Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 23

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 23

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

काय झाले प्रीती ?? त्याने घाबरून विचारले…घरी सगळे ठीक आहे ना???

निनाद …हे बघ…तिने मोबाईल समोर धरला…

मंदारचा मेसेज होता…Mom expired yday nite .Gng to Mumbai. ….

हम्म्म…

मला गेले पाहिजे निनाद..त्याला गरज आहे माझी…एकटा पडला असेल ते तो…कोणीच नाही रे त्याला जवळचे…चल ना फ्लाईट आहेत का बघू….चल ना….ती काकुळतीला येत म्हटले…उगीच घाई करू लागली. …तिला सांभाळणे
निनादला जड जात होते…

ठीक आहे..घरी जावे लागेल .लॅपटॉप घरी आहे …तिकडे जाऊ मग बघू काय करायचे ते…ठीक आहे.. रील्लॅक्स…. तिला कसेबसे समजावत तो म्हणाला…

ती मात्र त्याचा सारखा फोन ट्राय करत राहते.

नाही लागणार फोन..प्रीती..तो फ्लाईट मध्ये असेल एक दिवस जाईल त्याला मुंबईला पोचायला.तो पर्यंत काही कॉन्टॅक्ट होणार नाही त्याच्याशी…चल घरी जाऊ मग पुढचे ठरवू…तू टेन्शन नको घेऊ प्लीज….

दोघा निनाद च्या घरी येतात..ती मात्र सुन्न पणे विचार करत बसलेली असते..तिला गरम गरम कॉफी देऊन तो लॅपटॉप घेऊन बसतो…..

प्रीती उद्याची फ्लाईट मिळेल तुला. बुक करू का??

तू विचार केला असशील ना काय काय घेऊन जायचे ते.ऑफिस मध्ये सांगावे लागेल तुला..अचानक मुंबईला का गेलीस तू आणि हो घरी काय सांगणार आहेस ते ठरवले असशील ना???

प्रीतीने चमकुन निनादकडे बघितले.. अरे आपण तर हा विचार केलाच नाही….!!!

त्याने शांतपणे लॅपटॉप बंद केला आणि म्हणाला…

डोके ठिकाणावर आहे ना तुझे?? चालली मुंबई ला?? जवळ आहे का लंडन आणि मुंबई?? काय सांगणार होतीस घरी जाऊन? का आलीस अचानक निघून?? कित्ती टेन्शन दिले असते घरच्यांना काही कळत की नाही तुला???
आणि नोकरी वर ठेवले असते का तुला ह्या लोकांनी?? करिअर बरबाद करायचे आहे तुला स्वतःचे?? आणि काय ग कुठल्या नात्याने तिकडे जाणार होतीस ?? तुमच्या दोघांच्या ही घरी माहिती नाही तुमच्याबद्दल….असे सांगणार होतात तुम्ही दोघा सगळ्यांना?? त्याचे सोड.. तुझ्या घरी चालेले असते ह्याचा विचार केला??
आता फक्त नाव नोंदवून गप्प बसलेत तुझे आई बाबा ..असे काही करशील ना…तर सरळ जो मुलगा पहिला येईल ना त्याच्याशी लग्न लावून मोकळे होतील तुझे….मग बस मंदार मंदार चा जप करत..

बावळट कुठली…..चालली लगेच मुंबई ला…तसे पण तू जाणार कुठे होतीस गा?? कुठे राहते त्याची आई सध्या हे तरी माहिती आहे का तुला??? आणि त्याने तुला फक्त सांगितले आहे ते म्हणून नाही बोललो तो…काय नाते आहे तुमच्यामध्ये ना तुमचा लग्न ठरले आहे ना साखरपुडा झाला आहे ना कसली बोलणी इन्फॅक्ट तो तर लग्नाला पण नकार देतो आहे….मग तू का जावस ?? हा विचार कर प्रीती….बाकी तुझी मर्जी….

असे म्हणून तो आत जायला वळतो…प्रीती त्याचा हात धरून त्याला थांबवते….सॉरी…. .मी विचार नाही केला…मला फक्त त्याची काळजी वाटली म्हणून जायचे होते….ती मुसमुसत म्हणते.

सॉरी प्रिन्सेस …मला तुला दुखवायचे नव्हते पण तू अशी वेड्या सारखी वागते मग बोलावे लागले मला…त्याने तिच्या डोक्यावर अलगद हात फिरवत म्हटले…

बी प्रॅक्टिकल प्रीती…तू अशी दर वेळेला इमोशनल होते त्याच्या बाबतीत आणि त्याचा फायदा उठवतो तो…त्याचे नाव घेतले की माहिती नाही का तू तुझी सारासार बुध्दी कुठे जाते ते .त्याला गरज नाही आहे तुझी..असती तर मेसेज केला असता त्याने…फक्त माहिती दिली तुला आणि तुझ्या तिथे जाण्याने प्रॉब्लेम्स अजून वाढतील नाही का तुमच्या दोघासाठी? ते चालेल का ??

एक काम कर तो उद्या पर्यंत मुंबईला पोचेल…मग तू त्याला फोन कर आणि मग ठरव पुढे काय करायचे ते.पण तो पर्यंत शांत रहा आणि प्लीज इथून जायचा घाईघाईत निर्णय घेऊ नकोस….

चल जा झोपयला आता … उशीर झाला आहे.तिची झोपायची व्यवस्था आज स्वतःच्या बेडरूम मध्ये करून देतो आणि स्वतः सोफ्यावर बराच वेळ जागा राहतो…त्याला माहिती होते प्रीती पण आत जागीच असेल…अशी कशी ही वेडी?? इतकी हळवी आहे त्याच्या बाबतीत? ह्याला प्रेम म्हणतात का???? काय विचार करत असेल आता ? जाऊन बघू का ?? नकोच नाही आवडणार तिला…फोन करून बघतो….मोबाईल वर चात विंडो उघडून बघतो तर प्रीती ऑनलाईन होती……मंदार ची वाट बघते आहे बहुतेक….तिला गुड नाइट मेसेज टाकून तो शेवटी डोळे बंद करून पडून राहतो….

इकडे प्रीती ही फोन घेऊन निनाद काय बोलला त्याचा विचार करत असते…जे काही बोलला ते कटू सत्य होत…पाहिले राग आला तिला निनाद चा पण नंतर विचार करत करत झोपून गेली…दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली तर निनाद तयार होत होता…बाहेर जायला…

मी पण येऊ तुझ्याबरोबर?? प्लीज..?

मी जॉगिंग ला चाललो आहे…त्याने शांतपणे तिच्याकडे न बघत म्हटले..

मी पण येते…

बाहेर खूप गारवा आहे….नको येऊस ..

मला यायचे आहे..जॅकेट दे एक..

दोघे जवळच्या पार्क मध्ये जॉगिंग साठी येतात..बाहेर तुरळक लोक होती पार्क मध्ये संथ गाती ने दोघे एका लयीत जॉगिंग ला सुरुवात करतात…४ राऊंड दोघे एकत्र जॉगिंग करत शेवटी निनाद बसतो पण प्रीती मात्र आपलाच नादात त्याच्या पुढे निघून जाते..एक लय पकडुन ती धावत आहे..मनात वादळ उठलाय हे नक्की…नाही तर ही आणि एवढ्या व्यायाम शक्यच नाही…मह्या जॅकेट मध्ये छान दिसते आहे …थोडे मोठे होते पण क्युट देस्ते, केस असे छान झोकदार पणे हेलकावे खात आहेत…आणि कानातले मस्त डुलत आहेत …मोहक च दिसते ती..फक्त एक चेहरा आज सोडला तर ..कसली उदासी आहे चेहऱ्यावर…..कठीण आहे बाबा….सांभाळायला पाहिजे…

शेवटी तो तिच्या समोर उभा राहिला…बस कर आता …७ राऊंड झाल्या…पूर्णपणे घामाने डावरलेली होती…घामाचे बिंदू कपाळावर चमकत होते..मतीचा चेहरा अजूनच तेजस्वी दिसत होता त्यामुळे….स्वतःच्या भावना ना थांबवणे कठीण जात होते निनाद ला…

बरे वाटले धावून…आता मोकळे वाटतेय ….श्वास कोंडत होता रात्रभर…

हम्म.. अती विचार करू नकोस ना मग …इथे आजारी पडशील ना …तर खरच परवडणार नाही तुला आणि मला ….प्लीज काळजी घे….

येताना तिने ब्रेड अंडी घेऊन परत आली, चल भूक लागली आहे ..रात्री जेवला पण नाहीस ना..माझे एक ठीक आहे तुझे काय आहे तू का उपाशी झोपलास ???

वाह तू इथे रडारड करत बस आणि मी इथे जेवून घेईन असे वाटले तुला …हेच ओळखलेस ना मला ???

सॉरी…पुन्हा असे नाही होणार…

नाश्ता करून ती आपल्या घरी निघाली…निनाद दुपारी जेवायला ये..थोडे उशीर ये पण ये…येशील???

येतो…जास्ती काळजी करत बसू नकोस….

दुपारी प्रीती आणि निनाद एकत्र जेवतात आणि निनाद मूवी लावून बसतो…ती ही मग बाजूला येऊन गोलमाल बघत बसते..मोवि बघता बघता दोघा ही झोपून जाते….जाग येते ते प्रितीच्या फोन ने….

निनाद चा चेहरा पडला …मंदार चा फोन असेल … ती ने इशारा करून सागितले आई चा फोन आहे …हुष कसले बरे वाटले…आईंचा फोन आहे म्हणून सांगितल्यावर…रात्र होत आली तरी अजून मंदार चा फो लागत नव्हता की मेसेज नव्हता…इकडे प्रीती चे घालमेल वाढत होती…. शेवटी ना राहून तिने म्हटले…

पोचला असेल ना तो निनाद…फोन पण लागत नाही अजून…

इंटरनॅशनल रोमिंग नसेल त्याचे…आणि इंडियाचा नंबर बंद असेल ना त्याचा…..

हम्म..तिची तगमग ना बघून त्याने थोड्यावेळाने शेवटी त्यानेच विचारले…तुझ्याकडे त्याच्या घरचा अॅड्रेस आहे??? मला दे जरा ..

निनाद नंतर बराच वेळ कोणकोणते नंबर वर बोलत होता … बराच वेळाने म्हटले…सांगितले आहे एक दोन जन्नना…ह्या पत्यावर जाऊन चेक करायला …करतील फोन थोड्यावेळात….तू काळजी नको करुस इतकी….

बराच वेळा नंतर निनादचा फोन वाजला. थोडा वेळ बोलून त्याने फोन ठेवला…काय झाले??काही पत्ता लागला का त्याचा??कोणाचा फोन होता??काय म्हणाले??? ती ने उत्सुकतेने विचारले???

बस सांगतो…मित्राचा होता…तो गेला त्या पत्यावर..घर बंद होते म्हणून आजबजुला चौकशी केली तर कळले की ह्या घरी कोणी राहत नाही गेले २ वर्ष पासून…त्याबाई आपल्या बहिणी कडे राहायला गेल्यात एकट्याच असतात म्हणून आणि अजून तरी कोणी फिरकले नाही तिकडे….

मला वाटते, की त्या मंदरच्या मावशी कडे राहता असतील…..तिथेच त्यांचे सगळे कार्य वैगेरे केले असेल. नाहीतरी इथे घर बंद आहे…साफ सफाई, इत्तर तयारी करायला कोणी तरी हवे ना…

प्रीती …ठीक आहेस ना…तुझ्याशी बोलतोय

हम्म…हो…ठीक आहे..

तो आपल्या मावशी कडे आहे म्हणजे आपल्याच घरी असेल ना…लक्षात नसेल आले फोन चे..करेल एक दोन दिवसात…तू टेन्शन नको घेऊस..होईल कॉन्टॅक्ट…..

चार पाच दिवस गेले तर मंदार काही कॉन्टॅक्ट होई ना..ऑफिस च्या कामात ही लक्ष लागेना..कुठे गेला असेल.?? रोज त्याच्या फोन ची आतुरतेने वाट बघत होती…तिला मंदार ची खूप काळजी वाटत होती.एकटाच असेल .आईसाठीच तर एवढे लांब गेला शिकायला. ..कसा रहात असेल एकटा?? सोप्पं थोडी आहे परदेशात राहणे..बघतो आहे ना आपण…तरी बरे आपल्यासाठी निनाद तरी आहे..काही झाले की निनाद करतो आपण…तो तर तिथे एकटा…अनेक विचारांनी डोके सुन्न होऊन जायचे.

त्या शनिवारी निनादला हट्टाने बाहेर घेऊन गेला…कसे बसे तिला राजी केले. ..दूर कंट्री साईड ला घेऊन गेला. दूर दूर पर्यंत पसरलेले हिरवेगार गालिचे , मस्त चारणाऱ्या गाई , हलका हलका पाऊस आणि निरव शांतता….त्याने तिचा मूड बघून भीमसेन जोशी ची सी डी लावली….

थॅन्क्स…तिने हलकेच हसत म्हटले…
संध्याकाळी तिला घेऊन परत आला तेव्हा प्रीती बऱ्यापैकी मोकळी झाली होती…

त्यानंतर २० दिवसांनी एक दिवस मंदार चा फोन आला… अवचितपणे. बराच वेळ बोलत होता आपले मन मोकळे करत होता…आई हल्ली आजारीच असायची… एकटेपणा म्हणून शेवटी मावशी कडे राहायला गेली होती..तिथेच तब्येतीची कुरबुर सुरू होती. अशात आई ला हार्ट आटॅक आला आणि काही कळायच्या आता सगळा खेळ संपला होता.  ह्या सगळ्या गडबडीत फोन करायला सुचले नाही.
घर पण विकायला काढले आहे.आता इतक्यात येता येणार नाही.बाकी कोणी नाही बघायला…बाबा आणि आंटी तर फिरकले सुद्धा नाही…आंटीचे एक ठीक आहे पण बाबा ..त्याला काहीच वाटले नसेल का ?? त्यांना वाटते मी शिकून परत यावे.त्यांचा बिजनेस सांभाळावा..
मला नाही पटत ते..मला काही नको त्यांचे.माझा विश्व मी उभारेन….वेळ लागेल पण उभारेन नक्की.एक एक पाश सोडेवतोय आणि २/३ दिवसात मी पुन्हा अमेरिकेला जातोय…

प्रीतीने थोडा वेळ त्याचे सांत्वन केले त्याला धीर दिला आणि फोन ठेवला…मनात मात्र  अनेक प्रश्न होते..घर विकले म्हणजे? परत येणार नाही कधी? मुंबईशी संबंध संपला?? मी कुठे आहे ह्या सगळ्यात?? आहे की नाही?? एक एक पाश सोडवतोय म्हणजे काय?? काय म्हणायचे असेल ह्याला…..

पण त्याचा फोन आला ह्यातच तिला समाधान…तिने निनाद ला फोन करून सांगितले मंदारशी बोलणे झाले. थोडे जुजबी बोलून त्याने फोन ठेवला.
तिचा तो समाधानी आवाज ऐकुन त्याला खूप बरे वाटले….तू खुश रहा बस प्रिन्सेस ..बाकी मला काही नको

????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️????️

तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा….तुमच्या प्रतिक्रयांमुळे मला कथा कशी  वाटली ते कळते.

 

 

You can now read the complete story on my wordpress blog PKs Diary. https://littlesecretmusings.wordpress.com/

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...