Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 25

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 25

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

काय बोलताय आहे सर… असे म्हणत तिने हळूच आपला हात सोडवुन घेतला..

मला माहितीये प्रीती तुला वेळ लागेल.. तू विचार करून सांग मी आहे आहे दोन-तीन दिवस अजून… तुझा निर्णय मान्य असेल मला…

आय एम सॉरी सर माझं कोणावर तरी प्रेम आहे आणि मला लग्न करायचे आहे त्याच्याशी मला माफ करा सर… असे म्हणून तिथून जायला निघते.

थांब येते मी सोडतो तुला खूप रात्र झाली आहे एकटी जाऊ नकोस प्लीज. ….????????????????

त्याने तिला टॅक्सी ने घरी सोडले…रस्ताभर दोघा ही एकमेकांची नजर चोरत होते. घरी गेल्यावर मात्र प्रीती खूप रडली… सावर स्वतःला प्रीती ही तर सुरुवात आहे..अजून कदाचित खूप आघात होणार आहेत…….ती बराच वेळ स्वतःला समजावत राहिली….

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शनिवारी सकाळी प्रीती आणि शीना निनादचा घरी भेटणार होते..प्रीती लवकरच पोचली…थोडीफार गप्पा होत होत्या..

सो डीनर डेट कशी होती साहिल बरोबर ?? पकवलं असेल नाही त्यांनी???

हम्म…

ती काहीच बोलत नाही बघून त्याला जाणवले काहीतरी झाले आहे….

काय झालं काय लपवतेस? त्याने विचारले.

साहिलने लग्नासाठी प्रपोज केलय मला…आई बाबा ना भेटू का म्हणून विचारले.

काय???? त्याचे हातपाय थंड पडले हे ऐकुन.आता हा कुठून आला मधेच!!!!

तू काय बोललीस मग?? त्याने हळूच विचारले….

मी नकार दिला त्यांना. ..बॉस आहेत ते माझे..कसे वाटत ते..प्लस वयानेही मोठे आहेत ते माझ्यापेक्षा मी त्यांना मेंटर म्हणून बघते त्यांच्याबद्दल मला काहीच अशा भावना नाही मग कसा होकार देऊ ??? आणि मला भिती ही वाटते त्यांची. आमचे विचार जुळतात  त्यांचा स्वभाव आवडी-निवडी मला काहीच माहीत नाहीत आणि मला थोडा वेळ हवा..इतक्यात लग्न नाही करायचे मला…मलाच क्लॅरिटी नाही अजून ..मला काय हवे आहे त्याची…

मी काही खोटे बोलले नाही त्यांना…मी त्यांना मंदार बदल सांगितले माझे प्रेम आहे त्याच्यावर …मला लग्न करायचे आहे त्याच्या बरोबर….हो ना…

एक सुटकेचा निश्वास सोडला त्याने.पण आपल्याला आता घाई करायला हवी हे मात्र त्याच्या लक्षात आले….

शीना आणि अमन आल्यावर चौघेही परत लंडन पालथा घालायला निघाले दिवसभर टाईमपास करुन शेवटी ते दोघे आपापल्या घरी गेले तर निनाद प्रीतीला घरी  सोडायला निघाला…

निनाद ..उद्या मला ह्या पत्यावर सकाळी ११ वाजता सोडशील??? असे म्हणत तिने एक मेसेज पुढे केला. …

अरे हा तर बोंड स्ट्रीट मधल्या एका फाईव्ह स्टार कॅफे चा पत्ता आहे तुझं काय काम तिथे.???

आई-बाबांनी जो मुलगा बघितला आहे त्याला उद्या मी भेटायला चालली आहे.????????????????????????????????????

???????????????????????????????????????????????????????????? काय सकाळीच म्हणालीस ना कि वेळ हवाय म्हणून आणि आता उद्या भेटायला चालली आहेस??? त्याला काही कळेना.

काय नक्की चाललंय हिच्या मनात काही कळत नाही जरा थांगपत्ता लागू देत नाही हल्ली. डोक्यावर तर परिणाम नाही ना झाला हिच्या.एका दिवसात दोन दोन आघात. हार्ट अटॅक येईल आता मला….

म्हणूनच म्हटले ना फक्त भेटायला जाते लग्न करायला नाही..तिने शांतपणे म्हटले. …

धन्य आहेस तू ..त्याने हात जोडले. …

उद्या संध्याकाळचा लक्षात आहे ना…

शीनाचे आईवडील आले होते दिल्ली होऊन, अमन आणि शीनाचा घरच्याघरी रोका करणार होता. लग्न दिल्लीला होणार होते नंतर. घरचे म्हणून शीनाने निनाद आणि प्रीतीला आमंत्रण दिले होते….

मीना जरा उशिराच दुसर्‍या दिवशी सकाळी तिला घ्यायला गेला खरे तर त्याच्या मनातही नव्हते तिला घेऊन जाणे पण जाणे भाग होते. छान गुलाबी कलरचा कुर्ता आणि त्यावर मोठे कानातले आणि बनारसी दुपट्टा वर हाय हिल्स आणि मोकळे सोडलेले केस ऐश्वर्या राय सुद्धा लाजेल इतकी सुंदर दिसत होती आज प्रीती… अशी तयार होऊन गेलीस ना तो कोणीही मुलगा तुला हो म्हणेल…. त्याच्या मनात आले.

कसली गावठी दिसते तू बदल ते कपडे बिलकुल चांगली दिसत नाहीये!!! त्याने तोंड वाकडं करत म्हटलं.

अरे चांगलं वाटतंय ते. माझ्याकडे इथे एथनिक कपडे जास्ती नाही आणले मी….

जा.. बदल खरच चांगला नाही दिसत आहे…

हो नाही करता करता शेवटी प्रीती साधी जीन्स आणि व्हाईट टॉप घालून बाहेर आली.

हा आता कसं एकदम नाच्रल वाटते…. पण तुझ्या सौंदर्याला लपवणार कसे हे त्याच्या मनात आले….

त्याने तिला बोंड स्ट्रीटवरच्या त्या कॅफेमध्ये सोडले आणि बाहेर बराच वेळ थांबून राहिला.एक एक मिनिट वर्षाप्रमाणे जातो आहे असे वाटत होते त्याला. जवळ जवळ तासाभराने प्रीती बाहेर आली.ती गाडीत येऊन बसली. त्यानेही काही न विचारायचं ठरवून सरळ गाडी तिच्या घराकडे घेतली….

ते घरी पोहोचताच आई वडिलांचा फोन आला. प्रीती आत जाऊन आई-वडिलांशी बोलू लागली. बाहेर निनादला सगळे ऐकू येत होते.बहुतेक बाबा बोलत होते.बाबांनी तिला विचारले कसा वाटला मुलगा ?? काय ठरवले आहे तू पुढचे??? तुझा होकार आहे का?

मुलगा तसा चांगला आहे बाबा पण मला नाही आवडला तो.आमचे स्वभाव, विचार आवडीनिवडी काहीच जुळत नाहीत..

आई मात्र प्रीतीवर भरपूर चिडलेली होती खूप बडबड केली असा मुलगा मिळणार नाही परत नीट विचार कर स्वभाव काय नंतर जुळवून घ्यावे लागतात वगैरे वगैरे खूप ऐकवले पण प्रीती बधली नाही.

मात्र बाबांनीच मग समजुतीने घेतले जाऊंन दे पहिले स्थळ आहे हरकत नाही आम्ही तुझा नकार कळवून टाकतो जशी तुझी इच्छा.पण तुझ्या अपेक्षा कळू दे एकदा…

बाबा…तश्या फार फार अपेक्षा नाहीत बाबा मुलगा चांगला असावा निर्व्यसनी असावा शक्यतो इंजिनियर आणि माझ्याच फील्ड मधला असावा.अगदीच गीतकार किंवा संगीतकार नाही पण निदान शास्त्रीय संगीताची आवड एवढे तरी असवी. मी घरचे सगळे सांभाळायला तयार आहे पण मला नोकरीही करायची आहे आणि शक्यतो मुंबईत राहणारा मुलगा हवा म्हणजे मला तुमच्याकडेही बघता येईल.

ठीक आहे पुढंच्या वेळेस लक्षात ठेवेन ….

थॅन्क्स बाबा  म्हणत प्रीतीने फोन ठेवला…

असा काय बघतोय भूत बघितल्यासारखे… तिने विचारले.

नक्की तूच आहेस ना की अजून कोणी असा विचार करतोय.. हा सगळा काय प्रकार होता.

ऐकलास ना मग का विचारतोयस? मला नाही आवडला मुलगा मी नाही म्हणाली बस आणि तसे पण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये.

का पण???

मी विसरू नाही शकले अजून मला दोन महिने झाले आमचं ब्रेक-अप होऊन पण रोज वाटते की त्याचा फोन येईल किंवा ईमेल तरी येईल किंवा तो स्वतः तरी या उभा राहील आपली चूक झाली हे त्याला जाणवले. परत सगळं पहिल्यासारखे होईल. त्याला विसरणं माझ्यासाठी सोपं नाहीये. तो खुशाल म्हणाला असेल मुलगा बघ, सेटल हो म्हणून पण मला कोणाला फसवायचं नाही आहे. मी कोणालाच खुश नाही ठेवू  शकणार… म्हणून वेळ मागत आहे. मलाही आई-बाबांचे टेंशन समजते. पण मी काय करू मंदार  मला नाही कोणा दुसऱ्याशी लग्न करायचे. त्रास होतो ह्या सा

मी मंदार नाही….निनाद आहे प्रीती….!!!!!
असे म्हणत तो निघून गेला…..

दुपारी जेवून लगेच प्रीती शीनाच्या घरी गेली. निनाद संध्याकाळी उशिरा येणार होता.शीनाकडून सगळी तिची मित्रमंडळी जमली होती. प्रीती ने आज एक छान लेंगा चोली घातला होता. हिरव्या गुलाबी रंगाचा लेंगा चोली तिला खूपच छान दिसत होता. सुंदर हलका मेकअप आणि मोकळे पाठीवर रुळलेले केस आणि हातभर बांगड्या ह्यात प्रीती अतिशय सुंदर दिसत होती…रोका झाल्यावर थोडी नाच-गाणी झाली….मज्जा मस्ती चालू होती.

अमर निनादला विचारले  सिर्फ देखते ही बैठेगा या कुछ करेगा भी??

मतलब मै समझा नही….

अच्छा बच्चू !!!! कब से उसे आखे फाडफाड के देख रहे हो प्यार करते हो तो इजहार करना भी तो सिखो… त्याने प्रीतीकडे इशारा करत म्हटले.

नाही यार !!!! थोडा वक्त देना चाहता हु ऊसे. अभी अभी तो ब्रेकअप हुआ है.थोडा वक़्त तो लगेगा ना…संभालने के लिए औऱ डर लगता है कहीं इन्कार ना करदे..

पागल हो !!! कितना भी वक्त दोगे कम ही पडेगा,  इसलिये कहता हु इजहार कर दो…. वरना मामा मामा कहते हुए उसके बच्चो का केक काटना पडेगा तुम्हे।।????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

निनाद ला अमन काय म्हणतोय ते पटले होत.जास्ती वेळ घालवला तर प्रीतीला अजून कोण तरी बघायला येईल आणि कधीतरी ती हो म्हणेल ही शक्यता खूप होती… आधीच एक मुलगा बघून झाला होता.त्याने  काहीतरी निश्चय केला आणि भराभर फोन करायला लागला…

????????????????????????????????????????????????????????????????

निनाद ने वीकेंडचा प्लॅन बनवला होता..त्याच्या मित्रांचे एक शहरा बाहेर दूर एक barn house होते. तिकडे सगळे जाणार होते. लंडनला हलके हलके हिवाळा सुरू झाला होता..हवेत छान गारवा वाढला होता. लंडन मध्ये जास्ती बर्फ पडत नसल्यामुळे लंडन कर दूर बर्फाची मज्जा घ्यायला  शहरा बाहेर जात…म्हणूनच सगळे वीकेंड ला जाणार होते…प्रीतीचा लंडन मधील हा पहिला हिवाळा होता….शीना कडून तिने भरपूर थंडीचे कपडे घेऊन ठेवले होते….

सकाळी निनाद ने प्रीतीला पीक केले. गाडी शहराबाहेर आली तशी प्रीतीने विचारले…शीना , अमन नाही येत आहेत??

नाही ..शीना च्या आईला इथली थंडी सोडवली नाही बहुतेक ..ताप सर्दी खोकला आहे…म्हणून ती येऊ शकत नाही…मग अमन कसला येतो…!!! डिच केला दोघांनी आपल्याला…त्याने खोटं राग दाखवत म्हटले…

ओह…खूपच थंडी आहे …कसे लोक रहातात इथे काय माहित…

तुला नाही आवडणार इथे राहायला??? त्याने विचारले…

कायमचे नाही रे बाबा..एक दोन वर्ष ठीक आहे …पण आपली मुंबईचं बरी……

पण आपण चाललोय कुठे ते तर सांग…

Nevis Range ला चाललोय आपण…लंडन पासून ५ तासाच्या अंतरावर आहे..एकदम खूप स्नो फॉल होती इथे..एक दम फेमस जागा आहे…गूगल मार …कळेल तुला…ऑफिस मधला आहे ना त्याचे घर आहे तिथे…कोणी रहात नाही तिथे…असाच वीकेंड ला वैगरे देतो तो….गावपासून घर लांब आहे बहुतेक त्यामुळे थोडे सामान घेऊन जाऊ …

हळू हळू लंडन मागे पडत होते..शहरीपणाच्या खुणा मागे पडत होत्या…हलका हलका स्नोकॉल सुरू झाला होता…वातावरण अजूनच गार होत चालेले…हळू हळू शुभ्र बर्फाचा लयेर तयार होत होता…त्ती बाहेर निशब्द पणे बघत होती…नजरेत भरून घेत होती..किती बघू आणि कित्ती नको असे झाले होते….

ते Nevis Range ला दुपार नंतर पोचले. येताना दिसत असणार नजरा काहीच नाही…असे अप्रतिम सौदर्य ह्या शहराला लाभली होती. कित्ती फोटो काढू आणि किती असे झाले होते…त्याने घराचा पत्ता विचारून घेतला ..थोडे सामान घेतले आणि पुढे निघाले…

तो गाडी घेऊन Barn House जवळ पोचले. .. निरतिशय सुंदर लाल घर आणि आजूबाजूला सुंदर उंच उंच बर्फाने अच्छा दीत वृक्ष…दूर दूर पर्यंत नजर जाईल तिथे पांढरी चादर पररलेली..प्रीती त्या घराकडे बराच वेळ बघत  उभी राहिली..

नNevis Range Barn House

आपण स्वर्गात आहोत ना…कित्ती सुंदर आहे..!!!  तिने हळूच विचारले… जणू कोणी ऐकले तर स्वप्नं तुटून जाईल….

बरयाच वेळाने ती भानावर आली…थँक्यू निनाद ..इतकी सुंदर जागा आहे ही…कित्ती सुंदर … माझ्याकडे शब्दच नाहीत हे सगळे कित्ती छान आहेत…it feels so special……❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

 

 

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...