एक छोटीसी लव्ह स्टोरी- 27

A story of Love, Friendship and Love in Friendship

नशे मध्ये प्रितीच्या थोंडून मंदार चे नाव ऐकून निनाद ला वाईट वाटलं… झटकन बाजूला होत तो बाहेर निघून गेला…

बाहेर फायर प्लेस जवळ बसून आपल्या विचारात गर्क झाला..मंदार चे नाव ऐकून त्याला खूप त्रास झाला होता..हे नक्की. एवढे प्रेम करत होती ही मंदारवर!!! आपल्यावर असे प्रेम करू शकेल कधी??

स्वतलाच समजावत राहिला बराच वेळ… तिने आधीच कल्पना  दिली होती..हे खूप कठीण असणार म्हणून…नाही म्हणत होती पण मीच राजी केले तिला. …मग त्रास का होतोय की आपली असून ही ती आपली नाही हे टोचत मनाला…. ये इश्क नाही आसान…हे का म्हणतात ते पटले त्याला.
बराच उशीर तो झोपायला गेला…पण रात्रभर डोळा लागला नाही…म्हणून सकाळी लवकरच उठला.. ब्रेकफास्ट  काय करावा  विचार करत होता…तेवढ्यात शीनाचा फोन आला….

सब ठीक?? क्या हुवा? रिझल्ट तो बता!!! ती उत्साहाने  बोलत होती…

तिचा तो  उत्साह बघून त्याला ही प्रसन्न वाटले. ..तिच्या आयडिया वरून निनाद ने ब्रेड जम टोस्ट वर कॉफी मग आणि हार्ट शेप बिस्किट्स घेऊन प्रीतीला उठवायला गेला…..
आता तिला शांत गाढ झोपलेले बघून त्याला मस्ती करायचा मुड आला….

गुड मॉर्निंग मुंबई….!!!!!!

ती खडबडून जागी झाली…..काय रे झोपू दे ना…डोके दुखत आहे…!!! असे म्हणत परत पांघरूण ओढले……

आरे हँगओव्हर आहे तो..उठ नाहीतर अजून डोके दुखेल तुझे….मस्त होती कालची रात्र….

हम्म्म..कल काय झाले???? तिने प्रश्न केला…( नक्की काय बोलतो आहे हा…काय झाले..कल ह्याने शंपेन दिली ह्याने …आपल्याला आवडली नाही…नंतर झोपलो बहुतेक..बसा मग हा काय बोलतोय)

म्हणजे तुला काहीच आठवत नाही .ओह गॉड…तुझा DDLJ  आठवतो…काजोल ला मागे टाकलेस तू काल…!!!

म्हणजे?? नक्की काय झाले??खरे सांग…निनाद ….

जास्ती काही झाले नाही…तुला जरा चढली होती…आणि तू जरा जॅकेट वाकेट काढून टाकले आणि ठुमरी MJ style मध्ये सुरू केलीस..एकदम बेकार होती..म्हणून तुला कसेबसे  रूम वर घेऊन आलो…आणि मग…

मग काय झाले …तिने घाबरत विचारले…

तू रडायला लागली..म्हणून मी तुला जवळ घेतले आणि माहिती नाही कसे ..आपण दोघं नी लिमिट क्रॉस केली…

खोटे बोलतोय तू…फेकू….

अरे खरंच…खोटे वाटत असेल ना तर बघ…हे बघ कसली मांजरी सारखी नख मारली आहेस तू ते….असे म्हणत त्याने शर्ट चे बटन काढले…

ओह असे झाले काय…मग ठीक आहे ….मला वाटले काय झाले काय काही ते…it's ok आपण UK ला आहोत…मग चालता हे…मग लाजत विचारले तुझी हरकत नसेल तर परत लिमिट क्रॉस करायला आवडेल मला….

हे ऐकून मी निनाद सटपटलाच… काहीतरी कारणे शोधू लागला पण तिने अगदी मधाळ आवाजात त्याला जवळ बोलवले….शेवटी तो तिच्याजवळ गेला… एकमेकांच्या डोळ्यात डोळे भिडलेले आणि प्रीती छान लाजत होती…आणि काही कळायच्या आतच प्रीतीने त्याचं कान पकडला आणि म्हणाली

बचू प्रत्येक मुलगी ना सिमरन नसते आणि प्रत्येक मुलगा सलमान नसतो.. आणि  हो मला नखं नाहीत तुला मारायला… वेडा कुठला !!! चल जा आता…

असे म्हणत त्याला उशीने मारायला लागली. आपली मस्ती पकडली गेली म्हणून निनाद पळायला लागलातो..दोघा ही खुप हसत होते… तो बिचारा उशीने मार खाऊन घेत होता मनात म्हणत होता.. चला सकाळ छान हसरी झाली…काल पासून अशी सीरियस होऊन बसली आहे !!!!

मारून झाले असेल तर प्लीज उठ आळशी !!!!…तयार हो लवकर बाहेर जायचे आहे….वेळ आहे १०.३०ची.. आटप पटकन …

दोघा नाश्ता करून बाहेर निघाले…कुठे जातोय हे फक्त त्याला माहित होते आणि तो प्रीतीला सांगायला काही केल्या तयार होईना. शेवटी आपल्या निश्चित ठिकाणी पोचले तेव्हा तिला सांगितले की skiing करायला आलो आहोत…२तास बुक केलेत… मस्त बर्फाने  अच्छादीत स्लोप वर आधी दोघांनी थोडे प्रशिक्षण घेतले आणि बराच वेळ दोघे एकत्र स्किंग करत राहिले…पहिल्यांदा घाबरले पण नंतर खूप मज्जा केली…

दुपारनंतर बाहेरच जेवून मग परत निघाले होते…कोणीच कोणाशी बोलत नव्हते…शेवटी निनादने शांतता मोडत म्हटले..

काय झाले प्रीती…कसला एवढं विचार करते आहे..??

काही नाही असाच निनाद , आयुष्यात या काही महिन्यात एवढी उलथापालथ झाली आहे कि नात्यांची सरमिसळ होते आहे.काय चाललंय नक्की माझ्या आयुष्यात मलाच कळेनासं झालं आहे….

मंदारला विसरता येत नाही आणि नवीन नात त्याच्या बदल शाशांक्ता आहे मनात…..काही चुकत तर नाही ना ? असे सारखे मनात येते. त्याचा स्वभाव तुझा स्वभाव आवडी निवडही खूप वेगळ्या आहेत.काल पासून डोक्यात नुसते तो विरूद्ध तू चालू आहे.पण मी , मी तर तिचं आहे ना… गल्लत होते आहे…विसरते की तू वेगळा आहेस , तुह्या काही वेगळ्या अपेक्षा असतील माझ्याकडून…मला झेपेल का हे सगळे…???

प्रीती किती विचार करते तू…इतका नको करू विचार…वेडी होशील आणि माझ्या अपेक्षा म्हणशील तर त्याची लिस्ट नंतर पाठवतो तुला सध्यातरी तू सकाळ सारखी खुश  रहा, हसत रहा एवढेच. कित्ती दिवसांनी मनापासून हसलीस आज माहिती आहे….आणि हो थोडा वेळ लागेल हे सगळं नीट समजायला उमजायला रुजायला ही… म्हणून म्हणतो वाहत्या पाण्याला वाहून दे ..अडवायचा प्रयत्न करू नकोस…..

निनाद…काही चुकत तर नाही ना….

नाही गा प्रिन्सेस …सगळे बरोबर आहे आणि असणार आहे.. तुला माहिती आहे नात कुठल्या गोष्टीवर टिकते ..ते प्रेम, आदर, पैसा ह्याच्यावर नाही तर नात टिकते ते दोघांच्या इच्छाशक्ती वर… बस आपली इच्छाशक्ती हवी आहे प्रीती ….

????????????????????????????????????????????????????????????????

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

🎭 Series Post

View all