Dec 07, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 24

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 24

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

त्यादिवशी संध्याकाळी पाव भाजी आणि आइस्क्रीम पार्टीचा बेत ठरला प्रितीकडे.  निनाद घरून येणार होता..येताना एक वाइनची बॉटल घेऊन आला. शीना आणि तिचा बॉयफ्रेंड  थोडे उशिरा येणार होते.प्रीतीची लगबग चालू होती…निनाद ने उगीच परत घर आवरल्यासारखे केले आणि छान लाईट मुसिक चालू केले…

प्रित्ती ये ना ..डान्स करू…

काय ??? वेडा आहेस का??? मला नाही येत डान्स बिन्स करता. ..ती ने किचन मधुन ओरडून सांगितले….

ये ना यार…मला तरी कुठे येतो…मस्त मजा येईल …ये ना…

ती येत नाही बघून..शेवटी तिला किचन मधून जबरदस्ती बाहेर घेऊन आला आणि तिच्या बरोबर डान्स करायला जवळ ओढले…

गाणे तरी चांगला लाव जरा..काय रे तू असा !!!!

काय यार तू पण…थांब बदलतो…..मग विचार करून एक गाणे सिलेक्ट करतो. हे छान आहे आणि तिच्या समोर हात पुढे करत म्हणतो मे आय??

अातिफ असलंम च्या सुंदर स्वरात …

तेरा होने लगा हूं
खोने लगा हूं
जबसे मिला हूं
तेरा होने लगा हूं
खोने लगा हूं
जबसे मिला हूं..

तिचा हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि जवळ खेचले आणि हलकेच दोघांची पावले थिरकली…थोडे लाजत  एकमेकांना हसत दोघे डान्स करत असतात..निनाद  गाणे म्हणत असतो जणू आपल्या मनातल्या भावना आज प्रीती जवळ व्यक्त करतो आहे. त्याला असे छान मूड मध्ये गाताना आणि सोबत डान्स करताना बघून ती त्याला हसत असते..

आज कोण तरी भलतेच खुश आहे….मामा बनून !!!!!. ती हसत  विचारते…..

अरे …असा मामा बनायला मला खूप आवडेल…खूप खुश आहे मी अनु साठी…मला वाटले होते की परत कधीच नाही भेटणार अनु..पण तुझ्यामुळे जीवाभावाची मैत्रीण परत मिळाली…

तेवढ्यात प्रीतीचा फोन वाजला..थांब बघते..नक्कीच शीना असेल…

काय यार…मस्त मूड होता आणि फोनला पण आताच वाजयाचा होता…त्याने मनाटल्या मनात फोनला एक दोन शिव्या दिल्या…

निनाद आवाज कमी कर …आईचा फोन आहे…

त्याने गपचूप  आवाज कमी केला आणि एक साईड चे बोलणे ऐकत होता…आधी प्रीती चे बोलणे नॉर्मल वाटत होते पण जसे जसे ती बोलत होती ..तस्सा तिचा चेहरा पडत चालला होता. आईशी काहितरी वाद घालत होती पण बहुतेक कोणी ऐकत नव्हते..शेवटी हो बघते आणि सांगते म्हणून फोन ठेवते आणि धापकान सोफ्यावर बसली..

काय गा काय झालं ..ओल ओके ना?? काय म्हणत होती आई?? भांडलीस का??

निनाद …आई बाबा ने एक मुलगा पसंत केला आहे..पत्रिका जुळ्ल्या आहेत, माझा फोटो हे आवडला आहे त्या लोकांना…मुलगा सध्या लंडनला आहे. आई बाबा भेटून घे सांगत आहेत….मी काय करू आता…!!!

काय!!!!.इतक्या लवकर…!!! आता तर निनाद ही टरकला..मामला सीरियस आहे. अजुन मंदारचे आणि हीचे काही ठरत नाही आणि आता अजून नवीन संकट…!!!

तू मंदारशी बोल…फोन लाव त्याला.. आता SOS बसिस तुम्हाला हातपाय हलवायला लागतील प्रीती….

नको आता नको  प्लीज..मलाच कळत नाही आहे काय करू  ते.नंतर बोलते त्याच्याशी…उगीच तमाशा नको सगळ्यांसमोर…शीना येईलच इतक्यात..मला पण जरा विचार करू दे काय बोलायचे ते त्याच्याशी…

तमाशा??? त्याने मनात विचार केला…खात्री आहे हिला तमाशा होईल ह्याची??

थोड्याच वेळात शीना आणि तिचा बॉयफ्रेंड आले.सगळ्यांनी गप्पा मारत मारत जेवले आणि  शीना थोड्यावेळाने गेली…. तसे दोघांनी हुश केले…

प्रीती ने देवा समोर हात जोडून उभी राहिली.निनाद ही तिच्याबरोबर हात जोडून उभा राहिला..तिला सुखी ठेव बस…तिच्या साठी जे योग्य असेल तेच कर देवा….त्याने देवाला मनापासून मागणे मागितले.

प्रीती फोन कर त्याला. मी आवरतो सगळे…तू बोल त्याच्याशी.सगळे सांग नीट समजावून.तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा…बेस्ट लक.

प्रीती ने मंदारला फोन लावला आणि आई बाबाने मुलगा बघितल्याचे सागितले…मी काय करू मंदार ..मला नाही भेटायचे त्याला.मी काय करू ? मला घरी आपल्याबद्दल सांगायचे आहे .तू बोलशील ना माझ्या आई बाबांशी? .प्लीज…मंदार बोल ना काही तरी ती…. त्याला बराच वेळ विनंती करत राहिली …

प्रीती प्लीज …समजून घे ना!!!!.मी आता नाही लग्न करू शकत लग्न आता.लग्न करून तुला कुठे ठेवू?? माझ्याकडे घर सुद्धा नाही आहे आणि नोकरी पण..अजून शिक्षण पण संपले नाही ..मला बिंजनेस करायचा आहे ..त्याला पैसा वेळ शक्ती सगळे लागणार आहे .मला अजुन ५/६ वर्ष लागतील सेट्टल व्हायला ..प्रीती प्लीज समजून घे ना …काय बोलू तुझ्या बाबांशी…नाही तयार होणार ते लग्नाला..माझ्या कडे ना शिक्षण ना पैसा ना नोकरी ना घर…कोण देईल तुझा हात माझ्या हातात…सांग बघू?? मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला पण आता नाही…खरंच नाही..मला नाही जमणार एवढ्या लवकर लग्न करायला.

तू त्याला मुलाला भेटून  ये…आवडला तर नक्की पुढे जा…माझ्यासाठी थांबू नकोस…स्वतचे आयुष्य नको वाया घालवू माझ्या पायी.

मंदार काय बोलतोयस हे?? मला विसर ..एवढं सोप्प असते ते..? आणि मागते आहे ते मी इतकं??फक्त एकदा माझ्या बाबांशी बोल .. एवढेच ना…बाकी मी सगळे  घेऊन…फक्त साथ दे रे …

काय सारखा तेच तेच प्रीती….सागितलं ना…नाही करायचे आहे लग्न मला…नाही आहे विश्वास माझा लग्न प्रेम वैगेरे वर..तुला सगळे माहीत असून पण तेच तेच बोलून डोके का फिरवते आहे….मला नाही करायचे आहे लग्न तुझ्या बरोबर … कळेले तुला…परत मला फोन करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस…प्रीती..I am breaking up with you..don't call me again ….it's over between us .म्हणत त्याने फोन ठेवला….

प्रीती मात्र शून्यात बसलेली…निनाद ला लगेच कल्पना आली काय  झाले असेल ते .धावत जाऊन तिला जवळ घेतो….प्रीती…प्रीती …ठीक आहेस ना ??? बोल ना…ठीक आहेस ना…काय झाले ….बोल ना…!!!!

मग मात्र ती ढसढसा रडायला लागली….I love him Ninand.. I love him आणि त्याने it's over between us म्हणत सगळे संपवले रे…

बराच वेळ तो तिला जवळ घेऊन थोपटत राहिला..कधी नव्हे ते आज निनादच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने ते थांबवले नाही. आपल्याला का वाईट वाटते आहे हे त्याला कळेना…आज जे झाले त्यामुळे प्रीती दुखावणार हे नक्की म्हणूनच सांगत होतो तिला लांब जायला. तिला असे बघवत नाही म्हणून आपल्याला वाईट वाटते आहे की आपण इतका स्वार्थी विचार केला तिच्याबद्दल म्हणून वाईट वाटतेय…हेच तर हवे होते ना आपल्याला…मग का त्रास होतोय. ….

भवणावेग थोडा ओसरल्या नंतर  तिला जाणवले निनाद ने तिला जवळ घेतले आहे ते…निनाद leave me alone for some time…please..तू घरी जा आता ..तिने दूर जात म्हटले..

मी नाही जाणार इथून प्रीती…!!!!

का????

बिकॉज आय केअर फोर यू इडियट… तुला अशा अवस्थेत एकट सोडायचं नाही मला..

रात्रभर प्रीती जागी होते कसलातरी विचार करत आणि निनाद तिचा हात हातात घेऊन सोबत करत होता… पहाटे कधीतरी त्याला झोप लागली… सकाळी जाग आली ते किचनमधल्या आवाजने… प्रीती किचन मध्ये चहा आणि नाश्ता बनवत होती…

आर यू ओके??? त्याने काळजीने विचारले…

या आय एम फाईन…..तिने हळू आवाजात म्हटले.

आज वर्क फ्रॉम होम कर प्रीती.. जाऊ नकोस ऑफिसला हालत कशी झाली तुझी .. मी घरी जाऊन येतो थोडा वेळ येतोच परत लगेच तोपर्यंत संभाळ स्वताला….

एका रात्रीत काय हालत झाली  रडून रडून डोळे सुजले चेहरा पार उतरला, डोळ्याखाली काळी वर्तुळे आलीत… आवर स्वतःला जितक्या लवकर बाहेर पडशील ह्या सगळ्या पण इतक्या लवकर तू सुखी होशील…त्याने मनातल्या मनात विचार केला..

निनाद घरी येऊन आपला लॅपटॉप आणि तयारी करून परत प्रीती कडे आला तोपर्यंत ती बरीच सावरलेली वाटत होती. दोघांनीही आपापल्या ऑफिसचे काम आज घरून करायचे ठरवले होते..निनाद अधून-मधून तिच्यावर लक्ष ठेवून होता तिने मात्र स्वतःला कामात गुंतवून घेतले होते अशातच आई-बाबांचा परत फोन आला… चौकशी करत होते मुलाचा फोटो बायोडाटा बघितला का म्हणून. ….

सध्या बिझी आहे बघते सांगते आणि ठरवते… असे म्हणून तिने फोन ठेवला…

काय ठरवणार आहेस प्रीती तू???

माहिती नाही पण मी भेटायला जाणार आहे हे नक्की इतक्यात नाही मे बी पुढच्या आठवड्यात…… ती निश्चयाने म्हणाली.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

प्रीतीने ऑफिसला जायला सुरुवात केली. जरी तिने कोणाला सांगितले नसले तरी शीनाला कळते नक्कीच काहीतरी झाले आहे आणि ती खोदून खोदून प्रीतीला सगळं विचारते. मग मंदार आणि तिचा ब्रेकअप झाल्याचे प्रीती तिला सांगते.

अशातच एक दिवस साहिलचा मेल आला. लंडनला येतोय रिव्यू साठी…..

आज प्रीतीचा रिव्ह्यू चालू होता.. क्लाइंट ने प्रीतीचा कामा बद्दल खूप चांगला फीडबॅक रिव्ह्यू दिला होता त्यामुळे आपली निवड कशी योग्य आहे हे बघून साहिल खूपच खूश होता. तिला प्रमोशनसाठी रेकमेंड करणार होता.. प्रीतीने विनंती केली की तिला मुंबई ब्रांच मध्ये ट्रान्सफर हवी… हे ऐकून साहील गोंधळला….

पुणं आवडली नाही की काही इतर प्रॉब्लेम आहे त्याने विचारले

नाही सर घरची आठवण येते आता म्हणून परत जावेसे वाटते…प्रीती ने सांगितले.

संध्याकाळी काय प्लान आहे तुझे त्याने विचारले..

काही नाही सर…

डिनर ला जाऊया खूप दिवस झाले.. तुझ्याशी नीट बोलून येशील?? इन्फॉर्मल डिनर आहे..

हो चालेल सर…

ठीक आहे मी तुला पत्ता वेळ मेसेज करतो पिकप करू की येशील तू ?????

मी  येईन सर….

संध्याकाळी उशिरा प्रीती तयार होऊन साहिल ला भेटायला हॉटेलवर गेली. प्रीती चे अवघडले पण त्याने हळूहळू दूर करायला सुरुवात केली ती तिच्याबद्दल विचारून… तिचे लहान पण तिचं शिक्षण तिची पुढची स्वप्न पुढचे प्लॅन्स वगैरे वगैरे वर जेवता जेवता भरपूर गप्पा मारल्या… शेवटी त्याने हिम्मत करून विचारले तुझ्या आयुष्यात कोणी आहे प्रीती??? मला फार रोमँटिक वागता येत नाही म्हणून सरळच तुला सांगतो…मला तू खूप आवडतेस , आपले विचारही जुळतात …मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल तुझा होकार असेल तर मी तुझ्या आई बाबांना भेटायला तयार आहे…. असे म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला.

❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

काय होईल पुढे ? प्रीती होकार देईल साहिलला?? मंदार आणि प्रीती परत कधीच एकत्र येणार नाहीत ??मग निनाद च काय ?

 

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...