????????????????????????????????????????????????????

फ्लाईट मध्ये त्याने तिला खिडकी जवळ जागा दिली. दोघा छान गप्पा मारत मारत जेवले.पण त्याचे लक्ष सारखे तिच्या हातातल्या अंगिठी कडे जात होते…कसली मस्त दिसत होती तिच्या लांबसडक बोटांमध्ये आणि मधेच लकलखत होती…खास त्याने पसंत केलेली तिच्यासाठी…

असे काय बघतोय??

काही नाही..छान दिसतेय  रिंग…

येस मस्त आहे एकदम..परफेक्ट चॉइस आहे तुझा..माझ्या सगळ्या वेस्टर्न ड्रेस वर एकदम सूट होईल अशी आहे …आजकाल नाही तरी कोण घालत सोने रोज रोज…

म्हणूनच घेतली तुला… नाहीतर काढून ठेवशील. तू मंगळसूत्र रोज घालशील की कधीतरी म्हणजे तसे डिझाईन बघायला..

हम्म्म माहिती नाही…एवढं विचार नाही केला मी…

मग विचार कर ना… प्रिन्सेस.!!! त्याने तिच्याकडे बघत म्हटले तशी ती बावरली…

बाप रे ..गोष्टी मंगळसूत्र पर्यंत गेल्यात आता…परत परत मन मागे का ओढ घेते आहे…कसे बसे स्वतःला समजावलं…आता नाही परत परत विचार करायचा.

तिने विषय बदलत आपल्याला शाळेत आणि कॉलेज मध्ये  किस्से विचारले…निनाद मग भरभरून एक एक आठवणी सागायला लागला…जशी एक एक किस्से ऐकवत होता तिला जाणवत होते निनाद चे म्हणणे…लहानपणा पासून त्याला आवडायची ती…

कधी सांगावेसे नाही वाटले मला..का नाही विचारले तेव्हा…हे सगळे झाले नसते ना…!!!!

कधी हिंमतच झाली नाही..वाटत होते खूप पण कधीच हिम्मत नाही झाली एक तर तू माझी एकुलती एक बेस्ट फ्रेंड, उगीच बोलायचे बंद केले तर, किवा घरी सांगितले तर, आधीच तुझ्यामुळे मी खूप मार खाल्ला आहे लहानपणी ..म्हणून भित्ती पण वाटायची..कधी वाटायचे माझीच तर आहेस ..मग कशाला ड्रामा पाहिजे…म्हणजे लहानापासून सगळे आपल्या दोघांना एकत्र बघत आहेत…आई बाबा पासून सगळे चिडवतात..म्हणजे तुला ही माहित असेलच की आणि तुला काहीच हरकत नसावी…पण तू मंद तू सगळाच हसण्यावारी नेलेस..

आज चूक कळते आहे…. मनातल्या भावना तेव्हाच तुझ्या पर्यंत पोचल्या असत्या तर!!!!..काही गोष्टी खरंच बोलून दाखवायचा असतात….माझीच चूक झाली. बोललो असतो तर आज गोष्ट काही वेगळी असली असती ना….

कदाचित..!!!!

By the Way, बाबा कडे वकिली केलीस म्हणे माझी..ही सुधारणा कधी झालीं आपल्यात… सांगा तर जरा मॅडम..

मी काही वकिली वैगरे केली नाही हा..उगीच बाबा काहीही बोलतात…पद्धती खाण्यापिण्याच्या  सवयी वरून त्रास होईल म्हणाले …खरंच होईल असे निनाद???

हम्म्म नाही व्हायला पाहिजे..घरी संकष्टी वैगरे पाळतात..बाकी तुझे कुठे उपास वैगरे असतील तर सांग.नाही बनवणार…बाकी माझ्याकडून म्हणशील तर वार वैगरे काही असतील तर सांगत जा …जशी नेहमी सांगते तशी.मला तर वेज पण आवडते… बनवायचा म्हणशील तर तुझी मर्जी, कोणी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही आणि करून देणार ही नाही मी…हे वचन माझ्याकडून…बाकी यु र स्मार्ट..मेनेज करशील तू….

वाह !!! वॉट ऑफ कॉन्फिडन्स वा…!!थँक्यू..
मनावरचं ओझं उतरल प्रितीच्या ..थँक्यू निनाद तिने मनात म्हटले.

निनाद ने तिचा हात हातात गुफुन घेतला आणि डोळे बंद केले…ती बराच वेळ जागी होती आणि कधी तरी झोप लागली कळेलच नाही..

????????????????????????????????????????????????????????????????

बाहेर थंडीचा खूप चांगला जोर वाढला होता…भर डेसेंबर महिना होता… खिर्समस नुकताच झाला होता…तरी   सणाची नशा उतरली नव्हती….अजून  सगळीकडे खिरस्मस चे लाइट्स आणि दुकान सजली होती…हिला एकदा चर्च मध्ये घेऊन जायला हवे .. हिला नक्की आवडेल …नवीन अनुभव असेल.

चल घरी.. थंडी आहे खूप..उद्या जाऊ या…नक्की..

दोघा बाहेर आले. टॅक्सी बुक करायला गेले….बोल कुठल्या घरी जाऊ या..तुझ्या की माझ्या….

तूच ठरव…मी काय सांगू…!!!

ठीक आहे..माझ्याकडे जाऊ…तुला नंतर सोडतो रात्री…चालेले…

दोघा निनाद चा घरी आले…दोघांना चांगलीच थंडी भरली होती…प्रीती ने आधी गरम गरम कॉफी केली आणीं दोघा कॉफी घेत बसलेले…प्रीती ने अजून एक स्वेटर
चढवला तसा त्याने हीटर अजून वाढवला..आणि तिला जवळ ओढले…..

निनाद …नको ना..प्लीज…I am not ready …

????????????????????????????????????????????????????????????????

 

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...