Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 26

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 26

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

Barn house बघून प्रीती हरखून गेली आहे..आपण स्वर्गातच आहोत असा तिला आभास होता आहे…पहिल्यांदा  बघितलेला शुभ्र बर्फाची चादर आणि त्यात अप्रतिम सौदर्याने नटलेला परिसर….निनाद ला ह्या सुंदर जागी आणल्याबद्दल ती अनेकदा त्याला धन्यवाद देते तरी कुठेतरी शब्द अपुरे पडतात…

तिला असे खूप दिवसानंतर..इतके खुश बघून त्याला ही समाधान वाटते….

आत येणार आहेस की आज बाहेरच राहायचा विचार आहे..त्याने तिची तंद्री मोडत विचारले….

बाहेरचं इतके सुंदर आहे….आत जावेसे वाटच नाही आहे..पण ठीक आहे????????????????..आपण समान आत टाकू मग परत बाहेर येऊ..प्लीज ना…मला बर्फात खेळायचे आहे….!!! तिने हट्ट करत म्हटले..

हो येऊ ..पण तू आधी आत तर चल…..

घेऊन आलेल्या चावीने निनाद ने दार उघडले आणि आत पहातच बसला… पूर्णपणे व्हिक्टोरियन स्टाईल ने सजवलेले एक सुंदर से बर्न हाऊस होते ते. मोठाले पोस्टर बेड , पेंटिंगस आणि झुंबर लावून घर सजवलेले होते. मोकळे सोडलेले पांढरे पडदे त्याची अजूनच शान वाढवत होते. सोबत थंडीपासून रक्षण म्हणून एक फायर प्लेस होती. अद्ययावत उपकरणांनी सजवलेले ते उत्तम असे घर होते. जणू एखाद्या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आल्यासारखे वाटत होते. निनाद ने मार्क चे आभार मानले.

दोघांनी हे घर पालथे घातले मग शेवटी एक एक बेडरूम आपल्यासाठी घेतली. सामान टाकले थोडे फ्रेश झाले आणि बाहेर बर्फ खेळायला आले.

दोघही लहान मुलांसारखे बर्फात खेळत होते  कधी बर्फाचे गोळे कर तर कधीच स्नोमन बनव तर कधी उगीचच स्लाईड करायचा प्रयत्न कर अशी मस्ती चालू होती. थंडी आणि त्यातल्या त्यात शिसारी आणणाऱ्या गारव्यामुळे दोघेही चांगलेच लाल झाले होते…

निनाद वाट बघत होता हलक्या हलक्या होणाऱ्या स्नोफॉल ची संध्याकाळ होत आलेली पण अजून स्नो फॉल सुरू झाला नव्हता… मनोमन देवाला प्रार्थना करत होता देवा आज स्नो फॉल  होऊ दे… उगीच नाही तर माह्या सगळ्या प्लॅन चा पचका व्हायचा…!!!
????????????????????????????????????????????????????????????????

दमून भागून शेवटी दोघेही घरात आहे आता गारवा चांगलाच वाढला होता शेकोटीजवळ गरम गरम सूप घेत दोघेही बसले होते निनाद चे लक्ष मात्र बाहेर स्नोफॉल सुरू झाला का … याच्याकडे होते आज दैवानेही साथ द्यायचे ठरवले होते बहुतेक… हळूहळू टेंपरेचर खाली गेले आणि हलका हलका स्नो पडायला सुरुवात झाली.

प्रीती!!!! चल बाहेर स्नो पडायला सुरुवात झाली आहे मजा येईल..

तीही तशीच बाहेर धावत सुटली आयुष्यातला पहिलाच स्नो फॉल होता तिचा….

तो हसला, तिला लांबूनच त्या पडणाऱ्या स्नो मध्ये खेळताना आणि मजा घेताना बघत राहिला.कित्ती खुश होती ती…
चला बच्चू मोठे काम करायचे आहे आपल्याला…

तिच्या जवळ जाऊन उभा राहतो आणि तिला आपल्याकडे वळवून डोळ्यात डोळे घालून तिला म्हणतो  मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं प्लीज आधी ऐकून घे…

तुला पाहिलं की …
असे काय होऊन जात..

माझच मन मला
कसं विसरून जातं….

तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरपून जातं…

तुला घेवून मन
उंच नभात उडून जात…

तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जातो …

त्या रेशमी जाळ्यात
मन गुंफून जात….

तुला पाहिलं की मन वेड होत कळत नाही कसं मनात प्रेम फुलत जात….

I love you Priti….I love you..माझ्याशी लग्न करशील???? मला आयुष्भर साथ देशील??

निनाद !!! काय बोलतोयस हे…!!!हा सगळा काय प्रकार आहे…

तेच जे तू ऐकले….माझे प्रेम आहे तुझ्यावर आणि लग्न करायचे आहे तुझ्याशी….

निनाद आपण फक्त मित्र आहोत….

मी तुझ्यासाठी फक्त एक मित्र असेन पण माझ्यासाठी तु लहानपणा पासून प्रेम आणि फक्त प्रेम आहेस प्रीती…

तुला माझ्याबद्दल सगळे माहिती आहे निनाद तरी पण…

मला नाही फरक पडत त्याने !!!!

तू वेडेपणा करतो आहेस ..!!

उशिरा सुचलेले शहाणपण आहे प्रीती.. आधीच  मी खूप उशीर केला आहे प्रीती…उगीच हेरोगिरी करायला गेलो
..आणि पुढचं सगळे चुकत गेलं… त्यावेळी माझी चूक झाली मी कच खाल्ली..नाही व्यक्त करू शकलो प्रेम तुझ्यावर..पण आता नाही…

निनाद वेडेपणा करू नकोस…तुला कोणीही चागली मुलगी मिळेल…

मला चांगली मुलगी नकोच आहे मुळी…बेस्ट सोडून फक्त चांगली वर का समाधान मानू मी….माझ्यासाठी तूच बेस्ट आहे…remember bestie…

त्याने तिला जवळ ओढले…फक्त एकदा .एकदाच मंदार ला बाजूला ठेव आणि विचार कर ना माझ्याबद्दल…प्लीज…

निनाद ते शक्य नाही आहे…मी नाही विसरू शकत त्याला…

मी त्याला विसर असे कधी म्हंटले आहे प्रीती…फक्त एकदा बाजूला ठेव असाच म्हटले ना…थोडीशी जागा मला पण दे ना तुझ्या आयुष्यात…

तू चूक करतोयस …तुला कळतच नाही आहे मी काय बोलतेय ते…मी तुझ्या प्रेम नाही करू शकत …

मला कळतंय तू काय बोलतेय ते… मी आपल्या दोघांच्या वाटणीचे प्रेम करेन तू नको करुस चालेल….मग तर ठीक आहे ….

मला तुझी सहानुभूती नको आहे…..

वाह !!!! तू सहानुभूती समजते आहेस ना ती चूक आहे तुझी…

माझे प्रेम आहे ते…खोटे वाटत ना तुला …एक मिनिट थांब…दाखवतो तुला…असे म्हणत आपले वॉलेट काढतो….हे बघ हो फोटो आठवतो .४ मधला आहे , ही रिबीन आठवतेय, ५ मधली आहे…शाळेत मार पण खाल्ला होता तुझे केस सोडले म्हणून…अजून बघायचे आहे…एक मिनिट..थांब…असे म्हणत त्याने जॅकेट उतरवले…आणि शर्ट ओपन केला…पाठीवर टॅटू होता …N लिहिलेला होता…नीट बघ बेमालूमपणे त्यात P कोरलेला होता…तुझ्या १८ बर्थडेला मी करून घेतलेला तेव्हा प्रपोज करायचं ठरवलेलं तुला… पण तोपर्यंत तू गुंतली होती त्याच्यामध्ये… म्हणून गप्प बसलो….दरवेळेला तुम्हाला बेस्ट म्हणायचीस ना आतल्याआत मी उद्ध्वस्त होतो दरवेळी.अजूनही वाटतं तुला की माझं प्रेम नाहीये ही सहानुभूती आहे तुझ्यावर म्हणून…..!!!!

प्लीज कपडे घाल ना!!! बाहेर प्रचंड थंडी आहे….असे म्हणत तिने त्याला जॅकेट चढवायला सुरू केले..नकळत पणे तिच्याही डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती…हा आपल्यावर एवढे जीवापाड प्रेम करतो आणि आपल्याला पत्ता सुधा नाही..

तिला असे इतके जवळ बघून त्याने गच्च मिठी मारली…प्रीती…प्लीज ना …विचार कर ना…एकदा फक्त….

काय हवे आहे तुला निनाद…!!!! तिने मुसमुसत विचारले.

तुला काय हवे आहे प्रीती…वेडे तुला तर हे पण नाही कळत की नकळत पणे तू तुझ्या अपेक्षांच्या लिस्टमध्ये माझंच वर्णन केलं आहेस… आठव बाबांशी काय बोललीस ते मुलगा निर्व्यसनी हवा तसा मी काही रोज रोज  घेत नाही, कधीतरी पार्टी वगैरे मध्ये, ते पण इकडे युकेला येऊ शिकलो, शक्यतो इंजिनिअरिंग वगैरे केलेला असावा वेडपट आपण दोघे एकाच कॉलेजमध्ये होतो एकाच वर्गात आपल्या फील्ड पण सेम आहे आणि अगदी गीतकार-संगीतकार नाही पण शास्त्रीय संगीत शिकतो आहे आणि तबला ही चांगला वाजवतो. घरची जबाबदारी म्हणशील तर ती काहीच नाहीये आणि तू नोकरी करावी , मुंबईत सेटल व्हावं अशी माझी पण इच्छा आहे वेडपट कुठली…!!!!!

निनाद ने तिला अजून अजून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला  तुझ्या मनात  थोडा जरी होकार असेल ना तर फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ बस मला बाकी काही नको ….तुझा होकार येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे!!! come what may….

आता चल ना..तिथे बसून बोलू…

नाही…मी नाही येणार आत….

जिद्दी आहेस तू खूप…तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालत म्हटले… आणि रडता रडता हसली. शेवटी तिने होकार दिला.

तो मग जोरात ओरडला पोरगी पटली रे पटली !!!!!!

गप्प रे..काय ओरडतोस !!!! वेडा आहेस का!!!

अरे !!!! इथे आहे कोण ऐकायला……..

तुझी नोटंकी संपली असेल तर आत जाऊया का ???

एक मिनिट प्रिन्सेस …. ये सुंदर पाँव ज़मीन पे मत रखना प्रिंसेस, पाँव ठंडे पड जाएंगे….असे म्हणत त्याने सरळ तिला उचलले आणि घरात घेऊन आला…तिने लाजून डोळे मिटून घेतले.. तिचे हृदय असे जोरात जोरात धडकत होते असे पहिले कधी झाले नाही…

दोघे जाऊन कपडे बदलून आले. तिने किचन मध्ये जाऊन परत साउप गरम केले आणि निनाद ला आणून दिले…तो पर्यंत त्याने फायर प्लेस लावून ठेवली होती….गरम गरम सूप आणि उबदार शेकोटी चा शेक घेत दोघं बराच वेळ शांत बसलेले..

ती शांतपणे डोळे मिटून आपल्याच विश्वात होती.प्रीतीच्या चेहऱ्यावर फायर प्लस मधल्या आगीच्या ज्वाला मुळे वेगवेगळे रंग पसरत होते त्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून येत होते. निनाद टक लावून तिच्याकडे बघत होता…किती बघू आणि किती नाही हे अप्रतिम सौंदर्य असे त्याला झाले होते.

थोड्यावेळाने तिच्याही लक्षात आले की नीना द तिच्याकडे बघत आहे….

तुला कल्पना आहे ना हे सगळं किती कठीण आहे …!!!

माहिती आहे पण घाबरू नकोस माझे थांबायची तयारी आहे… तू  तुला हवा तेवढा वेळ घे….

इतकं सगळं करायची काय गरज होती निनाद काही झाले असते म्हणजे!!! एकतर मैलोन् मैल दूर इथे काहीही नाही त्यात मोबाईल ला रेंज नाही मला गाडी चालवता येत नाही काही झालं असतं म्हणजे…. मी काय केले असते ???

सॉरी ना रागवलीस पण मला स्पेशल बनवायचं होतं हे सगळं… तुला आठवतं मी तुला सांगितलेले मी प्रपोज करेन ना माझ्या गर्लफ्रेंडला तेव्हा सगळाच  स्पेशल असेल..खास  तिच्यासाठी… बघ ना तुझी पहिले युके ची ट्रिप, पहिल्यांदा कंट्री साईडला आलेली, पहिला स्नोफॉल नीरव शांतता सुंदर परिसर आणि एकांत….

चल लेटस सेलिब्रेट…. एक मिनिट आलोच…

तो शंपेन आणि दोन ग्लासेस घेऊन आला…लेट्स टोस्ट…
फॉर लव आणि फ्रेंडशिप अँड लव इं फ्रेंडशिप.. चिअर्स….
ती थोडं तोंड वाकडे करून शंपेन घेतली…पहिलाच घोट एकदम कडू लागला….एकदम काढा प्यायल्या सारखा…

अरे बाबा.. पहिल्यांदा घेते आहेस का …घे नंतर चांगली वाटेल…..पहिल्या पहिल्यांदा कडू लागते…आणि थंडी खूप आहे त्यामुळं गरजेची आहे..
थोड्यावेळ दोघे गप्पं मारत बसले.मग त्याच्या लक्षात आले की प्रीतीला शेंपेन चढत आहे म्हणून तिला उचलून तिच्या बेड वर झोपवले.तिच्या ती काहीतरी बोलत आहे असे त्याला वाटले…म्हणून त्यानं आपले कान तिच्या तोंडाजवळ नेले…

मला सोडून जाऊ नकोस….मंदार….नको जाऊस ..

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...